AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमळ हटवलं, कपाट लावलं; मतदानाला 48 तास शिल्लक असताना भाजप उमेदवारासोबत काय घडलं?

कल्याण डोंबिवली निवडणुकीच्या रणधुमाळीत पॅनल १८ मध्ये बनावट पॅम्प्लेटमुळे खळबळ उडाली आहे. भाजप उमेदवार स्नेहल मोरे यांच्या कमळ चिन्हाच्या जागी अपक्ष उमेदवाराचे कपाट चिन्ह लावून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

कमळ हटवलं, कपाट लावलं; मतदानाला 48 तास शिल्लक असताना भाजप उमेदवारासोबत काय घडलं?
kdmc
| Updated on: Jan 12, 2026 | 8:21 AM
Share

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. मात्र, पॅनल क्रमांक १८ मध्ये एक विचित्र आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. महायुतीच्या अधिकृत प्रचाराच्या पॅम्प्लेटमध्ये फेरफार करून, भाजप उमेदवाराच्या कमळ चिन्हाच्या जागी एका अपक्ष उमेदवाराचे कपाट चिन्ह असलेले बनावट पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पॅनल क्रमांक १८ मध्ये भाजपच्या रेखा चौधरी या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित तीन जागांवर महायुतीतर्फे भाजपच्या स्नेहल मोरे, शिवसेनेचे मल्लेश शेट्टी आणि नवीन गवळी हे अधिकृत निवडणूक लढवत आहेत. मात्र, गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर एक पॅम्प्लेट जोरदार व्हायरल होत आहे. या पॅम्प्लेटवर शिवसेनेच्या दोन उमेदवारांची धनुष्यबाण ही निशाणी आहे. पण भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहल मोरे यांच्या कमळ चिन्हाच्या जागी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनोज चौधरी यांच्या पत्नी प्रीती चौधरी यांचे कपाट हे चिन्ह छापण्यात आले आहे. या पॅम्प्लेटवर आमचं ठरलंय असा मजकूर लावण्यात आला असून याद्वारे जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे बनावट पॅम्प्लेट व्हायरल झाल्यामुळे नेतीवली परिसरातील मतदार, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच खुद्द उमेदवारांमध्येही संभ्रमाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुतीमध्ये फूट पडल्याचा चुकीचा संदेश या माध्यमातून दिला जात असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.

सायबर गुन्ह्यांतर्गत कारवाई करा

या प्रकाराची गंभीर दखल घेत महायुतीचे उमेदवार मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, स्नेहल मोरे आणि भाजपचे निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खालील मुद्दे मांडले. आमची महायुती भक्कम आहे. विरोधकांना पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी मतदारांना फसवण्यासाठी हा प्रकार केला आहे, असे मल्लेश शेट्टी यांनी सांगितले. स्नेहल मोरे या आमच्या अधिकृत उमेदवार आहेत. ज्यांनी हे बनावट पॅम्प्लेट तयार केले, त्यांच्यावर सायबर गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे, असे नरेंद्र सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान महायुतीच्या वतीने या प्रकरणाची लेखी तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील कोणत्या ग्रुप्समधून हे पोस्टर पहिल्यांदा व्हायरल झाले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पॅनल १८ मधील चुरस वाढली आहे.

प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे
प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे.
'उद्या वीज बंद केली तर...,' राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती...
'उद्या वीज बंद केली तर...,' राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती....
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?.
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल.
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला.
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा.
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल.
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल.
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज.