Maharashtra News LIVE Update | पुण्यात दिवसभरात 182 नवे कोरोनाबाधित, 8 जणांचा मृत्यू

| Updated on: Oct 06, 2021 | 10:54 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | पुण्यात दिवसभरात 182 नवे कोरोनाबाधित, 8 जणांचा मृत्यू
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Oct 2021 08:40 PM (IST)

    कल्याण-डाेंबिवलीत विजेच्या कडकडासह जाेरदार वाऱ्यासह सुरु हाेता जाेरदार पाऊस

    डोंबिवली :

    कल्याण-डाेंबिवलीत विजेच्या कडकडासह जाेरदार वाऱ्यासह सुरु हाेता जाेरदार पाऊस

    जाेरदार वाऱ्यामुळे द्वारली गावात दाेन झाडे काेसळली

    एका रिक्षासह घऱाचे नुकसान

    कोणतीही जीवितहानी नाही

    फायर ब्रिगेडकडून झाड हटविण्याचे काम सुरु

  • 06 Oct 2021 08:20 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 182 नवे कोरोनाबाधित, 8 जणांचा मृत्यू

    पुणे :  ०६ ॲाक्टोबर दिवसभरात १८२ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात १३२ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५. -१८९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०१९७२. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५६४. – एकूण मृत्यू -९०४३. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९१३६५. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७४२७.

  • 06 Oct 2021 07:09 PM (IST)

    जालन्यात पंख्याचा शॉक लागून 46 वर्षीय महिलेचा मृत्यू

    जालना :

    जालना जिल्ह्यातील परतूर येथे घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर घराची साफसफाई करत असताना, टेबल पंखा सुरु करत असतांना पंख्यात विद्युत प्रहाव उतरून शॉक लागल्याने ४६ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. परतूर शहरातील मुजमुले गल्लीमध्ये आज ही दुर्दैवी घटना घडलीय . मृत महिलेचे नाव छाया मुक्तीराम काळे असे आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परतूर शहरात मात्र शोककळा पासरलीय.

  • 06 Oct 2021 06:59 PM (IST)

    शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भेटीला

    शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची सदिच्छा भेट घेतली.

    तिरुमाला तिरूपती देवस्थानाच्या सदस्यपदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती केलीय.

    त्यानिमित्त मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या कुटुंबियांसह जगनमोहन रेड्डी यांची सदिच्छा भेट घेऊन आभार मानले. या भेटीवेळी पक्षाचे सचिव सूरज चव्हाण हेसुद्धा उपस्थित होते.

  • 06 Oct 2021 06:48 PM (IST)

    नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्यला नाशिक बाजार पेठेमध्य तुफान गर्दी

    - नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्यला नाशिक बाजार पेठेमध्य तुफान गर्दी - कोरोना नियमांची ऐशीतैशी - दुकानदार,नागरिकांकडून सर्व नियम धाब्यावर - अनेकांच्या तोंडावर मास्क नाही,सोशल डिस्टन्सचा ही उडाला फज्जा

  • 06 Oct 2021 06:27 PM (IST)

    अंबरनाथ शहरात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस

    अंबरनाथ शहरात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस

    पाऊस सुरु होण्यासाठी जोरदार वारा आणि ढगांचा गडगडाट

    परतीच्या जोरदार पावसाला अंबरनाथ शहरात सुरुवात

  • 06 Oct 2021 06:19 PM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात

    कल्याण-डोंबिवलीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात

  • 06 Oct 2021 04:22 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू

    वाशिम:

    जिल्ह्यात आज झालेल्या विजेच्या गडागडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर रिसोड तालुक्यातील मांडवा येथील एका युवकांचा वीज पडून मृत्यू झाला, तर मालेगाव तालुक्यातील कोलदरा येथील शेतात शेतकरी काम करीत असताना वीज कोसळून वीज पडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्या असून, अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 06 Oct 2021 04:20 PM (IST)

    युपीएससीतील यशाबद्दल राज्यपालांकडून मृणाली जोशीचे अभिनंदन

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या मृणाली जोशीचे पेढा भरवून कौतुक केले. राज्यपालांनी मृणालीला विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मृणालीने आई वडिलांसह राज्यपालांची बुधवारी (दि. ६) राजभवन पुणे येथे भेट घेतली.

  • 06 Oct 2021 03:34 PM (IST)

    NCB आणि भाजपमधील संगनमताची मविआ सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी व्हावी : सचिन सावंत

    नवाब मलिकांच्या आरोपांवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची ट्विटरवर प्रतिक्रिया :

    "NCB व भाजपमधील संगनमताची मविआ सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. खाजगी लोक क्रूझवरील एनसीबी छाप्यात कसे? कोणत्या अधिकाराने? भाजपचा उपाध्यक्ष व एक फसवणूकीचा आरोपी यात आरोपींना ताब्यात घेताना कसे दिसतात? यांच्या गाडीवर "पोलीस" पाटी कशी? NCB ने त्यांचे काम भाजपाला दिले आहे का?", असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

  • 06 Oct 2021 02:34 PM (IST)

    आर्यन खानकडे कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही : नवाब मलिक

    बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही फोटो आहेत. त्यामुळे एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय? असा सवाल मलिक यांनी विचारला आहे.

    नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे : 

    एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे. त्याबरोबर सेल्फी काढणायत आली. तो सेल्फी व्हायरला झाला सेल्फीतला व्यक्ती एनसीबीचा अधिकार नाही, असं सांगण्यात आलं मग हा व्यक्ती नक्की कोण? एनसीबीला उत्तर द्यावं लागेल मनीष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना घेऊन जात आहे त्याचं प्रोफाईल भाजपचे उपाध्यक्ष असा उल्लेख आहे त्याचे फोटो नरेंद्र मोदी, अमित यांच्यासह भाजप नेत्यांबरोबर आहेत एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि मनीष भानुशालीचा संबंध काय काही फोटो एनसीबीनं जारी केलेत त्यात काही नशेचे पदार्थ दाखवण्यात आलेत पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून दाखवण्यात आलेत पण हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफीसचे आहेत गोसावी यांचा‌ झोनल डिरेक्टरशी संबंध काय, एनसीबीनं उत्तर द्यावं मनिष भानुशाली यांचा संबंध काय खाजगी व्यक्तींनी ही कारवाई कशी केली, त्यांना काही अधिकार आहेत का भाजप बॉलीवूड, राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे २१ तारखेला मनिष भानुशाली दिल्लीत काही मंत्र्यांच्या घरी होता त्यानंतर २२ तारखेला गांधीनगर भागात होता २१, २२ तारखेलाच गुजरातमध्ये ड्रग मोठ्या प्रमाणात सापडलं त्यामुळं २८ तारखेपर्‌यंत तो गुजरातमध्ये काय करत होता कुठल्या मंत्र्यांना भेटला याचं उत्तर एनसीबीनं द्यावे

  • 06 Oct 2021 11:27 AM (IST)

    इंदापूर तालुक्यातील निमगाव केतेकी येथील ज. मा. मोरे यांचे निधन

    इंदापूर

    शरद पवार यांचे अत्यंत जवळचा मित्र हरपला

    इंदापूर तालुक्यातील निमगाव केतेकी येथील ज. मा. मोरे यांचे निधन

    वयाच्या 88 व्या वर्षी झाले निधन

    शरद पवारांचे गेली 46 वर्षे अत्यंत जवळकीचे संबंध

    इंदापूर तालुक्याचे माजी पंचायत समिती सभापती

  • 06 Oct 2021 10:23 AM (IST)

    जायकवाडी धरणाचे आपत्कालीन 9 दरवाजे पुन्हा उघडले

    औरंगाबाद -

    जायकवाडी धरणाचे आपत्कालीन 9 दरवाजे पुन्हा उघडले

    जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजातून 80 क्यूसेक्स ने विसर्ग सुरू

    जायकवाडी धरणात पाण्याची अवाक वाढल्यामुळे वाढवला विसर्ग

    जायकवाडी धरणातून 80 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी पत्रात पुन्हा पूर परिस्थिती

  • 06 Oct 2021 10:22 AM (IST)

    भाजप नेते किरीट सोमय्या यांचे कोरेगावच्या जुना मोटार स्टँड येथे आगमन

    सातारा

    भाजप नेते किरीट सोमय्या यांचे कोरेगावच्या जुना मोटार स्टँड येथे आगमन

    भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत

    थोड्याच वेळात देणार जरंडेश्वर कारखानाल्या भेट

  • 06 Oct 2021 09:31 AM (IST)

    पवारांनी जालियनवाला बागेशी केलेली तुलना योग्यच - संजय राऊत

    संजय राऊत -

    पवारांनी जालियनवाला बागेशी केलेली तुलना योग्यच

    संतापाला वाट मोकळी करुन देणं हे विरोधकांचं काम

    राहुल गांधी लखीमपूरला जाणार त्यांनाही अडवलं जाईल

    त्यांनाही नोटिस बजाविल्याची माझी माहिती

    ज्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं अस्तित्व संपल होतं, तिथे प्रियांकांच्या समर्थनार्थ मशाल मोर्चे निघतायत

    ही एकप्रकारची जागरुकता

    लोकं जागी होत असल्याचं लक्ष

    भविष्यात काय होईल, हे आता पाहावं लागेल

    काल राहुल गांधींना भेटलो, लखीमपूरविषयी चर्चा झाली, राजकीय चर्चाही झाली

    लोकशाहीसंदर्भात आवाज जो उठवतो, त्याची नाकेबंदी केली जाते, देशद्रोही ठरविले जाते, अशा प्रकारचा अवलंब होत असेल तर देशामध्ये नव्या प्रकारली गुलामगिरी सुरु झालीये

  • 06 Oct 2021 08:22 AM (IST)

    गुन्हेगारांविरोधात नागपूर पोलीसांचं ‘ॲापरेशन ॲालआऊट’

    - गुन्हेगारांविरोधात नागपूर पोलीसांचं ‘ॲापरेशन ॲालआऊट’

    - दोन दिवसांत पोलिसांनी घेतली ९४० गुन्हेगारांची झाडाझडती

    - ॲापरेशन ॲालआऊटमध्ये ६८ दारुविक्रेते आणि पाच जुगार अड्ड्यावर छापे

    - नागपूर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने राबवलं ‘ ॲापरेशन ॲालआऊट’

    - नागपूर शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी राबवलं ॲापरेशन

  • 06 Oct 2021 08:20 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या शंभरच्या आत 

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड शहरात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या शंभरच्या आत

    -पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 75 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची दिवसभरात नोंद झाली

    -तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला

    -आजपर्यंत शहरातील 4 हजार 449 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.तर शहरातील 2 लाख 74 हजार 306 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे

    -सध्या 913 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 598 रुग्ण गृहविलगीकरणात असून 315 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत

    -आजपर्यंत 20 लाख 32 हजार 562 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली

  • 06 Oct 2021 08:15 AM (IST)

    मांत्रिकाने भक्ताला दिले चाबकाचे फटके, कोल्हापूर परिसरातील एका मंदिरातील धक्कादायक प्रकार

    कोल्हापूर

    मांत्रिकाने भक्ताला दिले चाबकाचे फटके

    कोल्हापूर परिसरातील एका मंदिरातील धक्कादायक प्रकार

    टाळ मृदंग वाजवत देवाचा सुरू होता जप

    भक्तीत तल्लीन झालेल्या भक्ताला मंत्रिकाकडून फटक

    घटने बाबत पोलीस आणि मंदिरातील पुजाऱ्याना मात्र कल्पना नाही

    नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर घडलेल्या प्रकारामुळे चर्चांना उधाण

    मंत्रिकाकडून चाबकाने फाटक्या चा व्हिडिओ व्हायरल

  • 06 Oct 2021 07:49 AM (IST)

    सलग चौथ्या वर्षी उजनी धरण भरले तुडुंब

    सोलापूर-- सलग चौथ्या वर्षी उजनी धरण भरले तुडुंब

    उजनी धरणात काल रात्री उशिरा 117 टीएमसी पाणीसाठा

    उजनी धरणाच्या 41 वर्षाच्या इतिहासात उजनी पस्तीस वेळा शंभर टक्के भरली

    2018 पासून सलग चौथ्या वर्षी उजनी धरण शंभर टक्क्यांवर

    धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

  • 06 Oct 2021 07:49 AM (IST)

    अक्कलकोट वटवृक्ष स्वामी मंदिरात मंदिर समितीने घेतली साफसफाई मोहीम

    सोलापूर-- अक्कलकोट वटवृक्ष स्वामी मंदिरात मंदिर समितीने घेतली साफसफाई मोहीम

    25 मार्च 2019 पासून मंदिर भाविकांसाठी बंद

    नवरात्र महोत्सवानिमित्त घटस्थापना व श्री देवीजींच्या  मूर्तीची करण्यात येणार मंदिरात स्थापना

  • 06 Oct 2021 07:48 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पाचशेच्या आत

    पुणे

    पुणे जिल्ह्यातील दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पाचशेच्या आत

    जिल्ह्यात मंगळवारी ४३४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून याउलट ६२२ जण कोरोनामुक्त

    अन्य पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील दिवसातील एकूण रुग्णांत पुणे शहरातील १६२ रुग्ण

    एकूण नवीन रुग्णांत शहरातील रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ७५ , जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १५३, नगरपालिका हद्दीतील ३४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील दहा रुग्णांचा समावेश

  • 06 Oct 2021 07:48 AM (IST)

    राज्य शासनाने महापालिकेला १०९६ कोटी रुपयांची थकबाकी तातडीने द्यावी

    पुणे

    राज्य शासनाने महापालिकेला १०९६ कोटी रुपयांची थकबाकी तातडीने द्यावी

    स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    'वस्तू व सेवा कर' आणि 'मुद्रांक शुल्क अधिभार' या दोन्ही अनुदानाची थकबाकी तातडीने उपलब्ध करून द्या

  • 06 Oct 2021 07:46 AM (IST)

    पुणे महापालिकेत आता असणार 166 नगरसेवक

    पुणे :

    महापालिकेत आता असणार 166 नगरसेवक

    राज्य निवडणूक आयोगाने दिले तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश

    महापालिकेच्या लोकसंख्येनुसार तीन सदस्यांचे 54 तर चार सदस्यांचा एक असे एकूण 55 प्रभाग रचना करण्याचे आदेश

    आजपासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार

  • 06 Oct 2021 07:44 AM (IST)

    नाशिकच्या गिरणारे,गंगाम्हाळुंगी परिसरात चार दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा जीव गेला

    - नाशिकच्या गिरणारे,गंगाम्हाळुंगी परिसरात चार दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा जीव गेल्याने वनविभागाचा नागरिकांना सर्कतेचा इशारा

    - या परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय

    - परिसरातील नागरिकांमध्य भीतीचे वातावरण

  • 06 Oct 2021 06:49 AM (IST)

    मोक्कातील फरार आरोपी रम्मी राजपूतला अखेर नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या

    - मोक्कातील फरार आरोपी रम्मी राजपूतला अखेर नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या

    - हिमाचल प्रदेशमध्ये आवळल्या मुसक्या

    - शहरातील भूमाफिया टोळीचा म्होरक्या,आणि आनंदवली येथील वृद्ध भूधारकाच्या खुनाचा कट रचून सुपारी त्याने दिली होती

    - या आरोपांखाली त्याच्यावर झाली होती मोक्काची कारवाई

    - मुख्य सूत्रधार गजाआड झाल्याने आता अनेक भूमाफियांची अनेक प्रकरण समोर येण्याची शक्यता

Published On - Oct 06,2021 6:46 AM

Follow us
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.