AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP: 2029 मध्ये विलनीकरण करून एकत्रित निवडणूक लढणार, बड्या नेत्याचा दावा…राष्ट्रवादी अंतर्गत घडामोडी वाढल्या?

NCP Merger: सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादळं आलेले आहे. तटकरे आणि पटेल हे नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्याचवेळी दादांच्या गोटातील बड्या नेत्याने पुन्हा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला हवा दिली आहे. काय केला आहे बडा दावा?

NCP: 2029 मध्ये विलनीकरण करून एकत्रित निवडणूक लढणार, बड्या नेत्याचा दावा...राष्ट्रवादी अंतर्गत घडामोडी वाढल्या?
राष्ट्रवादी विलिनीकरणImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 16, 2026 | 11:13 AM
Share

NCP Merger: अजितदादांच्या राष्ट्रवादीत सध्या घमासान सुरू असल्याचे दिसते. बडे नेते नाराज आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे पक्षाच्या कार्यकारिणीत कोणत्या पदावर आहेत हाच मोठा प्रश्न आहे. त्यातच तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. तर त्याचवेळी अजितदादांच्या गोटातील एका बड्या नेत्यानं पुन्हा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा हवा दिली आहे. 2029 मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन विधानसभेची निवडणूक लढवतील असा दावा या बड्या नेत्याने केला आहे.

तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

सत्तेत जर यायचं असेल तर विलीनीकरणाची आवश्यकता काय ? 2029 मध्ये विलनीकरण करून एकत्रित निवडणूक लढता येऊ शकते. सत्तेत राहायचं किंवा सत्तेतून बाहेर जायचं याचा खुलासा शरद पवारांच्या नेत्यांनी आजपर्यंत केला नाही. आम्ही एन डी ए मध्ये निवडणूक लढवली व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारलं व आमचा घटक पक्ष म्हणून आम्ही योग्य पद्धतीने काम करतोय. त्यामुळे एन डी ए मध्ये सहभागी व्हायचं असेल तर मग चर्चांना अर्थ राहील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत शरद पवारांनी जे भाष्य केलं, दादा गेल्यानंतर त्यावर अनेकदा चर्चा झाली. मात्र विलीनीकरण जर करायचं असेल एक पक्षाचा विलीनीकरण करून आम्ही सत्तेच्या बाहेर यायचं की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सत्तेमध्ये यायचं, याचे उत्तर मात्र काही कोणी देत नाही. जर याबाबत खुलासा केला तर विलीनीकरणाबाबत स्पष्टता येईल. जर विलीनीकरण करायचं असेल तर सत्तेमध्ये जायचं याचा खुलासा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी जाहीरपणे केला पाहिजे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली तर मग विलीनीकरणाबाबत चर्चा होऊ शकते. एकीकडे काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत आघाडी सोबत काम करायचं आणि विलीनीकरणांची चर्चा करायची त्यामुळे या चर्चा अर्थहीन आहेत असं माझं मत आहे, असे पाटील म्हणाले.

तटकरेंच्या भेटीदरम्यान शरद पवारांचं मौन

१२ मे ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत घडामोडींबाबत पटेल- तटकरे शरद पवारांशी बोलले तेव्हा शरद पवारांनी केवळ ऐकून घेतले, प्रतिक्रीया देण्याची घाई केली नाही. मात्र,राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडी या त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न, शरद पवार कुटुंबातील ज्येष्ठ या नात्यानं कुटुंबप्रमुख ही भूमीका बजावू शकतात असा सूर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील नेत्यांचा असल्याचे समोर येत आहे.

पार्थ पवार अजितदादांची जागा घेऊ पाहाताय

सध्या पार्थ पवार एनसीपीचे सर्वेसर्वा, त्यांना असं वाटतं की ते दादांची जागा घेत आहे, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली. प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांना त्यांचच औषध पार्थ पवारने पाजलं, असा चिमटा त्यांनी काढला. पार्थ पवार हे त्यांना हवंय ते करताय. त्याचीच गँग ते घेऊन फिरत आहेत. त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. एनसीपीचं राष्ट्रीय गणित पार्थ पवार पाहत आहेत. त्यामुळे धूसफुस वाढल्याचे दमानियांचे मत आहे.

Follow Us
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकारी
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकाऱ्यांसह अनेकांचा पक्षाला रामराम...
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या आता...
आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Raj Thackeray | आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
याची देही, याची डोळा... ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर.....
याची देही, याची डोळा... ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर शिवराज्याभिषेकासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी
भुजबळ की आणखी कोणी..? राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्र होणार? राष्ट्रवादी
भुजबळ की आणखी कोणी..? राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्र होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष
आपलीच माणसं पैसे मागतायेत मग... विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट,
आपलीच माणसं पैसे मागतायेत मग... विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट, थेटच सांगितलं उमेदवाराच्या माघारीचं राजकारण
एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं
Sanjay Raut UNCUT | एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं, म्हणत संजय राऊतांचा पलटवार
जोपर्यंत बॅलेट पेपरवर... संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा,
जोपर्यंत बॅलेट पेपरवर... संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा, राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? बडा नेता ACB च्या रडारवर!
Shivsena ubt | ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? बडा नेता ACB च्या रडारवर! मालमत्तेच्या चौकशीने खळबळ
शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज! किल्ले रायगडावर ऐतिहासिक 353
Video | शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज! किल्ले रायगडावर ऐतिहासिक 353 व्या राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह