Maharashtra News LIVE Update | कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली
Breaking News

| Edited By: prajwal dhage

Jul 14, 2021 | 12:17 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 13 Jul 2021 09:13 PM (IST)

  कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली

  कोल्हापूर : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली

  वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नवीन नियुक्ती

  कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून राहूल रेखावर यांची नियुक्ती

 • 13 Jul 2021 07:57 PM (IST)

  पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविकेचा डेंग्यूमुळे मृत्यू

  पिंपरी चिंचवड -पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविकेचा डेंग्यूमुळे मृत्यू

  -अर्चना बारणे असं मृत्यू झालेल्या नगरसेविकेचे नाव

  खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते

 • 13 Jul 2021 07:55 PM (IST)

  उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जण जखमी झाल्याची माहिती

  उल्हासनगर : उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला

  कॅम्प 1 च्या ए ब्लॉकमधील देवऋषी इमारतीतील दुर्घटना

  पहिल्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर कोसळला

  दुर्घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती

  जखमींना खासगी रुग्णालयात केले उपचारार्थ दाखल

  गेल्या दोन महिन्यातली उल्हासनगरातली स्लॅब कोसळण्याची तिसरी दुर्घटना

 • 13 Jul 2021 07:02 PM (IST)

  गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 24 दरवाजे उघडले

  गडचिरोली : जिल्ह्यात मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 24 दरवाजे उघडले

  या 24 दरवाजातून 43680 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे

  या धरणात एकूण 83 गेट असून त्यातून फक्त 24 गेट सोडण्यात आलेले आहे

  गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे

  गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या वैनगंगा नदी, वर्धा नदी, प्रणहिता नदी, इंद्रावती नदी, पारलाकोटा नदी यांची पाणीपातळी सामान्य आहे.

  या सर्व नद्या केंद्रातील नोंदीनुसार सामान्य असून इशारा पातळीच्या खाली आहेत

  चिचोडा बॅरेजचे 38 गेट उघडण्यात आले असून त्यातून तेराशे 24 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे

 • 13 Jul 2021 06:50 PM (IST)

  सोलापूर शहरात पावासाला सुरुवात, सकाळपासून होते ढगाळ वातावरण

  सोलापुर - शहरात पावसाला सुरुवात

  सकाळपासून होते ढगाळ वातावरण

  ग्रामीण भागात पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात

 • 13 Jul 2021 06:45 PM (IST)

  5 लाख रुपये चोरी प्रकरण, नाशिकमध्ये पोलिसांचे पथक करन्सी नोट प्रेसमध्ये दाखल 

  नाशिक - पोलिसांचे पथक करन्सी नोट प्रेसमध्ये दाखल

  चौकशीसाठी पोलीस करन्सी नोट प्रेसमध्ये पोहोचलो

  5 लाखांच्या चोरी प्रकरणी थेट करन्सी नोट प्रेसमध्ये जाऊन पोलीस करणार चौकशी

  पोलिसांचे पथक पहिल्यांदाच करन्सी नोट प्रेसमध्ये चौकशीसाठी दाखल

 • 13 Jul 2021 05:02 PM (IST)

  MPSC ने 817 जागांची शिफारस केली होती त्याबद्दल आजच्या बैठकीत चर्चा : दत्तात्रय भरणे

  मुंबई : MPSC 2019 ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत बैठक संपली

  मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

  - आजच्या बैठकीत MPSC ने 817 जागांची शिफारस केली होती त्याबद्दल चर्चा झाली

  - SEBC च्या जागांबाबत आम्ही विधि व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे

  - आज संध्याकाळपर्यंतच तो अभिप्राय येईल

  - आयोगावर 31 जुलैपर्यंत सदस्यांची रिक्त पदे भरली जातील

 • 13 Jul 2021 04:41 PM (IST)

  प्रकाश आंबेडकर यांना ICU मधून प्रायव्हेट रूममध्ये हलविले

  मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती  सुधारत असून आज त्यांना ICU  मधून प्रायव्हेट रूममध्ये हलविण्यात आले आहे. त्यांनी नियमित आहार घेण्यास सुरुवात केली असून वॉर्डमध्ये थोडावेळ चालत आहेत.

 • 13 Jul 2021 03:58 PM (IST)

  नालासोपाऱ्यात सकाळपासून पाऊस, पाणी वस्तीत शिरल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत

  विरार : नालासोपाऱ्यात सकाळपासून पावसाने सुरवात केली आहे, सकाळ पासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले नाही. मात्र विरार फाट्यावरील खैरपाडा (वरठापाडा) या परिसरातील वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

  भूमाफियांनी नैसर्गिक नाले बुजवून, अनाधिकृत चाळीचे बांधकाम केल्याने सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने खैरपाड्याला नदी नाल्याचे स्वरूप आले आहे. या परिसरात अजून म्हणावा तसा पाऊस झाला नाही. पण थोड्याशा पावसामुळे जर वस्तीत पूर येत असेल तर मोठ्या पावसात काय अवस्था असेल याची कल्पना नागरिक करत आहेत.

 • 13 Jul 2021 03:55 PM (IST)

  नंदुरबारमध्ये जोरदार पाऊस, नागरिकांची उकाड्यापासून सुटका

  नंदूरबार : गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा असलेल्या पावसाला नंदुरबार शहरात सुरुवात झाली

  दमदार पाऊस झाल्याने नंदुरबारवासियांना उकाड्यापासून सुटका

 • 13 Jul 2021 02:45 PM (IST)

  भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्या प्रकरणी एका बड्या एमडी डॉक्टरला अटक

  पुणे -

  - भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्या प्रकरणी एका बड्या एमडी डॉक्टरला अटक

  - सुजित जगताप (वय 42) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव,

  - त्याने हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोरे आल्याने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ,

  - आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली,

  - छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवरून मागवला असल्याचं समोर.

 • 13 Jul 2021 01:31 PM (IST)

  फक्त आमदारकी, मंत्रिपदासाठी मी राजकारणात नाही - पंकजा मुंडे

  मुंडे समर्थक सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीमाने नामंजूर

  गोपीनाथ मुंडेंनी तळागाळातील लोकांसाठी काम केलं

  मुंडे साहेबांनी वंचितांना आवाज दिला

  लोकांची कामं करण्यासाठी मी राजकारणात आली

  फक्त आमदारकी, मंत्रिपदासाठी मी राजकारणात नाही

  कुठलंही पद मिळवण्यासाठी मी राजकारणात नाही

  मंत्रिपदाची मागणी हे मुंडे साहेबांचे संस्कार नाही

  मला सत्तेची लालसा नाही, मला खुर्ची नको

  मला दबावतंत्र करायचं नाही

  तुमच्या डोळ्यातील पाणी मी कसं बघू?

  मोठा नेता नेहमी त्याग करतो

  मला दिल्लीत कोणीही झापलं नाही

  स्वाभिमानी राजकारण केले आहे, माझा पंतप्रधानांनी कधीही अपमान केला नाही

  काही राष्ट्रीय अध्यक्षांनी अपमानित केले नाही

  पंतप्रधानांसोबत पक्ष विस्तारावर चर्चा

  प्रवास खडतर मात्र मी संपले नाही

  मला संपवण्याचा प्रयत्न पण मी संपले नाही

  मी कोणालाच भीत नाही

  माझ्या समाजाच्या मंत्र्याला कशाला अपमानित करु

 • 13 Jul 2021 12:55 PM (IST)

  पुराच्या पाण्यातुन एसटी नेणाऱ्या त्या चालकाचे निलंबन

  महाड

  पुराच्या पाण्यातुन एस टी नेणाऱ्या चालकाचे निलंबन

  विजय कुमार रामचद्रं जाधव, असे चालकाचे नाव.

  एस टी पिपंरी चिचंवड डेपोची असल्याची माहीती समोर आली आहे.

  पुलाचे गार्ड स्टोन दिसत होते म्हणुन गाडी पुढे नेली असे चालकाचे म्हणणे होते.

 • 13 Jul 2021 12:38 PM (IST)

  करन्सी नोट प्रेसमधील 5 लाखांच्या नोटा गायब झाल्याचं प्रकरण

  नाशिक -

  करन्सी नोट प्रेसमधील 5 लाखांच्या नोटा गायब झाल्याचं प्रकरण

  करन्सी नोट प्रेसचे अधिकारी उपनगर पोलीस ठाण्यात दाखल

  नोटा गायब झाल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

 • 13 Jul 2021 12:37 PM (IST)

  गडचिरोली जिल्ह्यात दहा दिवसानंतर दमदार पाऊस

  गडचिरोली जिल्ह्यात दहा दिवसानंतर दमदार पाऊस

  जिल्ह्यातील अनेक भागात एक तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे

  जिल्ह्यातील जिल्ह्यातील धरणाचे पाण्याचा स्तर कमी असून आतापर्यंत कोणतेही धरणाचे दरवाजे उघड करण्यात आलेले नाही

  दमदार पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना दिलासा

  शेतकऱ्यांना पेरणीसाठी होणार मोठी मदत

 • 13 Jul 2021 12:36 PM (IST)

  आरोपी सचिन वाझे याचा जबाबात अनेक खुलासे

  आरोपी सचिन वाझे याचा जबाबात अनेक खुलासे

  तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपर्कात असल्याचा केला खुलासा

  यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ

  वाझे हा स्फोटकांनी भरलेली गाडी अंबानी यांच्या घरा जवळ पार्क केल्याच्या गुन्ह्यात आरोपी आहे.

