
KDMC Election Results 2026 LIVE :गेल्या महिन्यभरापासून आरोपप्रत्यारोपांची राळ उठल्यानंतर आज सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. राज्यातील ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत, त्यात कल्याण डोंबिवली ही महापालिकाही तितकीच महत्त्वाची आहे. या महापालिकेत एकूण १२२ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. चार सदस्यीय हा प्रभाग असून एकूण ३१ प्रभागातून १२२ उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून द्यायचे आहेत. तर वॉर्ड 26 ते 28 मध्ये कोण येणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Ward No. 26
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक २६ अ हा अत्यंत महत्त्वाचा प्रभाग समजला जातो. महापालिकेच्या प्रभागाची सुरुवातच या प्रभागातून होते. हा संमिश्र मतदारांचा प्रभाग आहे. या प्रभागात हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मिय आहेत. या भागात म्हात्रे नगर, राजाजी पथ, रामनगर, शिवमार्केट, स्वा. सावरकर रोड येथील परिसर आहे.
तर वॉर्ड क्रमांक २६ मध्ये २६ – अ, २६ – ब, २६ – क आणि २६ – ड अशा जागा आहेत. त्यामधील २६ – अ हा ओबीसीसाठी, २६ – ब आणि २६ – क या जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. २६ – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे. तर दोन ठिकाणी महिलांमध्ये शर्यत रंगणार आहे. तर या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
Ward – 27
वॉर्ड क्रमांक २७ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात पाथर्ली, टिळक नगर, अंबिका नगर, गोग्रासवारी येथील परिसर आहे. या भागातील लोकसंख्येबद्दल सांगायचं झालं तर, एकून ४५ हजार १९८ लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती १ हजार ७२७ तर अनुसूचित जमातींची सख्या २३८ इतकी आहे.
वॉर्ड २७ मधील प्रभागांबद्दल सांगायचं झालं तर, वॉर्ड २७ मध्ये २७ – अ ही ओबीसीसाठी, २७ – ब आणि २७ – क आणि २७ – ड सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हे प्रभाग देखील महत्त्वाचे आहेत.
Ward 28
वॉर्ड क्रमांक २७ येथील भागांबद्दल सांगायचं झालं तर, या वॉर्डात दत्तनगर, संगीकवाडी, एकता नगर, आनंदनगर येथील परिसर आहे. हा भाग देखील फार महत्त्वाचा ठरणार आहे.
तर वॉर्ड क्रमांक २८ मध्ये २८ – अ, २८ – ब, २८ – क आणि २८ – ड अशा जागा आहेत. त्यामधील २८ – अ हा ओबीसीसाठी, २८ – ब आणि २८ – क या जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. २८ – ड ही जागा सर्वसाधारणसाठी आहे. तर दोन ठिकाणी महिलांमध्ये शर्यत रंगणार आहे. तर या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE