राजकीय पेचाबाबत महाधिवक्ते राज्यपालांना मार्गदर्शन करणार
अॅटर्नी जनरल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार, महाराष्ट्रातील राजकीय पेचावर राज्यपालांना करणार मार्गदर्शन
अॅटर्नी जनरल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार, महाराष्ट्रातील राजकीय पेचावर राज्यपालांना करणार मार्गदर्शन
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 7, 2019
07/11/2019,5:25PM
यशोदा नदीपात्रातून चार ट्रक,एक जेसीबी जप्त, पावणे चौदा लाखांचा दंड
वर्धा : देवळी तालुक्यातील सोनेगावं बाई येथील यशोदा नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणारे चार ट्रक, एक जेसीबी जप्त, देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे यांची कारवाई, जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख यांना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सूरु असल्याची माहिती मिळाली, शेख यांनी तहसीलदारांना याबाबत माहिती दिली, तहसीलदारांकडून घटनास्थळ गाठत साहित्य जप्त, वाहनं जप्त करत पावणे चौदा लाखांचा दंड
07/11/2019,3:28PM
ईपीएस पेन्शनधारक संघटना आणि पोलीस आपसात भिडले
बुलडाणा : ईपीएस पेन्शनधारक संघटना आणि पोलीस आपसात भिडले, पेन्शनधारकांचा मोर्चा पोलिसांनी अडवल्याने पेन्शनधारक संतप्त, ईपीएस पेन्शनधारक संघटनेचे 318 दिवसांपासून आंदोलन सुरु, पेन्शनधारकांनी रस्ता रोको केल्याने पोलीस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये झटापट
07/11/2019,3:18PM
स्वर्गीय यशवंतराव मोहिते जन्मशताब्दी कार्यक्रमास शरद पवार यांची उपस्थिती
कराड : स्वर्गीय यशवंतराव मोहिते जन्मशताब्दी कार्यक्रमास शरद पवार यांची उपस्थिती, कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटीलही उपस्थित राहणार, कराड जवळील रेठरे बुद्रुक गावात सकाळी 11.30 वाजता कार्यक्रम, त्याआधी पवार कराडच्या पंकज हॉटेलला थांबणार, कराडमध्ये पवार काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेण्याची शक्यता
07/11/2019,9:30AM
सहा वर्षाच्या मुलीला कारने उडवले, मुलगी गंभीर जखमी
नवी मुंबई : सहा वर्षाच्या मुलीला कारने उडवले, कळंबोलीतील साईनगर सोसायटीमधील घटना, इमारतीमध्ये कारचालक घुसला असता गाडीवर नियंत्रण सुटल्याने मुलीला उडवले, मुलगी गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू, नशीब बलवत्तर म्हणून वाचली, या घटनेत अजून एक व्यक्ती सुदैवाने बचावला
07/11/2019,9:27AM
कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
पंढरपूर : येत्या 8 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात यात्रा, यात्रेच्या सोहळ्याच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, यावर्षी मंदिर समितीने प्रवेश द्वार, मंदिराचे शिखर, सात मजली दर्शनमंडप आदी ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केली, विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालं, कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी
07/11/2019,9:25AM
साताऱ्यात अज्ञातांकडून तरुणाची गोळ्या झाडून हत्या
सातारा : जिल्हयातील कराड जवळील आगाशिवनगर परिसरात अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून तरुणाची हत्या, विकास उर्फ विकी रघुनाथ लाखे असं मृत तरुणाचे नाव, दोन दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात सहा जणांनी गोळीबार केला, यावेळी हल्लेखोरांनी वेगवेगळ्या बंदुकीतून 10 ते 12 राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती, हल्लेखोर फरार, हल्ल्याचे कारण मात्र अस्पष्ट, कराड पोलिसांत गुन्हा दाखल
07/11/2019,9:21AM
स्वच्छता स्पर्धेतून पुणे शहर बाहेर पडण्याची शक्यता
पुणे : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याचा महापालिकेचा दावा खोटा, स्वच्छ स्पर्धेअंतर्गत शहरातील स्वच्छतागृहांतील सुविधांबाबतचे निकष पूर्ण झाले आहेत किंवा कसे, हे तपासण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला निकष अपूर्ण असल्याचं आढळलं, स्पर्धेसाठी आवश्यक असलेले ‘स्टार रेटिंग’ शहाराला मिळाले नाही, स्वच्छ स्पर्धेतून शहर बाहेर पडण्याची शक्यता
07/11/2019,9:07AM
ओल्या दुष्काळानंतर आता शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न
नंदुरबार : पशुधनासाठी चारा कुठून उपलब्ध करावा, शेतकऱ्यांसमोर प्रश्न, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात असलेला ज्वारी आणि मक्याच्या कडबा बुरशी लागून खराब, अवकाळी पावसामुळे पीकांसोबत चाऱ्याचंही नुकसान, सरकारने जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांची मागणी
07/11/2019,9:01AM
भिवंडीत नामवंत कंपन्यांचे 25 कोटींचे पॅकेजिंग मटेरियल जप्त
भिवंडी : नामवंत कंपन्यांचे 25 कोटींहून अधिक किमतीचे कागदी पुठ्ठ्याचे पॅकेजिंग मटेरियल जप्त, एचपी, कॅनॉन, सॅमसंग आणि इपसोन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचे पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे 25 कोटींहून अधिक रक्कमेचे पुठ्याचे साहित्य जप्त, बुधवारी दुपारी या गोदामावर पोलिसांची धाड, एकाला अटक
07/11/2019,9:00AM
सिरणा नदीत जायबंदी होऊन पडलेल्या वाघाचा मृत्यू
चंद्रपूर : सिरणा नदीत जायबंदी होऊन पडलेल्या वाघाचा मृत्यू, आज पहाटे वाघाचा मृत्यू, काल सकाळपासून वाघाला वाचविण्याची सुरू असलेली मोहीम अंधार पडल्यामुळे संध्याकाळी थांबविण्यात आली, आज सकाळी पुन्हा बचाव मोहीम सुरू करण्यात आली, मात्र वाचवण्यापूर्वीच वाघाचा मृत्यू
07/11/2019,9:00AM