Maharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi

Maharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद
Breaking News

| Edited By: चेतन पाटील

Jun 21, 2021 | 11:49 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 21 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 21 Jun 2021 08:50 PM (IST)

  नागपूर जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळांना नियमित कालावधीत सुरू ठेवण्याची परवानगी

  नागपूर :

  नागपूर जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळांना नियमित कालावधीत सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली

  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज एक आदेश काढत या संदर्भातील मागणीला मान्यता दिली

  कोरोना कालावधीमध्ये काही निर्बंध जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत

  आठ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये आता जीम, व्यायाम शाळा नियमित खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  21 ते 28 जून या कालावधीसाठी ही परवानगी असून पुढील शुक्रवारी पुन्हा या संदर्भातील नवे आदेश जारी करण्यात येणार आहे.

 • 21 Jun 2021 08:48 PM (IST)

  सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद

  नवी मुंबई :

  सिडको घेराव आंदोलन, पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद

  नवी मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद

  सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत वाहतूक असणार बंद

  ठाणे-बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार

  कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी, नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद

  मुंबईकडून येणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाणार

  तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत जाणार

  विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यासाठी 24 जूनला सिडको घेराव आंदोलन

 • 21 Jun 2021 08:01 PM (IST)

  अखेर भाजपच्या मीरा भाईंदर जिल्हा अध्यक्षपदी रवी व्यास यांची नियुक्ती

  मीरा भाईंदर : रवी व्यास यांची भाजपच्या मीरा भाईंदर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी रवी व्यास यांची मीरा भाईंदर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली. गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदर भाजपात मीरा भाईंदर अध्यक्ष पदासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता गट आणि नगरसेवक रवी व्यास यांच्या गटातील संघर्ष सुरु होता

 • 21 Jun 2021 06:45 PM (IST)

  महागाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन

  महागाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक, बैलगाडीवर बाईक आणि गॅस बाटला टाकून केलं आंदोलन, पोलीस आणि आंदोलनकर्ते आमनेसामने, सतीश राजगुरू यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात मुंबईच्या चेंबूर पांझरपोल सर्कलमध्ये आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात मोठ्या संख्येने वंजित बहुजन आघाडी कामगार उपस्थित होते, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती आणि वाढत्या महागाईमुळे तसेच वाढत्या बेरोजगारीमुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा वंचितने निषेध केला,  पोलिसांनीकार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं

 • 21 Jun 2021 06:23 PM (IST)

  नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव द्या, शेतकरी नेते मनीष जाधव यांची मागणी

  यवतमाळ : नवी मुंबई विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव द्या, शेतकरी नेते मनीष जाधव यांची मागणी, नवी मुंबईचे निर्माते वसंतराव नाईक आहेत. ते सिडकोचे शिल्पकार आहेत. त्यामुळे त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.  एकीकडे दिबा पाटील यांच्या नाव देण्यासाठी आंदोलन सुरू असताना आता वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी करत या नामकरणाच्या राजकारणात मनीष जाधव यांनी उडी घेतली आहे

 • 21 Jun 2021 05:33 PM (IST)

  कोणतीही पळवाट न काढता निदान 15  दिवस तरी अधिवेशन बोलवावे

  मुंबई : राज्य सरकारनं अधिवेशन जास्तीत जास्त कालावधीसाठी करावं

  पण अधिवेशन जवळ आलं की आकडे वाढतात हे आधीपासून पाहिलंय

  राज्यासमोर  महत्वाचे विषय असल्याने अधिवेशन होणं गरजेचं

  आर्थिक आणि सामाजिक विषयांवर चर्चा होण्याची गरज

  उद्या होणाऱ्या बैठकीत हे मुद्दे मांडणार

  सरकारनं कोणतीही पळवाट न काढता निदान 15  दिवस अधिवेशन कराव

  भाजप नेते प्रविण दरेकर यांची माहिती

 • 21 Jun 2021 04:55 PM (IST)

  प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात बैठक, देशभरात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा शरद पवारांचा प्रयत्न

  प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या बैठकीतील माहिती

  सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत काँग्रेस, भाजप विरहित विरोधी पक्षांना एकत्र करण्याबाबत काही चर्चा झाल्याची शक्यता

  त्याचबरोबर आगामी निवडणुकीमध्ये बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप आघाडीत करता येते का अशी चाचपणी शरद पवार करत आहेत.

