कोल्हापूरच्या नंदवाळ रिंगण सोहळ्याला धक्काबुक्कीचे गालबोट; आरक्षित जागेवर रिंगण सोहळा करण्यावरुन वाद

कोल्हापूरच्या नंदवाळ रिंगण सोहळ्याला धक्काबुक्कीचे गालबोट; आरक्षित जागेवर रिंगण सोहळा करण्यावरुन वाद
Nandwal Ringan Sohala Laticharge
Image Credit source: TV9

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील रिंगण सोहळ्याचा वाद आता पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे विकोपाला गेला आहे. नंदवाळमध्ये दरवर्षी रिंगण सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे यंदाही भारत बटालियनच्या आरक्षित जागेवर रिंगण सोहळ्याचा करण्याचा आग्रह वारकऱ्यांचा होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 28, 2022 | 7:00 PM

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील रिंगण (Nandwal Ringan Sohala) सोहळ्याचा वाद आता पोलीस (Police) आणि वारकऱ्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे विकोपाला गेला आहे. नंदवाळमध्ये दरवर्षी रिंगण सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे यंदाही भारत बटालियनच्या (Bharat Battalion) आरक्षित जागेवर रिंगण सोहळ्याचा करण्याचा आग्रह वारकऱ्यांचा होता. यावेळी रिंगण सोहळ्याला भारत बटालियनकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर या मुद्यावरुन पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली.

रिंगण सोहळ्याला विरोध केला गेल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन केले होते. ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांकडून ग्रामस्थांना आणि वारकऱ्यांना धक्काबुक्की झाल्याच्या कारणावरुन एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थ आणि वारकऱ्यांमध्ये गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला.

रिंगण सोहळ्याच्या जागी पोलीस

करवीर तालुक्यातील नंदवाळमधील विठ्ठल मंदिरात सध्या हरिनाम सप्ताह सुरु आहे. यावेळी ग्रामस्थांतर्फे भारत राखीव बटालयिनच्या आरक्षित मैदानावर रिंगण सोहळा व दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या या मागणीला विरोध करण्यात आला. भारत बटालियन मैदानावर रिंगण सोहळा पार पाडण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, बटालियनचे अधिकारी यांच्याबरोबर ग्रामस्थांच्या चर्चा सुरु होत्या. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. रिंगण सोहळ्याच्या जागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने हा वाद विकोपाला जाऊन वाद चिघळला.

नेत्यांकडून विरोध

नंदवाळ येथे होणाऱ्या या रिंगण सोहळ्याला लोकप्रतिनिधी, सभापती आणि अन्य नेत्यांकडून विरोध दर्शवण्यात आल्याने त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन रिंगण सोहळा भारत बटालियनच्या मैदानावर घेण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला. त्यावेळी ग्रामस्थांनी मैदानावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

पोलिसांकडून सौम्य लाठीमार

भारत बटालियनच्या आरक्षित मैदानावर रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्याच्या निर्णयावर ग्रामस्थ आणि वारकरी ठाम होते. त्यावेळी आंदोलन करण्यावरुन पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याने हा गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्तीमुळे हा वाद निवळला असला तरी येथे तणाव कायम होता.

संबंधित बातम्या

Kolhapur : जोतिबाच्या मंदिरात नवी तोफ दाखल, पोलिसांकडून घेण्यात आली चाचणी

मोठी दुर्घटना टळली! दिल्ली एअरपोर्टवर SpiceJet विजेच्या खांबाला धडकले

Pune | नवीन कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी, पुण्यात कामगार संघटना एकवटल्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें