Maharashtra News LIVE Update | राज्यात दिवसभरात 3 हजार 586 जणांना कोरोनाची लागण, 67 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: Sep 18, 2021 | 12:01 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | राज्यात दिवसभरात 3 हजार 586 जणांना कोरोनाची लागण, 67 रुग्णांचा मृत्यू
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Sep 2021 09:27 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 3 हजार 586 जणांना कोरोनाची लागण, 67 रुग्णांचा मृत्यू

    राज्यात दिवसभरात 3 हजार 586 जणांना कोरोनाची लागण, तर 4 हजार 410 रुग्णांना डिस्चार्ज, गेल्या 24 तासात 67 रुग्णांचा मृत्यू

  • 17 Sep 2021 08:09 PM (IST)

    अकरावी प्रवेशासाठी 2 लाख 14 हजार 806 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

    ऑनलाईन प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी 2 लाख 14 हजार 806 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहे. उर्वरित विद्यार्थी आजपासून 20 सप्टेंबरपरच्या रात्री आठ वाजेपर्यंत 25 सप्टेंबरपर्यंत सुरू होणाऱ्या प्रवेशांच्या विशेष फेरीसाठी त्यांचे अर्ज सादर/अद्ययावत करू शकतात, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर दिली आहे.

  • 17 Sep 2021 06:58 PM (IST)

    राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. बबनराव तायवाडे यांचा सदस्यपदाचा राजीनामा

    नागपूर :

    राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी आज त्यांच्या सदस्यपदाचा दिला राजीनामा

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविला राजीनामा

    पत्रकार परिषदेत आज त्यांनी ही माहिती दिली.

  • 17 Sep 2021 06:29 PM (IST)

    पुण्यातील काही भाजप नगरसेवक माझ्या संपर्कात : अजित पवार

    अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    - पिंपरी चिंचवड महापालिका माझ्या नेतृत्वाखाली लढवली जाणार

    - पुण्यातील काही भाजप नगरसेवक माझ्या संपर्कात - मात्र मी खालच्या पातळीचं राजकारण करत नाही - भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी दिली आहे - पालिका चांगली असल्यास काम चांगलं होतं

    - मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी सांगू शकत नाही - आम्ही एकत्र काम करत असताना आजपर्यंत तरी चांगलं सुरु आहे - त्यामुळे या वक्तव्याकडे फारसं गांभीर्यानं पाहत नाही - ते राज्याचे प्रमुख आहेत, ते बोलू शकतात

    - जो काम करतो तोच चुकतो जो कामच करत नाही तो चुकत नाही त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने काम करत राहील पाहिजे

    - शरीर तंदुरुस्त राहील पाहिजे खास करून पहिल्या रांगेतील लोकांनी

    - सर्व शिष्यवृत्ती देण्यात आलीय, कोरोनाच्या सावटामुळे आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत आहेत तेव्हा शिष्यवृत्ती संदर्भात अडचन येणार नाही

  • 17 Sep 2021 06:25 PM (IST)

    पंढरपूरसह पाच तालुक्यातील संचारबंदी आणि निर्बंधांमध्ये शिथिलता

    पंढरपूर : पंढरपूरसह पाच तालुक्यातील संचारबंदी आणि निर्बंध शिथिल, माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला, पंढरपूर या पाच तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाने घेतला निर्णय, सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवेसह सर्व आस्थापणा सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहणार सुरु, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली माहिती

  • 17 Sep 2021 06:23 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 171 नवे कोरोनाबाधित, 10 जणांचा मृत्यू

    पुणे : दिवसभरात १७१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात २१३ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत १० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६. - १८१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९९०५३. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १८६२. - एकूण मृत्यू -८९९४. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८८१९७. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७८३१.

  • 17 Sep 2021 03:03 PM (IST)

    अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांनी दिले शिवसेना-भाजप युतीचे स्पष्ट संकेत

    अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांनी दिले शिवसेना भाजप युतीचे स्पष्ट संकेत

    शिवसेना भाजप एकत्र आले तर मतदारांना आनंद होईल रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य

    तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढचे तीन वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर युतीसाठी आमची तयारी आहे, अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण

    मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहण्याबाबत रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं

    रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यात रंगली तुफान जुगलबंदी

    अब्दुल सत्तार यांचे रावसाहेब दानवे यांच्यावर अनेक राजकीय आरोप

    तर आरोपांवर रावसाहेब दानवे यांची मिश्किल उत्तरं

  • 17 Sep 2021 12:15 PM (IST)

    जळगावमध्ये साफसफाई चा ठेका देण्यात आलेल्या वॉटर ग्रेस कंपनीने कामगारांचे पगार थकवले

    जळगावमध्ये साफसफाई चा ठेका देण्यात आलेल्या वॉटर ग्रेस कंपनीने कामगारांचे पगार थकवले

    घंटागाडीवरील चालकांनी आज केले कामबंद आंदोलन

    85 चालक 85 हेल्पर यांनी पुकारले आंदोलन

  • 17 Sep 2021 11:24 AM (IST)

    रात्रीच्या संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांना पुणे पोलिसांनी केली उठा बश्या काढायची शिक्षा

    पुणे

    रात्रीच्या संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांना पोलिसांनी दिली उठा बश्या काढायची शिक्षा

    कोरोना नियमांचं पालन केलं न करता विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या पोरांना पोलीस देतायेत शिक्षा

    विनाकारण रस्तावर फिरणाऱ्या तरुणांना कसबा गणपती समोर पोलिसांनीबाहेर उठाबशा काढायला लावल्या

  • 17 Sep 2021 11:24 AM (IST)

    सोलापुरातील विजयनगर परिसरात आढळला विवाहितेचा मृतदेह

    सोलापुरातील विजयनगर परिसरात आढळला विवाहितेचा मृतदेह

    मृतदेह आढळलेल्या विवाहितेचा अद्याप ओळख पटली नाही

    ओळख पटल्यानंतर खून की आत्महत्या होणार स्पष्ट

    शहरातील विजयनगर परिसरातील विहिरीत आढळला मृतदेह

  • 17 Sep 2021 11:23 AM (IST)

    तेल अंगावर पडून लागलेल्या आगीत विवाहितेचा मृत्यू

    येवला

    - तेल अंगावर पडून लागलेल्या आगीत विवाहितेचा उपचार अगोदरच रस्त्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

    - उपचारासाठी पुणे येथून नंदुरबार येथे खाजगी वाहनाने नेत असताना रस्त्यातच येवल्या दरम्यान भाजलेल्या विवाहितेचा झाला मृत्यू

    - निशा आशिष वळवी असे मृत विवाहित महिलेचे नाव

    - याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

    - पुणे येथील मोठमोठे खाजगी रुग्णालय सोडून आदिवासी असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात उपचाराला का घेऊन जात होता मयतेचा पती आशिष याबाबत येवला पोलिसांना शंका

    - पुढील तपासासाठी पुणे जिल्ह्यातील हडपसर पोलिस ठाण्यात येवला शहर पोलीस करणार गुन्हा वर्ग

  • 17 Sep 2021 08:46 AM (IST)

    किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर

    कोल्हापूर

    किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर

    ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वरील आरोपानंतर सोमय्या पहिल्यांदाच येणार कोल्हापुरात

    किरीट सोमय्या संताजी घोरपडे कारखान्याला भेट देणार असल्याची माहिती

    सोमय्या यांच्या दौऱ्यावरून वातावरण तापणार

    दौऱ्याला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरण्याची शक्यता

  • 17 Sep 2021 08:45 AM (IST)

    जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळणार 150 कोटींचे सॉफ्ट लोन

    बुलडाणा

    जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळणार 150 कोटींचे सॉफ्ट लोन

    मुख्यमंत्र्यांनी घेतला काल आढावा

    आज पुण्यात नाबार्ड आणि शिखर बँक अधिकाऱ्यांची बैठक

    विदर्भातील कमकुवत असलेल्या तीन बँकांपैकी अधिक सक्षम असलेल्या बुलडाणा जिल्हा बँकेला आणखी दिलासा मिळण्याची शक्यता

    मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत चर्चा झाल्याने शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या

    तर बँकेला मदत मिळाल्यास जिल्हा बँक अधिक सक्षम होईल

  • 17 Sep 2021 08:44 AM (IST)

    महाज्योतीच्या युपीएससी चाचणी परीक्षेची मुदत वाढवली

    नागपूर -

    - महाज्योतीची चाचणी परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

    - महाज्योतीच्या युपीएससी चाचणी परीक्षेची मुदत वाढवली

    - जेईई आणि नीट चाचणी परीक्षेला ३१ ॲाक्टोबर पर्यंत मुदतवाढ

    - तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून महाज्योतीचा निर्णय

    - महाराष्ट्रासह दिल्लीतंही असणार चाचणी परिक्षेचं सेंटर

    - महाज्योतीच्या मार्फत राज्यात ७२ होस्टेल सुरु करण्याचा निर्णय झाला

    - ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

  • 17 Sep 2021 08:43 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपहासात्मक स्वागत करण्यासाठी एमआयएमचे कार्यकर्ते रस्त्यावर

    औरंगाबाद:

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपहासात्मक स्वागत करण्यासाठी एमआयएमचे कार्यकर्ते रस्त्यावर

    बाबा चौक परिसरात शेकडो एमआयएम कार्यकर्ते एकत्र

    हातात स्वागताचे फलक घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर

    बाबा चौकात स्वागतासाठी चारही बाजूने कार्यकर्ते उभे

    पोलिसांचाही तगडा बंदोबस्त

  • 17 Sep 2021 08:42 AM (IST)

    खामगाव उपविभागात वीजबिल थकल्याने 13 गावं अंधारात

    बुलडाणा

    खामगाव उपविभागात वीजबिल थकल्याने 13 गावं अंधारात,

    महावितरण ने पथदिव्यांचा विद्युत पुरवठा बंद केल्याने गावात अंधार,

    तर 1455 ग्राहकांना महावितरणचा शॉक,

    वीज बिल थकीत असल्याने महावितरण ने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम केलीय सुरु,

    खामगाव उपविभागात आहे 7 कोटींची थकबाकी,

    या कारवाई ने ग्रामपंचायत आणि महावितरण एकमेकांसमोर ठाकले य.

  • 17 Sep 2021 06:50 AM (IST)

    पेस्ट कंट्रोल ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, आमदार देवयानी फरांदे यांची मागणी

    नाशिक - पेस्ट कंट्रोल ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

    भाजप आमदार देवयानी फरांदे यांची मागणी

    शहरात सध्या डेंग्यू आणि चिकनगुनिया चा कहर

    आमदार देवयानी फरांदे याना देखील डेंग्यूची लागण

    कार्यवाही न केल्यास पालिकेच्या आरोग्य विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा

    आरोग्य अधिकारी त्रंबके यांना भाजपचे काही पदाधिकारीच पाठीशी घालत असल्याची चर्चा

  • 17 Sep 2021 06:49 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा, शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    औरंगाबाद -

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा

    औरंगाबाद शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    सिद्धार्थ उद्यानाबाहेरही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    सिद्धार्थ उद्यानात होणार आहे मुक्तीसंग्रामदिनानिमित्त ध्वजारोहण

    विरोधाच्या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ उद्यानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

  • 17 Sep 2021 06:45 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सायकल रॅलीचे आयोजन

    पुणे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सायकल रॅलीचे आयोजन

    कोथरूड येथून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झेंडा दाखवून होणार या रॅलीची सुरवात

  • 17 Sep 2021 06:44 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलीस अॅक्शन मोडवर

    औरंगाबाद -

    मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलीस अॅक्शन मोडवर

    औरंगाबाद पोलिसांकडून अनेक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

    तर अनेक कार्यकर्त्यांना बजावल्या 149 च्या नोटीस

    एमआयएम मनसे धनगर आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांना नोटिसा

    आंदोलन न करण्यासाठी बजावल्या नोटिसा

    आंदोलन केल्यास गुन्हा दाखल करून अटक करण्याचा दिला ईशारा

    शेकडो कार्यकर्त्यांना बजावल्या पोलिसांनी नोटिसा

    तरीही एमआयएम मनसे आणि मराठा क्रांती मोर्चा आंदोलनावर ठाम

  • 17 Sep 2021 06:41 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

    औरंगाबाद -

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त करणार ध्वजवंदन

    तर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन

    तर पैठण येथील संतपिठाचे करणार ऑनलाइन उद्घाटन

    त्यानंतर शेंदरा एमआयडीसीतील ओरिक सिटीची करणार पाहणी

    मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला अनेक संघटनांनी दर्शवला आहे विरोध

    विरोधाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Published On - Sep 17,2021 6:34 AM

Follow us
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.