AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE Update |मालाडमधील डीमार्ट सील, कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे कारवाई  

| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 12:44 AM
Share

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update |मालाडमधील डीमार्ट सील, कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे कारवाई   
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Jul 2021 09:53 PM (IST)

    सुसाईड स्टंटचा व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीला वांद्रे पोलिसांकडून अटक

    मुंबई : पश्चिम रेल्वे पोलिसांनी सुसाईड स्टंटचा व्हिडिओ बनवणाऱ्या आणि व्हिडीओला सोशल मिडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला केली अटक

    वांद्रे रेल्वे पोलिसांनी केली आरोपीला अटक

    या व्यक्तीने मुंबईतील वांद्रे-खार स्थानकादरम्यान आत्महत्या करण्याऱ्या स्टंटचा व्हिडिओ बनविला होता

    स्टंट करणाऱ्या व्यक्तीचे नाव इफ्फी खान आहे

    वांद्रो जीआरपी करत आहेत पुढील चौकशी

  • 24 Jul 2021 06:40 PM (IST)

    वरळी हनुमान गल्लीमध्ये लिफ्ट कोसळली, 2 जणांचा मृत्यू

    मुंबई : वरळी हनुमान गल्लीमध्ये लिफ्ट कोसळली

    काही लोकांना इजा झाल्याची प्राथमिक माहिती

    ललित अंबिका बिल्डींग अस इमारतीचं नाव

    2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती

    मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

  • 24 Jul 2021 05:07 PM (IST)

    मालाडमधील डीमार्ट सील, कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे कारवाई  

    मुंबई : मालाडमधील डीमार्ट सील

    सहाय्यक आयुक्त मकरंद दगड़खैर यांनी केली कारवाई

    कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे बीएमसीकडून डीमार्ट सील

    अनिश्चित काळासाठी डी मार्ट केले सील

  • 24 Jul 2021 10:27 AM (IST)

    नागपूर शहरात गँगवॉर भडकले, 24 तासात दोन हत्येच्या घटना

    नागपूर

    नागपूर शहरात गँगवॉर भडकले,

    नागपूरात 24 तासात दोन हत्याच्या घटना,

    काल रात्री स्वयंदीप नगराळे याची हत्या करण्यात आली होती,

    याचा बदला म्हणून स्वयंदीप च्या साथीदारांनी आरोपी शक्तिमान याची केली हत्या,

    शहरात पुन्हा गुन्हेगारांनी डोकं वर काढलं

  • 24 Jul 2021 10:26 AM (IST)

    आषाढी एकादशी वारीची सांगता, मानाच्या पालख्या आणि संतांच्या पादुका श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भेट

    पंढरपूर – आज आषाढी एकादशीसाठी आलेल्या मानाच्या पालख्या आणि श्री विठ्ठलाची भेट होऊन वारीची सांगता होते.

    काल्या नंतर सर्व मानाच्या पालख्या आणि संतांच्या पादुका यांची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भेट होते. आषाढी यात्रेचा सोहळा सांगता होते. आज गोपाळपूर मध्ये सर्व संतांच्या पालख्या काला करण्यासाठी जातात. संत ज्ञानेश्वर,तुकाराम, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ, एकनाथ या पालख्या पंढरपूर मधून गोपाळपूर ला जातात. यानंतर सर्व पालख्या आपल्या गावाकडे प्रस्थान ठेवतात

  • 24 Jul 2021 09:39 AM (IST)

    नाशिकच्या सिडको भागातील सोसायटीत फ्री स्टाईल हाणामारी, महिलांना देखील मारहाण

    नाशिक – सिडको भागातील सोसायटीत फ्री स्टाईल हाणामारी

    घटनेत महिलांना देखील मारहाण

    किरोकोळ कारणावरून मारहाण झाल्याची माहिती

    सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्याकडून सोसायटीमध्ये राहत असलेल्या एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप

    अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा, पोलीस तपास सुरू

  • 24 Jul 2021 09:37 AM (IST)

    नागपुरात रेमेडिसिव्हीर काळाबाजार केल्याप्रकरणी पहिली शिक्षा, 3 वर्ष सश्रम कारावास

    नागपूर –

    रेमडीसीविर काळाबाजार पहिली शिक्षा, 3 वर्ष सश्रम कारावासाची विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा.

    महेंद्र रंगारी असे आरोपीचे नाव असून या प्रकारच्या प्रकरणातील राज्यातील ही पहिलीच घटना आहे.

    महेंद्र रेमडीसीविर इंजेक्शन चा काळाबाजार करत होता, 17 एप्रिल 2021 रोजी हुडकेश्वर पोलिसांनी महेंद्रवर गुन्हा नोंदविला होता.

    उच्च न्यायालयाने अश्या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन फास्ट ट्रक कोर्टात प्रकरण चालविण्याचे आदेश दिले होते.

  • 24 Jul 2021 08:04 AM (IST)

    कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या गोदावरी गौरव पुरस्कार यंदा ऑनलाईन, सहा विभिन्न क्षेत्रातील मान्यवरांना दिला जाणार पुरस्कार

    नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या, गोदावरी गौरव पुरस्कार यंदा ऑनलाइन

    एक वर्षाआड दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार

    2020 सालचा हा पुरस्कार’ कोरोनामुळे झाला नव्हता वितरीत

    रविवारी सायंकाळी सहा वाजता होणार ऑनलाइन सोहळा

    गौरी सावंत, डॉ माधव गाडगीळ, भगवान रामपुरे, दर्शना जव्हेरी, सई परांजपे आणि काका पवार या सहा विभिन्न क्षेत्रातील मान्यवरांना दिला जाणार पुरस्कार

  • 24 Jul 2021 08:01 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात अतिृष्टीमुळे खरीप पिकांचं आणि शेतीचं मोठं नुकसान, त्वरित पंचनामे करण्याची मागणी

    – नागपूर जिल्ह्यात अतिृष्टीमुळे खरीप पिकांचं आणि शेतीचं मोठं नुकसान

    – नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी

    – काँग्रेस आ. राजू पारवे यांनी प्रशासनाकडे केली पंचनाम्याची मागणी

    – अतिवृष्टी आणि पुरामुळे कापूस, सोयाबीनचं सर्वाधिक नुकसान

    – पुरामुळे जमीन खरडून गेल्याने शेतकरी संकटात

    – शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याची मागणी

  • 24 Jul 2021 07:59 AM (IST)

    एएससीचा पेपर घेण्याचा नागपूर विद्यापीठाला विसर, विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना मोठा फटका

    एएससीचा पेपर घेण्याचा नागपूर विद्यापीठाला विसर

    – नियोजीत वेळेत प्रश्नपत्रिकाच अपलोड केली नाही

    – फॅारेन्सीक सायन्सचा पेपर वेळेवर सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप

    – पेपरचा वेळ झाला तरिही प्रश्नपत्रिका अपलोड झाली नाही

    – विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना मोठा फटका

  • 24 Jul 2021 07:58 AM (IST)

    नाशिकमध्ये तिसऱ्या लाटेसाठी महापालिका प्रशासनाची तयारी, 1780 ऑक्सिजन बेड उभारणार

    नाशिक – तिसऱ्या लाटेसाठी महापालिका प्रशासनाची तयारी..

    1780 ऑक्सिजन बेडच्या उभारणीला सुरुवात..

    तर तिसऱ्या लाटेपूर्वी नोकरभरती साठी गर्दी..

    आरोग्य विभागाच्या पदांसाठी शेकडो तरुणांची महापालिकेत गर्दी

  • 24 Jul 2021 07:58 AM (IST)

    नाशिक शहरात लसीकरण मोहिम विस्कळीत, आरोग्य केंद्रांवर नागरिकांच्या रांगा

    नाशिक – शहरात लसीकरण मोहीम विस्कळीत..

    शुक्रवारी मिळाले केवळ 5700 डोस..

    लसीकरण मोहीम एक दिवस सुरू, दोन दिवस बंद..

    सर्वच आरोग्य केंद्रांवर नागरिकांच्या रांगा..

    लसीकरणाच्या अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये संताप

  • 24 Jul 2021 07:25 AM (IST)

    जून महिन्यापासून साताऱ्याच्या पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस

    सातारा – जून महिन्यापासून साताऱ्याच्या पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस

    कोयनेला आतापर्यंत 2597 मिलिमीटर

    नवजाला  तीन हजार 427 मिलिमीटर

    तर महाबळेश्वर येथे 3209 मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद

  • 24 Jul 2021 07:23 AM (IST)

    ठाण्यात आज पाणीपुरवठा बंद, पंपाच्या स्ट्रेनरमध्ये कचरा काढण्याचे काम सुरु

    अतिवृष्टीमुळे पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये पुराच्या पाण्यातील कचरा काढण्याचे काम सुरु,

    ठाण्यात आज सकाळी 9 ते 6 दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार

    फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा सुरु राहणार.

  • 24 Jul 2021 07:18 AM (IST)

    एअर इंडियाच्या 3 हजार 523 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा

    सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या ३ हजार ५२३ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा

    त्यातील ५६ जणांचा मृत्यू

    त्यात वैमानिकांसह केबिन क्रू मेंबरची संख्या सर्वाधिक

  • 24 Jul 2021 07:12 AM (IST)

    मध्य आणि पश्चिम रेल्वेचे वातानुकूलित लोकल सर्वेक्षण पूर्ण

    मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून करण्यात येणारे वातानुकूलित लोकलसाठीचे सर्वेक्षण पूर्ण

    बहुसंख्य प्रवाशांनी वातानुकूलित लोकल प्रवासाला पसंती

    सुमारे ४० टक्के प्रवाशांनी १२ पैकी तीन डब्बे वातानुकूलित असावे,

    तर ३० टक्क्यांहून अधिक प्रवाशांनी किमान सहा डब्बे वातानुकूलित असावे, असे मत केले व्यक्त

    आतापर्यंत ३७ हजार प्रवाशांनी आपली मते नोंदविली

  • 24 Jul 2021 07:09 AM (IST)

    मुंबई 45 वर्षांवरील दुसऱ्या मात्रेचे 61 टक्के नागरिक लसीच्या प्रतीक्षेत

    मुंबई : ४५ वर्षांवरील दुसऱ्या मात्रेचे ६१ टक्के नागरिक प्रतीक्षेत

    गेले दोन दिवस बंद असलेले लसीकरण अखेर शुक्रवारी सुरू

    अनेक केंद्रावर लस घेण्यासाठी रांगा

    प्रत्येक केंद्रावर मोजक्याच मात्रा मिळाल्यामुळे अनेकांना लस न घेताच परतले

Published On - Jul 24,2021 6:58 AM

Follow us
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.