Maharashtra News LIVE Update | पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाची पर्यटनस्थळ म्हणून घोषणा

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाची पर्यटनस्थळ म्हणून घोषणा
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 26 Oct 2021 23:40 PM (IST)

  प्रभाकर साईल यांच्या स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याची प्रक्रिया 5 तासापासून सुरुच

  क्रूझ रेव्ह ड्रग्ज कारवाई प्रकरणातील मुख्य साक्षीदार प्रभाकर साईल यांचे 5 तासापासून स्टमेंमेंट रेकॉर्ड करणे सुरूच

  पोलीस आयुक्त मुंबई झोन 01 च्या कार्यालयात चालू आहे स्टेटमेंट रेकॉर्ड करणे

 • 26 Oct 2021 22:22 PM (IST)

  भिवंडीत नियंत्रण सुटलेली बाईक घुसली थेट फोटो स्टुडिओच्या दुकानात  

  भिवंडीत नियंत्रण सुटलेली बाईक घुसली थेट फोटो स्टुडिओ दुकानात

  घटना सीसीटीव्हीत कैद

  सुदैवाने जीवितहानी टळली

 • 26 Oct 2021 22:20 PM (IST)

  समीर वानखेडे मुंबई दाखल

  समीर वानखेडे मुंबई दाखल

  माझी चौकशी लावली आहे Veery Good

  समीर वानखेडे यांचे वक्तव्य

 • 26 Oct 2021 19:34 PM (IST)

  NCB पथक उद्या मुंबईत दाखल होणार, समीर वानखेडे चौकशी होणार

  नवी दिल्ली – NCB पथक उद्या मुंबईत दाखल होणार

  5 अधिकाऱ्यांचे विशेष पथक मुंबईत दाखल होणार

  मुंबईत येऊन समीर वानखेडे यांची उद्या पुन्हा चौकशी

  पंच प्रभाकर साहिलकडेही पथक चौकशी करणार

  डेप्युटी जनरल डायरेक्टर ज्ञानेश्वर सिंह स्वतः मुंबईत येणार

 • 26 Oct 2021 19:32 PM (IST)

  पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाची पर्यटनस्थळ म्हणून घोषणा

  पंढरपूर : तालुक्यातील चिंचणी या गावाची पर्यटनस्थळ म्हणून घोषणा

  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये चिंचणी या गावाला ” ब “वर्ग पर्यटनाचा दिला

  हे गाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा घेण्यात आला निर्णय

  या वर्षाकरिता चिंचणी गावास 25 लाख रुपये निधीची केली तरतूद

  पर्यटनाचा दर्जा दिल्यामुळे गावातील लोकांना गावांमध्येच उपलब्ध होणार रोजगार

  जिल्हा नियोजन अधिकारी श्री दराडे यांनी केली याबाबतची घोषणा

 • 26 Oct 2021 18:54 PM (IST)

  कोणालाही उगीचच अडकवले जाणार नाही- नवाब मलिक

  क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. पंचांनी कलेले आरोप  धक्कादायक आहेत. मी केलेल्या आरोपांमध्ये भर घालणारे हे आरोप आहेत. खंडणी वसूल करण्यावर गुन्हा दाखल केला जाईल. पंचांची कोऱ्या कागदांवर सही घेतली गेली असे सांगितले जाईल. पोलीस तपास करतील. नंतर ठरवतील कोणताही गुन्हा दाखल केला जाईल. पोलीस निष्पक्षपणे काम करतील. कोणालाही उगीचच अडकवले जाणार नाही. या प्रकरणात एसआयटी नेमायची की तपास क्राईम ब्रांच करेल हे गृहमंत्री ठरवतील, असे नवाब मलिक म्हणाले.

 • 26 Oct 2021 18:51 PM (IST)

  पंचांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत, गुन्हा दाखल करणार- नवाब मलिक

  क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टीत पंचांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत. आम्ही गुन्हा दाखल करणार. कोणालाही मुद्दाम अडकवण्याचा आमचा प्रयत्न नाही. घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार, असे नवाब मलिक म्हणाले.

 • 26 Oct 2021 18:49 PM (IST)

  बॉलिवूड बदनाम झाले तर देश बदनाम होईल- नवाब मलिक

  बॉलिवूड बदनाम झाले तर देश बदनाम होईल. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आले असेल तर कारवाई जरूर व्हावी. पण बॉलिवूडवर लाखो लोकांचा रोजगार आहे.

 • 26 Oct 2021 14:56 PM (IST)

  औरंगाबादेत गुंठेवारीचा प्रश्न पेटला, गुंठेवारीतील घरे पाडण्याच्या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोध

  औरंगाबाद –

  औरंगाबादेत गुंठेवारीचा प्रश्न पेटला

  गुंठेवारीतील घरे पाडण्याच्या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोध

  घरे पडण्याच्या निर्णयाविरोधात भाजप काढणार महापालिकेवर मोर्चा

  औरंगाबादचे पालकमंत्री आणि पालिका आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याची भाजपची मागणी

  गुंठेवारीतील घरे पाडण्याचा महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी घेतला होता निर्णय

  आयुक्तांच्या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टी आक्रमक

  घरे पडण्याच्या निर्णयाविरोधात भाजप मोर्चा काढणार असल्याचा शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी दिला ईशारा

 • 26 Oct 2021 13:25 PM (IST)

  माझी नवाब मलिकांना प्रार्थना आहे की त्यांच्याकडे इतके पुरावे आहेत तर त्यांनी थेट कोर्टात जावे – यास्मिन वानखेडे

  यास्मिन वानखेडे –

  माझी नवाब मलिकांना प्रार्थना आहे की त्यांच्याकडे इतके पुरावे आहेत तर त्यांनी थेट कोर्टात जावे आम्ही तिथे उत्तर देऊ

  उगाच लोकांचा, यंत्रणेचा, मीडियाचा वेळ वाला घालवू नये

  नवाब मलिक जातप्रमाणपत्र का शोधत आहेत, जातप्रमाणपत्र काढणारे ते कोण आहेत, तुम्हाला काय अधिकार आहेत, तुमचं कोणी जातप्रमाणपत्र काढलंय का?

  त्यांची रिसर्च टीम अशी आहे की मुंबईत पोस्ट केलेला फोटो त्यांना दुबईचा वाटतो, त्यांनी जरा आणखी मेहनत करावी

  धोका तर आहे, धमक्या येत आहे, मारण्याच्या धमक्या येत आहेत

  सत्यमेव जयते, ते या आरोपातून नक्कीच बाहेर पडतील

 • 26 Oct 2021 13:12 PM (IST)

  मला माझ्या राज्यात सेफ वाटलं पाहिजे – क्रांती रेडकर

  मला वेगवेगळ्या राज्यातून पाठिंब्याचे मेसेज येतात

  महाराष्ट्र सरकार आणि पोलीस आमची काळजी घेतात

  अँटी समीर वानखेडे मारण्याच्या धमक्या देतात, लटकवू टाकू, जाळून टाकू अशा धमक्या येतात

  मला माझ्या राज्यात सेफ वाटलं पाहिजे

  समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत

  ते फक्त दोन-तीन टक्के आहेत, इतर गँगस्टर ड्रग पेडलरही आहेत

  ते कोणत्याही पक्षासाठी काम करत नाहीत, ते न्यूट्रल आहेत

 • 26 Oct 2021 13:10 PM (IST)

  माझा नवरा खोटा नाही – क्रांती रेडकर

  त्यांच्या गावाचं सर्टिफिकेट पाहा, वानखेडे कुटुंबाचं सर्टिफिकेट पाहा

  कास्ट सर्टिफिकेट अख्ख्या गावाचं कसं खोटं

  रिसर्च जरा नीट करा

  खरा जन्माचा दाखला डॅडींनी दाखवला

  सारखं सारखं सांगायचं नाही

  उद्यापासून मी बोलणारही नाही, शेवटची पीसी

  कंटाळा आला सारखं सांगून, माझा नवरा खोटा नाही, मग का सहन करायचं

  हे आरोप कोर्टात केलेले नाहीत, ट्विटरवर केलेले आरोप

  आरोप कोर्टात सिद्ध झाले तर ते गुन्हागार ठरतील

  मीडिया ट्रायलमध्ये कसं गुन्हेगार होऊ शकते

  15 वर्ष क्लीन रेकॉर्ड असलेले अधिकाऱ्यावर तुम्ही असे आरोप लावू शकत नाही

  आमच्या कोट्यावधींची संपत्ती नाही, कोर्टात जाण्याइतके पैसे नाहीत

  नाकातोंडात पाणी गेलं तर जाऊ कोर्टात

 • 26 Oct 2021 13:07 PM (IST)

  हे सर्व पुरावे खोटे – क्रांती रेडकर

  क्रांती रेडकर –

  असे निनावी पत्र कोणीही घरी बसून लिहू शकते, त्यावर जर कोणाचं नाव नाहीये, ज्याने ते पत्र लिहिलंय त्याने पुढे यावं आणि कम्पेंट करावी, मग त्याचा तपास करावा

  हे सर्व पुरावे खोटे आहेत त्याचा काहीही अर्थ नाही

  समीरवर लावलेले सर्व आरोप हे खोटे आहेत, यावर काही पुरावे असतील तर ते कोर्टात सादर केले जातील तेव्हाच न्याय होईल

  ट्विटरबाजी करुन काहीही मिळवू शकत नाही, ट्विटरवर कोणीही काहीही लिहू शकते

   

 • 26 Oct 2021 12:58 PM (IST)

  पुण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार?

  पुण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार?

  शिवसेनेचे पुणे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

  महापालिका निवडणुकीसंदर्भात झाली चर्चा,

  लवकरच पुण्यात युतीसंदर्भात होणार बैठक

  अजित पवारांबरोबर चर्चा झाल्याची सचिन अहिरांची माहिती

  पुण्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार चर्चांना उधाण!

 • 26 Oct 2021 12:21 PM (IST)

  वर्धा जिल्हा परिषदेसमोर सरपंच संघटनेच ठिय्या आंदोलन

  वर्धा –

  – जिल्हा परिषदेसमोर सरपंच संघटनेच ठिय्या आंदोलन

  – दिवाळीच्या तोंडावर ग्रामपंचायतच्या स्ट्रीट लाईटचे कनेक्शन कापण्याच्या निषेधार्थ आंदोलन

  – आंदोलनात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा सहभाग

  – पथदिव्यांचा वीजपुरवठा कापणे बंद करावे , प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रपत्र ड च्या अपात्र यादीचे फेर सर्वेक्षण करावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन

 • 26 Oct 2021 12:01 PM (IST)

  31 तारखेला पुण्यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि सहसंपर्कप्रमुख घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक

  पुणे

  31 तारखेला पुण्यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि सहसंपर्कप्रमुख घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक

  महापालिका निवडणुकीची शिवसेनेनं तयारी केली सुरू

  31 तारखेला पक्षाच्या बैठकीत होणार युतीचा निर्णय

  स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मतं घेऊन मुंबईत मातोश्रीवर निरोप पोहोचवला जाणार

  पुण्यात महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र येणार का? प्रत्येक पक्षाच्या बैठका आयोजित

  येत्या आठवडाभरात पुण्यात युतीवर होणार शिक्कामोर्तब

  शिवसेनेचं मात्र 31 तारखेला ठरणार

 • 26 Oct 2021 11:41 AM (IST)

  पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कार्यकारिणीने बोलावली बैठक

  पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कार्यकारिणीने बोलावली बैठक

  दूपारी 4 वाजता काँग्रेस भवनात बैठकीचं आयोजन

  राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युती करायची की नाही? या मुद्द्यावर होणार चर्चा

  पुण्यातील पदाधिकाऱ्यांच मतं घेऊन प्रदेश कार्यकारीणीला कळवलं जाणार

 • 26 Oct 2021 10:55 AM (IST)

  कोविड नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दोन शाळांवर दंडात्मक कारवाई

  नागपूर –

  कोविड नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दोन शाळांवर दंडात्मक कारवाई

  महापालिकेच्या शोध उपद्रव पथकाची कारवाई

  शहरातील 34 शाळा ची केली पाहणी

  शाळा महाविद्यालयांवर कारवाई करण्याची पहिली वेळ

  राज्य सरकार ने शाळा महाविद्यालय उघडण्याची परवानगी दिली ,मात्र काही नियम घालून दिले

  दोन शाळा सह 3 प्रतिष्ठानवर कारवाई करत 15 हजार रुपयांचा दंड केला वसूल

  पथकाने 45 मंगलकार्यालाय , 25 मंदिर , 11 मस्जिद , 34 शाळा कॉलेज आणि 10 ठिकाणांची केली पाहणी

 • 26 Oct 2021 10:55 AM (IST)

  के पी गोसावीच्या शोधासाठी गेलेली टीम आज रात्री लखनौमध्ये पोहोचणार

  के पी गोसावीच्या शोधासाठी गेलेली टीम आज रात्री लखनौमध्ये पोहोचणार,

  काल माध्यमांना गोसावीनं दिलेल्या माहितीनुसार टिम लखनौमध्ये गोसावीचा तपास करणार

  एकच टिम गोसावीच्या तपासासाठी लखनौमध्ये ,

  आज रात्रीपासून के.पी गोसावीची शोधमोहीम सुरू होणार,

  फरासखाना पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती

 • 26 Oct 2021 10:54 AM (IST)

  कोणत्याही क्षणी समीर वानखेडे NCB कार्यालयात दाखल होतील

  नवी दिल्ली – कोणत्याही क्षणी समीर वानखेडे NCB कार्यालयात

  Ncb कार्यालयात विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी दाखल

  कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात

  समीर वानखेडे यांनाही बैठकीतील चर्चेत उपस्थित राहण्याची परवानग

  काल रात्री समीर वानखेडे नवी दिल्लीत दाखल

 • 26 Oct 2021 10:54 AM (IST)

  पुणे शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग कमी

  पुणे

  शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग कमी

  ग्रामीणमधील हॉटस्पॉट गावांच्या संख्येतही प्रत्येक आठवड्याला लक्षणीय घट

  सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ 34 गावे हॉटस्पॉट मागील आठवड्यात ही संख्या 76 इतकी

  तेरापैकी सहा तालुके हॉटस्पॉट मुक्‍त असून, 7 तालुके हॉटस्पॉट

  चार तालुक्‍यांतील हॉटस्पॉट गावांची संख्या पाचच्या आत तर तीन तालुक्‍यांतील हॉटस्पॉट गावांची संख्या दहाच्या आत

 • 26 Oct 2021 10:39 AM (IST)

  शेतात काम करणाऱ्या तरुणीचा बिबट्यासोबत थरार

  यवतमाळ –

  शेतात काम करणाऱ्या तरुणीचा बिबट्यासोबत थरार

  बिबट्याने धरला तिचा गळा तिने कळशीने फोडले त्याचे डोके

  कळशी मारून केली बिबट्यापासून सुटका

  धाडसी शेतकरी कन्येने परतविला मृत्यू

  यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील करंजखेड येथील घटना

  उपचारासाठी यवतमाळ मध्ये केले दाखल

  वृषाली नीलकंठ ठाकरे असे तरुणीचे नाव ती पुसद ला फार्मसी चे शिक्षण घेत असून अधूनमधून शेतात घरी कामाला सुद्धा कुटूंबाला करते मदत

 • 26 Oct 2021 10:09 AM (IST)

  औरंगाबादेत लस घेतलेली असेल तरच मिळणार सरकारी कार्यालयात प्रवेश

  औरंगाबाद –

  लस घेतलेली असेल तरच मिळणार सरकारी कार्यालयात प्रवेश

  औरंगाबाद शासकीय कार्यालयात प्रवेशासाठी नवा नियम

  किमान पहिला तरी डोस अनिवार्य

  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांचा हा निर्णय

  जिल्ह्यात शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी हा निर्णय

 • 26 Oct 2021 10:09 AM (IST)

  आजपासून एसटीची भाडेवाढ, पण ETIM तिकीट मशिन अपडेट न झाल्याने अडचणी

  – आजपासून एसटीची भाडेवाढ, पण ETIM तिकीट मशिन अपडेट न झाल्याने अडचणी

  – अनेक बसेसच्या तिकीट मशिन अपडेट न झाल्याने तिकिटाचे जुनेच दर

  – हॅाल्टिंगला असलेल्या बसेसच्या मशीन अपडेट झाल्याच नाही

  – कंडक्टरला मॅन्यूअली जुन्या पद्धतीनं द्याव्या लागत आहेत वाढीव तिकीट

  – छापील तिकीट उपलब्ध नसल्यास काय करायचं?

  – तीन वर्षानंतर एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ

  – एसटीच्या दरात किमान पाच टक्के भाडेवाढ

 • 26 Oct 2021 10:08 AM (IST)

  हिंगोलीत साडेतीन हेक्टरवरचा ऊस जळून खाक

  हिंगोलीत साडेतीन हेक्टरवरचा ऊस जळून खाक

  विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या शेतात आग

  ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान

  आठ एकरावरचा ऊस भस्मसात झाल्याने शेतकरी चिंतेत

 • 26 Oct 2021 09:52 AM (IST)

  आर्यन खानच्या जामीन प्रकरणात मी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहणार : मुकुल रोहतगी

  क्रूझ ड्रग्ज प्रकरण

  आर्यन खानच्या जामीन प्रकरणात मी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहणार अशी माहिती भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी दिली

   

 • 26 Oct 2021 09:05 AM (IST)

  काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांच्या मुलाला दिलासा

  नवी दिल्ली

  काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांच्या मुलाला दिलासा

  काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना परदेशात जाण्याची परवानगी

  तब्बल एक कोटी रुपयांच्या जातमुचलक्यावर परदेशवारी ला परवानगी

  एअरसेल आयनॅक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवास भोगल्यानंतर खासदार कार्ती चिदंबरम सध्या जामिनावर

  सुप्रीम कोर्टाकडून खासदार कार्ती चिदंबरम यांना मोठा दिलासा

 • 26 Oct 2021 08:47 AM (IST)

  बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने केली एकास अटक

  पिंपरी चिंचवड

  -बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने केली एकास अटक

  -त्याच्याकडून एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे दरोडा विरोधी पथकातील पोलिसांनी जप्त केली आहेत

  -गणेश निंबा महाले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव

  -निगडी परिसरातील टीजेएस बॅंकेजवळ आरोपी निलेश पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी निलेश याला ताब्यात घेतले

  -त्याच्याकडून 35 हजार 600 रुपयांची एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतूसे जप्त केली

 • 26 Oct 2021 08:47 AM (IST)

  WHO ची आज महत्त्वपूर्ण बैठक, भारतीय बनावटीच्या KOVACCIN लसीला मान्यता मिळण्याची शक्यता

  नवी दिल्ली

  WHO ची आज महत्त्वपूर्ण बैठक

  भारतीय बनावटीच्या KOVACCIN लसिला मान्यता मिळण्याची शक्यता

  आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्याची शक्यता

  कोवॅक्सिन लस घेतलेल्या व्यक्तींना मिळणार मोठा दिलासा

  कोवॅक्सिन मान्यताप्राप्त न ठरल्याने नागरिकांना परदेश वारीमध्ये येत होते अडथळे

  आंतरराष्ट्रीय स्तरावर कोवॅक्सिन लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

  WHO च्या बैठकीकडे लस घेतलेल्याचे लक्ष

 • 26 Oct 2021 08:47 AM (IST)

  केंद्रीय गृहमंत्री पुलवामामध्ये दाखल

  केंद्रीय गृहमंत्री पुलवामामध्ये दाखल

  अमित शहा यांच्याकडून पुलवामा मध्ये वीर जवानांना अभिवादन

  2019 सालच्या हल्ल्यात 40 जवान झाले होते शहीद

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तीन दिवसांचा जम्मू-काश्मीर दौरा

  पुलवामा येथे जाऊन शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

 • 26 Oct 2021 08:46 AM (IST)

  धुळे सोलापूर महामार्गावर धावत्या कारला भीषण आग

  औरंगाबाद –

  धुळे सोलापूर महामार्गावर धावत्या कारला भीषण आग

  महामार्गावरील लिपाणी आडगाव परिसरात लागली आग

  आगीत कार पूर्णपणे जळून झाली खाक

  सुदैवाने आगीत कुठलीही जीवित्तहानी नाही

  गाडीला आग लागल्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट

 • 26 Oct 2021 08:46 AM (IST)

  साखर कारखान्यांचं शिष्टमंडळ घेणार अमित शाह यांची भेट

  नवी दिल्ली

  महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाबाबत आज पुन्हा भेट

  साखर कारखान्यांचं शिष्टमंडळ घेणार अमित शहा यांची भेट

  हर्षवर्धन पाटील राधाकृष्ण विखे पाटील घेणार अमित शहा यांची भेट

  आज दुपारी तीन वाजता भेट होण्याची शक्यता

  गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली होती बैठक

 • 26 Oct 2021 08:45 AM (IST)

  नवी दिल्ली काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक

  नवी दिल्ली काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक

  आगामी विधानसभा निवडणुकांत बाबत होणार बैठक

  सोनिया प्रियंका राहुल यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

  उत्तर प्रदेशसह चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकी बाबत होणार चर्चा

 • 26 Oct 2021 08:45 AM (IST)

  औरंगाबाद शहरात दोन दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प

  औरंगाबाद –

  औरंगाबाद शहरात दोन दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प

  शहरातील अनेक भागात सुरू आहे निर्जळी

  जायकवाडी धरणावरील पाणीपुरवठयाचे केबल जळाल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प

  गेल्या दोन दिवसांपासून ठप्प आहे पाणीपुरवठा

  पाणी येत नसल्यामुळे नागरिकांची सुरू आहे पाण्यासाठी वणवण

  अनेक नागरिकांची पाण्यासाठी टँकरवर भिस्त

 • 26 Oct 2021 08:45 AM (IST)

  राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यातून प्रवास करताना आता सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसणार

  सोलापूर –

  राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यातून प्रवास करताना आता सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसणार

  आज पासून शिवशाहीच्या दरात वाढ

  पुणे -सोलापूर शिवशाही साठी आता 80 रुपये जादा मोजावे लागणार

  यापूर्वी शिवशाहीचे  465 रुपये होते भाडे

  साध्या गाडीने पुण्याला प्रवास करताना पंचवीस रुपये जादा भाडे द्यावे लागणार

  एसीचा प्रवास भाड्यात 17.17 टक्क्यांनी वाढ

  मागील काही दिवसापासून डिझेल टायर आदींच्या दरात मोठ्या प्रमाणात झाली आहे वाढ

 • 26 Oct 2021 08:41 AM (IST)

  औरंगाबाद महापालिकेची आर्थिक परिस्थिती आली डबघाईला

  औरंगाबाद –

  औरंगाबाद महापालिकेची आर्थिक परिस्थिती आली डबघाईला

  औरंगाबाद महापालिका काढणार 300 कोटींचे कर्ज

  महापालिकेच्या जागा तारण ठेऊन काढणार 300 कोटींचे कर्ज

  महापालिकेची आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी काढणार 300 कोटींचे कर्ज

  शहारातील अनेक बँकांशी महापालिकेची चर्चा सुरू

  कर वसुली होत नसल्यामुळे कर्ज काढण्याची आली वेळ

 • 26 Oct 2021 08:41 AM (IST)

  दहा वर्षात विक्री केलेल्या 56 सहकारी साखर कारखान्याची चौकशी करून त्यांचे फेरमूल्यांकन करा – राजू शेट्टी

  कोल्हापूर

  गेल्या दहा वर्षात विक्री केलेल्या 56 सहकारी साखर कारखान्याची चौकशी करून त्यांचे फेरमूल्यांकन करा

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची रिझर्व्ह बँके कडे मागणी

  मूल्यांकनात सावळा गोंधळ घालून कारखाने लाटल्याचा शेट्टी यांचा आरोप

  कोणत्या सहकारमंत्र्यांच्या काळात किती कारखाने विकले गेले

  राजू शेट्टींनी केली यादी जाहीर

  हर्षवर्धन पाटील यांच्या काळात सर्वाधिक 32 कारखाने चुकीच्या पद्धतीने विक्री केल्याचा दावा

 • 26 Oct 2021 08:40 AM (IST)

  ॲारेंज सिटी वॅाटर (OCW) ला 92 कोटींच्या माफीची चौकशी होणार

  – नागपूर महानगरपालिकेला मोठा धक्का

  – ॲारेंज सिटी वॅाटर (OCW) ला 92 कोटींच्या माफीची चौकशी होणार

  – पोलीसांची आर्थिक गुन्हे शाखा करणार चौकशी

  – सेवाशर्थीचा भंग केल्यामुळे ओसीडब्लू ला ९२ कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता

  – वन टाईम सेटलमेंटच्या नावाखाली दंड माफ केल्याने मनपावर ओढवलं आर्थिक संकट

  – या प्रकरणाची पोलीसांची आर्थिक गुन्हे शाखा करणार चौकशी

  – नगरविकास विभागाची मदत घेऊन चौकशी होणार

  – ओसीडब्लू नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारी कंपनी

 • 26 Oct 2021 08:11 AM (IST)

  नाशकातील गॅस स्फोटातील दोघांचा मृत्यू

  नाशिक –

  गॅस स्फोटातील दोघांचा मृत्यू

  तर इतर चार जणांवर उपचार सुरू

  दोन दिवसांपूर्वी पेठरोड परिसरातील कुमावत नगर मध्ये झाला होता स्फोट

  इतर चौघांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती

 • 26 Oct 2021 08:10 AM (IST)

  करमाळा तालुक्यातील शिवसेना पक्षात गटबाजी उफाळली

  सोलापूर – करमाळा तालुक्यातील शिवसेना पक्षात गटबाजी उफाळली

  गटबाजीला कंटाळून शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाचा भरत अवताडे यांनी दिला राजीनामा

 • 26 Oct 2021 08:10 AM (IST)

  नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मेगा भरती

  नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मेगा भरती

  शुक्रवारच्या महासभेत घोषणांचा डबलबार

  आयटी हब, लॉगिस्टिक पार्क च्या जागेवर होणार शिक्कामोर्तब

  महापौर सतीश कुलकर्णी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाना मंजुरीची शक्यता

 • 26 Oct 2021 08:09 AM (IST)

  दिवाळी आणि छटपूजेनिमित्त पुण्यातून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच बुकिंग फुल्ल

  पुणे

  दिवाळी आणि छटपूजेनिमित्त पुण्यातून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच बुकिंग फुल्ल

  उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या 100 टक्के बुकींग,

  दिवाळी आणि छटपूजेनिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने 10 दिवस आधीच गाड्यांच बुकींग फुल्लं,

  गाड्यांच बुकींग फुल्ल झाल्यानं अनेक प्रवासी वेटींगवर

 • 26 Oct 2021 08:08 AM (IST)

  नाशकात दिवाळीत सुरू राहणार बँकांचे व्यवहार

  नाशिक –

  दिवाळीत सुरू राहणार बँकांचे व्यवहार

  फक्त दोनच दिवस सलग सुट्ट्या

  क्लिअरिंग दररोज सुरू राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय टळणार

  बाजारातील अर्थचक्र सुरूच राहणार

 • 26 Oct 2021 08:08 AM (IST)

  राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शालेय पोषण आहाराची निविदा रखडली

  राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शालेय पोषण आहाराची निविदा रखडली

  गेल्या दोन महिन्यांपासून 1 कोटी विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळेना

  शालेय पोषण आहारांतर्गत तांदूळ आणि गव्हाची निवीदा न काढल्यानं पोषण आहार मिळेना,

  इयत्ता पहिली ते आठवीच्या राज्यातील 86 हजार 400 शाळांमधील 1 कोटी 5 लाख विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो

  यंदा 600 कोटी रुपये मंजूर करूनही निवीदा प्रक्रीया धूळ खात

  कोरोनामुळं कोरडा आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय

 • 26 Oct 2021 08:07 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी येथील रेमडेसवीर विक्रीच्या प्रकरणात शिक्षा

  – नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी येथील रेमडेसवीर विक्रीच्या प्रकरणात शिक्षा

  – रेमडेसवीर काळाबाजार करणाऱ्या चार जणांना पाच वर्षे कारावास

  – सत्र न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली

  – कुणाल पोवळे, लोकेश शाहू, शुभम मोहतुरे, सुमित बागडे चार आरोपींना शिक्षा

  – आरोपीविरुद्ध नविन कामठी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला

  – कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना आरोपी चढ्या दराने रेमडेसवीर विकत होते

 • 26 Oct 2021 08:07 AM (IST)

  पुण्यातील 23 गावं महापालिकेत समाविष्ट झाल्यानं जलसंपदा विभागानं पाणी कोट्यात केली वाढ

  पुण्यातील 23 गावं महापालिकेत समाविष्ट झाल्यानं जलसंपदा विभागानं पाणी कोट्यात केली वाढ,

  पावणे दोन टीएमसी पाणी महापालिकेला दिलं वाढवून,

  23 गावं समाविष्ट झाल्यानं पाण्याचि अतिरिक्त मागणी जलसंपदा विभागाकडे करण्यात येत होती,

  16 टीएमसी पाणी महापालिकेसाठी मंजूर आहे मात्र आता पावणे दोन टीएमसी पाणी अतिरिक्त पाणी पुणेकरांना मिळणार आहे,

  कालवा समितीच्या पुढच्या बैठकीत निर्णय अंमलात येण्याची शक्यता

 • 26 Oct 2021 07:53 AM (IST)

  ठाण्यात रहेजा गार्डन एसकोना इमारतीला च्या 5 व्या मजल्यावर आग

  ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील रघुनाथ नगर येथील रहेजा गार्डन एसकोना इमारतीला च्या 5 व्या मजल्यावर पहाटे पावणे पाच च्या सुमारास लागली आग

  घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण .

  कोणतीही जीवित हानी नाही, परिस्थिती आटोक्यात

  यावेळी 15 ते 16 रहिवाशांना बाहेर काढण्यात आले

  आगीचे कारण अस्पष्ट

 • 26 Oct 2021 07:51 AM (IST)

  नागपूर जिल्हयात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी 

  – नागपूर जिल्हयात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी

  – नागपुरात दुधाच्या वाहनातून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची तस्करी
  – वाहनासह २५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
  – नागपूरातील जरीपटका पोलीसांची मोठी कारवाई
  – विजय ट्रेकर्सचे संचालक विजय जेठाणी सह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
  – एफडीएच्या मगतीनं पोलिसांनी केली मोठी कारवाई
  – नागपूरातून छत्तीसगढ मध्ये होत होती सुगंधी तंबाखूची तस्करी
 • 26 Oct 2021 07:50 AM (IST)

  चालकाचे हात-पाय बांधून मालट्रक लुटणाऱ्या टोळीला अटक

  सोलापूर –

  चालकाचे हात-पाय बांधून मालट्रक लुटणाऱ्या टोळीला अटक

  स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा जणांच्या टोळीला अटक

  दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे ट्रक चालकास मारहाण करून ट्रक मधील साहित्य जबरदस्तीने घेतले होते काढून

  आरोपींकडून चोवीस लाखाचा मुद्देमाल ही केला हस्तगत

 • 26 Oct 2021 07:47 AM (IST)

  नागपुरात उडणारे कंदील, चिनी आणि मोठ्या आवाजाच्या फटाक्यावर निर्बंधाची मागणी

  – नागपुरात उडणारे कंदील, चिनी आणि मोठ्या आवाजाच्या फटाक्यावर निर्बंधाची मागणी

  – नागपूरातील पर्यावरण प्रेमिंनी केली मागणी

  – कोरणामुक्त झालेल्यांना फटाक्यांच्या मोठ्या आवाजापासून त्रास होण्याची शक्यता

  – नागपूर मनपाच्या अग्निशमन विभागाच्या फटाके दुकादारांना सूचना

  – दुकानात विद्युत तारा उघड्यावर आणि लटकत नसाव्या

  – दुकानात आग लागल्यास पाण्याचा साठा असावा

 • 26 Oct 2021 07:01 AM (IST)

  नाशिक मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, अधिकारी, कर्मचाऱ्यांना 15 हजार सानुग्रह अनुदान

  नाशिक –

  मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

  महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना 15 हजार सानुग्रह अनुदान

  दिवाळीपूर्वी साडे चार हजार कर्मचाऱयांना मिळणार सानुग्रह अनुदान

  महत्वपूर्ण निर्णयावर आयुक्तांचे शिक्कामोर्तब

  बिकट परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱयांना दिवाळीची भेट

  अधिकारी आणि कर्मचाऱयांना 15 हजार अनुदान

 • 26 Oct 2021 07:00 AM (IST)

  हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविनाच होण्याची शक्यता

  हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविनाच होण्याची शक्यता

  अर्थसंकल्पीय अधिवेशनापाठोपाठ नागपूरमध्ये होऊ घातलेले हिवाळी अधिवेशन विधानसभा अध्यक्षांविनाच होणार का?

  महाविकास आघाडीला आमदार फुटण्याची भीती असल्याने गुप्त मतदानाऐवजी हात उंचावून मतदानाचा कायदा विधान परिषदेत आधी पारित केला जाणार – सूत्र

  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून नवे अध्यक्ष कोण यांची चर्चा
  हिवाळी अधिवेशनच्या निमित्ताने अध्यक्षांच्या नावाची पुन्हा चर्चा रंगणार

 • 26 Oct 2021 06:58 AM (IST)

  झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधलेल्या सदनिका दहाऐवजी तीन वर्षांनंतर विकण्याची मुभा देण्यास मंत्रिमंडळ उपसमिती अनुकूल

  झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधलेल्या सदनिका दहाऐवजी तीन वर्षांनंतर विकण्याची मुभा देण्यास मंत्रिमंडळ उपसमिती अनुकूल

  मात्र ही मर्यादा पाच वर्षे असावी, असे उपसमितीचे अध्यक्ष व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे म्हणणे आहे.

  उच्च न्यायालयाच्या मान्यतेनंतर दिवाळीपूर्वी याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितल्याची माहीती आहे…

 • 26 Oct 2021 06:57 AM (IST)

  दीड वर्षानंतर नाशिक महापालिकेची महासभा ऑफलाईन

  नाशिक – दीड वर्षानंतर महापालिकेची महासभा ऑफलाईन

  पुढील महिन्यात होणारी महासभा थेट सभागृहात..

  कोरोना निर्बंधांमुळे दीड वर्षांपासून ऑफलाईन होती महासभा

  नगरसेवक,अधिकारी येणार आमने सामने

  अनेक वादग्रस्त विषयांना फुटणार तोंड

 • 26 Oct 2021 06:45 AM (IST)

  मुंबईच्या अँटॉप हिल सीजीएस कालोनी सेक्टर 7 मध्ये दोन मुलांचा खड्यात बुडून अपघाती मृत्यू

  मुंबईच्या अँटॉप हिल सीजीएस कालोनी सेक्टर ७ मध्ये दोन मुलांचा खड्यात बुडून अपघाती मृत्यू

  सोमवारी संध्याकाळी येथील पाइपलाईन दुरुस्तीकरण कामासाठी खोदलेल्या खड्यामध्ये भरलेल्या पाण्यात  दोन्ही मुले अचानक पडले

  हे मुलं तेथील मैदानात खेळत होते , सदर घटना निदर्शनात येताच दोन्ही मुलांना जवळच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आला

  मात्र डॉक्टरानी दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं

  पाईपलाईन दुरुस्तीचे काम करताना योग्य त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे

  सदर घटने संदर्भात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपमृत्यु नोंद दाखल असून योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे

 • 26 Oct 2021 06:42 AM (IST)

  पुण्यावरुन छत्तीसगढला निघालेल्या ट्रॅव्हल्स बसला भीषण आग

  बुलडाणा –

  पुण्यावरुन छत्तीसगढला निघालेल्या ट्रॅव्हल्स बसला भीषण आग

  ट्रॅव्हल्स जळून खाक

  मात्र घटनेत जीवितहानी नाही

  सिंदखेड राजाच्या जिजाऊ सृष्टी जवळील घटना

  हरिकृष्णा ट्रॅव्हल्सला लागली आग

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI