LIVE : आदित्य ठाकरेंच्या वरळीतील उमेदवारीवर शिक्कामोर्तब

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE : आदित्य ठाकरेंच्या वरळीतील उमेदवारीवर शिक्कामोर्तब
Picture

आदित्य ठाकरेंच्या वरळीतील उमेदवारीवर शिक्कामोर्तब

24/09/2019,6:17PM
Picture

ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत

ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत, ठाणे ते पनवेल ट्रान्सहार्बर वाहतूक उशिराने, नेरुळ स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड

24/09/2019,10:26AM
Picture

सोलापूर विभागात कलबुर्गी-सावळगी या स्थानकांदरम्यान 4 ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक

पुणे : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात कलबुर्गी-सावळगी या स्थानकांदरम्यान चार ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक, तांत्रिक कामानिमित्त ब्लॉक, मुंबईहून पुण्यामार्गे जाणाऱ्या 28 गाड्यांच्या वाहतुकीत बदल, पुणे-सोलापूर दरम्यानची वाहतूक सुरळीत

24/09/2019,10:02AM
Picture

घाटकोपरच्या R city मॉलमध्ये 2 शाळकरी मुलींचा विनयभंग, पोलिसांकडून आरोपीला अटक

मुंबई : घाटकोपरच्या R city मॉलमध्ये 2 मुलींचा विनयभंग, किडझानिया थीम पार्क शाळेच्या पिकनिकसाठी मुले आली होती, त्यावेळी जॉय रायडिंग कारमध्ये 2 मुलींचा विनयभंग, आरोपी रणवीर उदयवीर सिंगला पार्क साईट पोलिसांकडून अटक

24/09/2019,9:57AM
Picture

मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील नेर तलाव 100 टक्के भरला

सातारा : रात्रभर झालेल्या मुसळधार पाऊसामुळे खटाव तालुक्यातील नेर तलाव 100 टक्के भरला, तलावाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले, 12 वर्षानंतर प्रथमच तलावात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी, नागरिकांमध्ये समाधान, खटाव तालुक्यातील पुसेगाव, नेर, फडतरवाडी, बुध या गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा स्त्रो

24/09/2019,9:42AM
Picture

पुण्यात क्षय आणि कुष्ठरोग्यांची संख्या वाढली

पुणे जिल्ह्यात क्षय आणि कुष्ठरोग्यांची संख्या वाढली, संयुक्त कुष्ठ रुग्ण, सक्रिय क्षय रुग्ण मोहीम आणि असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियानातंर्गत जिल्ह्यात सर्वेक्षण, आतपर्यंत 1 हजार 819 कुष्ठरुग्ण, तर क्षयरोगाचे 2 हजार 025 रुग्ण आढळले

24/09/2019,9:39AM
Picture

सेट परीक्षेचा निकाल ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात

पुणे : सेट परीक्षेचा निकाल ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात, युजीसीकडून निकाल तपासून घेतल्यावर निकाल जाहीर होणार, परीक्षेला चार महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून निकाल जाहीर, 79 हजार 879 विद्यार्थ्यांनी सेटची परीक्षा

24/09/2019,9:37AM
Picture

नाशिकमध्ये शेतात साठवलेल्या 1 लाखांच्या कांद्याची चोरी

नाशिक : जिल्ह्यात 1 लाख रुपयाचा कांदा चोरी, शेतात साठवलेला कांदा चोरट्यांनी चोरला, राहुल पगार यांचा कांदा लंपास, 25 क्विंटल 74 किलो कांदा लंपास, चोरट्यांचा मोर्चा आता कांद्यावर, कळवण तालुक्यातील मोकभगणी येथील घटना, कळवण पोलिसात गुन्हा दाखल

24/09/2019,9:34AM
Picture

कांद्याचे भाव वाढल्याने चोरांकडून 90 किलो कांद्याची चोरी

मालेगाव : कांद्याचे भाव वाढल्याने चोराने आपला मोर्चा आता वळवला कांद्याकडे असून मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथील शेतकरी शांताराम देसाई यांच्या कांदा चाळणीतून चोरांनी 90 किलो कांदे चोरले, या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, एका व्यक्तीला अटक

24/09/2019,9:23AM
Picture

गोव्याहून कर्नाटकला जाणाऱ्या बसला अपघात, ट्रक आणि बस यांच्यात धडक

बेळगाव : गोव्याहून कर्नाटकला जाणाऱ्या बसला अपघात, गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक आणि बस यांच्यात भीषण अपघात, दोन्ही वाहनांना आग, प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले. 21 प्रवाशांपैकी 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी, जखमींवर बेळगाव रुग्णालयात उपचार

24/09/2019,9:07AM
Picture

पुण्यात टोळक्यांचा धिंगाणा, दुचाकी आणि चार चाकी गाड्यांची तोडफोड

पुणे : सिंहगड रस्त्यावर मध्यरात्री टोळक्यांचा धिंगाणा, रस्त्यावरील पाच ते सहा गाड्या फोडल्या, दुचाकी आणि चार चाकी गाड्यांची तोडफोड, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण, गेल्या महिन्यात हडपसर परिसरात टोळक्यांनी अशाच पद्धतीने गाड्या फोडण्यात आल्या होत्या

24/09/2019,9:02AM
Picture

नागपुरात बर्ड फ्लू पसरण्याची शक्यता

नागपूर : पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या लघुसिंचन तलावात फेकल्या, नागपूमधील हिंगणा तालुक्यातील दाभा अगरगाव येथील घटना, पोल्ट्री फार्ममध्ये मेलेल्या कोंबड्या तलावात फेकल्यानं ग्रामस्थांची प्रशासनाकडे तक्रार, बर्ड फ्लू पसरण्याची शक्यता

24/09/2019,8:59AM
Picture

नाशिकमध्ये ICICI एटीएमची चोरी, चोरांना पोलिसांनी पकडले

नाशिक : आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे एटीएम मशीनची चोरी, चोरी करत असताना पोलिसांनी बघितले, पोलिसांवर हल्ला करत चोरांचा पळ, त्र्यबंक रोडवरील 4 वाजताची घटना, पंचवटी परिसरात पाठलाग करत असताना चोर पोलिसांच्या ताब्यात.

24/09/2019,8:56AM
Picture

पावसाचा जोर कमी होताच पूर्व विदर्भात डेंग्यू

नागपूर : पावसाचा जोर कमी होताच पूर्व विदर्भात डेंग्यू सक्रिय, जानेवारीपासून आतापर्यंत 388 रुग्णांची नोंद, यातील सर्वाधिक रुग्ण नागपुरातील, तर 183 रुग्णांना डेंग्यूची लागण, चंद्रपुरातील 178 रुग्णांना डेंग्यूचे निदान, वर्षभरातील पहिल्या डेंग्यूच्या मृताची नोंद भंडाऱ्यात, गडचिरोलीत आतापर्यंत एकही डेंग्यूचा रुग्ण आढळलेला नाही.

24/09/2019,8:47AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *