LIVE | संगमनेर पोलिसांवरील हल्ला दुर्दैवी, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | संगमनेर पोलिसांवरील हल्ला दुर्दैवी, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे
Breaking News

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

May 08, 2021 | 12:39 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 07 May 2021 06:58 PM (IST)

  रायगड जिल्ह्यात मुबंई पुणे मार्गावरील बोरघाटात टेम्पो उलटला, दोन महिला जखमी 

  रायगड : मुबंई पुणे मार्गावरील बोरघाटात टेम्पो उलटला, दोन महिला जखमी

  जखमी महीलांवर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरु

  साताऱ्याहून भिवंडीला एकूण सात प्रवासी घेऊन जात होता टेम्पो

  दोन महीला जखमी तर पाच जण सुखरुप,  अडीच वर्षाची चिमुरडीसुद्धा सुखरुप

  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आपटी या गावातील कदम व घोरपडे कुटुंबातील सदस्य होते टेम्पोमध्ये

 • 07 May 2021 06:31 PM (IST)

  पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी प्रशांत जगताप यांची निवड

  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची निवड

  अजित पवार यांनी दिले नियुक्तीचे पत्र

 • 07 May 2021 06:29 PM (IST)

  मुंबई पुणे मार्गावरील बोरघाटात टेम्पो पलटल्याने दोन महिला जखमी

  खोपोली : मुंबई पुणे मार्गावरील बोरघाटात टेम्पो पलटल्याने दोन महिला जखमी

  जखमी महिलांवर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरु

  साता-याहून भिवंडीला एकूण सात प्रवासी घेऊन जात होता टेम्पो

  दोन महिला जखमी तर पाच जण सुखरुप, तर अडीच वर्षाची चिमुरडीही सुखरुप

  सर्व प्रवासी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आपटी या गावचे रहिवासी

  लोणावळा येथून खोपोलीकडे येताना खिडींत झाला अपघात

  खोपोली पोलीस, बोरघाट वाहतूक पोलीस अपघातग्रस्तांच्या मदतीकरीता घटनास्थळी रवाना

 • 07 May 2021 06:19 PM (IST)

  कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस

  कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस

  विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

  अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित

  वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

  हवामान खात्याने वर्तवला होता अंदाज

  उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा

 • 07 May 2021 06:17 PM (IST)

  दोन महिन्यात आरोग्य विभागातील रिक्त जागा भरा, कोर्टाचे औरंगाबाद प्रशासनाला आदेश

  औरंगाबाद : दोन महिन्यात आरोग्य विभागातील रिक्त जागा भरा

  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

  औरंगाबादच्या जिल्हा प्रशासनाला दिले आदेश

  आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती याचिका

  इम्तियाज जलील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हाय कोर्टाने दिले आदेश

 • 07 May 2021 04:29 PM (IST)

  संगमनेर पोलिसांवरील हल्ला दुर्दैवी, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे

  संगमनेर पोलीस हल्ला प्रकरणावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

  संगमनेर येथील घटना दुर्दैवी

  असं घडायलाच नको होतं

  पोलीस नागरिकांच्या हितासाठी काम करत आहेत.

  कर्तव्य करताना अशी वागणूक देणं चुकीचं

  कोणीही असो त्याला शिक्षा झाली पाहीजे

  महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य

  बाळासाहेब विखे पाटील काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका

  विरोधी पक्षाची भूमिका बजावताना विखे पाटील नैराश्यातून बोलतात

 • 07 May 2021 03:05 PM (IST)

  मुंबई अँटी नारकोटिक्स सेलकडून 20 वर्षांच्या ड्रग्ज पॅडलरला अटक

  मुंबई अँटी नारकोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने गोरेगाव परिसरातून 20 वर्षांच्या एका ड्रग्ज पॅडलरला अटक

  पॅडलरकडून 36 ग्रॅम कोकेन आणि 114 ग्रॅम एमडी ड्रग जप्त केली आहेत.

  पकडलेल्या ड्रगची किंमत 22 लाख 20 हजार आहे

  पुढील तपासासाठी आरोपीविरूद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

 • 07 May 2021 03:03 PM (IST)

  अँटिलिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरण, सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

  अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरण

  सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

  मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं सुनावली 19 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी

  सचिन वाझेनं कोर्टाकडे काही खाजगी गोष्टींसाठी केलेला अर्ज कोर्टानं स्वीकारला

  वाझे यांना जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, वॉशिंग पावडर, साबण, मीठ, साखर आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधं देण्यास कोर्टाची परवानगी

 • 07 May 2021 02:59 PM (IST)

  मनसूख हिरेन हत्याकांड : सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

  अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरण

  सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

  मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं सुनावली 19 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी

  सचिन वाझेनं कोर्टाकडे काही खाजगी गोष्टींसाठी केलेला अर्ज कोर्टानं स्वीकारला

  वाझे यांना जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, वॉशिंग पावडर, साबण, मीठ, साखर आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधं देण्यास कोर्टाची परवानगी

 • 07 May 2021 02:55 PM (IST)

  शहापूरमध्ये भाजपला जोर का झटका, 150 कार्यकर्ते शिवसेनेत

  शहापूर

  शहापूरमध्ये भाजपला जोर का झटका

  शहापूर नगरपंचायत हद्दी मधील वर्ड क्रमांक 13 व 14 मधील 150 भारतीय जनता पार्टीच्या कार्येकर्त्यांनी घेतला शिवसेनेचे प्रवेश

  ठाणे जिल्हा ग्रामीण युवासेने अध्यक्ष प्रभूदास नाईक, माजी आमदार पांडुरंग बरोरा, तालुकाध्यक्ष मारुती धीर्डे यांच्यासोबत प्रवेश

  150 कार्येकर्त्यांनी नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतला शिवसेनेत प्रवेश

 • 07 May 2021 01:28 PM (IST)

  नांदेडमध्ये वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान, अनेक घरांचे छप्पर उडाले

  नांदेड : वादळी वाऱ्याने खतगांवमध्ये प्रचंड नुकसान, अनेक घरांचे छपर उडाले

  भिंती पडल्याने अनेक घरांचे झाले नुकसान,

  झाडाच्या फांद्या तुटून उडाल्याने वाहनांचे मोठे नुकसान,

  विद्युत पुरवठा देखील रात्रीपासून खंडित,

  गावातील शेकडो ग्रामस्थांचे वादळी वाऱ्यासह पावसाने झाले मोठे नुकसान.

 • 07 May 2021 12:32 PM (IST)

  ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गजराज हत्तीला कार्यमुक्त करण्याचे संकेत

  चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गजराज हत्तीला कार्यमुक्त करण्याचे संकेत,

  प्रकल्पातील बोटेझरी भागात माजावर आलेल्या गजराजने मुख्य लेखापालाला होते चिरडले,

  गजराजच्या याच धुमाकुळात आजवर तिघांचा झालाय मृत्यू,

  प्रधान मुख्य वन्यजीवसंरक्षकांचा सल्ला घेत हत्तीला पुनर्वसन केंद्रात पाठविणार,

  मृत मुख्य लेखापाल प्रमोद गौरकार यांच्या शवाचे पोस्टमोर्टम करून मूळ गावी शंकरपूर येथे अंत्यसंस्कार होणार

 • 07 May 2021 12:25 PM (IST)

  न्या. अंबादास जोशी यांनी घेतली गोव्याच्या लोकायुक्तपदाची शपथ

  मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अंबादास हरिभाऊ जोशी यांनी आज (दि. ७) गोव्याच्या लोकायुक्तपदाची शपथ घेतली.

  महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. जोशी यांना राजभवन मुंबई येथून दूरस्थ माध्यमातून लोकायुक्त पदाची शपथ दिली. गोवा राजभवन येथे झालेल्या शपथविधीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील उपस्थित होते.

 • 07 May 2021 12:16 PM (IST)

  जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गजराज हत्तीला कार्यमुक्त करण्याचे संकेत

  चंद्रपूर -

  जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गजराज हत्तीला कार्यमुक्त करण्याचे संकेत

  प्रकल्पातील बोटेझरी भागात माजावर आलेल्या गजराजने मुख्य लेखापालाला होते चिरडले

  गजराजच्या याच धुमाकुळात आजवर तिघांचा झालाय मृत्यू

  प्रधान मुख्य वन्यजीवसंरक्षकांचा सल्ला घेत हत्तीला पुनर्वसन केंद्रात पाठविणार

  मृत मुख्य लेखापाल प्रमोद गौरकार यांच्या शवाचे पोस्टमोर्टाम करुन मूळ गावी शंकरपूर येथे अंत्यसंस्कार होणार

 • 07 May 2021 11:29 AM (IST)

  आमदार विनायक मेटे जिल्हाधिकारी कार्यालयात, मराठा आरक्षणासंदर्भात मोर्च्याचे निवेदन देणार

  बीड : आमदार विनायक मेटे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले

  मराठा आरक्षणासंदर्भात देणार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  16 मे रोजी मोर्चाचे आयोजन

  मोर्चाचे देणार निवेदन

 • 07 May 2021 11:27 AM (IST)

  शहापूर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा फटका, शेतकऱ्याच्या घराचे छप्पर उडाले

  शहापूर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे.

  शहापूर तालुक्यातील वादळी वाऱ्याचा फटका एका गरीब शेतकऱ्याला

  शेणवे गावातील शेतकरी विलास अण्णा पडवळ यांच्या घराचे छप्पर उडाले

  शहापूर तालुक्यातील शेणवे गावात झालेल्या वादळी वाऱ्यात अतिशय गरीब कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले एककीडे कोरोनाचे सावट असल्याने घरात रोजगार नाही अगदी धावपळ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असताना विलास पडवळ यांच्या संकटात आणखी भर पडली. खरंतर अशाच प्रकारे तीन वर्षा पूर्वी वादळी वाऱ्यात घराचा एक भाग कोसळून पडून पञ्यांची नासधूस झाली होती. आता पुन्हा एकदा आज झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे विलास अण्णा पडवळ यांच्या घराचे छप्पर उडाले भिंत कोसळली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

 • 07 May 2021 10:35 AM (IST)

  शहापूर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे

  शहापूर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे

  शहापूर तालुक्यातील वादळी वाऱ्याचा फटका एका गरीब शेतकऱ्याला

  शेणवे गावातील शेतकरी विलास अण्णा पडवळ यांच्या घराचे छप्पर उडाले

 • 07 May 2021 10:25 AM (IST)

  बीडमध्ये मराठा समन्वयक समिती जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

  बीड :

  मराठा समन्वयक समिती जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

  16 तारखेच्या मराठा मोर्चा संदर्भात देणार निवेदन

  आ. विनायक मेटे आणि समन्वयक जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

  16 मे रोजी बीडमधून निघणार पहिला मोर्चा

 • 07 May 2021 10:06 AM (IST)

  शहापूर तालुक्यातील फर्डेपाडा गावात 14 वर्षाच्या मुलाच्या अंगावर वीज पडून मुलाचा मृत्यू

  शहापूर -

  शहापूर तालुक्यातील फर्डेपाडा गावातील पारस अरुण फर्डे या 14 वर्षाच्या मुलाच्या अंगावर वीज पडून मुलाचा जागीज मृत्यू झाला

  कुटुंबातील माणसानं सोबत शेतावर गेला असतांना तेथे अंगावर वीज पडून मुलाचा झाला मृत्यू

  एक महिना अगोदरच शहापूर तालुक्यात पावसाने सुरवात केली आहे रोज वेगवेगळ्या ठिकाणी रोज वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे

  त्यामुळे घरांचे पत्रे उडणे, उन्हाळी लागवड केलेल्या शेतीचे नुकसान होणे, वीज पडणे आशा रोज घटना घडत आहेत

 • 07 May 2021 09:42 AM (IST)

  नाशिक सभागृह नेते सतीश सोनवणे कार्यलय तोडफोड प्रकरण, मुख्य संशयिताला अटक

  नाशिक -सभागृह नेते सतीश सोनवणे कार्यलय तोडफोड प्रकरण

  मुख्य संशयित सागर देशमुखला पोलिसांनी केली अटक

  दोन दिवसांपूर्वी सोनवणे यांच्या कार्यलयाची सेनेचे पदाधिकारी सागर देशमुख आणि त्यांच्या साथीदारांकडून करण्यात आली होती तोडफोड

  सतीश सोनवणे यांनी सागर देशमुख यांचे पोस्टर फाडल्याने झाला होता संघर्ष

  आगामी महापालिका निवडणुकांच्या पाश्वभूमीवर सेना भाजप वाद नाशिक मध्ये विकोपाला

 • 07 May 2021 09:12 AM (IST)

  राज्यात प्रथमच औरंगाबाद महानगरपालिका देणार तृतीयपंथीना नोकरी

  औरंगाबाद -

  राज्यात प्रथमच औरंगाबाद महानगरपालिका देणार तृतीयपंथीना नोकरी

  राज्याच्या महापालिकांमध्ये पहिलाच प्रयोग आहे

  औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सीटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने तृतीयपंथीना सेवेत घेणार सामावून

  महानगरपालिका प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांचा निर्णय

 • 07 May 2021 09:09 AM (IST)

  पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दोन महिन्यांनंतर पुन्हा दरवाढ

  पुणे :

  पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दोन महिन्यांनंतर पुन्हा दरवाढ

  तीन दिवसांच्या दरवाढीनंतर पुण्यात पेट्रोलचा प्रतिलिटर दर पुन्हा 97 रुपयांच्या पुढे

  पुण्यातील आजचे पेट्रोल डिझेल दर

  पेट्रोल - 97.31

  पॉवर - 100.99

  डिझेल - 87.17

  सीएनजी - 55.50

 • 07 May 2021 09:05 AM (IST)

  औरंगाबादच्या ऐतिहासिक पाणचक्की तलावातील शेकडो माश्यांचा मृत्यू

  औरंगाबाद -

  औरंगाबादच्या ऐतिहासिक पाणचक्की तलावातील शेकडो माश्यांचा मृत्यू

  पाणचक्की तलावाच्या पाण्यावर शेकडो माश्यांचा तवंग

  पाणचक्की बंद असल्यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन माश्यांचा मृत्यू

  लोकडाऊन मुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे पाणचक्की

  तलावातील पाण्याचा वापर बंद असल्यामुळे पाणी झालं दूषित

  पाणी दूषित झाल्यामुळे शेकडो माश्यांचा मृत्यू

 • 07 May 2021 08:29 AM (IST)

  आळंदीमध्ये वरुथिनी एकादशी निमित्त संजीवन समाधी सोहळा मंदिराला सजावट

  पुणे

  - आळंदीमध्ये वरुथिनी एकादशी निमित्त संजीवन समाधी सोहळा मंदिराला सजावट करण्यात आलीय

  -विविध फुलांचा वापर करत आकर्षक सजावट करण्यात आलीय

  -मंदिर भक्तांसाठी बंद असले तरी विविद्य धार्मिक विधी उत्साहात होत आहेत

 • 07 May 2021 08:28 AM (IST)

  नाशकात फायर ऑडिट न करणाऱ्यांना थेट नोटीस देण्याचा महापालिका आयुक्तांचा इशारा

  नाशिक -

  शहरातील खाजगी रुग्णालयाना महापालिका आयुक्तांचा इशारा

  फायर ऑडिट न करणाऱ्यांना थेट नोटीस देण्याचा इशारा

  विरार घटनेच्या पार्शवभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचा इशारा

  शहरातील 178 कोव्हिडं रुग्णालय आयुक्तांच्या रडारवर

 • 07 May 2021 08:25 AM (IST)

  नंदूरबारमध्ये संचारबंदीच्या कालावधीत बाजार समिती धान्यमालाची आवक कमालीची घटली

  नंदूरबार -

  संचारबंदीच्या कालावधीत बाजार समिती धान्यमालाची आवक कमालीची घटली

  सध्या हंगामा संमत आल्याने आवक कमी आणि भाव देखील स्थिर असल्याचे चित्र

  दरम्यान 11 वाजेची वेळमर्यादि असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर ती नुकसान होत आहे

  शेतकरी सकाळी पहाटे कृषी माळ घेऊन बाजार समितीत दाखल होत असल्याचे चित्र आहे

 • 07 May 2021 08:13 AM (IST)

  कोरोनाच्या पाठोपाठ नाशिक शहरावर पाणी कपातीचे संकट

  नाशिक -

  कोरोनाच्या पाठोपाठ शहरावर पाणी कपातीचे संकट

  नियोजित वेळ कमी करण्यासह एक वेळ पाणी कपातीचा प्रस्ताव

  गतवर्षी च्या तुलनेत गंगापूर धरण समूहात पाणीसाठा कमी

  गतवर्षी 50.13 टक्के पाणीसाठा , यंदा मात्र 40.97 टक्के इतका

  दारणे मधील 300 दशलक्ष घनफुट पाणी आरक्षण गंगापूर आणि मुकणे धरणात वर्ग करण्याची मागणी

 • 07 May 2021 08:13 AM (IST)

  नाशिक आनंदवल्ली हत्याकांड प्रकरण, रम्मी राजपूत, सचिन मंडलिकसह 20 संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई

  नाशिक - आनंदवल्ली हत्याकांड प्रकरण

  राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या रम्मी राजपूत, सचिन मंडलिक,भूषण मोटकरी, भगवान चांगले सह 20 संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई

  भूमाफियांवर राज्यातली पहिलीच एवढी मोठी कारवाई

  आयुक्त दिपककुमार पांडये यांच्या कारवाईने भूमाफियाना दणका

 • 07 May 2021 08:10 AM (IST)

  चाकणच्या काळूस गावामध्ये नदीलगत सुरु असलेला अवैध गावठी दारु उध्वस्त

  पुणे

  -पिंपरी चिंचवड पोलीस गुन्हे शाखा युनिट 3 कडून चाकण जवळील काळूस गावामध्ये नदीलगत सुरु असलेला अवैध गावठी दारू उध्वस्त

  -तब्ब्ल 5 लाख रुपये किमतीचे एकूण दहा हजार लिटर कच्चे रसायन जे दारू काढण्यासाठी लागते तसेच इतर साधने मिळून आल्याने तो जागीच नष्ट करण्यात आला

  -उत्तरसिंग राठोड यांच्या विरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 • 07 May 2021 07:59 AM (IST)

  देगलूरचे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजपाच्या वाटेवर

  नांदेड : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने भाजप ओढ वाढली, देगलूरचे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजपाच्या वाटेवर, येणाऱ्या पोट निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही तर भाजपमध्ये जाण्याचा दिला अप्रत्यक्षपणे इशारा, साबणे भाजपमध्ये गेले तर देगलूर विधानसभेच्या निवडणुकीत होणार मोठी चुरस.

 • 07 May 2021 07:50 AM (IST)

  पुणे शहरातील खुनाचे सत्र थांबेना, दोन दिवसात पाच खून

  पुणे

  शहरातील खुनाचे सत्र थांबेना, दोन दिवसात पाच खून

  लष्कर परिसरात भंगार गोळा करणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीचा खून

  खुनाचे कारण पोलिसांना अस्पष्ट

  ईस्माईल शेख असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव

  याप्रकरणी लष्कर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा केला दाखल

 • 07 May 2021 06:59 AM (IST)

  कोरोनाला रोखण्यासाठी सुरु झाली 'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहीम'

  रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि मृत्यूचा दर कमी करण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी माझी रत्नागिरी माझी जबाबदारी ही मोहीम आज पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे, या मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे, पुन्हा एकदा ही जबाबदारी, अंगणवाडी, आशा वर्कर्स, ग्राम कृती दलावर सोपविण्यात आली आहे.

 • 07 May 2021 06:40 AM (IST)

  पोलिसांवर दगडफेक करत जमावाचा हल्ला, संगमनेर शहरातील धक्कादायक घटना

  पोलिसांवर दगडफेक करत जमावाचा हल्ला

  संगमनेर शहरातील धक्कादायक घटना

  संचारबंदी काळात गस्त घालत असताना केला हल्ला

  जमाव बंदी आदेश असताना गर्दी का केली विचारले असता हल्ला

  संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरातील घटना

  संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली घटना

  6 जणांसह अज्ञात जमावा विरोधात गुन्हा दाखल

  हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

 • 07 May 2021 06:39 AM (IST)

  मुंबई विमानतळ मोठ्या अपघातातून बचावले

  मुंबई विमानतळ मोठ्या अपघातातून बचावला आहे, नागपूरवरुन हैदराबादला जाणाऱ्या एयर अॅम्ब्युलन्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर मुंबई विमानतळावर काही काळ इमरजेन्सी घोषित करण्यात आली होती, मात्र या विमानाची मुंबई एयरपोर्टवर सुखरुप आपत्कालीन लँडिंग करावी लागली, विमान क्रमांक सी-90 व्हीटी-जेआयएल जेट एअर अॅम्ब्युलन्समध्ये असलेले सर्व पॅसेंजर सुखरुप असून सध्या मुंबई एयरपोर्टवर विमान सेवा सुरळीत सुरु

Published On - May 07,2021 6:58 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें