AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवा घातक, पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाचा मोठा इशारा, राज्यात थेट…

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषण हा गंभीर मुद्दा बनलाय. यामुळे आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता असून थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला.

हवा घातक, पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाचा मोठा इशारा, राज्यात थेट...
Maharashtra Weather
| Updated on: Jan 04, 2026 | 7:29 AM
Share

देशातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कडाक्याच्या थंडीनंतर अचानक राज्यात वर्षाच्या पहिल्याच दिवसी पाऊस झाला. झपाट्याने वातावरण बदलत आहे. उत्तरेकडून थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून गारठा वाढणार आहे. उत्तरेकडून राज्यात शीत लहरी येत आहेत आणि पारा अधिकच खाली जाताना दिसत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातही थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून थंडी वाढली. काही भागात अवकाळी पावसाचा इशाराही देण्यात आला. जानेवारी महिना उजाडला असूनही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. मुंबईमध्ये वायू प्रदूषण हा मोठा मुद्दा बनले आहे. मुंबईत प्रचंड वायू प्रदूषण वाढले असून काल रात्री सर्वत्र फक्त आणि फक्त धूळ दिसत होती. आकाशात स्पष्ट काही दिसतही नव्हते. मुंबईतील वायू प्रदूषणाचा थेट परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शिवाय थंडीही वाढेल. जळगाव येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. जळगावात 9.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली त्यानंतर धुळात 9.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. दुसरीकडे जेऊर येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सतत हवामानात बदल आणि वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, गळ्यात दुखण्याच्या समस्या वाढल्या आहेत. वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने नागरिकांना मास्क घालून फिरण्याचा सल्ला दिला. हेच नाही तर ज्यांना श्वसनाचे आजार आहेत, अशांनी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असेही म्हटले.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजधानी दिल्लीतील तापमान 5 जानेवारीपर्यंत आणखी खाली येण्याची शक्यता आहे. तापमान घटत असल्यामुळे हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. थंडीच्या लाटेचा तब्बल पाच राज्यांना इशारा देण्यात आला. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याचीही शक्यता आहे.

BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा
BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा.
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य.
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला.
बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेताना अमित ठाकरे झाले भावूक
बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेताना अमित ठाकरे झाले भावूक.
ठाण्यात उमेदवारांना दमदाटी! अविनाश जाधवांचा गंभीर आरोप
ठाण्यात उमेदवारांना दमदाटी! अविनाश जाधवांचा गंभीर आरोप.
Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं
Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं.
गॉगल लावत, कॉलर उडवली अन् उदयनराजे गाण्यावर थिरकले | VIDEO
गॉगल लावत, कॉलर उडवली अन् उदयनराजे गाण्यावर थिरकले | VIDEO.
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?.
चंद्रपूरनंतर अमरावतीत फडणवीसांचा रोड शो; भाजप नेत्यांचा सहभाग
चंद्रपूरनंतर अमरावतीत फडणवीसांचा रोड शो; भाजप नेत्यांचा सहभाग.