AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरसेवक पदाचा आनंद क्षणात विरला, पतीसोबत घडलं असं काही… खोपोली हादरली

खोपोलीत नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. मुलाला शाळेत सोडून परतताना झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस राजकीय कोनातून तपास करत आहेत.

नगरसेवक पदाचा आनंद क्षणात विरला, पतीसोबत घडलं असं काही... खोपोली हादरली
Mansi Kalokhe husband
| Updated on: Dec 26, 2025 | 11:07 AM
Share

रायगड जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या खोपोलीत आज सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मंगेश काळोखे यांची अज्ञात इसमांनी दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे हे आज सकाळच्या सुमारास आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडले होते. मुलाला शाळेत सुखरूप सोडून ते दुचाकीवरून घराकडे परतत होते. त्यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना गाठले. एका काळ्या रंगाच्या संशयास्पद चारचाकी गाडीतून आलेल्या ३ ते ४ अज्ञात हल्लेखोरांनी काळोखे यांची गाडी अडवली. काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले.

हा हल्ला इतका भीषण होता की मंगेश काळोखे हे रस्त्यावर कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळोखे यांना सोडून आरोपी गाडीसह घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर मंगेश काळोखे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांचा प्राथमिक अंदाज काय?

खोपोली नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीत मानसी काळोखे यांनी विजय मिळवून नगरसेवक पद मिळवले होते. या विजयानंतर काळोखे कुटुंबाचा राजकीय प्रभाव वाढला होता. निवडणुकीच्या निकालाचा राग किंवा जुन्या राजकीय वादातून हा टोकाचा सूड घेण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्थानिक परिसरात ही हत्या सुपारी देऊन केली असल्याची चर्चा आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून पंचनामा पूर्ण केला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून खोपोलीत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

या घटनेनंतर रायगड पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहेत. संशयास्पद काळ्या गाडीचा शोध घेण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी केली आहे. “आम्ही घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून काही धागेदोरे हाती लागले आहेत. आरोपींना लवकरच जेरबंद करू,” असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर