AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : रूसू बाई रूसू….महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रूसला? रोहिणी खडसे यांचा एकनाथ शिंदेना कवितेतून जोरदार टोला

Rohini Khadse attack on Eknath Shinde : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीला चांगलेच चिमटे काढले आहे. त्यांच्या शालाजोडीने सध्या एकच खसखस पिकली आहे. त्यांनी कवितेतून महायुतीसह त्यांच्या प्रमुख नेत्यांना चांगलाच टोला हाणला आहे.

Eknath Shinde : रूसू बाई रूसू....महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रूसला? रोहिणी खडसे यांचा एकनाथ शिंदेना कवितेतून जोरदार टोला
रुसू बाई रुसू
| Updated on: Dec 03, 2024 | 4:09 PM
Share

ऐतिहासिक बहुमत असताना सुद्धा महायुतीचे सरकार अस्तित्वात येण्यासाठी वेळे लागत आहे. राजकारणात पडद्या आड नाराजी नाट्याचा अंक सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहे. इतके बहुमत असताना सुद्धा जल्लोष दिसत नसल्याने आता विरोधकांचे महायुतीवर हल्ले वाढले आहेत. संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह अनेक नेते तोंडसुख घेत असतानाच आता शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सुद्धा शालजोडीतून हाणले आहे. त्यांनी कवितेतून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि महायुतीला चांगेलच चिमटे काढले आहेत. त्यामुळे एकच खसखस पिकली आहे.

अजून नवरदेव ठरेना

महायुतीमधील संभ्रमावर त्यांनी चांगलीच टोलेबाजी केली. पत्रिका छापून तयार आहेत. पण नवरदेव ठरला नसल्याचा टोला त्यांनी महायुतीला लगावला. अनेकजण अनेक अपेक्षा ठेवून निवडणुकीला सामोरं गेले होते. आता कुठं वादाला सुरुवात झाली आहे. भविष्यात हे वाद वाढतील. शपथविधी तोंडावर असतानाही त्यांचा मुख्यमंत्री ठरलेला नाही, यावरून रोहिणी खडसे यांनी महायुतीवर प्रहार केला होता.

रूसू बाई रूसू

आज रोहिणी खडसे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याचा खरपूस समाचार घेतला. दिल्ली दरबारी जाऊन आल्यापासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा होत आहे. त्यांनी मोदी आणि शाह ठरवतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगितले असले तरी त्यांची सध्याची भूमिका बरंच काही सांगून जात असतानाच आता खडसे यांनी कवितेतून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. खडसे यांनी एक्सवर याविषयीची एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी रुसू बाई रुसू या मथळ्याखाली शिंदे आणि महायुतीला चिमटे काढले आहेत.

रुसू बाई रुसू

रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू, आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू। आहा… ही ही… हो हो, आता तुमची गट्टी फू!

लालबाल, बारा वर्षं, बोलू नका कोणी, चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी। महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला? सांगशील का माझ्या कानी, राग तुझा कसला?

अशी जोरदार फटकेबाजी त्यांनी या कवितेतून केली आहे.

ईव्हीएमविरोधात एल्गार

विधानसभेच्या निकालानंतर अनेकांनी ‘ईव्हीएम’वर शंका घ्यायला सुरुवात केली आहे. पराभूत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना निकालानंतर ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी संधी दिली जात आहे. तीन मतदारसंघातील उमेदवारांनी २७ ईव्हीएममधील मतांची पडताळणी आणि तपासणीसाठी १२ लाख ७४ हजार ४०० रुपयांचे शुल्क भरले आहे. त्यानुसार मुक्ताईनगरमधील १६ पाचोन्यातील ८ आणि एरंडोलमधील 3 ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी होणार आहे.

विधानसभा मतदारसंघातील पराभूत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना निकालानंतर ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी सात दिवसांची मुदत दिली जाते. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला असताना ३० नोव्हेंबरपर्यंतच्या मुदतीच्या कालावधीत तीन मतदारसंघातील तीन उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला आहे. मुक्ताईनगरमधील रोहिणी खडसे, पाचोऱ्यातील वैशाली सूर्यवंशी आणि एरंडोलमधील डॉ. सतीश पाटील या तीनही पराभूत उमेदवारांनी अर्जासह शुल्काची रक्कमही भरली आहे. हे तीनही उमेदवार निकालात दुसर्‍या स्थानी आहेत.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.