  त्यासाठीच प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती

  देशभरात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा शरद पवारांचा प्रयत्न

  त्या-त्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन शरद पवार तिसरी आघाडी बनवण्याच्या तयारीत?

 • 21 Jun 2021 04:13 PM (IST)

  ठाण्यात आणखी एक तरुण पाण्यात बुडाला, 48 तासात 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

  ठाणे - पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

  - गेल्या 48 तासात 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

  - येऊर पाटोना पाडा येथील निल तलाव येथील घटना

  - 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

  - तेजस चोरगे आणि ध्रुव कुळे यांचा मृत्यू

  - पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू

  -ध्रुव याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू

  -घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन ,अग्निशमन दल आणि वन विभाग,पोलीस दाखल

 • 21 Jun 2021 04:10 PM (IST)

  वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस

  वाशिम : वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरासह ग्रामीण भागात व पांघरी नवघरे परिसरात मुसळधार पाऊस

  दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदचं वातावरण

  तर काही ठिकाणी पेरणीच्या कामात खोळंबा

 • 21 Jun 2021 03:16 PM (IST)

  माझ्या घरावर धाड टाकून झडती घेतली आणि त्रास दिला गेला, शंकरराव गडाख यांचा गौप्यस्फोट

  उस्मानाबाद :

  माझ्या घरावर धाड टाकून झडती घेतली आणि त्रास दिला गेला

  महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याने केला तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारवर गंभीर आरोप

  जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची प्रतिक्रिया

  मागच्या 5 वर्षांपूर्वी मी आमदार नसताना माझ्या घरावर शेतकरी आंदोलनाची नोटीस प्रकरणात धाड टाकली

  कोर्टाची नोटीस माझ्यापर्यंत आली नाही. शेवटची तारीख असल्याने कोर्टात हजर झालो नाही म्हणून LCB च्या पोलीस पथकाने माझ्या घरावर धाड टाकली आणि झडती घेतली

  सत्ता मिळवणे व राखणे करीता होणारे दुर्दैवी प्रकार असून ते थांबले पाहिजेत

  शिवसेनेची सत्ता असताना गृह खाते कोणाकडे होते खरी सत्ता कोण चालवत होते या खोलात जाणार नाही मात्र मला त्रास दिला गेला

  कोण हे प्रकार करतय हे महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही असा आरोप गडाख यांनी केला

  मंत्री गडाख यांनी व्यक्त केला स्वतः अनुभव

  आमदार प्रताप सरनाईक यांनी भावना व्यक्त केल्या,राजकारण करत असताना कुटुंबावर अनेक कटू प्रसंग येतात

  अलीकडच्या काळात कुटुंबाला त्रास देण्याचा प्रकार सुरू झाला आहे तो महाराष्ट्रला नवीन आहे

  महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष सुरक्षीत आहे ज्यांनी जे अनुभव आले ते बोलत आहेत.

 • 21 Jun 2021 01:43 PM (IST)

  25 तारखेला मुंबई मध्ये गोलमेज परिषद घेणार - सुरेशदादा पाटील

  कोल्हापूर

  सुरेशदादा पाटील -

  येत्या 25 तारखेला मुंबई मध्ये गोलमेज परिषद घेणार

  गोलमेज परिषदेत आंदोलनाची दिशा ठरवणार

  गोलमेज परिषदेला माजी मुख्यमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार

  उदयनराजेंना ही आमंत्रित करणार

  यापुढे प्रश्न सुटे पर्यंत रस्त्यावरच आंदोलन करणार

  केंद्राविरोधात आंदोलन कराव लागलं, तर तेही करg पण सध्या हा प्रश्न राज्याचाच आहे

  आरक्षण मिळेपर्यंत राज्यावर दबाव आणतच राहू

  घरात बसलो तर काहीच मिळणार याची आम्हाला खात्री झालीय

  अजित दादा आणि संभाजीराजेंच्या बैठकीवर आम्ही समाधानी नाही

  जो पर्यंत काही मिळत नाही तो पर्यंत याला काही अर्थ नाही

 • 21 Jun 2021 01:42 PM (IST)

  राष्ट्रवादी पक्षाच्या परिवार संवाद यात्रेची सुरुवात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथुन

  उस्मानाबाद -

  राष्ट्रवादी पक्षाच्या परिवार संवाद यात्रेची सुरुवात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथुन तर समारोप बीड येथे

  24 जून ते 4 जुलै या दरम्यान होणार राष्ट्रवादी पक्षाची परिवार संवाद यात्रा

  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार पक्ष बांधणीच्या अनुषंगाने बैठका

  24 जून उस्मानाबाद , 25 जून लातूर येथे घेणार बैठक

  लातूर ,नांदेड , यवतमाळ, हिंगोली , परभणी, जालना, औरंगाबाद, बीड येथे घेणार पक्ष बैठक

 • 21 Jun 2021 01:34 PM (IST)

  पंजाब नॅशनल बँकेच्या नोटिसा जाळून शेतकऱ्यांनी केला निषेध

  सोलापूर -

  पंजाब नॅशनल बँकेच्या नोटिसा शेतकऱ्यांनी जाळून केला निषेध

  करमाळ्याचे आमदार संजय शिंदेनी शेतकऱ्यांच्या नावावर  परस्पर कर्ज काढल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

  करमाळा तालुक्यातील कंदर आवाटी येथील शेतकऱ्यांनी केले आंदोलन

  आमदार संजय शिंदे याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

 • 21 Jun 2021 11:15 AM (IST)

  मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मताशी कोणाचंही दुमत नाही - छगन भुजबळ

  छगन भुजबळ -

  मला काल आपल्या कार्यकर्त्यांनी आमंत्रण दिलं

  छत्रपतींनी देखील मला फोन केला

  मराठ्यांना आरक्षण दिल पाहिजे या मताशी कोणाचंही दुमत नाही

  माझ्या पक्षाची देखील तीच भूमिका

  कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावं ही सगळ्यांची भूमिका

  अनेक अडचणी आहेत

  ओबीसींचे आक्रोश मोर्चे मराठ्यांच्या विरोधात नाही

  दोन्ही समाज अडचणीत

  मराठा समाजाला आरक्षण नाही आणि ओबीसींच आरक्षण काढलं

  कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर अडचणी निर्माण होतात

  काही लोक ओबीसी आणि मराठा समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तो योग्य नाही

  शाहू फुले आंबडेकर आमचे दैवत

  शाहू महाराजांचे वंशज समंजस, उतावीळ नाहीत आणि काय गाठायचं आहे हे त्यांना माहिती आहे

 • 21 Jun 2021 11:13 AM (IST)

  आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक मराठा आक्रमक

  नाशिक - मूक आंदोलना दरम्यान आंदोलकांचा गोंधळ

  राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर यांनी भाषणात मंत्र्याचे नाव घेतल्याने आंदोलक आक्रमक

  नेत्यांचे नाव घेऊ नका म्हणत घातला गोंधळ

  छत्रपती संभाजी महाराजांच्या मध्यस्ती नंतर आंदोलक शांत

 • 21 Jun 2021 11:12 AM (IST)

  नाशकात मूक आंदोलनाला सुरुवात

  नाशिक - मूक आंदोलनाला सुरुवात

  भाजप आमदार राहुल ढिकले यांचं भाषण सुरू

  आरक्षणाचा लढा देण्याची लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी- राहुल ढिकले

 • 21 Jun 2021 11:11 AM (IST)

  छत्रपती संभाजी महाराज आंदोलन स्थळी दाखल

  नाशिक - छत्रपती संभाजी महाराज आंदोलन स्थळी दाखल

  राजें सोबत महाराष्ट्रातील समन्वयक देखील उपस्थित

  थोड्याच वेळात मूक आंदोलनाला सुरुवात

  आंदोलन स्थळी कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, सदाभाऊ खोत, भाजप आमदार राहुल ढिकले, मनसे नेते सलीम शेख उपस्थित

 • 21 Jun 2021 10:41 AM (IST)

  उद्या दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची जनरल बॅाडी बैठक आयोजित करण्यात आलीये

  उद्या दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची जनरल बॅाडी बैठक आयोजित करण्यात आलीये

  शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि पक्षाचे अन्य नेते उपस्थित राहणार.

  केरळ एनसीपी नेतेही उपस्थित राहणार.

 • 21 Jun 2021 10:40 AM (IST)

  सदाभाऊ खोत आंदोलनस्थळी दाखल

  नाशिक -

  सदाभाऊ खोत आंदोलनस्थळी दाखल

  मराठा समाजाला आमचा पूर्ण पाठिंबा

  आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी आलो आहे

  सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया

 • 21 Jun 2021 10:40 AM (IST)

  फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेे

  जळगाव -

  जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत,

  पगारासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन,

  थकीत पगार, पीएफची रक्कम अदा करण्याची मागणी

 • 21 Jun 2021 09:14 AM (IST)

  नगर शहराला आजपासून नवीन टाकीतील पाणी मिळणार

  अहमदनगर

  नगर शहराला आज पासून नवीन टाकीतील पाणी मिळणार

  वसंत टेकडी येथे नव्याने उभारी 50 लाख क्षमतेची टाकी

  सुमारे 107 कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.

  महापौर बाबासाहेब वाकळे आणि आयुक्त शंकर गोरे यांनी केली कामाची पाहणी

  पाहणी करून ठेकेदारांना कामाला गती देण्याच्या दिल्या सुचना

 • 21 Jun 2021 08:29 AM (IST)

  मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे चर्चा फिसकटली - नवी मुंबई विमानतळ कृती समिती

  नवी मुंबई

  मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे चर्चा फिसकटली - विमानतळ कृती समिती

  सिडको घेराव आंदोलन करण्याचा कृती समितीचा ठाम निर्धार

  मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे न ऐकून घेता ते दोनदा बैठकीतून निघून गेले

  दिबां’च्या नावासाठी आम्ही माघार घेणार नाही- विमानतळ कृतीसमिती

  नामकरणासंदर्भात रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत कृतिसमितीची बैठक

  24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनाची जोरदार तयारी सुरू

  रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतील ‘दिबा’प्रेमी नागरिकांचा विमानतळाच्या नावाला तीव्र विरोध

 • 21 Jun 2021 08:28 AM (IST)

  बुलडाण्यात पावसाने दिली उघडीप, जिल्ह्यातील अर्ध्या पेरण्या खोळंबल्या,

  बुलडाणा

  जिल्ह्यात पावसाने दिली उघडीप, जिल्ह्यातील अर्ध्या पेरण्या खोळंबल्या, जिल्ह्यात 7 लाख 35 हेक्टर वर पेरणीचे नियोजन , मात्र पावसाने उघडीप दिल्याने आतापर्यंत फक्त 3 लाखावर लागवड आटोपली, त्यामुळे बळीराजाला डोक्याला हात लावण्याची वेळ आलीय, यामध्ये खामगाव तालुक्यात सर्वाधिक पेरण्या झाल्या, तर जमिनीत पुरेशी ओल आल्याशिवाय पेरणी करू नये कृषी विभागाने केले आवाहन

 • 21 Jun 2021 08:04 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यात बिबट्याची दहशत, वाकला येथे बिबट्याने केला नागरिकांवर हल्ला

  औरंगाबाद -

  औरंगाबाद जिल्ह्यात बिबट्याची दहशत

  वैजापूर तालुक्यातील वाकला येथे बिबट्याने केला नागरिकांवर हल्ला

  हल्ल्यात 2 नागरिक गंभीर जखमी

  जखमींवर लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार सुरू

  बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण

 • 21 Jun 2021 07:53 AM (IST)

  जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत बिबट्याचा वावर, दृष्य सीसीटीव्हीत कैद

  औरंगाबाद -

  जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत बिबट्याचा वावर

  लेणी परिसरात बिबट्या फिरताना सीसीटीव्हीत कैद

  लॉकडाऊन काळात गर्दी नसल्यामुळे अजिंठा लेणीत बिबट्याने मांडलं ठाण

  अजिंठा लेण्या आणि लेणी समोरील जागेत बिबट्याचा वावर

  अजिंठा लेणीत बिबट्या आढळल्यामुळे खळबळ

 • 21 Jun 2021 07:52 AM (IST)

  छत्रपती संभाजी महाराजांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज मूक आंदोलन

  नाशिक - छत्रपती संभाजी महाराजांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज मूक आंदोलन

  आंदोलनात पुढील दिशा होणार निश्चित

  लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

  छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, दादा भुसे राहणार उपस्थित

  आंदोलनानंतर राज्य समनवयकांची बैठक

 • 21 Jun 2021 07:22 AM (IST)

  आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सहभाग

  - आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सहभाग

  - नितीन गडकरी स्वत: योगा करुन वाढवत आहेत तरुणांचा उत्साह

  - योग दिनाच्या कार्यक्रमात योगाभ्यासी नागपुरकरांचा सहभाग

  - नागपूरात विविध ठिकाणी साजरा होतोय योगा डे

 • 21 Jun 2021 07:15 AM (IST)

  वाशिममध्ये नऊच दिवसांत 136 पैकी 14 प्रकल्पांची पाणीपातळी 50 टक्क्यांवर

  यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच दमदार पावसाची हजेरी लागत आहे

  गेल्या नऊच दिवसांत जिल्ह्यातील 136 पैकी 14 प्रकल्पांची पाणीपातळी 50 टक्क्यांवर पोहोचली

  तर दोन प्रकल्प 75 टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याचे दिसून येत आहे

 • 21 Jun 2021 07:10 AM (IST)

  योग विज्ञान संपूर्ण जगासाठी उपलब्ध असावे - पीएम मोदी

 • 21 Jun 2021 07:07 AM (IST)

  योग स्ट्रेस ते स्ट्रेंथ आणि नेगेटिव्हीटी ते क्रिएटिव्हीटीचा मार्ग दाखवतो - पीएम मोदी

  पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने म्हणाले, योग आपल्याला स्ट्रेस ते स्ट्रेंथ आणि नेगेटिव्हीटी ते क्रिएटिव्हीटीचा मार्ग दाखवतो. भारतातील ऋषींनी जेव्हाही आरोग्याबाबत सांगितलं ते केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्याबाबतही होतं, म्हणून योगामध्ये फिजिकल हेल्थ सोबतच मेंटल हेल्थलाही खूप महत्त्व दिलं जातं

 • 21 Jun 2021 07:00 AM (IST)

  उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप हंगामात डीएपी खताचा तुटवडा असल्याने शेतकरी संकटात

  उस्मानाबाद -

  जिल्ह्यात खरीप हंगामात डीएपी खताचा तुटवडा असल्याने शेतकरी संकटात, 46 हजार मेट्रिक टन खताची गरज असताना 12 हजार मेट्रिक टन प्राप्त

  कोरोनाच्या मागील वर्षभरात उस्मानाबाद जिल्ह्यात विनामास्क फिरणे, ट्रिपल सीट व विनाकारण फिरणाऱ्या 11 हजार 169 प्रकरणात पोलीस विभागाकडून 43 लाखांच दंड वसुल

  शेतात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या सालगड्याच्या पत्नीवर गावातील 3 जणांनी केला सामूहिक बलात्कार , परंडा तालुक्यातील घटना , परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद 3 जणांना अटक

 • 21 Jun 2021 06:59 AM (IST)

  कोरोनाच्या या काळात योग बनला आशेचा किरण - पंतप्रधान मोदी

  पंतप्रधान मोदी -

  सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस

  कोरोनाच्या या काळात योग बनला आशेचा किरण

  यंदा योगा फॉर वेलनेस थीम

  हा योग दिवस अनेकांना योगा करण्यासाठी प्रेरित करेल

  प्रत्येक देश, धर्म आणि व्यक्ती निरोगी राहावे हिच माझी प्रार्थना

 • 21 Jun 2021 06:32 AM (IST)

  भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे यांच्या मुलीच्या लग्नात आमदार रोहित पवारांची हजेरी

  अहमदनगर

  भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे यांच्या मुलीच्या लग्नात आमदार रोहित पवारांची हजेरी

  तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवारांची आमनेसामने भेट

  यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार महादेव जानकर उपस्थित

 • 21 Jun 2021 06:32 AM (IST)

  डुक्कर आडवे आल्याने मोटरसायकलचा अपघात, पती-पत्नी जखमी

  अकोला -

  अकोला जिल्हातल्या बार्शीटाकळी ते पिंजर रोडवर डुक्कर आडवे गेल्याने मोटरसायकलचा अपघात या अपघातात पती पत्नी जखमी

  अकोला वरुन भेंडी सुत्रक येथे जात असताना झाला अपघात

  रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास झाला अपघात

Published On - Jun 21,2021 6:18 AM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें