Maharashtra News Live Update : आरक्षणाचा लढ्यात ओबीसी मैदानात नव्हते, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड

| Updated on: Jan 04, 2022 | 12:23 AM

Maharashtra News And Omicron Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

Maharashtra News Live Update : आरक्षणाचा लढ्यात ओबीसी मैदानात नव्हते, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड
Breaking News

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तिसऱ्या लाटेचे ढग (Corona Third Wave) आणखी गडद होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोरोना (Corona) प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे. तर कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉनचाही (Omicron) संसर्ग वाढताना दिसतोय. या दुहेरी संकटातून जात असताना आजपासून राज्यात 15 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Children Corona Vaccination) आजपासून सुरु होणार आहे. मुंबईसह राज्यात लहान मुलांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. या घडामोडींसह राज्यातील राजकीय तसेच इतर महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स फक्त TV9 Mararhi वर

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Jan 2022 11:23 PM (IST)

    आरक्षणाचा लढ्यात ओबीसी मैदानात नव्हते, जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. त्यावेळी आरक्षणावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत (OBC Community) एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘खरं तर ओबीसींवर फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला महार समाज होता. कारण ओबीसींनी लढायचंच नव्हतं. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पडगा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसत. ते हे सर्व विसरले आणि ताता आरक्षणासाठी पुढे येतात. नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे, केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील’, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

  • 03 Jan 2022 08:44 PM (IST)

    नवी मुंबईतील 500 चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता करात मिळणार सूट

    ठाणे : नवी मुंबईतील (Navi Mumbai) सिडको आरक्षित भूखंडावरील आरक्षणांची पुन्हा छाननी करून त्यानंतरच आरक्षण हटवण्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचा पुनरुच्चार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. तोपर्यंत याआधी नगरविकास विभागाने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच नवी मुंबईतील 500 चौरस फुटापर्यन्तच्या घरांना मालमत्ता करातून (Property Tax) सवलत देणाची तयारी त्यांनी दर्शवली. यासाठी नवी मुंबई मनपाने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविल्यास त्याबद्दल नक्की सकारात्मक विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी आज नवी मुंबईतील सिडको प्राधिकरणाद्वारे सुरू असलेल्या अनेक विकासकामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

  • 03 Jan 2022 08:09 PM (IST)

    व्याघ्र संरक्षणासाठी वेगवान हलचाली, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

    मुंबई : राज्यात व्याघ्र संरक्षणासाठी महावितरण, पोलीस, महसूल तसेच वन विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावे तसेच जिल्हास्तरावर पोलीस अधिक्षक‍ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित स्वरूपात घ्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाची दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

  • 03 Jan 2022 07:13 PM (IST)

    खासदार सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून 12 दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा

    पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगलकार्यलयात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व 12 जोडप्यांचा हळदी समारंभ व अन्य विधी संपल्यानंतर प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून सर्व नवदाम्पत्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या सोहळ्यादरम्यान कोविड विषयक नियमांचेही पालन करण्यात आले.

  • 03 Jan 2022 06:42 PM (IST)

    नारायण राणेसारख्यांना आम्ही खपवतो ही चिल्लर बात – गुलाबराव पाटील

    जळगाव: “वाळू उपसा गुलाबराव पाटलांच्या काळात निर्माण झालेला नाही. मागच्या काळामध्ये जे वाळू माफिया होते, त्यात चेतन शर्मा नाव आत्मसात करावं, ते कोणत्या पक्षाचे होते. वाळू माफियामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक आहेत” असे गुलाबराव पाटील म्हणाले. “गुलाबराव पाटलाच्या नादी लागू नका, नारायण राणेसारख्यांना आम्ही खपवतो ही चिल्लर बात आहे” असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

  • 03 Jan 2022 06:36 PM (IST)

    आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव

    मुंबई : संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. नितेश राणे यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी ही माहिती दिली आहे. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर (Bail Application) उद्या तातडीने सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणी नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तेव्हापासून नितेश राणे समोर आलेले नाहीत.

  • 03 Jan 2022 06:07 PM (IST)

    समीर वानखेडे यांची डीआरआय विभागात बदली, एनसीबीतील कार्यकाळात अनेक मोठ्या कारवाया

    मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अखेर मुदत वाढ नाकारण्यात आली आहे. यामुळे समीर वानखेडे हे आता आपल्या मूळ विभागात अर्थात कस्टममध्ये पुन्हा लवकरच रुजू होणार आहेत. समीर वानखेडे यांचा झोनल डायरेक्टर म्हणून एनसीबीतील कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होतं. मात्र, त्यांना आता मुदतवाढ नाकारण्यात आली आहे.

  • 03 Jan 2022 02:07 PM (IST)

    मिरजेत 47 लाखाचा गुटखा जप्त, दोघांना अटक

    सांगली : मिरजेत 47 लाखाचा गुटखा जप्त

    दोघे जण ताब्यात

    मीरज महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई

  • 03 Jan 2022 01:16 PM (IST)

    युवासेनेच्या झंझावात या राज्यव्यापी अधिवेशनास स्थगिती

    मुंबई : युवासेनेच्या झंझावात राज्यव्यापी अधिवेशनास स्थगिती

    8 आणि 9 जानेवारी रोजी होणार होते अधिवेशन

    अधिवेशनाला युवासेना पदाधिकारी राहणार होते उपस्थित

    कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्णय

  • 03 Jan 2022 12:53 PM (IST)

    नितेश राणेंचा अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल

    भाजपा आमदार नितेश राणेंनी केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

    वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज दाखल

  • 03 Jan 2022 12:26 PM (IST)

    कर्नटकात प्रवेश करण्यासाठी 2 डोस सोबतच RT-PCR टेस्टचा अहवालही आवश्यक

    कोल्हापूर :  राज्यात प्रवेशासाठी कर्नाटक सरकारने आणखी कडक केल नियम

    लसीकरणाच्या 2 डोस सोबतच rt-pcr टेस्टचा अहवालही आवश्यक

    दोन्ही अहवाल असतील तरच कर्नाटकात मिळणार प्रवेश

    कर्नाटकची भूमिका आडमुठेपणाची

    केंद्राने सूचना देऊनही कर्नाटक सरकार कडून त्याचं उल्लंघन

    स्वतंत्र पत्रव्यवहार करून कर्नाटक सरकारशी चर्चा

    पालकमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

  • 03 Jan 2022 11:44 AM (IST)

    नांदेडमंध्ये दोघांची विष पिऊन आत्महत्या, हदगाव तालुक्यातील वडगावमधील घटना

    नांदेड: दोघांची विष पिऊन आत्महत्या

    हदगाव तालुक्यातील वडगावची घटना

    अल्पवयीन मुलीसह 22 वर्षीय युवकाने केली आत्महत्या

    रात्री उशिरा शेतात जाऊन केली आत्महत्या

    आत्महत्येचे कारण अस्पष्ट, पोलीस घटनास्थळी दाखल.

  • 03 Jan 2022 11:41 AM (IST)

    घाटकोपरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

    मुंबई : घाटकोपर येथे कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

    अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना

  • 03 Jan 2022 11:40 AM (IST)

    हिंगोली जिल्ह्यात पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

    हिंगोली-पती पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

    रामदास इंगळे वय 24 वर्ष तर शीतल इंगळे वय 22 वर्ष अस गळफास घेतलेल्या पती-पत्नीची नावे

    दोघांनी ही शेतातील लिंबाच्या झाडाला घेतला गळफास

    सेनगाव तालुक्यातील दाताळा बुद्रुक येथील घटना

    घटनास्थळी पोलीस दाखल, कारण अपष्ट..

  • 03 Jan 2022 11:05 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील चव्हाळा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा नितीन गडकरी यांच्या घरासमोर ठिय्या

    नागपूर : अमरावती जिल्ह्यातील चव्हाळा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा नितीन गडकरी यांच्या घरासमोर ठिय्या

    - रस्त्याच्या बांधकामात शाळा तुटल्यामुळे विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन

    - शाळा दुरुस्त करुन देण्याच्या मागणीसाठी आंदोलन

    - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

    - प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन

    - नितीन गडकरी यांनी मुलांना दिलं आश्वासन

  • 03 Jan 2022 10:48 AM (IST)

    वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुणे महापालिकेनं बोलावली बैठक

    पुणे : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिकेनं बोलावली बैठक

    बैठकीत आरोग्य विभागाचा घेतला जाणार आढावा

    गेल्या तीन दिवसात वाढलेल्या रुग्णसंख्येनं महापालिकेची चिंता वाढली

    आज बैठकीत काय निर्णय होणार ?

    मात्र पुण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत घेतला जाईल

    महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती ..

  • 03 Jan 2022 09:57 AM (IST)

    पुण्यात महापौर मुरलीधर मोहोळ करणार मुलांच्या लसीकरणाचं उद्घाटन

    पुणे : पुण्यातील महापालिकेच्या दळवी रुग्णालयात लसीकरणाला होणार सुरुवात

    महापौर मुरलीधर मोहोळ करणार लसीकरणाचं उद्घाटन

    15 ते 18 वयोगटातील मुलांना दिली जाणार लस

  • 03 Jan 2022 09:38 AM (IST)

    सिंधुदुर्ग भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली-देवेंद्र फडणवीसांची गोव्यात भेट

    सिंधुदुर्ग :भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची गोव्यात भेट

    जिल्हा बँक निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजन तेली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

    रात्री उशिरा त्यांनी गोव्यात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली चर्चा.

    पक्षाला व संघटना वाढीसाठी गरज असल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये अशी सूचना त्यांना फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती

    राजन तेली आता आपला राजीनामा मागे घेतात की निर्णयावर ठाम राहतात याची स्पष्टता नाही.

  • 03 Jan 2022 09:12 AM (IST)

    अभिनेता जॉन अब्राहमसह पत्नी प्रिया कोरोना पॉझिटिव्ह 

    मुंबई : अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया कोरोना पॉझिटिव्ह

    दोन्ही लस घेऊनही दोघांना कोरोनाची लागण

    दोघांमध्ये सौम्य लक्षणं असल्याची माहिती

  • 03 Jan 2022 08:15 AM (IST)

    औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात महसूल विभागाकडून पंचनामे सुरू

    औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात महसूल विभागाकडून पंचनामे सुरू

    दोन दिवसांपूर्वी झालेल्या गारपीटीनंतर नुकसानभरपाईबाबत पंचनामे सुरू

    तब्बल अडीच हजार हेक्टरवरील शेतीचे होणार पंचनामे

    मात्र नुकसान भरपाई मिळणार की नाही याबाबत स्पष्टता नाही

    पंचनामे सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा

  • 03 Jan 2022 07:25 AM (IST)

    आजपासून पुण्यात 40 केंद्रावर लहान मुलांना मिळणार लस

    पुणे : आजपासून पुण्यात 15 ते 18 वयोगटातील लहान मुलांना मिळणार लस

    40 केंद्रावर महापालिकेचं लसीकरणाचं नियोजन

    महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते दळवी रुग्णालयात होणार लसीकरणाला प्रारंभ

    पहिल्या दिवशी 10 हजार मुलांना डोस देता येईल याचं महापालिकेनं नियोजन केलंय...

  • 03 Jan 2022 07:20 AM (IST)

    स्पर्धा परीक्षांचा घोळ मिटेना, म्हाडा आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवाशी

    स्पर्धा परीक्षांचा घोळ मिटेना

    म्हाडा आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवाशी

    म्हाडाने पेपरफुटीमळे परीक्षा ढकलल्या होत्या

    आजा 29 जानेवारी दोन्ही परीक्षा एकाच दिवशी

    म्हाडा आणि एमपीएसीच्या पोलीस निरीक्षक पदासाठी होणारी परीक्षा एकाच दिवशी

  • 03 Jan 2022 06:28 AM (IST)

    नाशिकमध्ये वस्तीगृहातील 17 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह

    नाशिक - नाशिकमध्ये वस्तीगृहातील 17 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह

    - पंचवटीत असणाऱ्या दंत महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या 17 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह

    - महाविद्यालयात शिकणाऱ्या एकूण 52 मुलींचे नमुने काल तपासणीसाठी देण्यात आले होते.

    - मुलींना वसतिगृहातच विलगिकरणात ठेवले आहे

Published On - Jan 03,2022 6:22 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.