Maharashtra News LIVE Update | …तर काँग्रेसचा पंतप्रधान व्हायला हवा, आमचा त्यांना पाठिंबा : संजय राऊत

Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 11 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

Maharashtra News LIVE Update | ...तर काँग्रेसचा पंतप्रधान व्हायला हवा, आमचा त्यांना पाठिंबा : संजय राऊत
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 11 Jun 2021 20:32 PM (IST)

  चोरट्यासोबतच्या झटापटीत कळव्याच्या घटनेची कल्याण रेल्वे स्थानकात पुनरावृत्ती

  कल्याण : विद्या पाटील हे प्रकरण ताजे असतानाच रेल्वेत पुन्हा एका व्यक्तीला चालत्या ट्रेनमध्ये लुटण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या व्यक्तिने चोरटय़ाचा प्रतिकार केल्याने चोरटा प्रवाशाच्या नाकावर प्रहार करुन पळून गेल्याची घटना कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे प्रवासी टिटवाळा रेल्वे स्थानकात उपचारासाठी घेऊन गेले. त्याठिकाणी प्रथमोपचारही झाले नाही. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे

 • 11 Jun 2021 19:03 PM (IST)

  …तर काँग्रेसचा पंतप्रधान व्हायला हवा, आमचा त्यांना पाठिंबा : संजय राऊत

  संजय राऊत :

  नाना पटोले जर स्वबळावर निवडणुका लढत असतील तर त्यांचे स्वागत आहे. स्वबळावर लढून जर ते केंद्रात सत्ता आणणार असतील, मोदींना आव्हान उभे करत असतील तर त्यांचे स्वागत आहे. काँग्रेसचा पंतप्रधान व्हायला हवा, आमचा त्यांचा पाठींबा असेल.

 • 11 Jun 2021 18:57 PM (IST)

  पारनेरमध्ये माजी सरपंचाची निर्घृण हत्या, अहमदनगर हादरलं !

  अहमदनगर :

  पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे माजी सरपंच राजाराम शेळके यांची निर्घृण हत्या

  जुन्या भांडणातून हत्या झाल्याची चर्चा

  अकरा वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकाश कांडेकर हत्या प्रकरणातील ते आरोपी होते

  सध्या ते कांडेकर खून प्रकरणात शिक्षा भोगत होते, मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या ते रजेवर होते

  दुपारच्या सुमारास राजाराम शेळके हे नारायण गव्हाण येथील आपल्या मालकीच्या शेतात काम करीत असताना अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले

 • 11 Jun 2021 18:05 PM (IST)

  नवी मुंबई विमानतळाचा वाद थांबता थांबेना, पनवेलच्या काँग्रेस नेत्याचं प्रकाश आंबेडकरांवर टिकास्त्र

  पनवेल :

  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकर या माणसाची काही एक पात्रता नाही. प्रकाश आंबेडकरांनी नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव द्यावं, अशी मागणी केली होती. या मागणीवरून काँग्रेस नेते अभिजीत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली. अजिबात स्वकर्तृत्व नसलेला हा तथाकथित नेता आयुष्यभर कुणाच्यातरी कुबड्यांबर राजकारणात उभा राहिला, काँग्रेस नेते अभिजीत पाटील यांची टीका

  दी बा पाटील आणि नवी मुंबई विमानतळ याच्याशी प्रकाश आंबेडकर यांचा काही एक संबंध नाही. नवी मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला काडीचे स्थान नाही. नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्यांची हौस ही दुसरी घाण सवय. अभिजीत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट लिहत केली टीका

  अभिजीत पाटील पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आहेत

 • 11 Jun 2021 17:10 PM (IST)

  साताऱ्यात रिक्षाला कारची मोठी धडक, रिक्षातील भाजीपाला रस्त्यावर

  सातारा :

  उडतारे गावाच्या हद्दीत भाजीपाला घेऊन जाणारया अॅपे रिक्षाला अर्टिगा कारची पाठिमागून भीषण धडक

  एर्टिगा कारच्या धडकेनंतर अॅपे रिक्षातील सर्व भाजीपाला रस्त्यावर

  अॅपेतील शेतकऱ्यासह चालक गंभीर जखमी

  सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जखमींना केले दाखल

  पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर उडतारे गावाच्या हद्दीतील घटना

 • 11 Jun 2021 17:07 PM (IST)

  मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, वाशिंदजवळ ओव्हरहेडची वायर तुटली

  मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, कल्याण-कसारा मार्गावरची वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. वाशिंद आणि खडवली दरम्यान ओव्हरहेडची वायर तुटली. त्यामुळे कसाऱ्याकडून मुंबईच्या दिशेला येणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे.

