Kolhapur By Election : चंद्रकांत पाटलांची ‘चाय पे चर्चा’, सतेज पाटलांची ‘मिसळ पे चर्चा’, कोल्हापुरची पोटनिवडणूक रंगात

Kolhapur By Election : चंद्रकांत पाटलांची  'चाय पे चर्चा', सतेज पाटलांची 'मिसळ पे चर्चा', कोल्हापुरची पोटनिवडणूक रंगात
शिवसेनेचे आमदार सतेज पाटील
Image Credit source: tv9 marathi

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालीय. या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मिसळ पे चर्चा, चाय पे चर्चा सारखे फंड काढले आहेत. उमेदवारांपेक्षा नेत्यांसाठीच ही निवडणूक प्रतिष्ठेची बदनली आहे.

भूषण पाटील

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 28, 2022 | 12:49 PM

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालीय. प्रचाराला सुरुवात झाल्यानं नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारांच्या गाठीभेठी घेणं, आश्वासनांचा पाऊस पाडणं इतकंच काय तर मिसळ पे चर्चा हा उपक्रम शिवसेना आमदार सतेज पाटील यांनी सुरु केला आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांकडूनही चाय पे  चर्चा सुरु आहे. आता या दोन्ही नेत्यांनी केलेल्या प्रचाराच्या नव्या फंड्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. काँग्रेसचे नेते दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर (Kolhapur) उत्तर जागेची पोटनिवडणूक होत आहे. यामुळे या पोटनिवडणुकीकडे राज्यभराचं लक्ष आहे.

मिसळ पे चर्चा

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालीय.  मात्र, याच प्रचारात चाय पे चर्चा आणि मिसळ पे चर्चा सारखे फंडे चंद्रकांत पाटील आणि सतेज पाटील यांच्याकडून केले जातायेत.   उमेदवारांपेक्षा नेत्यांसाठीच ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. नेत्यांकडून आता मतदारांच्या गाठीभेठी घेतल्या जातायेत. यासाठी वेगवेगळे फंडे देखील वापरले जातायेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी मिसळ पे चर्चा हा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमांतर्गत ते शहरातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन झणझणीत कोल्हापुरी मिसळवर ताव मारताना दिसतायेत. यादरम्यान ते मतदारांशी संवादही साधतायेत. रंकाळा परिसरातील नागरिकांशी सतेज पाटील यांनी संवाद साधून मिसळीवर ताव मारला. यावेळेस त्यांनी भाजपवर जोरदार टीका देखील केली आहे. एका महिलेला हरवण्यासाठी चाळीस नेत्यांची फौज भाजपला आणावी लागत असल्याचे सांगत दादांनी तीन लाख कार्यकर्ते कोल्हापुरात येतील, या केलेल्या वक्तव्याचा देखील मंत्री सतेज पाटील यांनी समाचार घेतला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यापूर्वी केली होती. त्यालाही सतेज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

चाय पे चर्चा

भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पटील यांनी चाय पे चर्चा सुरु केली असली तरी सतेज पाटील यांनीही मिसळ पे चर्चा, हा मतदारांना प्रलोभीत करण्याचा नवा फंडा समोर आणला आहे.  यानिमित्ताने मतदारांशी बातचीतही होत आहे. त्यांचे प्रश्न जाणून घेता येत आहेतच. आता दोन्ही बड्या नेत्यांच्या चर्चा उमेदवारांना किती यश मिळवून देतात. ते येत्या काळातच कळेलं.

इतर बातम्या

Gujarat Titans vs Lucknow Super Giants Playing XI IPL 2022: गुजरात-लखनौमध्ये कांटे की टक्कर, अशी असेल प्लेईंग इलेव्हन!

अखेर मुंबईतील मत्स्यालयाचा मार्ग मोकळा, दुग्धशाळा आरे वसाहतीमध्ये होणार स्थलांतरीत!

Nanded | खासगीकरणाविरोधात महावितरणचा देशव्यापी संप, नांदेडमध्ये कर्मचाऱ्यांची निदर्शनं, ऊर्जांमंत्र्यांचा काय इशारा?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें