LIVE | नाशिकमध्ये कोरोना संसर्ग वाढला, जिल्हास्तरीय आपत्कालीन कक्ष पुन्हा सुरु
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिकमध्ये कोरोना संसर्ग वाढला, जिल्हास्तरीय आपत्कालीन कक्ष पुन्हा सुरु
नाशिक – कोरोना संसर्ग वाढल्याने जिल्हास्तरीय आपत्कालीन कक्ष पुन्हा सुरू
संसर्ग कमी झाल्यानंतर हा विभाग बंद करण्यात आला होता
मात्र रुग्ण वाढल्याने कक्ष पुन्हा कार्यान्वित
शहरात बंद करण्यात आलेले दोन कोरोना सेंटरदेखील परत सुरू करणार
आज एका दिवसात शहरात पुन्हा एकदा 1135 रुग्णांची नोंद
-
राज्यात कोरोनाचा स्फोट, दिवसभरात 15 हजार 817 नवे रुग्ण, 56 जणांचा मृत्यू
राज्यात कोरोनाचा स्फोट, दिवसभरात 15 हजार 817 रुग्णांना कोरोनाची लागण, तर 56 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू, दिवसभरात 11 हजार 344 रुग्ण कोरोनामुक्त, पण रुग्णवाढीचा वेग वाढला, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा उद्रेक, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येत वाढले
-
-
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट, तब्बल 1135 नवे कोरोना रुग्ण
नाशिक जिल्ह्यात आजा पुन्हा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत.
नाशिकमध्ये आज तब्बल 1135 रुग्ण कोरना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरात आढळले असून त्याची संख्या 844 एवढी आहे.
नाशिकमध्ये आतापर्यंत 2166 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
-
नंदा खरे यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारला
नागपुरातील नंदा खरे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. मात्र त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. याविषयी बोलताना “काही वर्षा पूर्वी ठरविलं होत की मी कुठलाही पुरस्कार स्वीकारणार नाही. त्यानुसार मी हा पुरस्कार नम्रपणे नाकारला आहे,” असे ते म्हणाले .
-
अकोल्यात आज दिवसभरात 318 रुग्णांना कोरोनाची लागण
अकोला कोरोना अपडेट
आज दिवसभरात 318 रुग्णांना कोरोनाची लागण
2677 पैकी 2359 जणांचे अहवालात निगेटिव्ह आले आहेत
एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 20589 वर पोहोचला आहे
आज दिवसभरात कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे
कोरोनामुळे आतापर्यंत 397 जणांचा मृत्यू झाला आहे.
अकोल्यात सध्या 4899 जणांवर उपचार सुरु आहेत.
-
-
चंद्रपुरात कोळसा वाहतूक करणाऱ्या महाकाय डंपरला खाण क्षेत्रातच लागली आग
चंद्रपूर: कोळसा वाहतूक करणाऱ्या महाकाय डंपरला खाण क्षेत्रातच लागली आग
शहरालगत असलेली पद्मापूर खुल्या कोळसा खाणीतील घटना
60 टनी महाकाय डंपरला लागलेल्या आगीत चालकाने प्रसंगावधान राखून घेतली उडी
याच खाणीत काही दिवसांपूर्वी कोळशाचा भला मोठा थर कोसळून अवजड आणि महागडी यंत्रसामुग्री अजूनही दबलेली आहे
-
सोशल डिस्टनसिंगचा नागपुरात फज्जा, शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांची गर्दी
नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी
सोशल डिस्टनसिंगचा नागपुरात फज्जा
उद्या शनिवार आणि रविवार नागपुरात लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांची गर्दी
सोमवारी 15 मार्चपासून 21 मार्चपर्यंत नागपुरात कडक लॉकडाऊन पाळले जाणार आहे.
नागपुरात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या बघता ही गर्दी म्हणजे धोक्याची घंटा ठरणार असल्याची चर्चा
-
चंद्रपूर 75 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आतापर्यंत 402 जणांचा मृत्यू
चंद्रपूर 75 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
24 तासात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 24556
एकूण कोरोनामुक्त : 23358
चंद्रपुरात सध्या 796 जणांवर उपचार सुरु
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 402 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
-
नागपुरात आज 1957 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
नागपुरात आज पुन्हा कोरोना ब्लास्ट
नागपुरात आज 1957 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
15 जणांचा कोरोना मुळे मृत्यू
तर 939 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्णसंख्या 165989
नागपुरात आतापर्यंत 147358 जण कोरोनामुक्त
नागपुरात आतापर्यंत 4440 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
-
भाजप उपाध्यक्ष राम शिंदे कोरोना पॉझिटिव्ह, फेसबूक पोस्टद्वारे दिली माहिती
भाजप उपाध्यक्ष राम शिंदे कोरोना पॉझिटिव्ह
स्वतः फेसबूक पोस्ट करून दिली माहिती
तब्येत ठीक असल्याची राम शिंदे यांची माहिती
-
हा अर्थसंकल्प जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणार आहे- राणे
राज्याचा अर्थसंकल्प बोगस आहे.
पुण्याच्या रस्त्यांच्या कामासाठी, अन्य कामांसाठी याच वर्षी तरतूद करण्याची ओळ टाकली.
हे सरकार राजकोषीय तूट कशी भरून कशी काढणार, 66 हजारांची ही राजकोषीय तूट बोगस आहे.
अर्थसंकल्पात सांगितलेली सगळी आकडेवारी बोगस आहे
-
यंदाचा अर्थसंकल्प फसवा, हा पुणे केंद्रीत अर्थसंकल्प- नारायण राणे
भाजप नेते नारायण राणे यांची राज्य सरकारवर टीका
हा अर्थसंकल्प जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारा आहे.
-
नागपुरात 15 ते 21 मार्चदरम्यान लॉकडाऊन, विश्वसात न घेतल्यामुळेे महापौरांची नाराजी
नागपुरात 15 ते 21 मार्चदरम्यान लॉकडाऊन मात्र, विश्वसात न घेतल्यामुळेे महापौरांची नाराजी
महापौर दया शंकर तिवारी यांनी व्यक्त केली नाराजी
नागपुरात लॉकडाऊन लावण्यापूर्वी परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे होती त्यानंतर निर्णय घ्यायला हवा होता- दया शंकर तिवारी
मी या शहराचा महापौर आहे, शहराविषयी निर्णय घेताना महापौरला विश्वसात घेणं आवश्यक असतं मात्र ते केलं नाही- दया शंकर तिवारी
निर्णय का घेतला हे मी म्हणत नाही मात्र संवाद झाला असता तर आणखी पर्याय पुढे आले असते- दया शंकर तिवारी
शासनाने लॉक डाऊन चा निर्णय घेतला असेल तर त्यांना सहकार्य करू मात्र ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात आला त्याचा मी निषेध करतो- दया शंकर तिवारी
-
जालन्यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनाच कोरोनाचा विळखा
जालना जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १७ हजार ४१६ वर पोहचला आहे.या पैकी आतापर्यंत १५ हजार ७१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत ४०७ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून सध्या १ हजार २९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांवर कोरोना रोखण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.आरोग्य विभागातील तेच अधिकारी कोरोनाचा बूस्टर डोस घेऊनही कोरोना संक्रमित झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अर्चना भोसले आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कडले या तिन्हीही अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून घनसावंगी येथील एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ही बाधा झाल्याचं समोर आलं आहे.नागरीकांनी नियमित मास्क वापरावे. सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं असं आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक प्रताप घोडके यांनी केलं आहे.
-
राज ठाकरेंचा पुण्यातील आजचा नियोजित कार्यक्रम रद्द, 2 एप्रिलला मेळावा घेणार
पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 2 एप्रिलला पुण्यात मेळावा घेणार
– मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं पुण्यात आयोजन
– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज यांचे आजचे पुण्यातील कार्यक्रम रद्द
– राज ठाकरे आज मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आणि नियुक्ती पत्राचे वाटप करणार होते
-
सोलापुरात घास श्वसननलिकेत अडकल्याने अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू
सोलापूर –
अन्नाचा घास श्वसननलिकेत अडकल्याने अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू
माढा तालुक्यातील वडाचीवाडी येथील घटना
रोहन सिद्धेश्वर निळे असे मृत बालकाचे नाव
रोहनच्या श्वसननलिकेत अन्नाचा घास अडकल्याने त्याला गुदमरुन आलं
त्यातच त्याचा मृत्यू झाला
ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने माढा पोलिसांत माहिती
-
21 तारखेला नागपुरात लॅाकडाऊन असूनही MPSC ची परिक्षा होणार – जिल्हाधिकारी
नागपूर –
21 तारखेला नागपुरात लॅाकडाऊन असूनही MPSC ची परिक्षा होणार
नागपूरात 21 तारखेला एमपीएससीची परिक्षा होणार
बाहेरुन विद्यार्थ्यांना नागपुरात येता येणार
ॲडमिशन कार्ड दाखवून परिक्षाकेंद्रांपर्यंत जाता येणार आहे
21 तारखेच्या तयारीला लागलंय प्रशासन
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
-
मद्यधुंद अवस्थेत नागाशी मस्ती तरुणाच्या अंगलट, चार वेळा नागाने चावा घेतल्याने प्रकृती चिंताजनक
लासलगाव –
मद्यधुंद अवस्थेत नागाशी मस्ती तरुणाच्या अंगलट
– निफाड तालुक्यातील नांदूरमध्येश्वर येथील घटना
– चार वेळा नागाने चावा घेतल्याने तरुणाची प्रकृती चिंताजनक
– नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
– मंगेश भाऊसाहेब गायकवाड असे या मद्यपीचे तरुणाचे नाव
-
मुंबईतल्या एमपीएससी कार्यालयाबाहेर चौख सुरक्षा व्यवस्था
मुंबई –एमपीएससी अधिकाऱ्यांचा कँमेऱ्यावर बोलण्यास नकारमुंबईतल्या एमपीएससी कार्यालयाबाहेर चौख सुरक्षा व्यवस्था
प्रसिद्धीपत्रकामधून एमएपीएससी यांनी दिली परीक्षेची माहिती
-
पुण्यात लॉकडाऊन नाही, कडक निर्बंध घालण्याचा प्रशासनाचा निर्णय
पुण्यात लॉकडाऊन नाही,
कडक निर्बंध घालण्याचा निर्णय,
शाळा 21 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश,
उद्याने एकवेळ बंद राहणार,
हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंतच सुरू राहणार,
आजच्या बैठकीत झाले निर्णय
-
देशाप्रती सर्वांच्या भावना एकच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
देशाप्रती सर्वांच्या भावना एकच, 75 वर्षपूर्ण करत आहोत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
-
MPSC चे विद्यार्थी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, 14 मार्चला परीक्षा घेण्याची मागणी
MPSC चे विद्यार्थी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
येत्या 14 तारखेला परीक्षा घ्यावी म्हणून निवेदन देण्यासाठी आले काही विद्यार्थी
– लवकरात लवकर परिक्षा घेण्याची मागणी
– नागपूरात राहायची सोय नाही, फुटपाथवर रहावं लागतंय
– थोड्याच वेळात विरोधीपक्ष नेत्यांना देणार निवेदन
-
मालवणमध्ये मच्छिमारांचे साखळी उपोषण सुरु
मालवणमध्ये मच्छिमारांचे साखळी उपोषण सुरु. हायस्पीड ट्रॉलर आणि बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीविरोधात उपोषण. केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मालवणमधील मत्स्य आयुक्तकार्यालयाबाहेर बेमुदत साखळी उपोषण. कडक पोलीस बंदोबस्त.
-
MPSC परीक्षेची नवी तारीख जाहीर, येत्या 21 मार्चला परीक्षा
MPSC परीक्षेची नवीन तारीख घोषित करण्यात आली आहे. येत्या 21 मार्च 2020 ला MPSC ची परीक्षा होणार आहे. नुकतंच याबाबतची माहिती समोर आली आहे.
-
महावितरण 7 लाख थकबाकीदारांची वीज कापण्याच्या तयारीत, नितीन राऊतांचे आदेश
नवी मुंबई :
महावितरण सात लाख थकबाकीदारांची वीज कापण्याच्या तयारीत
थकबाकी न भरणाऱ्यांवर महावितरण वाशी मंडळ आजपासून धडक कारवाई करणार ?
अधीक्षक अभियंता यांची टीव्ही 9ला माहिती
वाशी मंडळ कार्यालय अंतर्गत नवी मुंबई मनपा, पनवेल मनपा, पनवेल आणि उरण तालुक्यात तब्बल 7 लाख थकबाकीदारांकडून येणं बाकी
लॉकडाऊन काळात उद्योग धंदे आर्थिक बाजू ढासळल्याने बील थकीत
अधिवेशन संपताच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे परिपत्रकाद्वारे कारवाईचे आदेश
महावितरणच्या वषी मंडळात 615 कोटींची थकबाकी
पनवेल उरण तालुक्यातील 20 ग्रामपंचयातीचे 28 नळ जोडणीचे 59 लाख रु बिल थकलेले
कारवाईची झळ ग्रामपंचयतीच्या नळ पुरवठा योजनांना बसणार
-
राज्य सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा : गोपीचंद पडळकर
अनेक ठिकाणी परीक्षा होत आहे. रेल्वे भरतीसह इतर परीक्षा पार पडतात. MPSC परीक्षा का पार पडत नाही, यावर राज्य सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा : गोपीचंद पडळकर
-
राज्य सरकारचा भोंगळ कारभार, MPSC विद्यार्थ्यांना धोका दिला : गोपीचंद पडळकर
राज्य सरकारचा भोंगळ कारभार, MPSC विद्यार्थ्यांना धोका दिला, जनतेचा विश्वासघात केला जातो. आमच्यावर गुन्हे दाखल करा, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करु नका : गोपीचंद पडळकर
-
मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर जवळ बसला आग
नाशिक –
मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर जवळ बसला आग
चालत्या बसला लागली अचानक आग सुदैवाने कोणतही जीवित हानी नाही
वेळेत बस चालकाने बस बाजूला घेतल्याने सर्व प्रवाशी सुखरूप बस मधून उतरले खाली
आग लागण्याच कारण मात्र अद्याप अस्पष्ट
-
बीडमध्ये अँटिजेन चाचणी करण्यास व्यापाऱ्यांची उदासीनता, दुसऱ्या दिवशी केवळ 597 व्यापाऱ्यांची चाचणी
बीड-
अँटिजेन चाचणी करण्यास व्यापाऱ्यांची उदासीनता, दुसऱ्या दिवशी केवळ 597 व्यापाऱ्यांनी केली चाचणी, चाचणीत 11 व्यापारी बाधित
बीड- मळणी यंत्रात अडकून शेतकरी महिलेचा मृत्यू, शिरूर कासार तालुक्यातील राक्षस भुवन येथील घटना, उषाबाई तांबे अस मयत महिलेचे नाव, गव्हाचे खळे करताना घडली दुर्दैवी घटना
बीड- जुन्या वादातून अंबाजोगाईत एकाचा खून, आठवडाभरात दुसऱ्या खुनाने अंबाजोगाई हादरले, नितीन साठे अस खून झालेल्या व्यक्तीचे नाव, खुना नंतर हल्लेखोर फरार, पोलिसांचं एक पथक आरोपींच्या मागावर
-
सोलापुरात देशातील महत्वाच्या चार राष्ट्रीय बँकेचे खासगीकरण धोरणाच्या विरोधात संप
सोलापूर –
देशातील महत्वाच्या चार राष्ट्रीय बँकेचे खासगीकरण धोरणाच्या विरोधात संप
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने 15 मार्च पासून दोन दिवसाची दिली संपाची हाक
13 मार्च रोजी दुसरा शनिवार असल्यामुळे बँकेला सुट्टी तर रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी
त्यामुळे शनिवारपासून बँका सलग चार दिवस राहणार बंद
बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,इंडियन ओव्हर्सिज बँकांचे खासगीकरण करण्याचा सरकारने घेतला आहे निर्णय
15 आणि 16 मार्च रोजी राष्ट्रीय पातळीवर दोन दिवसाचा राहणार संप
-
महावितरणचे अधिकारी संतोष प्रल्हाद मंडलिक निलंबित
सोलापूर : महावितरणचे अधिकारी संतोष प्रल्हाद मंडलिक निलंबित
कामात कुचराई, कार्यालयीन कागदपत्रात अनाधिकृत फेरफार करून गैरप्रकार केल्याचा आरोप
खातेनिहाय चौकशीनंतर मंडलिक निलंबित
-
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढीची यात्रा यंदा रद्द
अहमदनगर –
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढीची यात्रा यंदा रद्द
होळीपासून गुढीपाडव्या पर्यंत यात्रेचा उत्सव असतो
तर श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथाचा यात्रेच्या मुख्य पाचही दिवशी भाविकांना प्रवेशबंदी
तसेच कावडी काट्यांची मिरवणूक देखील रद्द करण्यात आली
ऑनलाइन होणार कानिफनाथाचे दर्शन
-
नागपूर जिल्ह्यातील उमरेड करांडला अभयारण्यात वाघिणी चे आपल्या शावकासोबत दर्शन
नागपूर –
नागपूर जिल्ह्यातील उमरेड करांडला अभयारण्यात वाघिणी चे आपल्या शावकासोबत दर्शन
पाच शावका आणि वाघीण बघून पर्यटक खुश
वाघींच्या परिवार चा फोटो एका वन्यप्रेमी नी कैद केला आपल्या कॅमेऱ्यात
-
निफाड तालुक्यातील ओझर येथे 700 जणांना कोव्हिड लस
लासलगाव
– निफाड तालुक्यातील ओझर येथे 700 जणांना कोव्हिड लस
– फिजिकल डिस्टनसिंगचे होते पालन
– दर आठवड्याला होते उद्दिष्टाची पूर्ती
– आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरणासाठी नागरिकांमध्ये केली जाते जनजागृती
-
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे थकबाकी वसूल करण्यासाठी संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढविणार
सोलापूर –
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे थकबाकी वसूल करण्यासाठी संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढविणार
जिल्हा दूध संघाचे दहा कोटी पेक्षा जास्त येणे बाकी , तर संघावर चोवीस कोटी रुपयांचे कर्ज
दूध संघाने न्यायालयात दाखल केलेल्या कित्येक दाव्यात वसुली आदेश निघूनही कारवाई झाली नाही
त्यामुळे आता वसुलीसाठी ठोस भूमिका घेण्यात येणार
नुकत्याच जिल्ह्यातील दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून नेमण्यात आलेले आहे संघावर प्रशासक
-
सातारा वाढे येथे चालकाचा ताबा सुटून भाजीपाला घेऊन जाणारा तरकारी ट्रक पलटी
सातारा :
वाढे येथे चालकाचा ताबा सुटून भाजीपाला घेऊन जाणारा तरकारी ट्रक पलटी
वळणावर ब्रेक न लागल्यामुळे महिनाभरात दुसरा अपघात
सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही
अपघात ग्रस्त ट्रकचे आणि रस्त्यालगत उभ्या असणारया बैलगाडीचे नुकसान
-
26 मार्चला अहमदनगर जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा
अहमदनगर –
26 मार्चला अहमदनगर जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा
तर सभा ऑनलाईन घेण्यात यावी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे निर्देश
मात्र ऑनलाइन अर्थसंकल्पीय सभेवरून सत्ताधारी आणि विरोधकांनमध्ये जुंपणार
ऑनलाइन सभा घेण्यास विरोधकांचा नकार, ऑफलाइन सभा घेण्याची मागणी
-
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नेमणुकीस असल्याचे सांगणाऱ्या तोतया पोलिसाला पिंपरी-चिंचवडमध्ये अटक
पिंपरी-चिंचवड –
-इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नेमणुकीस असल्याचे सांगणाऱ्या तोतया पोलिसाला अटक
-शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंड करण्याची मोहीम सुरू असताना निगडी पोलिसांनी एकाला अडवले आणि दंडाची पावती करण्यास सांगितले त्यावर त्या बहाद्दराने आपण इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) दिल्लीमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले.
-पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यानंतर मात्र त्याची बोबडी वळली आणि तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला
– पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले आणि तो तोतया आयबी पोलीस असल्याचे उघडकीस आले.त्यानंतर निगडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-
नंदुरबार जिल्ह्यात 24 तासात 161 नवीन रुग्णांची भर, दोघांचा रुग्णांचा मृत्यू
नंदूरबार –
नंदुरबार जिल्ह्यात 24 तासात 161 नवीन रुग्णांची भर, दोघांचा रुग्णांचा मृत्यू
दिवसभरात 20 रुग्ण बरे झाल्याने देण्यात आला डिस्चार्ज
सध्या एकूण 718 रुग्णांवर उपचार सुरू
दोघांचा मृत्यू
-
वर्धा वाहनासह अवैध देशी दारुसाठा जप्त, 12 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त
वर्धा –
– वाहनासह अवैध देशी दारूसाठा जप्त
– 12 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त
– नागपूर येथून चंद्रपूरला जात होता अवैध देशी दारूसाठा
– जाम चौरस्ता येथे पोलिसांनी नाकेबंदी करत केली कारवाई
– पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेत चालक वाहन सोडून पसार
– समुद्रपूर पोलिसांची कारवाई
– अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल
-
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात लवकरच नौकर भरती
औरंगाबाद –
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात लवकरच नौकर भरती
प्रथम श्रेणी ते चतुर्थ श्रेणीच्या जागांची होणार भरती
तब्बल 868 पदांची लवकरच होणार भरती
सध्या कोरोना आणि इतर रुग्णवाढीमुळे नौकर भरतीचा निर्णय
-
औरंगाबाद महापालिकेचा अर्थसंकल्प पडला लांबणीवर
औरंगाबाद –
औरंगाबाद महापालिकेचा अर्थसंकल्प पडला लांबणीवर
विभागप्रमुखांनी माहिती दिली नसल्यामुळे अर्थसंकल्प लांबणीवर
मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार होता अर्थसंकल्प
आता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात सादर होणार अर्थसंकल्प
-
पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या कोरोनामुळं महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली
पिंपरी-चिंचवड –
-पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या कोरोनामुळं महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली
-गृह विलगिकरणात असणाऱ्या रुग्णांवर सोसायटीच्या चेअरमनला लक्ष ठेवणं बंधनकारक जर बाधित रुग्ण बाहेर पडला तर त्या बाधितावर गुन्हा दाखल होईलच, त्याशिवाय सोसायटी सील केली जाईल
-दुकानांमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास दुकान मालकांवर फौजदारी गुन्हा केला जाणार
-भाजी मंडईत सम-विषम तारखेनुसार खुली राहील, भंग झाल्यास पोलिसांना दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आलेत.
-
औरंगाबाद जिल्हा बँकेसाठी 64 अर्ज ठरले वैध
औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्हा बँकेसाठी 64 अर्ज ठरले वैध
21 जागांसाठी 64 जण लढवणार निवडणूक
214 उमेदवारांनी केले होते जिल्हा बँकेसाठी अर्ज
66 अर्ज झाले होते बाद
तर शेवटच्या दिवशी 84 जणांनी घेतली माघार
-
एमपीएससी आंदोलन प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांना विरुद्ध गुन्हा
पुणे –
एमपीएससी आंदोलन प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांना विरुद्ध गुन्हा दाखल
कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल
विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-
औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट, एकाच दिवसात तब्बल 902 रुग्ण आढळले
औरंगाबाद –
औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट
एकाच दिवसात आढळले तब्बल 902 रुग्ण
आजपर्यंतचे सर्वात जास्त रुग्ण आढळल्याची पहिलीच घटना
902 रुग्ण आढळल्याने औरंगाबादच्या यंत्रणेत खळबळ
रुग्णांचा आकडा पोचला 55341 वर
अशीच कोरोना वाढ कायम राहिल्यास औरंगाबादची परिस्थिती जाणार नियंत्रणाबाहेर
-
वर्ध्यात हद्दपार असतांनाही देशी रिव्हॉल्वर घेऊन शहरात फिरणाऱ्या गुंडाला अटक
वर्धा
– हद्दपार असतांनाही देशी रिव्हॉल्वर घेऊन शहरात फिरणाऱ्या गुंडाला अटक
– राकेश मुन्ना पांडे अस आरोपीच नाव
– पोलिसांना पाहताच आरोपीने दुचाकीने काढला होता पळ
– पाठलाग करत पोलिसांनी केली अटक
– स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक
– शहर पोलिसात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल
-
मुंबईतील टिळकनगरात बॉक्सर ट्रेनरकडून प्रशिक्षणार्थी अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मुंबईत गुरुशिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे, मुंबईतल्या टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या बॉक्सर ट्रेनर ने प्रशिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे
-
नाशकातील मनसेच्या मध्य विधानसभा निरीक्षक पदावरून सचिन भोसले यांना हटवल
नाशिक –
मनसेच्या मध्य विधानसभा निरीक्षक पदावरून सचिन भोसले यांना हटवल
मनसेची अंतर्गत गटबाजी पुन्हा उफळली
सचिन भोसले हे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे खंदे समर्थक
पक्षाने अशोक मुर्तडक यांनाचं धक्का दिल्याची पक्षात चर्चा
पक्ष देईल ती जवाबदारी स्वीकारणार असल्याची भोसले यांनी स्पष्टोक्ती
-
कोल्हापुरात अरुंद विहिरीत पडलेल्या बैलाला आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून जीवदान
कोल्हापूर –
अरुंद विहिरीत पडलेल्या बैलाला आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून जीवदान
गगनबावडा परिसरात तीस फूट खोल विहिरीतून बैलाला सुखरूप काढले बाहेर
अरुंद आणि खोल विहिरीत ऑक्सीजन मिळत नसल्याने पथकाला करावे लागले शर्तीचे प्रयत्न
पाच तासाच्या प्रयत्ना नंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश
आपत्ती व्यस्थापन पथकाच्या कौशल्याचं होतंय कौतुक
-
नागपुरात दोन लाख लसीकरणाचं उद्दिष्ठ, 131 केंद्रावर 2 लाख लसीकरण होणार
नागपूऱ –
नागपुरात दोन लाख लसीकरणाचं उद्दिष्ठ
जिल्ह्यात 131 केंद्रावर 2 लाख लसीकरण होणार
15 ते 21 मार्च लॉक डाऊन असल्याने या काळात नागरिकांच्या लसीकरणा साठी लोकप्रतिनिधी नी करावी मदत
नागरिकांना केंद्रावर पोहचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था लोकप्रतिनिधी नी करावी
प्रशासनाने केल्या सूचना
-
कोल्हापुरात स्थगिती उठताच महावितरणकडून थकीत वीज ग्राहकांच्या वीज तोडणीला सुरुवात
कोल्हापूर
स्थगिती उठताच महावितरणकडून थकीत वीज ग्राहकांच्या वीज तोडणीला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यातील दोनवडे गावात कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी तोडले 70 घरातील वीज कनेक्शन
विज तोडताच काही ग्राहकांनी भरली दिलं मात्र बहुतांशी घरांतील वीज पुरवठा खंडितच
वीज पुरवठा खंडित झाल्याने अर्धा गाव अंधारात
-
पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लोकडाऊन नको, व्यापारी महासंघाची अजित पवारांकडे मागणी
पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लोकडाऊन नको ,
– पुणे व्यापारी महासंघाची अजित पवारांकडे मागणी,
– पत्राद्वारे व्यापारी महासंघाने केली अजित पवारांकडे मागणी,
– कोरोनामुळे पुण्यातील व्यवसाय सुमारे सात ते आठ महिने बंद होते,
– त्यामुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे,
– आता कुठे व्यवसायाला सुरूवात झाली आहे.
– अशा स्थितीत पुन्हा लॉकडाऊन झाल्यास व्यापार्यांचे प्रचंड मोठे नुकसान होईल., व्यापाऱ्यांची भूमिका
-
नागपुरात लॅाकडाऊन जाहीर होताच ठोक भाजी बाजारात भाज्यांचे भाव पडायला सुरुवात
नागपूर
– लॅाकडाऊन जाहीर होताच ठोक भाजी बाजारात भाज्यांचे भाव पडायला सुरुवात
– नागपूरच्या कॅाटन मार्केट भाजीमंडीत भाज्यांच्या दरात घसरण
– ठोस बाजारात पालक, टोमॅटो दोन- तीन रुपये किलो
– वांगी, फुलकोबी, मेथी सह इतर भाज्यांच्या दरातंही घसरण
– जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद असल्याने भाजीविक्रीत अडचणी
– भाजीपाला विकण्यासाठी शेतकऱ्यांना येत आहेत अनेक अडचणी
– भाज्यांचे दर पडल्याने शेतकरी अडचणीत
-
नागपुरात पारडीची 700 मी. मी. मुख्य जलवाहिनी फुटली
नागपुरात पारडीची 700 मी. मी. मुख्य जलवाहिनी फुटली
– मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याची मोठी नासाडी
– आज आणि उद्या पारडी आणि भांडेवाडी जलकुंभ पाणी जाणार नाही
– पारडी, भांडेवाडील हजारो घरांमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद
– प्रभावीत परिसरात टॅंकरणेही पाणीपुरवठा होणार नाही
– पारडी, भांडेवाडील अनेक वस्त्यांमध्ये दोन दिवस पाणी नाही
-
नाशकात महापालिका रुग्णालयातील 800 च्या वर नमुने औरंगाबादच्या लॅबमध्ये पडून
नाशिक – महापालिका रुग्णालयातील 800 च्या वर नमुने औरंगाबादच्या लॅबमध्ये पडून
आठ दिवस उलटून देखील अहवाल मिळत नसल्याने आश्चर्य
अहवालाविना उपचार होत नसल्याने संसर्गाचा धोका वाढला
दररोज सरासरी 400 नमुने पाठवले जात आहेत औरंगाबादच्या लॅब मध्ये
औरंगाबादच्या लॅब मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेच स्वब पुन्हा मुंबईकडे
पॉझिटिव्ह रुग्ण देखील शहरात फिरत असल्याने संसर्ग वाढण्याची भीती
-
नागपुरात अपयश झाकण्यासाठी लॅाकडाऊनचा निर्णय – संदीप जोशी
– नागपुरात अपयश झाकण्यासाठी लॅाकडाऊनचा निर्णय
– पॅाश वस्त्या वेळीच सील का केल्या नाहीत?
– भाजप नेते संदीप जोशी यांनी उपस्थित केले सवाल
– ‘लॅाकडाऊन लावणे म्हणजे सर्वसामान्यांना वेठीस धरणे’
– नागपूरातील लॅाकडाऊनला भाजपचा विरोध
– ‘१५ ते २१ लॅाकडाऊन हा वेडेपणाचा निर्णय’
– ‘पालकमंत्र्यांनी हेकेखोरपणाने लॅाकडाऊनचा निर्णय घेतलाय’
– ‘लॅाकडाऊनमुळे कोरोना रुग्ण कमी होणार नाही’
-
रोलेट डॉन कैलास शहाला दोन दिवसांची पोलीस कोठडी
नाशिक –
रोलेट डॉन कैलास शहाला दोन दिवसांची पोलीस कोठडी
नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने सुनावली कोठडी
कैलास शहा कडून रोलेट डिव्हाईस देखील जप्त
कैलास शहा च्या अटकेनंतर आता स्थानिक एजंट रडारवर
कैलास शहा ला अटक, पण चौरसियाला अटक कधी ?
-
नागपुरात हत्या सत्र सुरुच, दगडाने ठेचून एकाची हत्या
नागपुरात हत्या सत्र सुरूच
हुडकेश्वर परिसरातील आऊटर रिंगरोड वर दगडाने ठेचून एकाची हत्या
अनिल हंसराज बर्वे असे मृतकांचे नाव असून तो ऑटो चालक आहे
ऑटो मध्ये तो दुपार च्या वेळी एक महिला आणि एक पुरुष असे प्रवाशी घेऊन रिंगरोड कडे गेला होता
मात्र त्याचा मृतदेह आढळून आल्याने अनेक शंका
गेल्या चार दिवसातील हत्तेची ही तिसरी घटना
त्यामुळे नागपुरात नेमकं काय सुरू आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहे
-
कोल्हापुरात ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांचा धिंगाणा, कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याच्या आनंदात नाचवल्या चिअर गर्ल्स
कोल्हापूर –
ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांचा धिंगाणा
कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याच्या आनंदात नाचवल्या चिअर गर्ल्स
कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी परिसरातील धक्कादायक प्रकार
भोगावती कारखान्यासाठी ऊस वाहतूक करत होते ट्रॅक्टर
दारू पिऊन, चिअर्स गर्ल्स नाचवून केली गर्दी
सोशल डिस्टसिंगचा फज्जा, सर्वचजण विनामास्क
-
नाशकात दुचाकी आणि टेम्पोचा अपघात, 6 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू
नाशिक –
दुचाकी आणि टेम्पोचा अपघात, 6 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू
अंबड लिंक रोड वरील खोदकामामुळे अपघात झाल्याचा आरोप
अपघातात आई वडील देखील जखमी
रस्त्यावर सूचना फलक न लावणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
-
नागपुरात गृह विलीगीकरणातील कोरोनाबाधीत बाहेर फिरत असल्याचं धक्कादायक वास्तव
गृह विलीगीकरणातील कोरोनाबाधीत बाहेर फिरत असल्याचं धक्कादायक वास्तव
– नागपूरात गृह विलीगीकरणातील कोरोनाबाधीताच्या घराची तपासणी मोहिम
– नियम तोडणाऱ्या १७ कोरोना बाधितांवर कारवाई
– गृह विलीगीकरणातून पाठवलं कोवीड केअर सेंटरमध्ये
– लक्ष्मीनगर झोनमधील १४ बाधितांची कोव्हिड केअर सेंटरमध्ये रवानगी
– कोरोनाबाधीतांनी नियम तोडल्यास ५ हजार रुपये दंड
-
चंद्रपुरात महाशिवरात्रीनिमित्त देवदर्शनासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
चंद्रपूर – महाशिवरात्रीनिमित्त देवदर्शनासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू, गोंडपीपरी तालुक्यातील येनबोथला गावातील नदीकाठची घटना, वैनगंगा नदीकाठी असलेल्या शिवमंदिरात कुटुंबासह दर्शनासाठी आला होता मुलगा, आंघोळीसाठी पाण्यात उतरल्यानंतर पोहता येत नसल्याने प्रवाहात गेला वाहून, स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य राबवून शव गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात केले रवाना
-
कोरोना वाढतोय, जळगावात शुक्रवार ते रविवार जनता कर्फ्यू
जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात येणार, गुरुवारी रात्री ८ वाजेपासूनच जनता कर्फ्यूला सुरुवात, अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी देखील रस्त्यावर उतरले
-
अकोलामध्ये वातावरणात बदल, जोरदार वाऱ्यासह पावसाची श्यक्यता
अकोला – अकोलामध्ये वातावरणात बदल,जोरदार वाऱ्यासह पावसाची श्यक्यता, दिवसभर कडक उन, रात्री 1 वाजता पासून जोरदार वारा सुरु
Published On - Mar 12,2021 9:56 PM
