
KDMC Election Results 2026 LIVE : गेल्या महिन्यभरापासून आरोपप्रत्यारोपांची राळ उठल्यानंतर आज सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. राज्यातील ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत, त्यात कल्याण डोंबिवली ही महापालिकाही तितकीच महत्त्वाची आहे. या महापालिकेत एकूण १२२ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. चार सदस्यीय हा प्रभाग असून एकूण ३१ प्रभागातून १२२ उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून द्यायचे आहेत. मात्र, असं असलं तरी सर्वांचं लक्ष प्रभाग क्रमांक १वर खिळलं आहे. तर पाच वॉर्डात कोण बाजी मारणार? हे आज काही क्षणात स्पष्ट होणार आहे.
प्रभाग क्रमांक १ अ हा अत्यंत महत्त्वाचा प्रभाग समजला जातो. महापालिकेच्या प्रभागाची सुरुवातच या प्रभागातून होते. हा संमिश्र मतदारांचा प्रभाग आहे. या प्रभागात हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मिय आहेत. तर वॉर्ड क्रमांक १ मध्ये १ – अ, १ – ब, १ – क आणि १ – ड अशा जागा आहेत. त्यामधील १ – अ हा अनुसूचित जातीसाठी, १ – ब आणि १ – क या जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. १ – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे. तर दोन ठिकाणी महिलांमध्ये शर्यत रंगणार आहे. तर या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| १ – अ | ||
| १ – ब | ||
| १ – क | ||
| १ – ड |
वॉर्ड क्रमांक देखील फार महत्त्वाचा ठरणार आहे. प्रभागाची सीमा टावरीपाडा भागश, गौरीपाडा, वडवली – आटाळी (पश्चिम), शहाड, मिलींदनगर – घोलपनगर पर्यंत असणार आहे… वॉर्ड क्रमांक २ मध्ये २ – अ, २ – ब, २ – क आणि २ – ड अशा जागा आहेत. त्यामधील २ – अ ही जा अनुसूचित जातीसाठी, २ – ओबीसी महिलांसाठी आण २ – क या जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. तर २ – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे
वॉर्ड क्रमांक २ येथील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, ५१ हजार ३०१ एवढे मतदार या वॉर्डात आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती ६ हजार ६१ मतदार आहेत. तर अनुसूचित जमातींची संख्या २ हजार ४५१ इतकी आहे. त्यामुळे या वॉर्डात देखील कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| २ – अ | ||
| २ – ब | ||
| २ – क | ||
| १ – ड |
आंबिवली गावठाण, मांडा पश्चिम, मांडा पूर्व, टिटवाळा गणेश मंदिर यांसारखे महत्त्वाचे भाग असलेल्या प्रभागात कोणाला गड राखता येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. … वॉर्ड क्रमांक ३ मध्ये ३ – अ, ३ – ब, ३ – क आणि ३ – ड अशा जागा आहेत. त्यामधील ३ – अ ही जा अनुसूचित जातीसाठी, ३ – ब अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ३ – क ही जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलीये. तर ३ – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे
वॉर्ड क्रमांक ३ येथील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, ५० हजार ७८३ एवढे मतदार या वॉर्डात आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती ६ हजार ३६५ मतदार आहेत. तर अनुसूचित जमातींची संख्या ६ हजार ९२३ इतकी आहे. त्यामुळे या वॉर्डात देखील कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| ३ – अ | ||
| ३ – ब | ||
| ३ – क | ||
| ३ – ड |
वॉर्ड क्रमांक ४ मध्ये मांडा येथील इंदिरानगर झोपडपट्टी, मोहने येथील आर, एस कॉलनी, फुले नगर, जैन मंदिर, गाळेगाव, मोहने, मोहने गावठाण, मोहने कोळीवाडा हे परिसर आहेत. वॉर्ड ४ मध्ये ४ – अ ही जा अनुसूचित जाती महिलांसाठी, ४ – ब ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ४ – क ही जागा सर्वसाधारन महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलीये. तर ४ – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे.
या वॉर्डातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ४६ हजार ९१६ लोकसंख्येपैकी १२ हजार ९५६ अनुसूचित जाती तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या १ हजार ५९२ इतकी आहे. त्यामुळे येथे कोण बाजी मारणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| ४ – अ | ||
| ४ – ब | ||
| ४ – क | ||
| ४ – ड |
वॉर्ड क्रमांक ५ मध्ये नक्ती नगर, तुलसी पुजा, निळंकठ पार्क , वायले मैदान, तारांगण सोसायटी, पोतदार शाळा, मोहन प्राईड, महावीर नगरी, अमृत पार्क , मोहन हाईट, राधा नगरी, मंगला पार्क, पटेल आर मार्ट, त्रिवेणी विहार, संघवी इस्टेट, श्री साई प्लाझा सोसायटी, ब प्रभाग कार्यालय, भोईर वाडी, म्हाडा वसाहत आणि बिर्ला कॉलेज व स्कूल परिसर आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| ५ – अ | ||
| ५ – ब | ||
| ५ – क | ||
| ५- ड |
येथील प्रभागाबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड ५ मध्ये ५ – अ ही जा अनुसूचित जातीसाठी, ५ – ब अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ५ – क ही ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलाय . तर ५ – ड ही जागा सर्वसाधारण महिलासाठी आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE