Maharashtra News LIVE Update | उल्हासनगरमध्ये इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळला

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | उल्हासनगरमध्ये इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळला
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 23 Oct 2021 22:44 PM (IST)

  उल्हासनगरमध्ये इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळला

  उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गांधी रोडवर असलेल्या पारस इमारतीच्या ५ व्या माळ्याचा स्लॅब चौथ्या माळ्यावर कोसळला असून यात दोन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे

 • 23 Oct 2021 20:25 PM (IST)

  कल्याणमध्ये धक्कादायक घटना, जीम मालकाच्या दादागिरीला कंटाळून फर्निचर कंत्राटदाराचा जीममध्ये गळफास

  कल्याण :

  कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरातील धक्कादायक घटना

  जीम मालकाने फर्निचर तयार करणाऱ्या मजूरांना डांबून ठेवले

  कंत्राटदाराला किडणी विकून पैसे उकळण्याची धमकी दिली

  फर्निचर कंत्राटदार पुनमाराम चौधरी याने जीममध्ये घेतला गळफास

  कोळसेवाडी पोलिसांनी जीम मालक वैभव परबला ताब्यात घेतले

 • 23 Oct 2021 20:04 PM (IST)

  रक्षा खडसे आणि भाजपचे माजी आमदार स्मिता वाघ यांनी गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक फसवले : माजी मंत्री सतीश पाटील

  जळगाव :

  भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि भाजपचे माजी आमदार स्मिता वाघ यांनी भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक फसवले, जिल्हा बँक निवडणूक अर्जावरून राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांचा गंभीर आरोप

  गिरीश महाजन यांनी आरोप करण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावे.

  भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना पुढे पक्षातून तिकीट घ्यायचा असेल म्हणून गिरीश महाजन यांच्या आदेशाने रक्षा खडसे यांनी जिल्हा बँकेत उमेदवारी अर्ज दाखल केला

  मात्र रक्षा खडसे यांना जिल्हा बँकेत उभारण्याची हिम्मत नव्हती म्हणून जाणीवपूर्वक उमेदवारी अर्ज पूर्ण ठेवल्याचा आरोपही राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

 • 23 Oct 2021 20:02 PM (IST)

  राज ठाकरे लीलावती रुग्णालयातून निघाले

  राज ठाकरे लीलावती रुग्णालयातून निघाले आहेत. राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासह त्यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाली आहे. ते उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आला. त्यानंतर थोड्यावेळाने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज पुढचे काही दिवस आपल्या घरीच क्वारंटाईन राहणार असून तिथेच त्यांच्यावर उपचार केला जाणार आहे.

 • 23 Oct 2021 19:56 PM (IST)

  तुळजापुरात खुलेआम डान्सबार सुरू

  एकिकडे राज्यात डान्स बारला बंदी असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापुरात खुलेआम डान्सबार सुरू

  बार मधील काही विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर

 • 23 Oct 2021 19:22 PM (IST)

  आमच्याशी लढायचं असेल तर समोर लढा, मग समजेल… : संजय राऊत

  संजय राऊत यांच्या भाषणातील मुद्दे :

  – संपूर्ण सभागृह आणि व्यासपीठ आज ओसंडून वाहतय
  – आज सकाळपासून कार्यक्रम झाले विकास कामांचे मात्र सर्व कोटींच्यावरती खाली नाही..
  – मी मुख्यमंत्री साहेबाना सांगितलं आज नाशिकमध्य सर्व कार्यक्रमात महिलांची उपस्थिती मोठी होती
  – म्हणजे तुम्ही किती घराघरात चुलीपर्यंत पोहचला आहेत
  – भगवा फेटा आहे आता फक्त कमरेला तलवार लावण्याची गरज
  – समोर घोशना आहे ED, CBI साथ है, आमच्याशी लढायचं असेल तर समोर लढा मग समजेल शिवसेना काय आहे.
  – आम्ही मागून वार करत नाही

  – ते गांजा वैगरे पुरवतात ते बोलतील
  – काय वातावरण आहे महाराष्ट्रात त्यांनी आज समोर येऊन पाहावं काय तुफान आलंय
  – क्षितिजावर फक्त शिवसेनेचा सूर्य तळपत राहील
  – आता दोन वर्षे पूर्ण होतील..शपथ घेतली तेव्हा पासून सरकार पडणार म्हणतात मात्र पुढील 5 वर्षे आपली
  – शिवसेना माघे हटणार नाही
  – अमित शहा काश्मीर मध्ये गेलेत… इतक्या हत्या झाल्या आणि गृहमंत्री आता पोहचले
  – सीमा पार करून चीनच सैन्य आत घुसल..
  – इथं काय चालल तर 100 कोटी लसी टोचल्या.. हा यांचा उत्साह

  – पेट्रोल चा भाव वाढला.. कोणी यावर बोलत नाही
  – गॅस महागाई वर कोणी बोलत नाही
  – हे म्हणतात 100 कोटी टोचल्या..
  – आता याना टोचायच की घालायचं..बांबू वैगरे काय म्हणतात
  – आता कोणला पेटवयाच तरी महाग झालं
  – आता सेनेची धडक दिल्लीला
  – ते हर्षवर्धन पाटील ..म्हणतात चांगली झोप लागते,त्यांना काय माहीत आम्हाला झोप लागत नाही
  – झोप लागत नाही ती चंद्रकांत पाटील आणि फडणवीस यांना
  – आमचे हात बरबटलेले नाहीत
  – आणि दसरा मेळाव्यात सांगितलं आहे आमच्या अंगावर येऊ नका

  – सत्ता हवीय तर आपल्याला जास्तीत जास्त आमदार आणि खासदार निवडून आणण्याची गरज
  – महाराष्ट्राच्या बाहेरचा पहिला खासदार निवडून येतोय डेलकर यांच्या पत्नी
  – शिवसेनेचे 22 खासदार आहेत.भविष्यात हा आकडा वाढेल
  – उद्धव ठाकरे यांच्याकडे नेता म्हणून सर्व जण बघतात
  – पश्चिम बंगाल मध्य ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्याकरिता मोदी यांनी 22 तर अमित शहा यांनी 40 सभा घेतल्या..
  – दंगली घडवल्या तरी दारुण पराभव झाला
  – महाराष्ट्र्र हा दिल्लीचा गुलाम नाही हे आपल्याला दाखवायचं आहे
  – काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या बरोबर

  – भाजपने दिलेला शब्द फिरवण्याच पाप केलं
  – त्यामुळे सर्व हे घडलं
  – बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेला शब्द यांनी पाळला नाही
  – त्यांना माफ करायचं नाही
  – या खोटे पणाविरुद्ध लढायचं
  – लढाई सुरू केली पण शेवट काय होईल माहीत नव्हतं
  – लोक म्हणे संजय राऊतला वेड लागलं
  – पण या महाराष्ट्राला आपण शिवसेनेचा मुख्यमंत्री देऊ शकतो

  – राज्याला बदनाम करण्याचं काम सुरू
  – उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेत एक आदर्श राज्य बनवायच आहे
  – याच नाशिकच्या भूमीमधून हिंदुत्वाचा हुंकार सावरकरांनी दिला
  – मात्र भाजपने हे सुरू केलं
  – आम्ही कोणत्या ही आघाडीत असुदे आम्ही हिंदुत्ववादि राहणार
  – हे तुफान बघून अस वाटत.. बाळासाहेब यांनी जे पेरलं ते उगवत आहे
  – शिवसेनेचा भगवा फडकत राहील
  – शिवसेनेच काम करणं ही एक नशा
  – शिवसैनिक होणं ही आपल्यासाठी प्रतिष्ठेची बाब

 • 23 Oct 2021 19:10 PM (IST)

  जम्मू-काश्मीर आता जगाच्या नकाशावर, श्रीनगर शारजाह आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू

  जम्मू काश्मीर :

  जम्मू-काश्मीर आता जगाच्या नकाशावर

  श्रीनगर शारजाह आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू

  केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते विमानसेवेचे उद्घाटन

  विमानसेवा पर्यटन आणि देशाच्या गुंतवणुकीसाठी, विकासासाठी महत्त्वाची ठरेल – अमित शहा

 • 23 Oct 2021 18:39 PM (IST)

  कामात कसूर केल्याप्रकरणी हिंगोलीत दोन पोलीस कर्मचारी निलंबित

  हिंगोली- पोलीस कर्मचारी निलंबित

  दोन पोलीस कर्मचारी निलंबित

  कामात कसूर केल्याप्रकरणी निलंबित

  पोलीस अधिक्षक राकेश कला सागर यांची कार्यवाही

  कामाजी जळके व भिकाजी मेनकुंदळे अस निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांच नाव

 • 23 Oct 2021 18:37 PM (IST)

  पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी नाशिक महापालिकेत कोणतंही ठोस काम केलं नाही : खासदार हेमंत गोडसे

  नाशिक :

  खासदार हेमंत गोडसे यांच्या भाषणातील मुद्दे :

  – पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी महापालिकेत कोणतंही ठोस काम केलं नाही
  – संघटनेने शहरात चांगलं काम
  – प्रत्येक प्रभागात आपल्या लोकप्रतिनिधींनी विकासकामं केली
  – आणि सत्ता आली तर अजून काम होईल

  – येणाऱ्या निवडणुकात जिल्हा परिषद, महापालिकेवर भगवा फडकणार

 • 23 Oct 2021 18:04 PM (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रींसह लीलावती रुग्णालयात पोहोचले

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रींसह लीलावती रुग्णालयात पोहोचले, राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, राज यांच्या आईलाही कोरोनाची लागण, राज यांना सौम्य लक्षण असल्याची माहिती

 • 23 Oct 2021 17:50 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 94 नवे कोरोनाबाधित, 4 रुग्णांचा मृत्यू

  पुणे : 
  दिवसभरात ९४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात १२६ रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत ०४ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.
  -१५४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०३७३३.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ९२७.
  – एकूण मृत्यू -९०७०.
  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९३७३६.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५७६९.

 • 23 Oct 2021 17:30 PM (IST)

  नाशिकमधील शिवसैनिक संवाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं जोरदार शक्तीप्रदर्शन

  – नाशिकमधील शिवसैनिक संवाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं जोरदार शक्तीप्रदर्शन
  – खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात होतोय शिवसैनिक संवाद मेळावा
  – संजय राऊत यांच्या आगमनापूर्वी रॅली काढून नगरसेवकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन
  – कोरोना नियमांचा अक्षरशः फज्जा
  – मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी
  – सेना पदाधिकाऱ्यांकडूनचं नियमांना हरताळ
  – ईडी, सीबीआय, एनसीबीला जम्मू काश्मीरला पाठवा, खूप शक्तीशाली लोक आहेत दहशतवादी पळून जातील
  – 2024 मध्ये शिवसेना राष्ट्रीय राजकारणात केंद्रात सर्वोच्च स्थानी असेल
  – कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवसेनेकडून विरोधकांना टोला मारत फलकबाजी

 • 23 Oct 2021 17:05 PM (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांची तब्येत बिघडल्याने काल त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. राज ठाकरे यांना कोरोनाचे सौम्य लक्षणे जाणवत आहेत. राज ठाकरे यांच्या आईलादेखील कोरोनाची लागण झालीय. राज यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथेच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तर घरातील इतर सदस्य क्वारंटाईन झाले आहेत.

 • 23 Oct 2021 16:47 PM (IST)

  मुख्यमंत्र्यांनी भारतीय घटना वाचावी, जबाबदार व्यक्तीने असे बोलू नये : नारायण राणे

  नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  आज भाजपतर्फे माझ्या विभागाची माहिती देणे, निराकरण करणे, देशाचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न करायचं आहेत

  नारायण राणे ऑन मुख्यमंत्री

  मुख्यमंत्र्यांनी भारतीय घटना वाचावी. मुख्यमंत्री यांनी कर्तव्य काय हे त्यांनी आधी समजून घ्यावी

  जबाबदार व्यक्तीने असे बोलू नये.

  दारू, मटका जुगार याला बंदी आहे

  अडीच वर्षे झाली यांना एबीसीडी कळलेली नाही

  कायद्यात नसतात त्या गोष्टी ठाकरे सरकार बोलत आहे

  सामना किंवा शिवसेनेला हिंदुत्वावर बोलायचा अधिकारी

  संजय राऊत यांना हिंदुत्व कळले नाही म्हणून शिकवायची वेळ आली आहे

  काही लोकांनी आपल्या पदाचा गैरवापर केला

  अमित शहा किमान काश्मीरला जातात यांनी जाऊन तरी दाखवावे

  यांची काय गिनती आहे

  यांचे राज्यात सरकार असून हे काय करत आहेत

  आताचे राज्याचे उद्योगमंत्री जमिनी विकत आहेत

 • 23 Oct 2021 15:57 PM (IST)

  गुन्हा घडताच कामा नये आणि लोकांना न्यायालयात जावेच लागू नये हे मुखमंत्र्याचे वक्तव्य स्तुत्य : उज्ज्वल निकम

  सांगली :

  गुन्हा घडताच कामा नये आणि लोकांना न्यायालयात जावेच लागू नये हे मुखमंत्र्याचे वक्तव्य स्तुत्य

  मुख्यमंत्र्याच्या आजच्या वक्तव्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून कौतुक

  पण मनुष्यस्वभावाप्रमाणे आपल्या मनासारखे झाले नाही तर याची कुठे दाद मागायची हा देखील महत्वाचा घटक

  न्यायालये असली पाहिजेत मात्र न्यायालयात अकारण कुणाला त्रास, बदला घेण्याच्या हेतूने कायदेशीर कारवाई नसावी हाच यामागे मुखमंत्र्याचा उदात्त हेतू आहे, असे मत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे

 • 23 Oct 2021 15:53 PM (IST)

  मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कृतज्ञता मेळावा, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

  बीड: मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कृतज्ञता मेळावा

  समता परिषद आणि राष्ट्रवादीकडून मेळाव्याचे आयोजन

  मेळाव्याला पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

  मेळाव्यात मास्क आणि सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

  मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडेंसह जिल्ह्यातील सर्वच नेत्यांची उपस्थिती

  बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मेळावा

 • 23 Oct 2021 14:57 PM (IST)

  उल्हासनगरात इस्टेट एजंट्सचा वृद्धेवर जीवघेणा हल्ला

  उल्हासनगरात इस्टेट एजंट्सचा वृद्धेवर जीवघेणा हल्ला

  फ्लॅट बघायला आल्यानंतर वाद झाल्यानं प्रकार

  हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

  विठ्ठलवाडी पोलिसांनी एका एजंटला ठोकल्या बेड्या, दुसऱ्याचा शोध सुरू

 • 23 Oct 2021 14:48 PM (IST)

  मुंबईत एनसीबीच्या तीन धाडी, एनसीबीची वांद्रे परिसरात कारवाई

  मुंबईत एनसीबीच्या तीन धाडी, एनसीबीकडून वांद्रे परिसरात तीन ठिकाणी धाडी, एनसीबीच्या हाती नेमकं काय लागलं? ते अद्याप समजू शकलेलं नाही

 • 23 Oct 2021 14:45 PM (IST)

  अहमदनगरचे पालकमंत्री पद सोडण्याबाबद हसन मुश्रीफ यांचा दुजोरा

  अहमदनगर :

  हसन मुश्रीफ ऑन पालकमंत्री :

  अहमदनगरचे पालकमंत्री पद सोडण्याबाबद मुश्रीफ यांचा दुजोरा

  आगामी काळात कोल्हापूरला आणि अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका

  त्यामुळे दोन्हीकडे लक्ष देणे जमणार नाही, 12 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू शकते

  दोन्ही जिल्ह्यात जाऊन प्रचार करणं शक्य होणार नाही,

  त्यामुळे मी कोल्हापूरची जबाबदारी घेतो असं मत व्यक्त केले, मात्र हे पक्षश्रेष्ठी ठरवतील

  जोपर्यंत अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी आहे तोपर्यंत प्रामाणिकपणे काम करून विकास करणार

  हसन मुश्रीफ ऑन किरीट सोमय्या

  मी सातत्याने माझ्या नेत्यांविषयी बोलतो त्यामुळे टार्गेट करायचं ठरवलं मात्र दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल

  आजपर्यंत च्या माझ्या आयुष्यात लबाडी किंवा बेईमानी केली नाही

  सरकार पडत नसल्याने सातत्याने बदनाम करून अस्तिर करण्याचा प्रयत्न सुरू आहेय मात्र ते यशस्वी होणार नाही

  तसेच अजितदादांनी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला

  एखाद्याला टार्गेट करणं योग्य नाही त्यांना आणि कुटूंबियांना जे टार्गेट केले जाताय ते चुकीचय

  तर अजितदादांना खटला दाखल करायला वेळ नाही उलट त्यांनी सांगितले किती प्रामाणिक पणे नातेवाईकांनी हा कारखाना चालवलाय

 • 23 Oct 2021 14:40 PM (IST)

  क्या हुआ तेरा वादा? नितेश राणेंचा ठाकरे सरकारला सवाल

  सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  नियमित कर्ज भरणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना 50 हजार देणार, असं वचन दिलं गेलं. त्यामुळे क्या हुआ तेरा वादा? असं विचारावसं वाटतं.

  मराठवाडा, विदर्भ किंवा कोकणातल्या शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करायची कशी? असा प्रश्न पडलाय.

  विरोधीपक्षात असताना हीच मंडळी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तोडफोड करून आले होते. आता तोडपाणी झाली नाही ना?

  चपटा पायाच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यासाठी प्रवृत्त केलंय

  ड्रग्स बद्दल बोलायचं, ncb बद्दल बोलायचं पण शेतकऱ्यांबद्दल बोलायचं नाही

  दिवसभर फक्त वसुली करायची हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे

  ठाकरे सरकारचा निषेध करतो

  शेतकऱ्यांच्या स्थितीला उद्धव ठाकरे आणि हे सरकारच जबाबदार आहे.

  ठाकरे सरकारच नाव बदलून बेईमानी सरकार नाव ठेवायला हवं

  पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे कसे कसे आणि कोणाकडून हफ्ते घेतात हे मी असलम शेख यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती.आमच्याकडे पुरावे आहेत.यासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार.

 • 23 Oct 2021 14:07 PM (IST)

  शिवसेना विरोधक असली तरी सत्ताधारी यांना लाजवेल असे काम करत आहेत – संजय राऊत

  संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  – शिवसेना विरोधक असली तरी सत्ताधारी यांना लाजवेल असे काम करत आहेत

  – दुपारी मेळावा आहे.उद्या आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघात कार्यक्रम आहे

  – दादरा नगर हवेली ला जाणार

  – तिथली लोकसभा जागा जिंकणार

  – महाराष्ट्र बाहेर शिवसेना प्रथम खात खोलणार

  – कावळे नसतील ते डोमकवले असतील
  – दिल्लीत राहतो तिथे मोर सुध्दा आहेत
  – डोम कावळे किती फडगडले तरी त्यांना काही सरकार पाडण्याची सुपारी फोडता येणार नाही
  – मी माझ्या पक्षासाठी कोणतेही घाव झेलण्यास तयार
  – सरकार आणण्यासाठी खटपट लटपटी केल्या त्याला यश आलं
  – पुलोद नंतर प्रथम असे सरकार आले

  – पुलोदचे शिल्पकार आपल्या बरोबर आहे
  – महाराष्ट्र तुळशी वृंदावन आहे

  – अमित शाह काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांनी काही दिवस तिथेच थांबावं. काश्मीरमध्ये काही भागात दहशतवादी कारवाया सुरु आहेत. शाह तिथे थांबल्याने सैन्यांनाही मानसिक बळ मिळेल

 • 23 Oct 2021 12:24 PM (IST)

  अमरावती जिल्ह्यातील दाणापूर येथे दलित समाजाच्या लोकांवर जातीय अत्याचार

  अमरावती –

  अमरावती जिल्ह्यातील दाणापूर येथे दलित समाजाच्या लोकांवर जातीय अत्याचार

  100 जणांनी गाव सोडून ठोकला पाझर तलावावर मुक्काम

  दलित समाजाच्या लोकांना शेतीकडे जाणारा रस्ता केला बंद

 • 23 Oct 2021 12:13 PM (IST)

  राज्याच्या अधिकारावर गदा येतेय का पाहिलं पाहिजे – मुख्यमंत्री

  घटनेत केंद्राला किती अधिकार आहेत राज्याला किती अधिकार आहेत, राज्याच्या वर केंद्र आहे का?

  केंद्र सरकार बॉस होणार असा प्रश्न आला तेव्हा हे स्पष्ट केलं की काही अधिकार वगळता राज्य सार्वभौम आहेत

  राज्याच्या अधिकारावर गदा येतेय का पाहिलं पाहिजे

  तुझा अधिकार वेगळा आणि तुझी मर्जी वेगळी हे कुणीतरी सांगितलं पाहिजे

  या तज्ञ लोकांकडून यावर प्रकाश पडेल

 • 23 Oct 2021 12:10 PM (IST)

  आपण अशी व्यवस्था निर्माण करू की गुन्हा घडला नाही पाहिजे – मुख्यमंंत्री

  रात्री राहायला जागा नसल्यामुळे कुठेही झोपतात आणि मग अत्याचार होतात

  त्यामुळे मुंबईत आपण निवाऱ्याची सोय करतोय

  गुन्हा घडल्यावर शिक्षा झाली पाहिजे पण आपण अशी व्यवस्था निर्माण करू की गुन्हा घडला नाही पाहिजे

  न्यायालये रिकामी पडली पाहिजे

  अमृतमहोत्सव महत्वाचा आहे पण या अमृतमहोत्सवाचे अमृतमंथन सुद्धा झाले पाहिजे

   

 • 23 Oct 2021 12:09 PM (IST)

  तीन डीएनए लॅब सुरू करण्याचा निर्णय – मुख्यमंत्री

  तीन डीएनए लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काल तीन फॉरेन्सिक लॅबचा आपण निर्णय घेतला आहे

 • 23 Oct 2021 12:09 PM (IST)

  न्यायदान ही केवळ न्यायालयाची जबाबदारी नाही, ही सर्वांची जबाबदारी – मुख्यमंत्री

  अनेकदा कोर्टात जाऊन जाऊन आयुष्य निघून जातं, खर्च परवडत नाही

  58 सालापासून एक आरोपी गायब असल्याचं तुम्ही म्हणता, पण चंद्रचूड साहेब आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, तरीही केस सुरू आहेl

  तक्रारदार गायब, कुठे पळून गेला माहीत नाही. पण आरोप केलेत ना मग खणून काढ

  खणलं जातंय, चौकश्या सुरू आहे, धाडसत्रं सुरू आहे ही काही पद्धत आहे

  तिला चौकट आणण्याची गरज आहे

  न्यायदान ही केवळ न्यायालयाची जबाबदारी नाही, ही सर्वांची जबाबदारी आहे, हे टीमवर्क आहे

 • 23 Oct 2021 12:07 PM (IST)

  पोलीस हवालदार निवृत्त होईपर्यंत हवालदार राहतो पण तो पोलीस उपनिरीक्षक झाला पाहिजे – मुख्यमंत्री

  पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनच्या बाजूला निवासाची सोय अशी आपण व्यवस्था करणार आहोत

  अनेक पोलीस हवालदार निवृत्त होईपर्यंत हवालदार राहतो पण तो पोलीस उपनिरीक्षक झाला पाहिजे असा आपण निर्णय घेतला आहे

   

 • 23 Oct 2021 12:04 PM (IST)

  लोकशाहीला अनेक खांब आहेत, या खांबानी हे वजन पेललं – मुख्यमंत्री

  लोकशाहीला अनेक खांब आहेत, या खांबानी हे वजन पेललं आहे

  त्यामुळेच आपण थंड हवेत बसू शकतो

  या चारही स्तंभावर दबाव आहे तो लोकशाहीचा आणि न्यायचा आहे

  आपले स्तंभ इतके कमकुवत नाहीत की त्या कोणत्या दबावामुळे कोलमडून पडतील

  पण एखादा स्तंभ कोसळून पडला तर उभा करणे कठीण जाईल

 • 23 Oct 2021 12:03 PM (IST)

  हायकोर्टासाठी बिल्डिंग हवीये ती मी करणारच – मुख्यमंत्री

  उद्धव ठाकरे –

  शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात

  मुंबई उच्च न्यायालयाची एक इमारत नागरिकांसाठी खुली केली आहे.

  हवं बघणं अजूनही रोमांचकारी आहे

  मला बोलताना आता इथे दडपण येतंय पण लोकमान्य टिळक यांनी जी घोषणा केली ती कशी आहे

  हायकोर्टासाठी बिल्डिंग हवीय ती मी करणारच

  रमना जी आजच आमंत्रण देतो की आपण सुद्धा भूमीपूजनाला यावं

  आणि प्रयत्न असा करू की भूमिपूजन आपण केल्यानंतर उद्घाटन सुद्धा आपणच करू

  तक्रारदार गायब आहेत तरी आमच्याकडे केस सुरू आहेत.

 • 23 Oct 2021 12:02 PM (IST)

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी किरण रिजुजू यांना चिमटा काढला

  एका अप्रतिम न्यायमंदिराचे उद्घाटन आज झाले

  किरण जी आपण म्हटल्या प्रमाणे भूमीपूजनाला मी नव्हतो पण आता झेंडा लावायला मी आलो,

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी किरण रिजुजू यांना चिमटा काढला

 • 23 Oct 2021 11:48 AM (IST)

  मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी

  वसई –

  मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे..

  वर्सोवा ब्रिज ते वसई हद्दीत सुवी पॅलेस हॉटेल पर्यंत 2 दीड किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत..

  सध्या ही वाहतूक अतिशय संथगतीने सुरू आहे..

  वालीव आणि महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत..

  मोठमोठी मालवाहू कंटेनर सर्व लेन ब्लॉक करून चालत असल्याने, छोट्या वाहनांना मार्ग काढणे कठीण होत असल्याने वाहनधाराकाना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे..

 • 23 Oct 2021 11:40 AM (IST)

  नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनिती

  – नागपूर महानगरपालिका निवडणूक भाजपची रणनिती

  – भाजप अनेक महिला नगरसेवीकांचं तिकीट कापण्याची शक्यता

  – अनेक महिला नगरसेवीकांवर मतदारांची नाराजी असल्याचा निष्कर्ष!

  – ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला नगरसविकांच्या तिकीट कापण्याची शक्यता

  – सध्या नागपूर महानगरपालिकेत ५२ पेक्षा जास्त महिला नगरसेवक

  – भाजप जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांवर संधी देण्याच्या तयारीत

  – भाजपने सुरु केला मतदारांशी संपर्क

 • 23 Oct 2021 11:39 AM (IST)

  प्रदूषित माहुल अंबापाडा येथे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन

  प्रदूषित माहुल अंबापाडा येथे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन…

  शिव येथील तानसा जलवाहिनी परिसरातील प्रकल्पग्रस्तांची न्यायालयात धाव…

  पालिकेला उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश…

 • 23 Oct 2021 11:18 AM (IST)

  दिवाळीत खासगी ट्रँव्हल्सचे दर दुपटी-तिपटीने वाढणार

  पुणे

  दिवाळीत खासगी ट्रँव्हल्सचे दर दुपटी-तिपटीने वाढणार !!!

  खासगी ट्रव्हल्स संघटनेकडून दिवाळी सिझनचे दर जाहिर

  प्रवासी दरवाढीसाठी दिले डिझेल दरवाढीचे कारण

  दिवाळी सुट्टीत गावी जाण्यासाठी पुणे, मुंबईतून खासगी ट्रँव्हर्सची वाढते मागणी

 • 23 Oct 2021 10:55 AM (IST)

  नाशिकमध्ये थंडीचे आगमन, पारा घसरला

  – नाशिकमध्ये थंडीचे आगमन

  – ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असतानाच थंडीचे आगमन

  – शहरातील पारा घसरला

  – 14.6 अंशावर नाशिकचा पारा

 • 23 Oct 2021 10:54 AM (IST)

  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अमरावती जिल्हा दौऱ्यावर

  अमरावती

  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अमरावती जिल्हा दौऱ्यावर

  गुरूकुंज मोझरीत गृहमंत्र्यांनी घेतले तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन

  गृहमंत्री अमरावतीत विभागाचा घेणार कायदा व सुव्यवस्थाचा आढावा

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशीही साधणार संवाद

 • 23 Oct 2021 09:09 AM (IST)

  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर

  – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर,

  – पुणे दौऱ्यात शहर काँग्रेसमधील गटबाजी दूर करण्याचा नाना प्रयन्त करणार,

  – आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी उफाळली,

  – आजच्या पुणे मुक्कामात नाना पटोले पक्षातील नव्या जुन्या नेत्यांना एकत्रित तंबी देणार असल्याची चर्चा.

 • 23 Oct 2021 09:04 AM (IST)

  शेतातून जाणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या लोम्बकळत असलेल्या तारांमध्ये शॉर्टसर्किट

  यवतमाळ –

  शेतातून जाणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या लोम्बकळत असलेल्या तारामध्ये शॉर्टसर्किट

  शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत

  शेतकऱ्याचे 300 क्विंटल सोयाबीन जळून खाक

  पंचनामा करून नुकसान भरपाई ची केली मागणी

  यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील मुरली गावातील आसाराम चव्हाण यांचया शेतातील घटना

 • 23 Oct 2021 09:03 AM (IST)

  रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला

  रत्नागिरी-

  रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला

  नाणारमधल्या विरोधानंतर राजापूरमधल्या बारसू सोलगावात रिफायनरीसाठी प्रयत्न

  बारसू सोलगाव पंचक्रोशीतल्या गावांची आता समर्थनात उडी

  जनतेचे समर्थन असेल तर रिफायनरी बारसू सोलगाव मध्ये होईल उद्योगमंत्र्यांच सुचक विधान

  विधानानंतर आता गावागावात समर्थनाचे फलक

  बारसू सोलगावातल्या पंचक्रोशीत रिफायनरी का हवी याचे झळकळे बॅनर्स

  सर्थनाच्या माध्यमातून रिफायनरीसाठी गावकऱ्यांची जनआंदोलनासाठी तयारी सुरु

 • 23 Oct 2021 09:00 AM (IST)

  गड किल्ल्यांच्या विकास आराखड्यात भूमिपुत्राला देणार स्थान, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे आश्वासन

  पुणे –

  – गड किल्ल्यांच्या विकास आराखड्यात भूमिपुत्राला देणार स्थान,

  – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे आश्वासन,

  – जिल्ह्यातील शिवनेरी, सिंहगडासह राजगड, तोरणा, कोरीगड, रायरेश्वर यांचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात,

  – यामध्ये कोणत्या ही भूमिपुत्राला विस्तापित करणार नाही. त्यांना विकास आराखड्यात सामावून घेऊ,

  – जिल्हातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आदित्य ठाकरेंचे आश्वासन,

  – मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आदित्य ठाकरें यांच्या बरोबर जिल्हातील सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यानी भेट घेतली.

 • 23 Oct 2021 09:00 AM (IST)

  एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी काल अनन्याला फटकारल्याची सूत्रांची माहिती

  एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी काल अनन्याला फटकारल्याची सूत्रांची माहिती

  11 वाजता बोलवलं असताना 2 वा अनन्या आल्याने, अधिकारी तुझी वाट पाहत बसलेले नाहीत, अशा भाषेत अनन्याला खडे बोल सुनावले

  तसेच ‘हे तुमचे प्रॉडक्शन हाऊस नाही, हे केंद्रीय तपास एजन्सीचे कार्यालय आहे, तुम्हाला बोलावल्या वेळी पोहोचायला हवे, असंही खडसावून सांगितलंय

  यानंतर आता सोमवारी अनन्या किती वाजता चौकशीला येते हे पाहणं महत्वाचं आहे

 • 23 Oct 2021 08:58 AM (IST)

  पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

  पुणे :

  पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

  त्यामुळे पुणे शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही शून्य मृत्यूची नोंद

  जिल्ह्यात दिवसभरात एकूण ३८० नवे कोरोना रुग्ण आढळले

  पुणे शहरात मागील सलग दोन दिवस शून्य मृत्यू नोंदले गेल्यानंतर शुक्रवारी मात्र दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली

 • 23 Oct 2021 08:57 AM (IST)

  ओबीसींच्या राजकीय आरक्षण अध्यादेशास हायकोर्टात आव्हान

  औरंगाबाद –

  ओबीसींच्या राजकीय आरक्षण अध्यादेशास हायकोर्टात आव्हान

  औरंगाबाद खंडपीठाने प्रतिवादींना दिली नोटीस

  राज्य शासनाचा 23 सप्टेंबर 2021 रोजीचा अध्यादेश रद्द करण्याची विनंती याचिकेत दाखल

  सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांचे तंतोतंत पालन केले जावे अशी याचिकेत विनंती

  यापुढेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याचिकेच्या अंतिम निकालाच्या राहतील अधीन

  धुळे येथील राहुल रमेश वाघ यांनी अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका केली दाखल

 • 23 Oct 2021 08:57 AM (IST)

  दिव्यांगाना त्यांच्या घरी जाऊन लस देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश

  औरंगाबाद –

  दिव्यांगाना त्यांच्या घरी जाऊन लस देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश

  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश

  दिव्यांग नागरिकांना लसीकरणात येणाऱ्या अडचणी पाहता महत्त्वाचा आदेश

  दिव्यांग सचिन चव्हाण यांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती याचिका दाखल

  दिव्यांगाना घरी लस मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

  दिव्यांगांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने लवकर घ्यावा असे ही आदेशात नमूद

 • 23 Oct 2021 08:56 AM (IST)

  बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ इस्कॉन तर्फे जगभरात 150 ठिकाणी आज आंदोलन

  औरंगाबाद –

  बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ इस्कॉन तर्फे जगभरात 150 ठिकाणी आज आंदोलन

  संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन आणि विविध 82 समविचारी संघटना तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

  जगभरात जवळपास 150 देशांमधून अशा प्रकारे केली जगात निदर्शने

  बांगलादेशात भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरावर आक्रमण करून केली होती जाळपोळ

  मंदिरातील मूर्तींची तोडफोड करून केलेल्या हल्ल्यात दोन भक्तांचा झाला मृत्यू

 • 23 Oct 2021 08:55 AM (IST)

  कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बँडबाजा वादनावरची बंदी उठवली

  पुणे

  कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बँडबाजा वादनावरची बंदी उठवली

  बंदी उठल्याने बँड पथकांसह ढोल ताश्यांचा आवाज पुन्हा एकदा घुमणार

  वाद्य पथकातील वादकाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस बंधनकारक

  हे आदेश पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला देखील लागू

  नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाणार

 • 23 Oct 2021 08:12 AM (IST)

  नाशिकमध्ये विना हेल्मेट पेट्रोल देणारे पंप आता पोलीस आयुक्त दिपक पांडे यांच्या रडारवर

  – नाशिकमध्ये विना हेल्मेट पेट्रोल देणारे पंप आता पोलीस आयुक्त दिपक पांडे यांच्या रडारवर

  – पेट्रोल पंपांवर कारवाई करण्यासाठी आता फ्लाइंग स्कॉड तयार

  – शहरात हे स्कॉड करणार पाहणी

  – विना हेल्मेट पेट्रोल देणाऱ्या पंपांवर करणार कारवाई

  – “नो हेल्मेट,नो पेट्रोल मोहीम यशस्वी करण्यावर पोलीस आयुक्त ठाम

 • 23 Oct 2021 08:12 AM (IST)

  सोलापूरच्या उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी मनपा घेणार 35 कोटींचे कर्ज

  सोलापूरच्या उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी मनपा घेणार 35 कोटींचे कर्ज

  उड्डाणपुलाच्या भूसंपादनाकरिता करिता लागणार आहेत 117 कोटी रुपये

  यापैकी 30 टक्के हिस्सा भरावा लागणार पालिकेला

  ही रक्कम वित्तीय संस्थेकडून कर्ज स्वरूपात घेण्याच्या विषयाला मंजुरी

  आजपर्यंत महानगरपालिकेवर आहे 26 कोटी 81 लाखांचे कर्ज

  तर एकूण 69 कोटी रुपये मक्तेदारांचे देणे

 • 23 Oct 2021 08:10 AM (IST)

  आरोग्य विभागाची गट क आणि ड परीक्षा एक दिवसावर

  पुणे

  आरोग्य विभागाची गट क आणि ड परीक्षा एक दिवसावर,

  मात्र एका विद्यार्थ्यांला अजूनही हॉलतिकीट मिळेना,

  तुका नाटकर असं या विद्यार्थ्यांच नाव आहे…

  आरोग्य विभागातील परीक्षेच्या तांत्रिक गोंधळानं विद्यार्थी त्रस्थ,

  मात्र परीक्षा वेळेवरच होणार आरोग्य विभगाचं स्पष्टीकरण …

 • 23 Oct 2021 07:26 AM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर,

  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं करणार उद्घाटन,

  केंद्रीय कायदे व न्याय मंत्री किरण रीजीजू , आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही रमण्णा लावणार हजेरी,

  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानंतरचा मुख्यमंत्र्यांचा दूसरा औरंगाबाद दौरा,

  विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ,विमानतळावरच मुख्यमंत्र्यांना दिला जाणार गार्ड ऑफ ऑनर !

  सुरक्षा व्यवस्थेसह मुख्यमंत्र्यांचा ताफा तयार

 • 23 Oct 2021 07:13 AM (IST)

  29 नोव्हेंबर पासून संसदेचे अधिवेशन?

  नवी दिल्ली

  29 नोव्हेंबर पासून संसदेचे अधिवेशन?

  केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही

  सूत्रांच्या माहितीनुसार 24 दिवस चालणार अधिवेशन

  29 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात चालणार संसदेचे अधिवेशन

 • 23 Oct 2021 07:12 AM (IST)

  महाराष्ट्र पोलीस अकादमीमधील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा रन वॉक

  नाशिक –

  – महाराष्ट्र पोलीस अकादमीमधील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा रन वॉक

  – 120 नंबर बॅच मधील 394 प्रशिक्षणार्थींचा रन वॉक मध्ये समावेश

  – बाह्यवर्ग अभ्यासक्रमांतर्गत पार पडला रन वॉक उपक्रम

  – शहरातील एबीबी सर्कल ते सोमेश्वर मंदिर असा रन वॉकचा रूट

  – सकाळच्या गुलाबी थंडीत रन वॉकने प्रशिक्षणार्थींमध्य उत्साह

 • 23 Oct 2021 07:12 AM (IST)

  पंतप्रधान मोदींचा आज गोवेकरांशी संवाद

  गोवा

  पंतप्रधान मोदींचा आज गोवेकरांशी संवाद

  आत्मनिर्भर भारत लाभार्थ्यांशी साधणार संवाद

  सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी साधणार संवाद

  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कार्यक्रमात सहभागी होणार

  गोव्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारकडून गोवेकरांची संवाद

 • 23 Oct 2021 07:04 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यातील हिंगण्याचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार निलंबीत

  – नागपूर जिल्ह्यातील हिंगण्याचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार निलंबीत

  – नुकत्या पार पडलेल्या निवडणूकीत मतदार याद्यांचा घोळ भोवला

  – मतदार याद्यांचा घोळामुळे निवडणुक आयोगाने केली कारवाई

  – तहसीलदार आणि नायब तहसीलदार विरुद्ध विभागीय चौकशीचे सरकारला आदेश

  – डिगडोह- इसासनी मतदार यादीत २४९४ नावं मतदार यादीच नव्हता

  – २४९४ नावं मतदारांना बजावता आला नाही मतदानाचा हक्क

 • 23 Oct 2021 07:03 AM (IST)

  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीर दौऱ्यावर

  नवी दिल्ली –

  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीर दौऱ्यावर

  आज पासून शाह यांचा तीन दिवसांचा जम्मू काश्मीर दौरा

  उच्चस्तरीय सुरक्षा दलांची बैठक करणार

  उपराज्यपाल आणि सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक

  कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच अमित शाह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर

 • 23 Oct 2021 06:43 AM (IST)

  नागरिकाच्या बेडरूममध्ये घुसलेला साप नगरसेवकाने पकडला

  नागरिकाच्या बेडरूममध्ये घुसलेला साप नगरसेवकाने पकडला
  उल्हासनगरच्या कॅम्प ५ भागात घडली घटना
  नगरसेवक भरत गंगोत्री यांच्या धाडसाचं कौतुक
 • 23 Oct 2021 06:43 AM (IST)

  अंबरनाथ एमआयडीसीतील कार्यालयात भलामोठा कोब्रा

  अंबरनाथ एमआयडीसीतील कार्यालयात भलामोठा कोब्रा
  कोब्राला पाहून कर्मचाऱ्यांची भीतीने गाळण
  सर्पमित्रांनी कोब्राची सुरक्षितपणे केली सुटका

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI