AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या नवरीच्या डोळ्यात अश्रू… पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तो सीमेवर, देश आधी, बाकी नंतर… वाशिमच्या सुपुत्राला सलाम

वाशिम जिल्ह्यातील कृष्णा अंभोरे आणि मध्य प्रदेशातील मोहित राठौर या दोन नवविवाहित सैनिकांनी भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लग्नानंतर लगेचच ड्युटीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या देशभक्तीच्या कृतीने सर्वांनाच प्रेरणा दिली आहे.

नव्या नवरीच्या डोळ्यात अश्रू... पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तो सीमेवर, देश आधी, बाकी नंतर... वाशिमच्या सुपुत्राला सलाम
Krishna Ambhore
| Updated on: May 09, 2025 | 8:27 PM
Share

सध्या भारत -पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सैन्यदलासह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच आता वाशिम जिल्ह्यातील एका गावचा सुपुत्र कृष्णा अंभोरेने आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेचे एक अनोखे उदाहरण देशासमोर मांडले आहे. नुकतेच कृष्णा विवाहबंधनात अडकला होता. त्याचे लग्न झाले होते. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी काही क्षणाचाही विलंब न करता कृष्णा भारतमातेच्या सुरक्षेसाठी तात्काळ निघाल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं काय घडलं?

वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे या गावचा सुपुत्र कृष्णा राजू अंभोरे याने आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेची एक अनोखी मिसाल सादर केली आहे. नुकतंच त्याने लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या केवळ दोनच दिवसांनंतर सैन्यदलाकडून त्याला बोलवण्यात आले. त्यानेही क्षणाचा विलंब न करता देशसेवेसाठी तात्काळ सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे नवविवाहित पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पण कृष्णाच्या डोळ्यात केवळ राष्ट्रसेवेचं समर्पण होतं. त्याने भावनांच्या काठावर उभं राहून तात्काळ ड्युटीवर रवाना झाला.

आज दुपारी २.३० वाजता कृष्णा अंभोरे हा उत्तराखंडमधील ड्युटीसाठी वाशिम रेल्वे स्टेशनवर पोहोचला. तेव्हा गावातील नागरिकांनी त्याला देशभक्तीच्या जयघोषांसह निरोप दिला. यामुळे गावातील वातावरण देशप्रेमाने भरून गेले होते. गावकऱ्यांनी “जय जवान”, “वंदे मातरम्” अशा घोषणा देत त्याचं कौतुक केलं. गावातील वृद्धांपासून लहानग्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता. कृष्णाचं हे पाऊल संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरलं आहे. “देश आधी, बाकी नंतर” हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे.

कृष्णाच्या नवविवाहित पत्नीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पतीच्या सहवासाचा आनंद पुरेपूर उपभोगण्याआधीच विरहाचे दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पण कृष्णाने या भावनांचा विचार न करता तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. तात्काळ ड्युटीवर रवाना झाला.

मध्यप्रदेशातही वीर सैनिकांची कथा

तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एका वीर सैनिकाची कथाही समोर आली आहे. कुरावर गावचा रहिवासी मोहित याचे नुकतेच लग्न झाले होते. १८ एप्रिल ते १५ मे पर्यंत तो लग्नासाठी सुट्टीवर आला होता. गुरुवारी तो विवाहबंधनात अडकला. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावामुळे मोहितची सुट्टी रद्द झाली. मोहित लग्न होऊ घरी पोहोचल्यानंतर त्याला ड्युटीवर परत रुजू होण्यास सांगितले. यानंतर त्याने पत्नीला हे सांगताच तिनेही यासाठी होकार दिला.

मोहितचे वडील महेश राठौर गावात किराणा दुकान चालवतात. मोहितला बुधवारीच मुख्यालयातून फोन आला आणि शनिवारी त्याला ड्युटी जॉईन करायची असे सांगण्यात आले. त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याने परतण्याची तयारी केली. मोहित म्हणाला, ‘मला भारत मातेच्या रक्षणासाठी योगदान देण्याची संधी मिळाली आहे. मी माझ्या नवविवाहित पत्नीच्या परवानगीने जात आहे.’ मोहितचे सासरे गोपाल राठौर यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली. आमच्यासाठी देशाची सुरक्षा सर्वात आधी आहे. मोहित ड्युटीवर जात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला हे आधीच माहिती होते. पण विधी पूर्ण होईपर्यंत आम्ही मुलीला काही सांगितले नाही.’ असे गोपाल राठौर यांनी म्हटले.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.