Maharashtra Election News LIVE : इंडस्ट्रीयल हब असल्याने राष्ट्रवादीचा पिंपरी चिंचवडमध्ये इंटरेस्ट- पडळकर
Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय हलचालींना वेग आला आहे. सर्वच पक्ष प्रचारासाठी दिवस रात्र एक करत आहे. तर मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. तर कल्याण - डोंबिवलीत प्रचारासाठी शेवटचा रविवार ‘सुपर संडे’ ठरला. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे, तसेच प्रिंट मिडीयाद्वारे देखील प्रचारावर बंदी राहील. प्रचारासाठी शेवटचा रविवार ‘सुपर संडे’ ठरला. कल्याण–डोंबिवलीत उमेदवारांची धावपळ पाहायला मिळाली. बाईक रॅल्या, पदयात्रा आणि घरोघरी भेटी देण्यात आल्या, तर दुसरीकडे, सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची बदली बढती करताना राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्राच्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांक अहवालानुसार पारदर्शकपणे करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल…
LIVE NEWS & UPDATES
-
अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे गिरीश महाजन यांच्या सभास्थळासमोर नतमस्तक
अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे गिरीश महाजन यांच्या सभास्थळासमोर नतमस्तक
मंत्री गिरीश महाजन हे माझे गुरुवर्य असल्याचं सांगितलं
गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून मुकेश शहाणे यांची ओळख
मुकेश शहाणे यांचा भाजपने दिलेला एबी फॉर्म अवैध झाल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात
-
पुणे महानगरपालिका निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात
पुणे महानगरपालिका निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आज आणि उद्या शेवटचे दोन दिवसच प्रचारासाठी असल्याने उमेदवारांनी आता होम टू होम प्रचार सुरू केला आहे. तसेच आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण देखील रंगल्याचं पहायला मिळत आहे.
-
-
मुंबईच्या जुहू परिसरात 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचा पालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार
मुंबईच्या जुहू परिसरात 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचा पालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार
मतदानावर बहिष्कार घालणारे बॅनर जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात लावण्यात आले
जुहू परिसरात मिलिटरी रडार (Military Radar) असल्यामुळे 35 वर्षापासून इथली 200 धोकादायक इमारत आणि दोन झोपडपट्टी विकासकापासून रखडली.
जवळपास 15 हजार ते 20 हजार लोकांचं धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य
-
अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपला धोबीपछाड
अंबरनाथमध्ये शिवसेनेचा भाजपला धोबीपछाड
उपनगराध्यक्षपदी शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडीचे सदामामा पाटील विजयी
निवडणुकीपूर्वी सभागृहात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी
निकालानंतर पुन्हा शिवसेना शिंदे गट -भाजप आमनेसामने
-
मुंबईच्या जुहू परिसरातील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार
मुंबईच्या जुहू परिसरातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचा पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकला. रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात बहिष्काराचे बॅनर लावले आहेत.
-
-
गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण, अनंत गर्जेच्या जामिनासाठी अर्ज
गौरी गर्जे आत्महत्याप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अनंत गर्जे याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. वकील मंगेश देशमुखांच्या माध्यमातून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. जामीन अर्जावर उत्तर दाखल करा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
-
आज शिवतीर्थावर मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची जाहीर सभा
शिवतीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडणार आहे. ठाकरे बंधुंच्या सभेनंतर ही सभा पार पडणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ठाकरेंच्या टीकेला कसं उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे, ठाकरे बंधुंची ठाण्यात सभा पार पडणार आहे.
-
फडणवीसांच्या सभेअगोदर सागर नाईक यांचा एकनाथ शिंदेवर निशाणा
फडणवीसांच्या सभेअगोदर सागर नाईक यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे. सत्ता आल्यावर प्रशासक असताना झालेल्या कामांची चौकशी करणार आहेत. 16 जानेवारीला समजेल कोणाचा टांगा पलटी झाला ते, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
-
इंडस्ट्रीयल हब असल्याने राष्ट्रवादीचा पिंपरी चिंचवडमध्ये इंटरेस्ट- पडळकर
पिंपरी चिंचवडमध्ये इंडस्ट्रीयल हब असल्याने राष्ट्रवादीचा येथे इंटरेस्ट असल्याचा आरोप गोपिचंद पडळकर यांनी केली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते पिंपरी चिंचवडला टार्गेट करत आहेत. सत्तेसाठीच राष्ट्रवादीचे नेते भाजपा नेत्यांवर टीका करत आहेत.
-
तमांग यांचे पार्थिव दार्जिलिंगला आणण्यात आले
इंडियन आयडल विजेता आणि अभिनेता प्रशांत तमांग यांचे पार्थिव दार्जिलिंगमधील चौरस्ता येथे सार्वजनिक दर्शनासाठी आणण्यात आले. 11 जानेवारी रोजी दिल्ली येथे वयाच्या 43व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
-
KDMC निवडणूक: शिवसेना उपशहरप्रमुख मनोज चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
KDMC निवडणूकीत पॅनल 18 मध्ये बनावट पॅम्प्लेटचा खोडसाळपणा केल्याप्रकरणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख मनोज चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजप उमेदवाराच्या जागी शिवसेनेतून बंडखोरी करत उपशहरप्रमुख मनोज चौधरी यांची पत्नी अपक्ष उमेदवार प्रीती चौधरी यांचा फोटो आणि कपाट चिन्ह दाखवणारे पॅम्प्लेट व्हायरल केल्या नंतर पक्षाने ही कारवाई केली आहे.
-
येवला : उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा बहिष्कार
येवला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाकडून एजाज शेख यांचा अर्ज 11.58 मिनिटा आला होता, मात्र तो स्वीकारला नसल्याचा आरोप केला जात आहे. मात्र ते वेळ संपल्यानंतर 12.07 मिनिटांनी आले असं येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाहेर यांनी सांगितले आहे. येथे भाजपच्या पुष्पा गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
-
काँग्रेसने लाडक्या बहिणींचा अपमान केला – बावनकुळे
काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून महानगर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहिण योजनेचे पैसे वितरीत करण्यात यावेत अशी मागणी केली आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ही राज्याची अडीच कोटी लाडक्या बहिणींची योजना आहे, केवळ 29 महानगरपालिकांपुरती नाही. संक्रांतीपूर्वी पैसे मिळाले तर आमच्या बहिणींना संक्रांत चांगली साजरी करता येईल म्हणून हा निर्णय घेतला होता. पण काँग्रेसने शेवटी बदमाशी केली त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले की पैसा देऊ नये. हा लाडक्या बहिणीचा अपमान आहे.
-
सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रित झाल्या पाहिजेत – बावनकुळे
जिल्हा परिषदांच्या निवडणुकीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडली असेल. येणाऱ्या निवडणुका, दहावी बारावी परीक्षा, बजेट अधिवेशन या सर्वांचा विचार केला असेल म्हणून कोर्टाने त्यांना परवानगी दिली असेल. निश्चितपणे सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रित झाल्या पाहिजे अशी आमची भूमिका आहे.
-
अंबरनाथ नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जोरदार राडा
अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सदाशिवमामा पाटील यांची निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता नगरपालिकेत जोरदार राडा झाला आहे. भाजप आणि शिंदेसेना आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
-
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा उत्साह अंतिम टप्प्यात, दिग्गज नेत्यांच्या प्रचार रॅलीचं आयोजन
चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा उत्साह अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शहरात आज विविध पक्षाच्या दिग्गज राजकीय नेत्यांनी आपल्या प्रचार रॅली केल्या. काँग्रेसच्या प्रचार रॅलीत विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार सहभागी झाले. त्यांनी शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर, बाबूपेठ, जुनोना चौक आदी भागांमध्ये प्रचार रॅलीत सहभाग घेत काँग्रेससाठी मताशीर्वाद मागितला. काँग्रेससाठी शहरात अनुकूल वातावरण असून मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे. आपण पचननाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
-
सदाशिवमामा पाटील यांची अंबरनाथ नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदी निवड
सदाशिवमामा पाटील यांची अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे. सदाशिवमामा यांनी अंबरनाथ विकास आघाडीच्या प्रदीप पाटील यांचा पराभव केला. सदाशिवमामा पाटील यांनी प्रदीप पाटील यांच्यावर 4 मतांनी विजय मिळवला.सदामामा पाटील यांना 32 तर प्रदीप पाटील यांना 28 मत मिळाली.
-
अजित पवार यांचा पुण्यात राष्ट्रवादी उमेदवारांसाठी रोड शो
अजित पवार यांचा पुण्यात राष्ट्रवादी उमेदवारांसाठी रोड शो सुरु आहे. अजित पवार यांचा वडगावशेरी मतदारसंघात रोड शो करत आहेत. दादांसह या रोड शोमध्ये अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत. दादांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे.
-
अंबरनाथ नगरपालिका उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू
अंबरनाथ नगरपालिका उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. सभागृहात भाजपकडून शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. भाजपकडून सदाशिव पाटील यांचा निषेध व्यक्त केला.
-
मुंबई गिळण्यापासून रोखायचं असेल तर मशालीला ताकद द्यावीच लागेल : आदित्य ठाकरे
मुंबई गिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मुंबई गिळण्यापासून रोखायचं असेल तर मशालीला ताकद द्यावीच लागेल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आम्ही 25 वर्ष जात, पात ,धर्म न पाहता सेवा केली. जे मतदार आपले नाहीत त्यांच्या ही घरी जाऊन भेटी द्या. तुतारी,शिवसेना ,मनसे मध्ये कुठे ही मतभेद नाहीत, असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
-
आदानीच्या घशात अख्खी मुंबई घालण्याचं काम सुरू आहे- आदित्य ठाकरे
आदानीच्या घशात अख्खी मुंबई आणि महाराष्ट्र घालण्याच काम सुरू आहे.ते आम्ही होऊ देणार नाही हा निर्धार आम्ही होऊ देणार नाही. देवेंद्र फडवणीस 10 वर्षांपासून सत्तेत स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांना बांगलादेशी आता दिसायला लागले तुम्ही तुमच्या कामाबद्दल बोला. ही निवडणूक गटर, वाटर, ओटरची आहे तुम्हाला प्रशासन कळत असेल तर त्यावर बोला असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
-
अहिल्यानगरमध्ये रेल्वेसाठी दोन तास रास्ता रोको
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर, अकोले मार्गेच न्यावी या मागणीसाठी संगमनेर आणि अकोलेकर एकवटले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोनवर मुख्यमंत्री फडणवीस यांचेसोबत बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आले आहे. 18 किंवा 19 तारखेला रेल्वे संघर्ष समिती शिष्ठमंडळाशी चर्चेचे आश्वासन देण्यात आले आहे.
-
काँगेसवाले बदमाश, लाडक्या बहिणी विरोधात आहेत- अनिल बोंडे
काँग्रेसचे उमेदवार मत मागायला आले तर त्यांना सोटे मारा. काँगेसवाले बदमाश आहेत. लाडक्या बहिणी विरोधात आहेत. त्याना बाजूला करा. डबल ढोलकी वाजवनाऱ्याना बाहेर करा. मला मुस्लिम महापौर अमरावतीमध्ये चालणार नाही असे अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.
-
अंबरनाथमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने
अंबरनाथमध्ये आज उपनगराध्यक्षपदीची निवडणूक पार पडत आहेत आणि यासाठी भाजप आणि शिंदे यांची शिवसेना आमने-सामने आले आहेत. भाजपकडून शिंदेंचे उमेदवार असणारे उपनगराध्यक्ष साठी सदाशिव पाटील हे गद्दार आहे अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे. चप्पल दाखवत महिलांनी रोष व्यक्त केला आहे.
-
15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे कोर्टाचे निर्देश
जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत झेडपीच्या निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.
-
भाजप आज चिवडा पार्टी राहिलेली नाही, ती बिर्याणी पार्टी झाली आहे- नाना पटोले
“जे जे नेते ज्या ज्या विभागाचे आहेत, तिथे तिथे ते प्रचाराला लागले आहेत. महाराष्ट्रात सर्वच नेत्यांनी फिरावं हे आवश्यक नाही. सत्ताधाऱ्यांकडे विमान, हेलिकॉप्टर आहेत. मुख्यमंत्र्यांची दौरे पाहा.. सकाळी नागपूर, दुपारी पुणे, संध्याकाळी मुंबई असं असतं. भाजप आज चिवडा पार्टी राहिलेली नाही, ती बिर्याणी पार्टी झाली आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस शक्तीने प्रचार का करत नाहीये, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
-
राज ठाकरे-अदानींच्या भेटीचा फोटो व्हायरल; नाना पटोलेंची प्रतिक्रिया
“कोणी कोणाला भेटत असेल, तर तो भाग वेगळा आहे. एखादा उद्योगपती एखाद्या नेत्याला भेटत असेल, तर त्यात काहीही वावगं नाही. भाजप आपले पाप लपवण्यासाठी तुम्ही याला भेटले, त्याला भेटले, तुम्ही ते लपवले.. असा हा सर्व कांगावा करत आहे,” अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे. राज ठाकरे आणि अदानींच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
-
कोल्हापुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत
कोल्हापुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत होणार आहे. कृष्णराज महाडीक आणि अभिनेते स्वप्निल राजशेखर मिळून फडणवीसांची मुलाखत घेणार आहेत. कृष्णराज महाडीक यांनी पालिका निवडणुकीतून माघार घेतली होती.
-
पुणे – नाशिक महामार्गावर रास्तारोको, वाहतूक ठप्प
नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर, अकोले मार्गेच न्यावी, या मागणीसाठी संगमनेर आणि अकोलेकर एकवटले आहेत. पुणे – नाशिक महामार्गावर त्यांनी रास्ता रोको केला आहे. आमदार किरण लहामटे, किसान सभेचे डॉ. अजीत नवले यांच्यासह सर्व पक्षीय नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. या रास्ता रोको आंदोलनामुळे नाशिक – पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
-
ठाकरेंच्या सेनेतील बड्या नेत्याला अटक करण्याचे संकेत
कोव्हीड घोटाळ्यात ठाकरेंच्या सेनेतील बड्या नेत्याला अटक करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. “बड्या नेत्याला होईल अटक कदाचित. आज सांगू शकत नाही. हे इन्व्हेस्टिगेशनच्या हाती असतं. हा आरोपासाठी आरोप नाही. प्रत्येक घोटाळ्यात घोटाळा सिद्ध झाला. तुरुंगात गेले. त्यांच्या आकांपर्यंत पोहोचण्याचे पुरावे असतील तर पोलीस कारवाई करतील” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
काँग्रेस नेत्यांकडून चांगल्या भाषेची अपेक्षा ठेवता येणार नाही – सुधीर मुनगंटीवार
“काँग्रेस नेत्यांकडून चांगल्या भाषेची अपेक्षा ठेवता येणार नाही. त्यांची वृत्ती यातून दिसते. त्यांनी याआधीही पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात वाईट भाषेचा वापर केला होता. मात्र प्रचारादरम्यान एकमेकांविषयी आदराची भाषा हवी हे भान नक्की हवे” असं टीका करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
-
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाचा राजीनामा
जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वजीत मनोहर पाटील यांचा राजीनामा. जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना पाठवला राजीनामा. वैयक्तिक कारणामुळे युवक जिल्हाध्यक्ष पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचा राजीनाम्यात नमूद. विश्वजीत पाटील यांनी फेसबुक वर देखील त्यांचा राजीनामा पोस्ट केला आहे.
-
मातोश्रीचं दार त्यांनी बंद केलं होतं, मी नव्हतं केलं – देवेंद्र फडणवीस
“मातोश्रीचं दार त्यांनी बंद केलं होतं. मी नव्हतं केलं. मी फोन करत होतो. एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर साक्षीदार आहे. ते फोनवर बोलायला तयार नव्हते. आम्ही पाच वर्ष सोबत आहोत. एकत्र निवडणूक लढलो, तरीही तुम्हाला फारकत घ्यायची असेल तर एवढी माणुसकी असली पाहिजे की नाही देवेंद्र माझं नाही जमत. माझी तुमच्यासोबत जाण्याची मानसिकता नाही. मला दुसरीकडे जायचे आहे. त्यांनी फोनही घेतला नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
धुळे महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा फाडला बॅनर
धुळे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधील ठाकरे गटाच्या उमेदवाराचा बॅनर फाडला. प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवार संदीप चौधरी यांचा बघा मोहन नगरात लावलेला बॅनर अज्ञातांनी फाडल्याने खळबळ माजली. यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी असून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-
या निवडणुकीत सगळ्यात मोठं नुकसान राज ठाकरेंना होईल – देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे काही माझे शत्रू नाहीत. पुढेही आमचे मित्रच राहतील. पण या निवडणुकीत त्यांची आणि आमची वैचारिक लढाई आहे. मी मित्र म्हणून नव्हे राजकीय निरिक्षक म्हणून सांगतो की महापालिका निवडणुकीत सगळ्यात मोठं नुकसना राज ठाकरेंचं होईल – टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
-
ठाण्यातील खारीगावात प्रचारादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना आमने सामने
ठाण्यातील खारीगावात प्रचारादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना आमने सामने आलेत. राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजीत पवार यांच्या प्रचारादरम्यान अश्लील शिवीगाळ आणि इशारे करण्यात आले. प्रचारादरम्यान खासदार बाळ्या उपस्थित असताना अश्लील प्रकार घडला. धमकावून आणि शिवीगाळ केल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.
-
शिवराय लुटारू नव्हते, त्यांनी सुरत लुटली नाही – मुख्यमंत्री फडणवीस
शिवरायांनी सुरत लुटली नाही. ते लुटारू नव्हते. त्यांना स्वारी केली. स्वराज्याचा खजिना मोघलांनी नेला होता. त्यांनी पत्र लिहिलं. त्यांनी तो आणला. शिवरायांना लुटारू म्हणणारे हे शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत का ? असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीव्ही9 ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान उपस्थित केला .
-
लातूरमध्ये भाजपचा बंडखोरांना दणका; 18 उमेदवारांचे 6 वर्षांसाठी निलंबन
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने शिस्तीचा बडगा उगारत तब्बल १८ बंडखोर उमेदवारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. अधिकृत उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरोधात जाऊन अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या आणि माघार न घेणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत. या १८ जणांना पक्षातून पुढील ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक नेतृत्वाच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली असून, पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला आहे. या बंडखोरीमुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, या निलंबनाचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांची पदयात्रा, राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरल्या मैदानात
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार गट आणि अजित पवार गट युतीने मोठी ताकद लावली आहे. प्रभाग क्रमांक ३० (कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी) मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कर्वेनगर परिसरात जोरदार पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. तसेच स्थानिक समस्या जाणून घेतल्या. सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील विविध भागांमध्ये पदयात्रांचे आयोजन केले असून, राष्ट्रवादीच्या अष्टसूत्री जाहीरनाम्यातील आश्वासने त्या मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. भविष्यात राष्ट्रवादीचाच महापौर असेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला आहे.
-
धाराशिव जिल्हा परिषदेवर ताबा मिळवण्यासाठी नातेवाईकांचे रणशिंग; दिग्गज नेत्यांच्या कुटुंबातच रंगणार सामना
धाराशिव जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावेळी सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी खुद्द दिग्गज नेत्यांचे नातेवाईकच मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी नेत्यांच्या घराघरातून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनीही भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच शर्यतीत माजी मंत्री बसवराज पाटील यांनी आपले पुत्र शरण पाटील यांना मैदानात उतरवण्यासाठी कंबर कसली आहे. बड्या नेत्यांच्या या नातलगांमुळे जिल्हा परिषदेचा हा राजकीय संघर्ष आता अधिक धारदार आणि औत्सुक्याचा ठरणार आहे.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा, विरोधी उमेदवाराच्या घरात घुसून विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी
पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक २१ मध्ये राजकीय वादातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांच्या समर्थकांनी विरोधी उमेदवाराच्या घरात घुसून धिंगाणा घातल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी ३३ वर्षीय महिला डॉक्टरने पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी आमच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी केली?” असे म्हणत घरात बेकायदेशीर प्रवेश केला. यावेळी आरोपींनी महिलेशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला, तसेच चुलत सासरे आणि दिराला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र स्कूलजवळ काल रात्री १२:१५ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत दुचाकींचे नुकसान करून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
-
35 वर्षांची सोबत सोडली; नेत्यांच्या त्रासाला कंटाळून हेमलता पाटील यांचा अजितदादांच्या पक्षात प्रवेश
गेली ३५ वर्षे मी काँग्रेसमध्ये निष्ठेने काम केले, पण तिथे नेत्यांकडूनच कार्यकर्त्यांचे पाय खेचले जातात, असा खळबळजनक आरोप हेमलता पाटील यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये काम करताना प्रत्येक गोष्टीत अडवणूक केली जाते आणि अडचणीच्या वेळी नेते सोबत राहत नाहीत, म्हणूनच आपण अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवारांच्या कामाची पद्धत लोकांना आवडते आणि सत्ता असेल तरच रस्ते, फ्लायओव्हर यांसारखी विकासकामे वेगाने होतात, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेसमध्ये दुसऱ्या पक्षांचे लोक सक्रिय असून ते आपल्याच नेत्यांचे खच्चीकरण करतात, अशी टीका करत त्यांनी आता विकासासाठी नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे स्पष्ट केले.
-
आपला विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला – संजय राऊत
कालची शिवतीर्थावरील सभा ही गेम चेंजर सभा आहे. ही सभा परिवर्तन करणारी आहे. शिवतीर्थ ओसांडून वाहत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण, यांचे विचार फक्त शिवतीर्थावर जमलेल्या अलोट गर्दीने ऐकला नाही, तर महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे मराठी बांधव आहेत ते काल त्या भाषणाकडे लक्ष देऊन होते. त्यांनी ते पाहिलं. कालचं भाषण तुफान होतं. आपला विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला आहे, असे संजय राऊत म्हणाले
-
सुप्रिया सुळे यांचे अत्यंत मोठे विधान
जिजाऊ माताला अभिवादन करण्यासाठी आली आहे दरवर्षी सिंदखेडराजाला जाते मात्र यावर्षी इथे आली. ही लोकशाही आहे लोकशाहीत राहतात बस आणि मेट्रो सेवेचा जो शब्द आम्ही पुणेकरांना दिला आहेत तो 100% पाळण्यात येईल मेट्रो आणि बस यावरील तज्ञांकडून आम्ही सल्ला घेतलाय अभ्यास करून हा निर्णय घेतलाय पुणेकरांवर तुमचा आवाज अतिरिक्त बोजा पडणार नाही
-
अंबरनाथमध्ये शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी
अंबरनाथ विकास आघाडी अवैद्य , आमदार बालाजी किणीकर. अंबरनाथ विकास आघाडीचा व्हीप लागू होणार नाही. अंबरनाथ नगरपालिका मध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक
-
भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांचे मोठे विधान
अमरावती महानगरपालिकेच्या प्रचार सभेत भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांचं वक्तव्य. भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटल्याने अपक्ष उमेदवारांना दिला आहे भाजपने पाठिंबा. भाजप सोबतच अपक्ष उमेदवारांना निवडून आणण्याचा मंत्री आकाश फुंडकर यांच्या कडून प्रचार.
-
चिपळूण बाजारपेठेत मोकाट बैलांच्या झुंजीचा थरार
चिपळूण शहरात आज सकाळी गजबजलेल्या चिंचनाका–बस डेपो मार्गावर दोन मोकाट बैलांमध्ये जोरदार झुंज पाहायला मिळाली. बाजारपेठेकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर अचानक सुरू झालेल्या झुंजीमुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
-
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊंना केले अभिवादन
– राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या जयंती निमित्त सिंदखेड राजा येथे जाऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिजाऊंच्या जन्मस्थळाला अभिवादन केल आहे.
-
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 706 गुन्हेगारांवर कारवाई…
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल 706 गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई करण्यात आली आहे.
-
राष्ट्रमाता जिजाऊचा 428 वा जयंती महोत्सव होतोय साजरा .
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राष्ट्रमाता जिजाऊंचा 428 वा जयंती सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. जिजाऊंचे जन्मगाव असलेल्या राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊंच्या जन्मस्थळी जिजाऊ भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.. सकाळी लखोजीराव जाधव यांच्या वंशजाकडून विधिवत जिजाऊंची पूजा करण्यात आली आहे.. तर प्रशासनाचेवतीने शासकीय पूजा देखील या ठिकाणी घेण्यात आली आहे.. दिवसभर लाखो जिजाऊ भक्त याठिकाणी दाखल होत असतात.
-
पुणे आणि पुणे परिसरातील तापमान 9 अंश सेल्सिअस पर्यंत…
उत्तरेकडून होणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यभरात थंडीची लाट पसरलेली पाहायला मिळत आहे. पुण्यातही गेल्या काही दिवसापासून कडाक्याची थंडी पुणेकर अनुभवत आहेत… हवेतील आर्द्रतेमुळे दृश्य मानता ही कमी झालेली पाहायला मिळत आहे.
-
भयमुक्त मतदानासाठी कल्याण–डोंबिवलीत पोलिसांचा तगडा रूट मार्च, संवेदनशील भागांत कडक बंदोबस्त
भयमुक्त मतदानासाठी कल्याण–डोंबिवलीत पोलिसांचा तगडा रूट मार्च काढण्यात आला. संवेदनशील भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गल्लोगल्ली पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. 100 पेक्षा अधिक कर्मचारी, 25 अधिकारी, SRPF व दंगल नियंत्रण पथक सहभागी झालेले. कल्याण डोंबिवलीत 25 संवेदनशील परिसर व 125 संवेदनशील मतदान केंद्र असून या ठिकाणी मतदानाच्या दिवशी राहणार 24 तास कडक बंदोबस्त राहणार आहे. मतदारांनी भयमुक्त मतदान करावे पोलिसांचे मतदारांना आवाहन…
-
मुकेश शहाणे यांची अखेर भाजपा मधून हाकालपट्टी
पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका मुकेश शहाणे यांच्यावर आहे. मुकेश शहाणे यांचा तिकीट कापून बडगुजर यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली. मुकेश शहाणे बडगुजर यांच्या मुला विरोधात अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.स कधीकाळी गिरीश महाजनांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले मुकेश शहाणे पक्षाबाहेर पडले आहेत.
-
काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचे नाशिककडे पाठ
प्रचारासाठी दोन दिवस उरले तरी अद्याप एकही मोठ्या नेत्याची सभा नाही. इतर पक्षाने प्रचारासाठी मोठी ताकद लावली असताना काँग्रेसमध्ये मात्र शांतता दिसत आहे. नाशिक मधील काँग्रेस उमेदवार मोठ्या नेत्यांच्या प्रचाराच्या प्रतीक्षेत आहेत. – नाशिक मध्ये आतापर्यंत एकनाथ शिंदे, ठाकरे बंधू मुख्यमंत्री फडणवीस यांच्या झाल्या सभा – नाशिक काँग्रेसमध्ये मात्र निवडणुकीच्या तोंडावर निराशा जनक चित्र
Published On - Jan 12,2026 8:04 AM