 • 11 Jun 2021 16:52 PM (IST)

  क्षत्रियांना 10 टक्के आरक्षण मिळावं, अशी आमच्या पक्षाची भूमिका : रामदास आठवले

  रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  राज्यात मराठा आरक्षणचा विषय आणि एसी, एसटीचा पदोन्नतीतील आरक्षण हे मोठे विषय आहेत

  कोरोना महामारीत मोदी सरकारने अन्न-धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला

  लस मोफत देण्याचा निर्णय घेतला

  मात्र या महामारीत अनेक लोकांचे परिवार उद्धवस्त झाले, बालके पोरके झाले. त्यांची जबाबदारी सरकारने घेतली

  मराठा आरक्षण –

  राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात भूमिका योग्यप्रकारे मांडता आली नाही
  मराठा समाज राज्यकर्ता आहे, तो श्रीमंत आहे, असं वाटलं असावं. मात्र अनेक मराठा गरीब आहेत. मग आरक्षण नाकारण्यात आलं

  50 टक्केच्या पुढे जाऊन आरक्षण देता येऊ शकते. मात्र ते कोर्टाला पटवून देणे गरजेचे आहे

  प्रमोशनमध्ये आरक्षण नाकारण्याचा घातकी निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे मोठं नुकसान होत आहे

  क्षत्रियांना 10 टक्के आरक्षण मिळावं अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे

 • 11 Jun 2021 15:26 PM (IST)

  ‘सरकारने फक्त पाच लोकांच्या पायी वारीसाठी परवानगी दिली तर उपकार होतील’

  औरंगाबाद : मानाच्या पालखीत पैठणच्या पालखीचे स्थान आहे. शासनाने ठरवून दिलेले नियमांवर पैठणच्या एकनाथ महाराज पालखीचे मानकरी रघुनाथ बुवा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पायी पालखी जाणे हा वारकऱ्यांचा मान आहे, जीव आहे. त्यामुळे किमान पाच तरी लोकांना पायी पालखी नेऊ द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारचे नियम आम्हाला मान्य आहे. मात्र जर पाच लोकांना पायी जाऊ दिलं तर वारकऱ्यांवर उपकार होतील, असं महाराजांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने याचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केलीये.

   

 • 11 Jun 2021 15:22 PM (IST)

  शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल : अरविंद सावंत

  शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया :

  ‘शरद पवार- प्रशांत किशोर यांच्यातील भेटीचे स्वागतच आहे. देशाचा एककल्ली कारभार सुरू आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष व पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचे फावले आहे. सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल.’

  ‘ शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी आहे. त्यामुळं शरद पवारांनीही तो विश्वास आहे. त्यांनी कौतुक केलय.’

  भाजपच्या नेत्यांना पोटशुळ संकुचित मनाचे झाले आहेत चांगल्याला चांगलं याला यासाठी दिलदारी लागते. मृणाल गोरे आयुष्यभर शिवसेनेच्या विरोधात लढल्या पण त्यांचं नाव पुलाला शिवसेनेनेच दिलंय.

  उत्तर प्रदेश या निवडणुकीची छायाचित्र झळकू लागली आहेत. कळून चुकले एका व्यक्तीभोवती फिरत होतो. पश्चिम बंगालचे निवडणूक केले त्यांना त्यांची जागा दाखवून दिले आहेत.

  बाजारात भारतीय जनता पार्टीचे कार्यालयीन होतं ते आता सजायला लागलाय. नवीन कार्यालय उभे राहिले आणि त्यांना असं विचारलं आणि हे पैसे अशा मार्गाने आले हे विचारलं त्याची चौकशी होणार नाही फक्त विरोधकांच्या ईडी चौकशी होणार

 • 11 Jun 2021 15:19 PM (IST)

  सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालयासमोर भाजपचे लक्षवेध आंदोलन

  सिंधुदुर्ग:-

  जिल्हा रूग्णालयासमोर भाजपचे लक्षवेध आंदोलन

  राज्य सरकार आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी.

  जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा आरोप.

  भाजपच्या कार्यकर्त्यानी आक्रमक होत राज्य सरकार, पालकमंत्री यांच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी

  ओरोस पोलीसांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, माजी आम अजित गोगटे, रणजीत देसाई, सरचिटणीस प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, नगराध्यक्ष संजू परब यांना घेतलं ताब्यात.

  जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था पुर्णता कोलमडली. जिल्ह्यात कोरोना टास्क फोर्स पाठवा आणि आरोग्य विभागात असलेली सहाशे रिक्तपदे तात्काळ भरा, राजन तेलींची मागणी.

   

 • 11 Jun 2021 13:12 PM (IST)

  पिंपरी चिंचवड शहरात तेरा अॅपे रिक्षाची तोडफोड

  पिंपरी-चिंचवड –

  – पिंपरी चिंचवड शहरात तेरा अँपे रिक्षाची तोडफोड

  – वाकडमध्ये ही घटना मध्यरात्री झाली. मद्यपान करणाऱ्या टवाळखोरांनी ही तोडफोड केल्याचा आरोप रिक्षा मालकांनी केलाय

  – पण एका इमारतीच्या सुरक्षा राक्षकाने ही तोडफोड केल्याच पोलिसांचं म्हणणं आहे

  – नव्या इमारतीसमोर या रिक्षा पार्क केला जातात, त्यामुळे इमारतीचे प्रवेशद्वारावर अडथळा निर्माण होतो म्हणून सुरक्षारक्षक अनेकदा इथं वाहनं पार्क करू नका असं सांगत होता, पण न ऐकल्याने त्याने वाहनांच्या काचा फोडल्याची कबुली पोलिसांना दिली आहे

  – सुरक्षा रक्षक वाकड पोलीसाच्या ताब्यात

 • 11 Jun 2021 13:08 PM (IST)

  नागपूरच्या मानकापूर पुलावर भीषण अपघात, चौघे जखमी

  नागपूर –

  नागपूरच्या मानकापूर पुलावर भीषण अपघात

  दोन कार अमोरा-समोर आदळल्या

  अपघातात चार जण जखमी , एका महिलेचा समावेश

  रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आणि पोलिसांनी पोहचवलं रुग्णालयात

 • 11 Jun 2021 12:39 PM (IST)

  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी असणारे राणा वासकर महाराज यांनी शासनाच्या निर्णयावर बोलण्यास दिला नकार

  पंढरपूर –

  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी असणारे राणा वासकर महाराज यांनी शासनाच्या निर्णयावर बोलण्यास दिला आहे नकार

  पालखी सोहळ्यातील संपूर्ण वारकरी संप्रदायाची पताका वासकरांच्या खांद्यावर असते

  त्याच राणा महाराज वासकर यांनी बोलण्यास नकार दिल्याने नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे

  आरफळकर, शितोळे सरकार आणि वासकर महाराज यांच्या कडे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला आणायचा मान परंपरेने तिघांना आहे

 • 11 Jun 2021 12:25 PM (IST)

  रत्नागिरी पूरस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज, चार एनडीआरएफची पथके जिल्ह्यात दाखल

  रत्नागिरी –

  पूरस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज, चार एनडीआरएफची पथके जिल्ह्यात दाखल

  रत्नागिरी जिल्ह्यात 11 ते 12 जूनला अति मुसळधार पावसाची शक्यता असून पुरस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज झाले आहे

  चार एनडीआरएफची पथके दाखल झाली असून

  साडेपाच हजार लोकांच्या स्थलांतराची व्यवस्था केली आहे

  समुद्र, खाडी, नदी किनाऱ्यावरील पूरग्रस्त, दरडग्रस्त भागात प्रवासासाठी प्रतिबंध घातले आहेत

 • 11 Jun 2021 10:56 AM (IST)

  भूमिपुत्रांच्या वतीने येत्या 24 तारखेला सिडकोला घेराव घालण्याचा इशारा

  भूमिपुत्रांच्या वतीने येत्या 24 तारखेला सिडकोला घेराव घालण्याचा इशारा

  नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला दि बा पाटील यांचेच नाव द्या अशी भूमिपुत्रांची आग्रही मागणी

  दुसऱ्या एखाद्या प्रकल्पाला नाव देऊ नका याच प्रकल्पाला नाव द्या – भाजपा आमदार किसन कथोरे यांचं एकनाथ शिंदे यांना उत्तर

 • 11 Jun 2021 10:55 AM (IST)

  नागपुरात 15 वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करुन हत्या

  – नागपुरात 15 वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करुन हत्या

  – राज राजकुमार पांडे असं मृतक मुलाचं नाव

  – इंदीरा माता नगर परिसरातून काल केलं होतं अपहरण

  – आरोपी सुरज कुमार साहू याने केलं अपहरण

  – आरोपीने घरी फोन करुन
  मृतकाच्या काकाचं डोकं कापून मोबाईलवर फोटो पाठवण्याची केली होती मागणी

  – मागणी मान्य न झाल्यास १५ वर्षीय मुलाची केली हत्या

  – आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी घेतलं ताब्यात

 • 11 Jun 2021 10:09 AM (IST)

  गडचिरोली जिल्ह्यातील जांभुळ विक्रीला ऑनलाईन शुभारंभ

  गडचिरोली जिल्ह्यातील जांभुळ विक्रीला ऑनलाईन शुभारंभ

  एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीच्या जांभळांची दसपट दरात विक्री

  जांभूळ उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा माननीय एकनाथ शिंदे ह्यांचा निर्धार

  १० रुपये किलो ऐवजी १०० रुपये किलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
  गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्याचा निर्धार

 • 11 Jun 2021 09:08 AM (IST)

  गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांची जबाबदारी एक कनिष्ठ अभियंत्यावर

  गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांची जबाबदारी एक कनिष्ठ अभियंत्यावर

  जल सिंचन साधारण उपविभागीय कार्यालयात रिक्त पदाचा डोंगर

  सिंचन प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी अनेक अर्ज सादर केल्यानंतर सुद्धा सिंचन प्रकल्पाची कामे थंडबस्त्यात आहेत

  अहिरे उपास जिल्हा सिंचन विभागाच्या कार्यालयात अहेरी मुलचेरा एटापल्ली भामरागड सिरोंचा या तालुक्यांसाठी एकच कनिष्ठ अभियंता असल्याने अनेक शेतकऱ्यांची कामे अपूर्ण

 • 11 Jun 2021 09:05 AM (IST)

  नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी घेतली औरंगाबाद खंडपीठात धाव

  औरंगाबाद –

  नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी घेतली औरंगाबाद खंडपीठात धाव..

  विमा कंपन्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल..

  गेल्या वर्षी खरीप हंगामात नुकसान झालेल्या उस्मानाबादच्या 15 शेतकऱ्यांनी खंडपीठात केली याचिका सादर..

  नुकसानीची 72 तासांच्या नंतर ऑनलाइन तक्रार केली नसल्याने पीक विमा कंपन्यांनी पीकविमा पैसे देण्यास दिला होता नकार..

  शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती असताना ही कंपन्यांनी दाखल घेतली असल्याचा याचिकेत नमूद..

 • 11 Jun 2021 08:31 AM (IST)

  सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थी हित पाहून परीक्षा फी 35 लाख  दिले महाविद्यालयाकडे परत

  सोलापूर – विद्यापीठाने विद्यार्थी हित पाहून परीक्षा फी 35 लाख  दिले महाविद्यालयाकडे परत

  पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 19.26 टक्के सुरू केले आहे माफ

  वीस हजार विद्यार्थ्यांना झाला फायदा

  35 लाख रुपये इतकी रक्कम महाविद्यालयाकडे विद्यापीठाने केली वर्ग

  महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना पैसे फिसचे पैसे मिळणार परत

 • 11 Jun 2021 08:30 AM (IST)

  ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना डोळे, मान-पाठ, डोकेदुखीचे जडले आजार

  नाशिक – ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना गंभीर त्रास सुरू

  डोळे, मान-पाठ, डोकेदुखी चे जडले आजार

  इंटरनेट चे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी

  शाळेतच विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मागणी

  ऑनलाईन लेक्चर च्या तासिका कमी करण्याची इंडिपेंडंट सेकंडरी अँड हायर सेकंडरी टीचर्स ची मागणी

 • 11 Jun 2021 08:29 AM (IST)

  नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात

  नाशिक – नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात

  शेतकऱ्यांचा तूर्तास सर्वेक्षणाला पाठिंबा

  उद्या सिन्नर मध्ये शेतकऱ्यांची बैठक

  शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला देण्याचं महारेल चं आश्वासन

  साडे सोळा हजार कोटींची एकूण रेल्वे मार्गाचा प्रस्ताव

 • 11 Jun 2021 08:29 AM (IST)

  नाशकातील 1456 धोकादायक मिळकतीना नोटीस

  नाशिक – 1456 धोकादायक मिळकतीना नोटीस

  सर्वाधिक धोकादायक 717 मिळकती पश्चिम विभागात

  अनधिकृत वाड्यांची माहिती संकलित करून नोटीस बजावणार

  तर जुन्या नाशिकमधील 139 घरांना नोटीस

  पावसाळ्याच्या तोंडावर मनपा प्रशासनाला आली जाग

 • 11 Jun 2021 08:28 AM (IST)

  नाशिक मनपाची शहर बस सेवा 1 जुलैपासून सुरु करण्याचा प्रयत्न, मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत आज आढाव बैठक

  नाशिक – मनपाची शहर बस सेवा 1 जुलै पासून सुरू करण्याचा प्रयत्न

  मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत आज आढाव बैठक

  पहिल्या टप्प्यात शहरात सुरू होणार 50 बसेस

  तर 5 टप्प्यात 146 बसेस धावणार शहरात

  वरून विरोध मात्र आतून छुपा पाठिंबा असल्याने नगरसेवकांची भूमिका संशयास्पद

 • 11 Jun 2021 08:28 AM (IST)

  मुळशी तालुक्यातील उरवडे एमआयडीसीतल्या आग दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह आज नातेवाईकांच्या ताब्यात देणार

  पुणे

  मुळशी तालुक्यातील उरवडे एमआयडीसीतल्या आग दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह आज नातेवाईकांच्या ताब्यात देणार

  डीएनए अहवाल प्राप्त झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही झाली सुरु

 • 11 Jun 2021 08:25 AM (IST)

  सोलापूर उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांना शासनाच्या सेवेतून निलंबित

  सोलापूर – उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांना शासनाच्या सेवेतून निलंबित

  आर्थिक व्यवहाराच्या ध्वनिफिती वरून उपसचिव डॉक्टर माधव वीर यांची कारवाई

  लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारी सोबत जोडलेल्या धुरी प्रीती मध्ये आर्थिक देवाणघेवाणीचे संभाषण गंभीर स्वरूपाचे

  लोकप्रतिनिधींच्या तक्रारीवरून निलंबित होणाऱ्या दीपक शिंदे पहिले उपविभागीय अधिकारी

  दीपक शिंदे यांच्या विरोधात थेट लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केल्या होत्या तक्रार

  शासनाने याची गंभीर दखल घेत पुढील आदेशापर्यंत सेवेतून निलंबित

  जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश

 • 11 Jun 2021 07:42 AM (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे पोलीस मुख्यालयाच्या पाहणी दौऱ्यावर

  पुणे

  उपमुख्यमंत्री अजित पवार आज करणार पोलीस मुख्यालयाची पाहणी

  त्यानंतर कोरोना काळात योगदान दिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा करणार सत्कार

  यानंतर विधानभवनला कोरोना आढावा बैठक आणि सायंकाळी चार वाजता फेसबुक लाईव्ह द्वारे साधणार जनतेची संवाद

  अजित पवार

  गुप्ता मला अश्या कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लई बारीक बघतो

  माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा-छु काम आहे

  या ठेकेदाराने पोलिसांचच काम अस केलंय तर बाकीच्यांचे काय

  अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना सुनावलं

   

 • 11 Jun 2021 07:26 AM (IST)

  महात्मा फुले मंडई येथील जुन्या इमारतीच्या छतावर मध्यरात्रीच्या सुमारास आग

  पुणे: महात्मा फुले मंडई येथील जुन्या इमारतीच्या छतावर मध्यरात्रीच्या सुमारास आग. दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल. तासाभरात आग आटोक्यात आणण्यात यश

 • 11 Jun 2021 07:05 AM (IST)

  मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनच्या पदोन्नती अरक्षणावरून ऊर्जा मंत्री नितीन राऊत आक्रमक

  अहमदनगर

  मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनच्या पदोन्नती अरक्षणावरून ऊर्जा मंत्री नितीन राऊत आक्रमक

  आम्ही अजून हातात बांगड्या घातलेल्या नाही किंवा आम्ही काय भिकारी नाही आहोत राऊत यांचा इशारा

  आम्ही जे संविधानात्मक आहे जे भारतीय राज्यघटनेनेे आम्हाला दिली आहे तेच आम्ही मागतोय

  मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यांना विरोध नाही

  मात्र त्यांनीसुद्धा मोठेपण दाखवून आम्हाला वेठीस धरू नये आमचं भांडवल करून अशी भूमिका घेऊन नये कि तेच फक्त काम करू शकतात आम्ही करू शकत नाही

  तर पदोन्नतीतील आरक्षणाच्या संबंधाने अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, व्ही जे एनटी यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मते काय आहे हे जाणून घेण्यासाठी राऊत मराठवाड्याच्या दौऱ्यावर

 • 11 Jun 2021 06:54 AM (IST)

  पाटणादेवी जंगलात चंदनाच्या ४२८ झाडांची कत्तल, दोन अधिकारी निलंबित

  जळगाव : कोरोना महामारीतील टाळेबंदी पाटणादेवी जंगल परिसरात चंदन तस्करांच्या पथ्यावरच पडली आहे. या तस्करांनी चंदनाच्या हिरव्यागार झाडावर कुऱ्हाड चालविल्याचे उघड झाले आहे. वनविभागाच्या पाहणीत ४२८ झाडे अवैधरित्या तोडल्याचे तर ५९३ झाडांनाही इजा पोहचविल्याचे आढळून आले आहे.