Kashmir Pahalgam Terror Attack LIVE : कुणाल कामराला मुंबई हायकोर्टाचा दिलासा
Kashmir Pahalgam Terror Attack LIVE News and Updates in Marathi : काश्मीरमधील पहलगाम, बैसरन, सोनमर्ग, गुलमर्ग, शंकराचार्य हिल, चिंकारा अशा आकर्षक पर्यटनस्थळांना देश-विदेशातील पर्यटकांकडून पसंती दिली जाते. मात्र, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी नियोजित सहलींचे आरक्षण रद्द करण्यास सुरुवात केली आहे.

उन्हाळी सुटीच्या निमित्ताने काश्मीर सहलीसाठी यंदा मोठ्या प्रमाणात आरक्षण झाले होते. मात्र, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी नियोजित सहलींचे आरक्षण रद्द करण्यास सुरुवात केली आहे. काश्मीरमधील पहलगाम, बैसरन, सोनमर्ग, गुलमर्ग, शंकराचार्य हिल, चिंकारा अशा आकर्षक पर्यटनस्थळांना देश-विदेशातील पर्यटकांकडून पसंती दिली जाते. उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटक प्राधान्याने काश्मीरच्या सहलीचे नियोजन करतात. खासगी पर्यटन कंपन्यांकडून हवाई, रेल्वे आणि रस्ते प्रवास असे पर्याय आणि विशेष सवलती देऊन निरनिराळ्या सहली आयोजित केल्या जातात. गेल्या काही वर्षांत काश्मीरमधील पर्यटनाला चांगली चालनाही मिळाली आहे. मात्र, आता पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पर्यटनाला पुन्हा फटका बसू शकतो, असे चित्र आहे. जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद व निषेध आंदोलन… विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्वच हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने बंदच आवाहन… अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदुत्ववादी संघटनांच आज सकाळी दहा वाजता निषेध आंदोलन.. पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी निषेद आंदोलन केलं जात आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
LIVE NEWS & UPDATES
-
सोलापुरात 1300 वाहनचालकांविरोधात अटक वॉरंट
सोलापुरात तेराशे वाहनचालकांविरोधात कोर्टाने काढले अटक वॉरंट
तर 8 हजार वाहन चालकांना दंड भरण्यासाठी बजावला समन्स
वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड न भरल्याने काढण्यात आले अटक वारंट
तेराशे वाहन चालकांपैकी 275 वाहन चालकांनी दंड भरून अटक वॉरंट केले रद्द
-
कुणाल कामराची होणार चौकशी
कुणाल कामराची मुंबई पोलीस चौकशी करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी केल्यापासून वाद निर्माण झाला. तेव्हापासून कामरा हा तामिळनाडूत आहे. आता तिथे त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
-
-
सरकार २४ तास काम करते
झोपणारे ठराविक वेळी झोपतात. मी पहाटे चारला उठतो,फिरतो,व्यायाम करतो,मी पहाटे चारला कामाला सुरुवात करतो आणि सायंकाळी दहा अकरा पर्यंत काम करतो, तर सायंकाळी ११ ते २ मुख्यमंत्री काम करतात,आणि एकनाथ शिंदे २ ते ४ काम करतात म्हणून आमचे सरकार २४ तास काम करत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
-
आज अमरावती शहर बंद
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद व निषेध आंदोलन करण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्वच हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने बंदच आवाहन करण्यात आले आहे.
-
आभाराचे बॅनर झळकले
डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभाराचे आणि शिंदे टीमच्या कार्याचे कौतुकाचे बॅनर झळकले आहेत. काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना धीर देत सुरक्षित महाराष्ट्रात आणल्याबद्दल जाहीर आभाराचे बॅनर लागले आहेत.
-
-
सहायक जिल्हाधिकाऱ्यांची बदली रद्द करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
जालना जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या 57 कोटी रुपयांच्या अतिवृष्टी आणि गारपीट अनुदानाचे चौकशी करणारे सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांची चंद्रपूर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झालेली बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केली आहे.
-
कांदा निर्यातीत मोठी घट
कांदा निर्यातीत तब्बल १० टक्क्यांची घट झाली आहे. अस्थिर धोरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत भारतातून ९ लाख ५३ हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती. तर याच कालावधीत मागील वर्षी एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान १६ लाख ९९ हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात होऊन ३८३७ कोटींचा व्यवसाय झाला. म्हणजे सुमारे ३७० कोटी रुपयांची घट झाली आहे.
-
ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावात हजारो मासे मृत्युमुखी
ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. तलावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने मासे मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तलावातील पाणी दूषित झाले असून अनेक मासे मृत्युमुखी पडून तलावावर तरंगताना दिसत आहे.
-
डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांचे आभाराचे बॅनर
डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभाराचे आणि शिंदे टीमच्या कार्याचे कौतुकाचे झळकले बॅनर. कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना धीर देत सुरक्षित महाराष्ट्रात आणल्याबद्दल जाहीर आभाराचे लागले बॅनर.
-
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यावरून असमन्वय
पेहेलगाम घटनेच्या निषेधार्थ अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यावरून व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये असमन्वय. आम्ही पहेलगाम घटनेच्या दुःखात सहभागी. पण बाजारसमिती बंद करण्यापूर्वी व्यापाऱ्यांनी आम्हाला माहिती द्यायला पाहिजे होती शेतकऱ्यांची प्रतिक्रिया.
-
कांदा निर्यातीत तब्बल १० टक्क्यांची घट
कांदा निर्यातीत तब्बल १० टक्क्यांची घट. अस्थिर धोरणाचा शेतऱ्यांना मोठा फटका. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत भारतातून ९ लाख ५३ हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात. यामधून सुमारे ३४६७ कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ऑस्ट्रेलियात चाचणी
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ऑस्ट्रेलियात चाचणी. 200 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाला सहज तोंड देईल. ऑस्ट्रेलियातील कंपनीकडून याची चाचणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे 99 टक्के काम पूर्ण. मे. राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांची माहिती.
-
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या जामनेर कडकडीत बंद
जळगावच्या जामनेरमध्ये पहलगाम येथील घटनेच्या निषेधार्थ आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. आज व्यवसायिक दुकानदार तसेच सर्व नागरिकांच्या वतीने आपली दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात येणार. संपूर्ण जामनेर शहर तसेच तालुक्यात एकही दुकानं, व्यवसाय आज सकाळपासून उघडलेले नाहीत.
-
शिरूर – बिबट्याच्या हल्ल्यात 95 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू
शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात 95 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. वाढत्या तापमानामुळे लक्ष्मीबाई भोईटे या घरासमोर ओट्यावरती झोपलेल्या होत्या. पहाटेच्या सुमारास बिबट्याने त्यांना ओट्यावरून ओढून नेऊन उसाच्या शेतात ठार केलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
-
काश्मिरला जाणारे अमरावती जिल्ह्यातील 700 पेक्षा अधिक पर्यटक बुकिंग रद्द करण्याच्या विचारात
काश्मिरला जाणारे अमरावती जिल्ह्यातील 700 पेक्षा अधिक पर्यटक बुकिंग रद्द करण्याच्या विचारात आहेत. अमरावती वरून काश्मीरला जाणाऱ्या 1200 ते 1300 जणांचे बुकिंग झाले आहे.
काही पर्यटक हे पर्यटनाला जाण्याचे ठिकाण बदलण्याचा विचार करत आहेत अशी माहिती अमरावती टूर्स अँड ट्रॅव्हल असोसिएशनने दिली.
जवळपास 80 टक्के बुकिंग रद्द झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
-
Maharashtra Breaking: मलकापूर येथिल दोन शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या आईवरच बलात्कार ..
वर्गशिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल… मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणू, म्हणत जबरदस्तीने केला बलात्कार
-
Maharashtra Breaking: नाशिकच्या सिटी सेंटर मॉल चौकातील सिग्नल वर रिक्षा आणि सिटीलींक बसचा अपघात
अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद… रिक्षातील 2 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती… नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल… रिक्षा चालक आणि रिक्षातील दीड वर्षाच्या बालकाला इजा झाल्याची माहिती…
Published On - Apr 25,2025 8:41 AM
