Maharashtra News LIVE Update | नागपूरमध्ये महापालिका करणार इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा सुरू

| Updated on: Jul 13, 2021 | 12:07 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | नागपूरमध्ये महापालिका करणार इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा सुरू
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 12 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Jul 2021 11:30 PM (IST)

    भिवंडी शहरात दुपारपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस, रस्त्यांवर साचतेय पाणी

    भिवंडी : भिवंडी शहरात दुपारी सुरू झालेल्या पावसाने अजून उसंत घेतली नसून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. येथे मध्ये मध्ये पावसाची मोठी सर येत आहे. शहरातील रस्त्यांवर पाणी साचत असून रात्री पाऊस सुरूच राहिल्यास सकाळी अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.  .

  • 12 Jul 2021 08:52 PM (IST)

    नागपूरमध्ये महापालिका करणार इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा सुरू

    नागपूर : महापालिका करणार इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा सुरू

    या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून होणार सुरुवात

    मनपा आणि आकांक्षा फाऊंडेशनमध्ये झाला सामंजस्य करार

    केजी वन, केजी टू आणि इयत्ता पहिलीचे वर्ग लवकरच होणार सुरू

    नागपूर महानगरपालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमुलाग्र परिवर्तन करणारा महत्वाचा विषय अखेर मार्गी लागला .

    नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे.

    आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेच्या सहकार्याने नागपूर शहरामधील झोपडपट्टी भागामध्ये सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा या शैक्षणिक वर्षापासून सुरू होतआहे

  • 12 Jul 2021 07:14 PM (IST)

    मिरजेत ऑइल टँकरची काच फोडली, सलग तिसऱ्या दिवशी नशेबाजांचा धुमाकूळ

    सांगली - मिरजेत ऑइल टँकरची काच फोडली

    मारहाण करताना व्हिडीओ व्हायरल

    सलग तिसऱ्या दिवशी नशेबाजाचा धुमाकूळ

    टँकर वाहकाचा चावा घेतला

  • 12 Jul 2021 07:13 PM (IST)

    पाथर्डी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणार बैठक

    अहमदनगर : पाथर्डी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना

    खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना पक्षाने मंत्रिपद न दिल्याने नाराज झालेले समर्थक मुंबईकडे रवाना

    नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेऊन मुंबईकडे केले कूच

    उद्या मुंबईत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक

    भाजपमधून पंकजा मुंडेंवर वेळोवेळी अन्याय होत आहे

    हा अन्याय आम्हाला सहन होत नाहीये

    ताई जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सहमत राहणार अहोत

    काही भाजपतले नेते पंकजा ताईंना संपवायला निघाले मात्र आम्ही ताईंना संपू देणार नाही

    भाजप जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा अमोल गर्जे यांनी व्यक्त केल्या भावना

  • 12 Jul 2021 06:12 PM (IST)

    सुफरान लकडावाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने 10 जणांना बजावले समन्स

    मुंबई : सुफरान लकडावाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने 10 जणांना समन्स बजावले

    चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठविले

    पाठविलेल्या समन्समधे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि अनेक बड्या उद्योजकांची नावे समाविष्ट असल्याची माहिती

  • 12 Jul 2021 05:32 PM (IST)

    नंदूरबारमध्ये कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट, दोन कामगार गंभीर जखमी

    नंदुरबार: नवापूर तालुक्यातील बेडकी पाडा येथील आर आर इनफॅक्ट कंपनीच्या बॉयलर मध्ये स्फोट होऊन दोन कामगार गंभीर जखमी

    या प्लांटमध्ये जुने टायर जाळून त्यापासून केमिकल तयार केले जाते

    जखमी कामगारांना उपचारासाठी गुजरात राज्यातील व्यारा येथील रुग्णालयात करण्यात आले दाखल

  • 12 Jul 2021 05:01 PM (IST)

    प्रेताला जागे करण्याचा प्रकार, बुलडाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल

    बुलडाणा : अखेर त्या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल

    4 लोकांवर गुन्हा दाखल, आरोपी फरार पोलिसांनी केली होती थातूरमातूर कारवाई

    प्रकरण मीडियात गाजल्यानंतर कारवाई

    मलकापूरच्या स्मशानभूमी मध्ये 9 जुलै च्या रात्री प्रेत जागे करण्याचा प्रकार आला होता समोर

    मांत्रिकाच्या साहाय्याने घडला प्रकार

  • 12 Jul 2021 04:42 PM (IST)

    जोरदार पावसामुळे मनमाड रेल्वे स्थानकावर पाण्याची गळती 

    मनमाड : मनमाडला मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वेस्टेशनमध्ये पाण्याची गळती

    प्रवाशांचे होतायत अतोनात हाल

    काही महिन्यापूर्वीच लाखो रुपये खर्च करून सिमेंटचे पत्रे काढून त्या जागी बसवण्यात आले होते लोखंडी पत्रे

  • 12 Jul 2021 04:32 PM (IST)

    मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, ट्रक चालक गंभीर जखमी

    रायगड : मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात

    खोपोलीकडून पनवेलकडे जाताना ट्रकचा अवघड वळणावर अपघात

    ट्रक चालक गंभीर जखमी, जखमीला खोपोली रुग्णालयात हलविले

  • 12 Jul 2021 04:08 PM (IST)

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली अपघातग्रस्तांना मदत

    नागपूर -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली अपघातग्रस्तांना मदत

    पारिवारिक कार्यक्रमासाठी नाना पटोले नागपूर वरून रामटेककडे जात असताना एक अपघात झाल्याचं दिसलं

    त्यामुळे गाडी थांबवून अपघातग्रस्तांना आपल्या गाडीतून नेलं रुग्णालयात

    गाडीचं टायर फुटल्याने अपघात झाला असावा अशी प्राथमिक माहिती

    नाना पटोले यांनी सोशल मीडियावर दिली माहिती

  • 12 Jul 2021 04:07 PM (IST)

    गुहागर -रत्नागिरी मार्ग ठप्प, आबलोली येथील पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प

    रत्नागिरी - गुहागर -रत्नागिरी मार्ग ठप्प

    आबलोली येथील एका पुलावर पाणी आल्याने वाहतूक झाली ठप्प

    गेल्या 2 तासापासून वाहतूक ठप्प

    रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा

  • 12 Jul 2021 03:31 PM (IST)

    बीडमधून भाजपला मोठा धक्का, आतापर्यंत 105 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

    बीड: भाजपमधील राजीनाम्याचे सत्र सुरूच

    20 सरपंचांसह 6 मुख्य पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

    सर्व सरपंच, पदाधिकारी वडवणी तालुक्यातील

    बीडमधून भाजपला मोठा धक्का

    आतापर्यंत 105 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

  • 12 Jul 2021 03:16 PM (IST)

    कोल्हापुरात जिल्हापरिषद अध्यक्षपदाची संधी हुकल्याने युवराज पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक

    कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचे कागल तालुक्यात पडसाद

    एनवेळी अध्यक्षपदाची संधी हुकल्याने युवराज पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक

    कार्यकर्त्यांनी कसबा सांगावं इथं केलं रास्ता रोको आंदोलन

    कसबा सांगाव हा युवराज पाटील यांचा मतदारसंघ

    राष्ट्रवादीचे युवराज पाटील होते अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार

    मात्र ऐनवेळी पद काँग्रेसकडे

    कोरोना हॉटस्पॉट असलेल्या कसबा सांगावं मध्ये कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा

    पोलिसांनी आंदोलकांना हटवलं

  • 12 Jul 2021 01:44 PM (IST)

    शिवसेनेचे जुन्या नाशिक महापालिकेत आंदोलन

    नाशिक -

    शिवसेनेचे जुन्या महापालिकेत आंदोलन

    गढूळ पाण्याच्या बाटल्यांवर लावले फडणवीसांचे स्टिकर

    गढूळ पाण्याच्या बाटल्या अधिकाऱ्यांना दिल्या भेट

    महापालिकेतील सत्ताधारी भाजप च्या विरोधात केली घोषणाबाजी

  • 12 Jul 2021 01:15 PM (IST)

    नवी मुंबईत दडी मारलेल्या पावसाची पुन्हा एकदा हजेरी

    नवी मुंबईत दडी मारलेल्या पावसाची पुन्हा एकदा हजेरी

    सोसाट्याच्या वारा आणि त्यात पाऊस असे चित्र

  • 12 Jul 2021 01:13 PM (IST)

    दादर परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात

    दादर परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात

    अनेक दिवसानंतर पावसाची मुंबईत पुन्हा हजेरी

  • 12 Jul 2021 12:44 PM (IST)

    नागपुरातील मृतक मनोज ठवकर यांच्या घरी भेट देणार देवेंद्र फडणवीस

    - नागपुरातील मृतक मनोज ठवकर यांच्या घरी भेट देणार देवेंद्र फडणवीस

    - थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस ठवकर यांच्या वाठोडा येथील घरी येणार

    - नागपूरातील मनोज ठवकर यांचा पोलीस मारहाणीत झाला होता मृत्यू

    - मृत्यूचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय

    - या प्रकरणातील आधीच तीन पोलीसांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय

    - या प्रकरणात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी पोलिसांवर केले आरोप

  • 12 Jul 2021 12:43 PM (IST)

    भाजप आणि मित्र पक्षाकडून निवडणूक न लढवण्याचा निर्णय

    कोल्हापूर -

    कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी निश्चित

    भाजप आणि मित्र पक्षाकडून निवडणूक न लढवण्याचा निर्णय

    भाजपच्या निर्णयामुळे महाविकासआघाडी चा मार्ग मोकळा

    दुपारी दोन वाजता होणार अधिकृत निवड प्रक्रिया

    अध्यक्ष राहुल पाटील हे आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र

    जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने काँग्रेसचे आमदार पी एन पाटील आणि पालकमंत्री सतेज पाटील गोकुळ निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र

  • 12 Jul 2021 12:33 PM (IST)

    177 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मुंबईकडे रवाना

    बीड -

    177 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मुंबईकडे रवाना

    भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के राजीनामे घेऊन मुंबईला रवाना

    उद्या पंकजा मुंडेंसोबत मुंबईत महत्वाची बैठक

    राजीनाम्यावर बैठकीत होणार चर्चा

    नाराज पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप सदस्यत्वाचा दिलाय राजीनामा

    पंकजा मुंडे काय निर्णय घेतील याकडे राज्याचे लक्ष

  • 12 Jul 2021 12:30 PM (IST)

    कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या राहुल पाटील तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या जयवंतराव शिंपी यांचे नाव निश्चित

    कोल्हापूर

    कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या राहुल पाटील तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या जयवंतराव शिंपी यांचे नाव निश्चित

    ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली नावांची घोषणा

    इतर पदाधिकाऱ्यांची नावे उद्या जाहीर केली जाणार

    राहुल पाटील हे आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र

    जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज दुपारी होणार आहेत निवड प्रक्रिया

    महा विकास आघाडी आणि मित्र पक्षांकडे आहे सर्वाधिक संख्याबळ

    भाजप आणि मित्र पक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का याकडे लक्ष

    संख्याबळ नसल्याने विरोधकांनी निवडी बिनविरोध पार पाडाव्यात पालकमंत्री सतेज पाटील यांचा आवाहन

  • 12 Jul 2021 12:29 PM (IST)

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मलाबादे चौकात केली निदर्शने

    इचलकरंजी -

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मलाबादे चौकात केली निदर्शने

    शहरातील दुकाने सुरू करण्यासाठी केली निदर्शने

    शहरातील व्यापारी संघटनेने आंदोलनाला फिरवली पाठ स्वाभिमानी शेतकरी संघटना उतरली रस्त्यावर

    सरकार च्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली

    मा. खासदार राजू शेट्टी यांनी शासनाच्या विरोधात दिल्या घोषणा

    नेत्यांनी केलेलं शोक आणि आम्ही केलेली लफडी असा घणाघाती आरोप राजू शेट्टी यांनी राज्य सरकार वर केला

    गोरगरीब व्यापाऱ्यांच्या पोटावर का उठलाय असा सवाल केला

    सरकारचेकार्यक्रम.पक्षप्रवेश.नेत्यांची लग्न सोहळा चालतो पण दुकान उधडलेला चालत नाही

    प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन

  • 12 Jul 2021 12:27 PM (IST)

    शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांचा औरंगाबाद दौरा

    औरंगाबाद -

    शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांचा औरंगाबाद दौरा

    औरंगाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या तांड्यावर संजय राठोड यांचं जोरदार स्वागत

    सातारा तांड्यावर संजय राठोड यांच्या स्वागतासाठी जमली जोरदार गर्दी

    सातारा तांड्यावर संजय राठोड यांचं केलं जाणार जंगी स्वागत

  • 12 Jul 2021 12:27 PM (IST)

    निफाडमध्ये एकाच वेळी एकाच पिंजर्‍यात दोन बिबटे जेरबंद

    - निफाडमध्ये घडली दुर्मिळ घटना

    - एकाच वेळी एकाच पिंजर्‍यात दोन बिबटे जेरबंद

    - निफाड़ तालुक्यातील वडाळी नजिक येथील रोहन होळकर यांचा उसाच्या शेतातील घटना

    - अजुन बिबटे असल्याने पिंजरे लावत वडाळी गांव बिबटेमुक्त करण्याची वन विभागकडे नागरिकांची मागणी

  • 12 Jul 2021 12:26 PM (IST)

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवुन आहेत,नाना पटोले यांचा गभींर आरोप

    लोणवळा

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवुन आहेत

    नाना पटोले यांचा गभींर आरोप

    स्वबळाची भाषा केल्यान त्यांच्या पायाखालची वाळु सरकली आहे

  • 12 Jul 2021 11:11 AM (IST)

    शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा पुण्यात आज शुभारंभ

    पुणे -

    - शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा पुण्यात आज शुभारंभ

    - शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते होणार शुभारंभ

    - टिव्हीयुवरून लाईव्ह फ्रेम चेक करा

  • 12 Jul 2021 10:39 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील खेड-राजगुरुनगरमध्ये पाबळरोडवर तडीपार गुंडाची हत्या

    पुणे

    - पुणे जिल्ह्यातील खेड-राजगुरुनगरमध्ये पाबळरोडवर तडीपार गुंडाची हत्या

    -राहुल उर्फ पप्पू वाडेकर असं हत्या झालेल्या तडीपार गुंडा चे नाव

    -मध्यरात्रीच्या सुमारास तडीपार गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर यांच्यावर पिस्तुलातून फायरींग करत डोक्यात दगड टाकुन निघृण हत्या

    -पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाला असल्याचा खेड पोलिसांचा अंदाज

    -राहुल उर्फ पप्पू वाडेकर याला चार महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते मात्र तडीपारीचा आदेश झुगारत त्याने खेड राजगुरुनगर शहरात केला होता प्रवेश त्यावेळी झाली हत्या

  • 12 Jul 2021 10:38 AM (IST)

    नाशिक महापौरांच्या 'रामायण' निवास्थानी थोड्याच वेळात बैठक

    नाशिक -

    महापौरांच्या 'रामायण' निवास्थानी थोड्याच वेळात बैठक

    शहरातील पाणी परिस्थिती बाबत महत्वपूर्ण बैठक

    नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट ?

    बैठकीकडे सगळ्यांच लक्ष

  • 12 Jul 2021 10:25 AM (IST)

    वसईच्या किल्लाबंदर समुद्र किनार्यावर 30 वर्षाच्या विवाहित महिलेचा मृतदेह मिळाला आहे

    वसई'-

    - वसईच्या किल्लाबंदर समुद्र किनार्यावर 30 वर्षाच्या विवाहित महिलेचा मृतदेह मिळाला आहे..

    - मृतदेह मिळालेली महिला ही बुधवार पासून बेपत्ता होती..

    - ममता पटेल असे मृतदेह मिळालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. ती वसईच्या एव्हरशाईन परिसरातील राहणारी असून त्यांचे मूळचे गुजरात नावसारी आहे.

    - मागच्या 2 महिन्यांपूर्वी महिलेचा विवाह झाला होता. बुधवार सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉक ला गेली असता त्यानंतर ती बेपत्ता झाली होती..

    - याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. 4 दिवसा नंतर मृतदेह समुद्र किनाऱ्यावर सापडल्याने तिची हत्या की आत्महत्त्या याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

  • 12 Jul 2021 09:32 AM (IST)

    देवळाली कॅम्प परिसरात बिबट्या जेरबंद

    नाशिक -

    देवळाली कॅम्प परिसरात बिबट्या जेरबंद

    गेल्या अनेक दिवसांपासून देवळाली कॅम्प, भगूर परिसरात होता बिबट्याचा वावर

    सत्यवान कांगने यांच्या शेतात बिबट्या जेरबंद..

    उसाच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या..

    नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

  • 12 Jul 2021 09:25 AM (IST)

    जिल्ह्यात 173 कोटींच्या प्रक्रियेत अनियमियतता झाल्याचा आरोप

    बुलडाणा -

    जिल्ह्यात 173 कोटींच्या प्रक्रियेत अनियमियतता झाल्याचा आरोप

    मृद आणि जलसंधारण विभागातील प्रकार

    चौकशी करून कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस चे जितेंद्र जैन यांची मागणी

    तर चौकशी न झाल्यास ईडीकडे तक्रार करणार

    गेल्या आर्थिक वर्षात काढलेली निविदा शासनाच्या धोरणाशी निगडित नसल्याचा दावा

    निविदा या जास्त दराने भरल्या गेल्या आणि मंत्रालयात ही याचे धागेदोरे असल्याचा आरोप ही जैन यांनी केलाय

  • 12 Jul 2021 09:21 AM (IST)

    राजापुरात पूरसदृश्य परिस्थिती

    रत्नागिरी -

    राजापुरात पूरसदृश्य परिस्थिती

    अर्जुना आणि कोदवली नदीला पूर

    राजापूर शहरातील जवाहर चौकात पाणी

    जवाहर चौकात तीन फुट पाणी

    राजापूर नगर परिषदेने बाजारपेठेतील नागरिकांना दिला इशारा

    अर्जुन नदीचे पाणी बाजारपेठेत सामानाची हलवाहलव करण्यास व्यापाऱ्यांची सुरुवात

  • 12 Jul 2021 09:20 AM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्री पावसाने झोडपले

    सिंधुदुर्ग -

    जिल्ह्याला रात्री पावसाने झोडपले.

    आताही जोर वाढलेलाच.

    जिल्ह्यात सर्वञ जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस.

    अनेक ठीकाणी सकल भागात साचले पाणी.

    नद्यांचीही पाणी पातळी वाढली

    जिल्ह्याच्या अनेक भागात राञी पासुन विद्युतपुरवठा देखील खंडित झाला आहे.

    हवामान विभागाने तळकोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रेड अलर्ट जारी केला आहे.

  • 12 Jul 2021 09:18 AM (IST)

    मुरुड आणि रोहा तालुक्यात जोरदार पाऊस

    रायगड -

    मुरुड आणि रोहा तालुक्यात जोरदार पाऊस

    पावसामुळे रस्त्यांवर साचले पाणी

    मुरुड आगरदांडा रस्ता पाण्याखाली.

    कुंडलिका नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ.

    मुरुड बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी.

    रात्रभर कोसळत होता पाऊस पहाटे थांबल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर.

  • 12 Jul 2021 08:16 AM (IST)

    शहरात आज कोरोना प्रतिबंधक लस मोहीम ठप्प

    सोलापूर -

    शहरात आज कोरोना प्रतिबंधक लस मोहीम ठप्प

    लसीचा  पुरवठा लसीकरण मोहीम ठप्प

    एक दोन दिवसाचा अपवाद सोडला तर वारंवार होत आहे लसीचा तुटवडा

    परिणाम म्हणून लसीकरण मोहीम होत आहे ठप्प

  • 12 Jul 2021 07:30 AM (IST)

    कथीत अमेरिकन लुटेरी दुल्हनने वीज कर्मचाऱ्याला ४० लाखाने गंडवले

    - कथीत अमेरिकन लुटेरी दुल्हनने वीज कर्मचाऱ्याला ४० लाखात गंडवले

    - एक लाख डॅालरसाठी गमावले ४० लाख

    - कथीत अमेरिकन महिलेने नागपूरातील वीज तर्मचाऱ्याला गंडवले

    - नागपूरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये महिलेसह १६ जणांवर गुन्हे दाखल

    - सुनील देऊळवार या वीज कर्मचाऱ्याची फसवणूक

    - मॅट्रीमोनी साईटवर झाली महिलेशी ओळख, नंतर चाटिंग आणि चिटिंग

  • 12 Jul 2021 07:29 AM (IST)

    कोल्हापूर जिल्हा परिषदेची आज अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड

    कोल्हापूर :

    कोल्हापूर जिल्हा परिषदेची आज अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड

    अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या राहुल पाटील यांचे नाव आघाडीवर

    राहुल पाटील हे आमदार पी.एन.पाटील यांचे सुपुत्र

    तर उपाध्यक्षपदासाठी जयवंत शिंपी आणि विजय बोरगे यांच्यात चुरस

    महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांकडून उमेदवारांची नाव आज सकाळी 11 नंतर जाहीर केली जाणार

  • 12 Jul 2021 07:17 AM (IST)

    राजकीय गुरु रघुनाथ येंमुलला अटक

    पुणे -

    - रघुनाथ येंमुल ला अटक

    - येंमुल हा मोठा राजकीय गुरू

    - चतुःश्रृंगी पोलिसांनी केली अटक

    -  अटकेने राजकीय क्षेत्रात खळबळ

  • 12 Jul 2021 07:14 AM (IST)

    नागपुरात महिन्याला सरासरी आठ हत्या, १८ अत्याचाराच्या घटना

    - नागपुरात महिन्याला सरासरी आठ हत्या, १८ अत्याचाराच्या घटना

    - नागपूरात गेल्या पाच महिन्यात ९९० चोरीच्या घटना

    - गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढल्या गुन्ह्याच्या घटना

    - २०२० च्या सरासरी तुलनेत यंदा गुन्हेगारीच्या घटना जास्त

    - सायबर गुन्हेगारीनेही वाढवली पोलीसांची चिंता

    - माहिती अधिकारात नागपूरातील गुन्हेगाराची धक्कादायक माहिती

  • 12 Jul 2021 07:03 AM (IST)

    मनसे लागली मनपा निवडणुकांच्या तयारीला

    नाशिक -

    मनसे लागली मनपा निवडणुकांच्या तयारीला

    मनसे अध्यक्ष 16,17,18 जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर

    पुण्यापाठोपाठ राज ठाकरे यांचा नाशिक दौरा..

    राज ठाकरे नाशिक दौऱ्यातून फुंकणार महापालिका निवडणुकांचं रणशिंग

    मनसे साठी नाशिक हा जुना बालेकिल्ला

    नाशिक ताब्यात घेण्यासाठी राज ठाकरे सरसावले

    तीन दिवसांच्या दौऱ्यात घेणार संघटनात्मक मोठे निर्णय

    राज ठाकरे यांचा दौरा असल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

  • 12 Jul 2021 07:01 AM (IST)

    नाशिककरांना दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेळगावसाठी हॉपिंग फ्लाईट्स

    नाशिक -

    अलायन्स एअर कडून नाशिककरांसाठी चांगली बातमी

    नाशिककरांना दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेळगावसाठी हॉपिंग फ्लाईट्स

    ट्रू जेट चे देखील उद्यापासून अहमदाबाद साठी उड्डाण

    नाशिककरांचा विमान प्रवास होणार आणखी सुखकर

    कोरोना काळात बंद असलेल्या विमानसेवा अंशतः सुरु

  • 12 Jul 2021 07:00 AM (IST)

    चिपळूण, गुहागर, खेड परिसरात रात्रभर पडतोय पाऊस

    रत्नागिरी -

    चिपळूण, गुहागर, खेड परिसरात रात्रभर पडतोय पाऊस

    गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत होता

    लावणीच्या कामाला वेग शेतकरी आनंदीत

    तर तुरळक भागात साचले पाणी

  • 12 Jul 2021 06:59 AM (IST)

    मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी धरणात पाण्याची आवक वाढली

    मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी धरणात पाण्याची आवक वाढली

    विष्णुपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडले

    942 क्यूमेसने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू

    नदीकाढच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

  • 12 Jul 2021 06:41 AM (IST)

    पूर्णा नदीच्या पुलावर पाणी, अकोला ते अकोट मार्ग बंद

    अकोला -

    अकोला जिल्ह्यातल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावरुन पाणी आल्याने प्रशासनाच्या वतीने अकोला ते अकोट मार्ग बंद करण्यात आला आहे

  • 12 Jul 2021 06:40 AM (IST)

    अकोल्यात विजांच्या कडकटा सह जोरदार पावसाला सुरुवात

    अकोला -

    अकोल्यात विजांच्या कडकटा सह जोरदार पावसाला सुरुवात

    सकाळ पासून आहे ढगाळ वातावरण

    संध्याकाळी झाला पाऊस

    पुन्हा जोरदार पावसाची हजेरी

    गेल्या 20 मिनिटा पासून आहे जोरदार पाऊस

  • 12 Jul 2021 06:39 AM (IST)

    काशीद येथीलजुना पूल कोसळला, तरुणाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना वाचवले

    मुरूड तालुक्यातील काशीद येथे असलेला जुना पुल आज रात्री ८ वाजता कोसळला या दुर्घटनेत एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन पुलावरून खाली पडली.

    यावेळी अलिबाग मांडवी मोहल्ला येथे राहणारा अरमान शेहनवाज सय्यद हा युवक वाहून गेला होता. मात्र त्याला पोहता येत असल्याने तो पाण्याबाहेर आला व त्याने प्रसंगवधान राखुन अल्टो कारची काच फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून समयसूचकता दाखवुन जीवदान दिले.

    अरमानचे या शौर्याबद्दल त्याचे सर्व थरातुन अभिनंदन होत आहे.

Published On - Jul 12,2021 6:30 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.