Sharad pawar : त्यांचं राजकारणातील… राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवार काय म्हणाले?

मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्यातील कोणताही शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे असे शरद पवार यांनी सांगितले. कांद्याच्या प्रश्नासाठी शरद पवार यांनी काय केलं असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत विचारला होता. त्यालाच शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

Sharad pawar : त्यांचं राजकारणातील... राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवार काय म्हणाले?
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 11:02 AM

शरद पवार यांनी पूर्वी अनेक राजकीय पक्ष फोडले. त्यामुळे आता शरद पवारांचा पक्ष फुटला आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला  शरद पवार यांनी खोचक भाषेत प्रत्यु्त्तर दिले. राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणात स्थान काय आहे ?; हे मला माहीत नाही अशा शब्दांत शरद पवार यांनी टोला लगावला. नाशिक हा राज ठाकरेंचा स्ट्राँग बेस आहे, पण ते आता नाशिकमध्येही दिसत नाहीत, असं ते म्हणाले. अवघ्या दोन वाक्यांत त्यांनी राज ठाकरेंच्या मुद्याची बोळवण केली.

गुरूवारी सकाळी ते माध्यमांशी संवाद साधत होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही कडाडून टीका केली. नरेंद्र  मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्यातील कोणताही शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे असे पवार यांनी सांगितले. कांद्याच्या प्रश्नासाठी शरद पवार यांनी काय केलं असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत विचारला होता. त्यालाच शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ते माध्यमांशी संवाद साधत होते. मी माझ्या काळात काय केलं विचारतात, पण त्यांचं सरकार १० वर्ष आहे, त्यांनी काय केलं हे आधी पहावं, अशा शब्दांत पवार यांनी त्यांना टोला लगावला. नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलत आहेत.  त्यांचा आत्मविश्वास ढासळला आहे. मोदी भरकटले आहेत, असे पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यातील मतदान पार पडले असून राजकीय आखाडा तापलेला आहे. महाराष्ट्रातील अंतिम, पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी, २० तारखेला पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा पार पडला. आधी नाशिक आणि कल्याणमध्ये त्यांची सभा झाली, त्यानंतर मुंबईत त्यांचा भव्यदिव्य रोड शो पार पडला.

मोदींचा कार्यक्रम गुजराती बहुल भागात

या रोड शो वरूनही शरद पवार यांनी मोदींवर टीका केली. मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो आयोजित करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावं लागतं, ट्रफिकचा प्रश्न बिकट होता, वाहतूक खोळंबून राहते. तसेच मोदींनी रोड शो ज्या भागात तो घेतला तो गुजराती एरिया आहे. मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेले अनेक भाग आहे. पण मोदींचं लक्ष्य विशिष्ट वर्ग होता, त्यामुळे त्यांनी या भागात रोड शो घेतला. मात्र त्यांच्या रोड शो मुळे लोकांना त्रास झाला अशी टिपण्णी त्यांनी केली.

लाचारीच्या मर्यादाही या लोकांनी सोडल्या, प्रफुल पटेलांवर निशाणा

वाराणसीमध्ये मोदींनी नामांकन दाखल केल्यानंतर राष्ट्ववादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी मोदींच्या शिरावर जिरेटोप घातला. त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला. या मुद्याच्या समाचार घेताना शरद पवार यांनी टीका केली. लाचारीच्या मर्यादाही या लोकांनी सोडल्या असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.