  या प्रकरणात सचिन वाझे सध्या तळोजा जेल मध्ये आहे

  ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझे याच्या चौकशी साठी ईडी कोर्टाची परवानगी घेतली होती

 • 13 Jul 2021 11:59 AM (IST)

  वरळी ते परळी पंकजा मुंडे समर्थकांचा एल्गार सुरु

  परळी -

  वरळी ते परळी पंकजा मुंडे समर्थकांचा एल्गार सुरु

  पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ परळीतही समर्थक एकवटले

  शिवाजी चौक परिसरात पंकजा मुंडे समर्थकांचे आत्मक्लेश आंदोलन सुरू

  वयोवृद्ध समर्थकही आंदोलनात सहभागी

  शिवाजी पुतळा परिसरात बसून समर्थकांचं आंदोलन सुरू

  पंकजा मुंडे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध समर्थकांचा परळीतही एल्गार सुरू

 • 13 Jul 2021 11:58 AM (IST)

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती

  सिंधुदुर्ग -

  जिल्ह्यात पावसाची विश्रांती

  पहाटेपासून पावसाची सुरु होती रिपरिप

  मात्र गेल्या दोन तासापासून पावसाची पूर्णत: विश्रांती

  नद्यांची पातळी सुद्धा झाली कमी

  जिल्ह्यात मात्र ढगाळ वातावरण

 • 13 Jul 2021 11:07 AM (IST)

  मराठा आरक्षणासाठी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांचा एल्गार

  मराठा आरक्षणासाठी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांचा एल्गार

  मुंबईत काढणार बाईक रँली

  ऐरोली ते माथाडी भवनापर्यंत काढणार बाईक रँली

  18 तारखेला नरेंद्र पाटलांची निघणार भव्य बाईक रँली

  सोलापूरात नरेंद्र पाटलांच्या मोर्चाला पोलिसांनी नाकारली होती परवानगी

  मात्र आता बाईक रँली काढणारचं नरेंद्र पाटलांची टीव्ही 9 मराठीला माहिती

  हजारो बाईक होणार रँलीत सहभागी

 • 13 Jul 2021 11:01 AM (IST)

  बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करतांना झाला स्फोट, बाईक जळून खाक

  नाशिक -

  - बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करतांना झाला स्फोट

  - बाईक जळून खाक

  - काही वीज मीटरही आगीत जळून खाक

  - सुदैवाने अपार्टमेंट मधील 6 कुटुंबाचे वाचले प्राण

  - कालपासून बिल्डिंगची वीज गायब

  - इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्या रेसीडेंसी मधील कालची घटना

 • 13 Jul 2021 10:50 AM (IST)

  वसई-विरारमधील पाऊस थांबला

  वसई-विरार -

  वसई विरारमधील पाऊस थांबला

  सकाळी 7 ते 8 या 1 तासात पडला जोरदार पाऊस

  वसई विरार मध्ये मागच्या 12 तासात 63 मिलिमीटर पावसाची झाली नोंद

  सध्या वसई विरार मध्ये आभाळ आले असून अधून मधून ऊनही पडत आहे

 • 13 Jul 2021 10:49 AM (IST)

  शेतकऱ्यांना पिक विमा भरपाईपासून वंचित ठेवल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला खंडपीठाची नोटीस

  औरंगाबाद -

  शेतकऱ्यांना पिक विमा भरपाईपासून वंचित ठेवल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला खंडपीठाची नोटीस

  सिल्लोड तालुक्यातील एक लाख 18 हजार 402 शेतकरी पीक विम्यापासून वंचित ठेवल्याने खंडपीठात याचिका दाखल

  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे दिले आदेश

  1 लाख 18 हजार लोकांनी HDFC इरगो विमा कँपणीला 4 कोटी 71 लाख रुपयांचे प्रीमियम भरून देखील पीक विमा मिळाला नाही

  पीक विम्यापासून वंचित ठेवल्याने 28 ते 29 शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात केली याचिका दाखल

 • 13 Jul 2021 10:45 AM (IST)

  प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज - राम शिंदे

  अहमदनगर -

  राम शिंदे, माजी मंत्री

  खासदार डॉ प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज

  तर माजी मंत्री राम शिंदे यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

  गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष तळागाळात पोहचवला

  काँग्रेस काळात देखील राज्यात मोठं काम केलं

  त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या

  प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा निवडून आल्या तर भागवत कराड एक वर्षापूर्वीच खासदार झाले त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या

  पंकजा मुंडे आपला निर्णय जाहीर करतील

  आपल्या मनासारखा निर्णय झाला नाही तर घरात देखील आपण नाराजी व्यक्त करतो

  तर सध्या देवेंद्र फडणवीस प्रमुख आहेय त्यामुळे त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली जाते

  मात्र पंकजा मुंडे या वेगळा निर्णय घेतील अस वाटत नाही

 • 13 Jul 2021 10:28 AM (IST)

  ठाण्यातील शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

  ठाण्यात शिवसेनेला धक्का

  ठाण्यातील शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

  शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आणि सभापती बांधकाम आरोग्य समिती , गटनेता जिल्हा परिषद ठाणे सुरेश गोपीनाथ म्हात्रे(बाळा मामा) - यांचा थोड्याच वेळात काँग्रेस मध्ये होणार प्रवेश

  टिळक भवन दादर येथे होणार पक्ष प्रवेश

 • 13 Jul 2021 10:28 AM (IST)

  मराठवाड्यातील 61 मंडळात अतिवृष्टीचा फटका

  औरंगाबाद ब्रेकिंग :-

  मराठवाड्यातील 61 मंडळात अतिवृष्टीचा फटका..

  मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद होत, नदी नाले भरले तुडुंब..

  परभणी जिल्ह्यात 276 जनावरे गेले वाहून ..

  मागील 24 तासात बीड, नांदेड, हिंगोली,परभणी जिल्ह्यातील 61 मंडळात अतिवृष्टीची नोंद..

  औरंगाबाद,उस्मानाबाद,जालना, लातूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस..

  औरंगाबाद येथील रहिवासी आईचा आणि मुलाचा औंढा नागनाथ येथील पुरात वाहून जात मृत्यू..

 • 13 Jul 2021 09:27 AM (IST)

  शिवसेना उपनेते आणि माजी राज्य मंत्री काँग्रेसच्या वाटेवर

  वर्धा

  - शिवसेना उपनेते आणि माजी राज्य मंत्री काँग्रेसच्या वाटेवर

  - हिंगणघाट मतदार संघाचे माजी आमदार अशोक शिंदे

  - अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिले आहे

  - माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे सध्या उपनेते

  - पक्षाकडून मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर डावलल्यामुळे होते नाराज

 • 13 Jul 2021 09:01 AM (IST)

  वाहत्या पाण्याने तुडुंब भरलेल्या पुरसद्रु्युश्य रस्ता एसटीने धाडसाने केला पार

  महाड -

  वाहत्या पाण्याने तुडुंब भरलेल्या पुरसद्रु्युश्य रस्ता एस टी धाडसाने केला पार.

  महात तालुक्यातील रेवतळे फाटा येथील खाडीपट्टयात जाणाऱ्या रस्त्यावरील घटना

  अतिव्रुष्टीमुळे नागेश्वरी बधांरा उलटुन वाहुन पाणी ओव्हरफ्लो होऊन खाडीपट्टयात जाणारा रस्ता ही बुडाला असताना एस टी चालकाने केलेले धाडस अगांशी येण्याचीही शक्यता होती.

  मात्र एसटी चालकाने सुखरुप रस्ता पार केल्याने अति घाई सकंटात नेयी. अशी परिस्थीती होती.

  एसटी मध्ये किती प्रवासी होते, रिकामी होती हे मात्र कळु शकले नाही.

 • 13 Jul 2021 07:54 AM (IST)

  राज्यातील शाळांकडून इयत्ता दहावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात

  पुणे -

  - राज्यातील शाळांकडून इयत्ता दहावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात,

  - परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण संगणकीय प्रणालीत भरण्याचे ९९ टक्के काम पूर्ण,

  - शाळांकडून विद्यार्थ्यांच्या गुणांची आलेली माहिती एकत्रित करून अंतिम निकाल तयार करण्यासाठी विभागीय मंडळाकडून राज्य मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतील,

  - एकूण १६ लाख चार हजार ४४१ विद्यार्थ्यांपैकी जवळपास १५ लाख ९२ हजार ४१८ हून अधिक विद्यार्थ्यांची गुण संगणकीय प्रणालीत अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण,

  - त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढील आठवड्याच्या सुरवातीला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

 • 13 Jul 2021 07:42 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप कायम

  कोल्हापूर

  जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप कायम

  शहर आणि परिसरात मात्र उघडझाप

  पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत होतेय वाढ

  कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली

  नदीची पाणी पातळी 23 फुटांवर

  जिल्ह्यातील चार बंधारे पाण्याखाली

 • 13 Jul 2021 07:22 AM (IST)

  कोल्हापुरात शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षांसह सात संचालकांचे राजीनामे

  कोल्हापूर

  शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षांसह सात संचालकांचे राजीनामे

  संघावर प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा

  आज किंवा उद्या होणार नव्या प्रशासकाची नियुक्ती

  संचालक मंडळ अल्पमतात आल्यानं सुरू प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया

  मात्र तत्पूर्वीच अध्यक्षांसह सात संचालकांचे राजीनामे

  यापूर्वी पाच संचालकांचे झालय निधन

  तीन संचालक ठरले होते अपात्र इतर तिघांनी दिले होते राजीनामे

 • 13 Jul 2021 07:20 AM (IST)

  देशभरात सहा महिन्यात ८६ वाघांचा मृत्यू

  - देशभरात सहा महिन्यात ८६ वाघांचा मृत्यू

  - सहा महिन्यात २२ वाघांच्या मृत्यूने महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

  - भारतात वाघाच्या मृत्यूची वाढती आकडेवारी चिंतेचा विषय

  - वन खात्यापुढे व्याघ्र संरक्षणाचं मोठं आव्हान

  - मध्य प्रदेशात सहा महिन्यात २६ वाघांचा मृत्यू

 • 13 Jul 2021 07:17 AM (IST)

  रायगड जिल्ह्याला मागील 48 तास पावसाने झोडपून काढल्यानतंर आता मात्र पाऊस शांत

  रायगड

  रायगड जिल्ह्याला मागील 48 तास पावसाने झोडपून काढल्यानतंर आता मात्र पाऊस शांत आहे.

  पावसाचा जोर ओसरला असला तरी ढगाळ वातावरण आहे.

  अधून मधून हलक्या सरी सुरू आहेत.

  नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे धरण बंधारे भरलेली आहेत.

  पावसाचा जोर पुन्हा वाढला तर पुर परिस्थिती निर्माण होऊ शकते

  कशेडी घाटात सायंकाळी दरडी कोसळत होत्या. माटवण गावात नव्याने उभा केलेला विजेचा खांब रस्त्यावर कोसळला.

 • 13 Jul 2021 07:11 AM (IST)

  रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट

  रत्नागिरी - जिल्ह्यातील पूरपरिस्थिती ओसरली

  जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू

  रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्यानं दिलाय रेड अलर्ट

  मुसळधार पावसाने सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत

  जून पासून आज पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात तेराशे मिलिमीटर हून अधिक पाऊस

  पहाटे नंतर पावसाची विश्रांती

 • 13 Jul 2021 07:06 AM (IST)

  नागपुरात पुन्हा भुखंड हडपणारी गुंडांची टोळी सक्रिय

  - नागपुरात पुन्हा भुखंड हडपणारी गुंडांची टोळी सक्रिय

  - कळमना भागात हडपले अनेकांचे भुखंड

  - तक्रारीनंतरंही कारवाई नाही, कळमना पोलीसांची भुमिका संशयास्पद

  - पोलीसांकडून कारवाई होत नसल्याने लोक संतप्त

  - नागरिकांमध्ये गुंडांची दहशत

 • 13 Jul 2021 07:05 AM (IST)

  चिपळूणमध्ये गेल्या 24 तासापासून पडत असलेला पाऊस रात्रभर तसाच सुरू

  चिपळूण - गेल्या 24 तासापासून पडत असलेला पाऊस रात्रभर तसाच सुरू

  मात्र पहाटेपासून पावसाचा जोर ओसरला

  सध्या फक्त पावसाच्या तुरळक सरी

 • 13 Jul 2021 06:50 AM (IST)

  राजापूरमधील पूर ओसरला, पावसाची विश्रांती

  रत्नागिरी -

  राजापूरमधील पूर ओसरला

  रात्री पासून राजापूर शहरात पावसाची विश्रांती

  अर्जुना नदी दुथडी भरून वाहते

  अर्जुना नदीला पूर आल्याने काल राजापूर बाजारपेठ होती पाण्याखाली

Published On - Jul 13,2021 6:47 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें