Maharashtra News LIVE Update | जयंत पाटील, धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक

| Updated on: Sep 28, 2021 | 1:13 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | जयंत पाटील, धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Sep 2021 09:18 PM (IST)

    जयंत पाटील, धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक

    बीड:

    जयंत पाटील, धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक

    परळीला जाताना गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचे घेतले दर्शन

    जयंत पाटलांचे परळीत जंगी स्वागत

    परिवार संवाद मेळाव्याला पाटील यांची हजेरी

  • 27 Sep 2021 08:13 PM (IST)

    पालघरमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात, दोन टेम्पोच्या धडकेत कारचा चुराडा

    पालघर : पालघरमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात, दोन टेम्पोच्या धडकेत कारचा चुराडा, अपघातात पाच जण गंभीर जखमी, बोईसर-चिल्हार मार्गावर नागझरी येथे भीषण अपघात, जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू, जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश, टेंम्पो खाली अडकलेल्या कार आणि कार मधील प्रवाशांना बाहेर काढण्यात अडचणी

  • 27 Sep 2021 08:09 PM (IST)

    जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी उठवली, किरीट सोमय्या यांचा कोल्हापूरला जाण्याचा मार्ग मोकळा

    कोल्हापूर :

    भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कोल्हापूरला जाण्याचा मार्ग मोकळा

    जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी उठवली

    जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केले आदेश

    किरीट सोमय्या यांचा उद्या कोल्हापूर दौरा

    ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी उठवणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती

  • 27 Sep 2021 07:35 PM (IST)

    जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, अजिंठा शासकीय विश्रामगृहात खलबतं सुरु

    जळगाव :

    जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय नेत्यांची अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठक सुरू

    सर्वपक्षीय पॅनल तसेच जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता

    बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजप नेते गिरीश महाजन, माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, शिरीष चौधरी, ऍड. संदीप पाटील आदींची उपस्थिती

    एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात एकमत होणार का? हे पाहणे ठरणार महत्वपूर्ण

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज होत असलेली बैठक ही चर्चेची दुसरी फेरी आहे, आजच्या बैठकीनंतर सर्वपक्षीय पॅनलवर शिक्कामोर्तब होणार किंवा सर्वपक्षीय पॅनल बारगळणार, हे स्पष्ट होणार

  • 27 Sep 2021 06:13 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 109 नवे कोरोनाबाधित, 167 जणांना डिस्चार्ज

    पुणे :  दिवसभरात १०९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १६७ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. - १८२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५००४९४. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४१३. - एकूण मृत्यू -९०२२. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९००५९. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५९३७

  • 27 Sep 2021 05:45 PM (IST)

    आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर, राजेश टोपे यांच्याकडून मोठी घोषणा

    राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षा पुन्हा होणार

    आज दुपारी 2 ते 3 तास बैठक झाली

    गट 'क' साठी 24 ऑक्टोबरला परीक्षा

    तर गट 'ड' साठी 31 ऑक्टोबरला परीक्षा

    कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका

  • 27 Sep 2021 05:15 PM (IST)

    किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दिशेला रवाना, हिंमत असेल तर अडवून दाखवा, राज्य सरकारला आव्हान

    भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दिशेला रवाना

    दादर येथे सिद्धीविनायकांचं दर्शन घेऊन ते कोल्हापूरला रवाना

    हिंमत असेल तर अडवून दाखवा

    सोमय्यांचे राज्य सरकारला आव्हान

  • 27 Sep 2021 04:24 PM (IST)

    राज्यातील खराब झालेले सर्व महामार्ग 15 ऑक्टोबरपूर्वी तातडीने दुरुस्त करा, राज्य सरकारचे निर्देश

    राज्यातील खराब झालेले सर्व महामार्ग 15 ऑक्टोबरपूर्वी तातडीने दुरुस्त करा

    राज्य सरकारचे निर्देश

    मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व खराब झालेल्या महामार्गांची तातडीने दुरुस्ती करावी लागणार

  • 27 Sep 2021 04:20 PM (IST)

    परळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

    बीड: परळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

    जयंत पाटलांच्या स्वागताची लोखंडी कमान कोसळली

    ऑटोरिक्षातील प्रवाशी थोडक्यात बचावले

    वादळ सुटल्याने पिंपळगाव फाट्यावरील कमान कोसळली

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आज परळी दौरा

  • 27 Sep 2021 04:19 PM (IST)

    जालन्यात मराठा आंदोलकांचा 29 तारखेला गोदावरी नदी पात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा

    मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली शासकीय नोकरी आणि दहा लाख रुपये आर्थिक मदत दिली नसल्याने राज्यव्यापी साष्ट पिंपळगाव मराठा आंदोलनातील आंदोलकाने गोदावरी नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय. मराठा आंदोलनातील 42 कुटुंबीयांना मदत देणार असल्याचे सरकारने 3 वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं. मात्र वारंवार विनवण्या करून देखील आणि लेखी आश्वासन देऊन देखील गेल्या तीन वर्षापासून या कुटुंबांची हेळसांड होत असल्याचा आरोप करत या आंदोलकांनी 28 तारखेपर्यंत सरकारने मागण्या मंजूर न केल्यास गोदावरी नदीत 29 तारखेला जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिलाय.

  • 27 Sep 2021 03:20 PM (IST)

    राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या परीक्षा मुद्द्यावर राजकारण नको : सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर :

    राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या परीक्षा मुद्द्यावर राजकारण नको, अशी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

    आरोग्य विभागाच्या परीक्षा हाताळणीत त्यांनी व्यक्त केलेली शंका

    हे परीक्षा व्यवस्थापन हाताळण्यासाठी नामांकित कंपन्यांना मुद्दाम डावलले गेल्याची टीका

    महिनाभरापूर्वीच या विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्याचा दावा

    आधी एमपीएससी मग एसआरपीएफ आणि आता आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याने उमेदवार हतबल झाल्याचा आरोप

    या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशाकडून चौकशी करण्याची मागणी

    महाराष्ट्राची प्रशासकीय यंत्रणा खड्ड्यात घालण्याचा हा कट असल्याचे विधान

  • 27 Sep 2021 02:31 PM (IST)

    महाराष्ट्रातील लेण्या या आपल्या खजिना : उद्धव ठाकरे

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित करत आहेत. त्यांच्या भाषणातील मुद्दे :

    दुर्देवाने पर्यटन खात्याकडे आजपर्यंत लक्ष गेलं नव्हतं. अनेक देश ७० ते ८० टक्के खर्च पर्यटनावर करतात काही पर्यटक जंगलं बघण्यासाठी जातात देशभरात जेवढ्या लेण्या आहेत त्यापैकी 800 लेणी महाराष्ट्रात आहेत. पण यापैकी जवळपास 90 टक्के लेणी आपल्या माहिती नाही. हा आपला खजिना आहे आपण खूप विकास केला म्हणतो. पण पूर्वजांनी केलेल्या लेणीसारखं लेणी बनणं शक्य नाही. आपल्याकडे वैभव आहे ते आपण टिकवतोय. जगतोय आणि जगासमोर आणतोय. आपण एक लेणी खोदायला सुरुवात केली पाहिजे. लेण्या म्हणजे डेकोरेशन नाही. प्रत्येकाला काहीतरी अर्थ आहे. प्रत्येक लेणीत महत्त्व आहे. वेगवेगळ्या शैली आहेत.

  • 27 Sep 2021 11:26 AM (IST)

    कोल्हापुरात घरगुती गॅसचा स्फोट, दोनजण किरकोळ जखमी

    कोल्हापूर

    कोल्हापुरात घरगुती गॅसचा स्फोट

    टाकाळा चौक परिसरातील घटना

    स्फोटात दोनजण किरकोळ जखमी

    नियाज जमादार, आणि मैनुद्दीन जमादार अशी जखमींची नावं

    जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

    घटनेत जमादार कुटुंबीयांच्या प्रापंचिक साहित्याचे मोठ नुकसान

  • 27 Sep 2021 10:35 AM (IST)

    थकीत एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू - कृषिमंत्री दादाजी भुसे

    कृषिमंत्री दादाजी भुसे -

    - थकीत एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू,

    - कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक,

    - आनंदराव अडसूळ यांना ईडी नोटीशीबाबत मला माहिती नाहीय

    - शेवटी जनता जनार्धन सर्वश्रेष्ठ आहे येणाऱ्या काळात जनता यासर्व गोष्टींची नोंद घेईल,

    - जनतेला या सर्व गोष्टी समजतात,

    - मी लहान कार्यकर्ता आहे, यावर बोलण्याएवढा मोठा कार्यकर्ता नाहीय, संजय राऊतांचा अजित पवारांना सूचक इशारा यावर प्रतिक्रिया.

  • 27 Sep 2021 10:34 AM (IST)

    नाशकात संशयित कुणाल उर्फ आतिफच्या वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं

    नाशिक - संशयित कुणाल उर्फ आतिफ च्या वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं

    उपनगर पोलिसांनी बोलावलं आतिफच्या वडिलांना

    आतिफ ला उत्तरप्रदेश ATS ने कालच केली होती अटक

    प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्र ATS टीम नाशिकला येण्याची शक्यता

  • 27 Sep 2021 09:27 AM (IST)

    मंगरूळ नवघरे येथील शेतकऱ्यावर 3 अस्वलांचा हल्ला

    बुलडाणा

    मंगरूळ नवघरे येथील शेतकऱ्यावर 3 अस्वलांचा हल्ला,

    चिखली तालुक्यातील घटना,

    जखमी शेतकरी धम्मप्रसेन जाधव वर रुग्णालयात उपचार सुरू,

    धम्मप्रसेन जाधव वडिलांसोबत शेतातून घरी परतत असताना घडली घटना,

  • 27 Sep 2021 09:27 AM (IST)

    पुणे मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांची भाजप सोबत जाण्याची मागणी

    - पुणे मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांची भाजप सोबत जाण्याची मागणी...

    - युती करा मनसे पदाधिकाऱ्यांची सुचना...

    - प्रभाग रचनेच्या गणितांचा आढावा घेताना युती करण्याची सुचना...

    - युतीमध्ये लढल्यास फायदा होण्याची शक्यता असल्याची भुमिका...

  • 27 Sep 2021 09:26 AM (IST)

    कोल्हापुरात अधिकाऱ्याच्या नावे चिट्टी लिहून महापारेषणच्या वायरमनचा आत्महत्येचा प्रयत्न

    कोल्हापूर

    अधिकाऱ्याच्या नावे चिट्टी लिहून महापारेषणच्या वायरमनचा आत्महत्येचा प्रयत्न

    कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावर आत्महत्येचा प्रयत्न कर्मचाऱ्याला स्थानिकांनी रोखलं

    विकास बंदी नावाचे अधिकारी वारंवार त्रास देत असल्याचा संबधित कर्मचाऱ्याकडून आरोप

    आई-वडील यांच्या नावे चिट्टी लिहून प्रशांत ढोणे या कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

  • 27 Sep 2021 09:25 AM (IST)

    विदर्भाच नंदनवन चिखलदरा येथे पर्यटकांच्या अंगावर वीज कोसळली

    विदर्भाच नंदनवन चिखलदरा येथे पर्यटकांच्या अंगावर वीज कोसळली

    पाच पर्यटक जखमी, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

    चिखलदरा येथील मोझरी पाइन्ट वरील घटना

  • 27 Sep 2021 09:24 AM (IST)

    चोरीच्या संशयातून पारधी वस्तीवर हल्ला

    बीड : चोरीच्या संशयातून पारधी वस्तीवर हल्ला

    हल्ल्यात दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू तर इतर 8 जण गंभीर जखमी

    पाटोदा तालुक्यातील पारनेर येथील घटना

    जखमींवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू

    पारनेर गावात तणावाचे वातावरण

    पोलीस घटनास्थळी दाखल

  • 27 Sep 2021 07:47 AM (IST)

    सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेण्याच्या प्रमाणात मोठी वाढ

    सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेण्याच्या प्रमाणात मोठी वाढ

    पटसंख्या 4 हजार 892 वरून 5 हजार 342 गेली

    कोरोना निर्बंधाच्या काळात महापालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले

    मागील दोन वर्षात महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या तीनशेहून अधिक वाढली

  • 27 Sep 2021 07:46 AM (IST)

    मुरगूड शहरातील उद्याचा आठवडी बाजार रद्द

    कोल्हापूर

    मुरगूड शहरातील उद्याचा आठवडी बाजार रद्द

    भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

    किरीट सोमय्या उद्या मुरगूड पोलिस स्टेशन मध्ये मुश्रीफ कुटुंबीयां विरोधात देणार तक्रार

    महा विकास आघाडी कार्यकर्त्यांचा दौऱ्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय

    मात्र खबरदारी म्हणून आठवडी बाजार बंदच राहणार

  • 27 Sep 2021 07:33 AM (IST)

    गुणपत्रकांचा गैरवापर टाळण्यासाठी गुणपत्रकावर आता विद्यार्थ्यांचा फोटो छापण्यात येणार

    - गुणपत्रकांचा गैरवापर टाळण्यासाठी गुणपत्रकावर आता विद्यार्थ्यांचा फोटो छापण्यात येणार,

    - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत प्रस्ताव मंजूर,

    - अधिसभा सदस्य अभिषेक बोके यांनी यासंबंधीचा प्रस्ताव अधिसभेसमोर मांडला होता.

    - त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

  • 27 Sep 2021 07:31 AM (IST)

    आयपीएल सट्टयावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई, दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींसह अनेकांना घेतले ताब्यात

    - आयपीएल सट्टयावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई,

    - आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींसह अनेकांना घेतले ताब्यात,

    - पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ९३ लाख रुपयांवर अधिकची रोकड केली जप्त,

    - या कारवाईत सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक जैन या दोघांसह काही जणांना घेतले ताब्यात.

  • 27 Sep 2021 07:30 AM (IST)

    नाशिक स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांविरोधात व्यापारी आक्रमक

    नाशिक - स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांविरोधात व्यापारी आक्रमक

    व्यापारी आणि लोकोप्रतिनिधींचे शिष्टमंडळ आज भेटणार पोलीस आयुक्तांना

    आयुक्तांची भेट घेऊन देणार निवेदन

    दसर्या पूर्वी कामे पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

    स्मार्ट सिटी प्रशासन आणि व्यापाऱ्यांचा वाद चिघळण्याची शक्यता

  • 27 Sep 2021 07:30 AM (IST)

    उजनी धरण आज करणार नव्वदी पार

    सोलापूर - उजनी धरण आज करणार नव्वदी पार

    -उजनी धरण पाणलोट क्षेत्रात एकाच दिवसात विक्रमी पाऊस

    - उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेली पुणे जिल्ह्यातील 19 धरणं पूर्ण क्षमतेने भरली

    -या धरणातून ही अतिरिक्त विसर्ग भीमा नदीत जोडण्याची शक्यता

    -काल संध्याकाळी उजनी धरणातील -काल - पाण्याची पातळी होती 89 टक्क्यांवर

    -आज पाण्याची पातळी करणाऱ नवदी पार

  • 27 Sep 2021 07:29 AM (IST)

    नागपुरात वीज वसूली कर्मचाऱ्यावर रॅाडने हल्ला

    - नागपुरात वीज वसूली कर्मचाऱ्यावर रॅाडने हल्ला

    - नागपूरातील इंद्रप्रस्त नगर येथील घटना

    - सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, आरोपीला अटक

    - कृष्णा अरुण वाट यांच्या नावावर पाच हजारांचं वीजबिल होतं थकित

    - वीज बिल वसूलीसाठी केलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि रॅाडने हल्ला

    - महावितरणच्या वसूलीधोरणाविरोधात संताप

  • 27 Sep 2021 07:28 AM (IST)

    संयुक्त किसान मोर्चाचा आज भारत बंद

    नवी दिल्ली - संयुक्त किसान मोर्चाचा आज भारत बंद

    नवी दिल्ली गाजीपुर रस्ता पूर्णपणे बंद

    उत्तर भारतात अनेक शेतकरी संघटना बंदमध्ये सहभागी

    केंद्र सरकारच्या विधेयकाविरोधात पुन्हा एकदा शेतकरी संघटना आक्रमक

    काँग्रेस,आप, समाजवादी पार्टी बीएसपी या पक्षांचा आजच्या बंदला पाठिंबा

    उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

  • 27 Sep 2021 07:27 AM (IST)

    काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा भाजप उमेदवारासाठी प्रचार

    - काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा भाजप उमेदवारासाठी प्रचार

    - जिल्हा परिषद पोटनिवडणूकीसाठी प्रचार

    - काँग्रेस नेते भाजप उमेदवाराचा प्रचार करत असल्याने पक्षात खळखळ

    - जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आलीय

    - सावरगाव सर्कलमधील भाजपच्या पार्वताबाई काळबांडेंच्या प्रचार बैठकीत आशिष देशमुख

    - २५ सप्टेंबरच्या बैठकीत आशिष देशमुख उपस्थित असल्याची माहिती

  • 27 Sep 2021 07:27 AM (IST)

    पुणे परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट

    - पुणे परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट,

    - पुढील दोन दिवस घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा पुणे हवामान खात्याचा अंदाज,

    - येत्या मंगळवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज

    - वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव.

  • 27 Sep 2021 06:44 AM (IST)

    गायमुख घोडबंदर रोड येथे ऑईल चा टँकर उलटून भीषण अपघात

    मुंबई - गायमुख घोडबंदर रोड येथे ऑईल चा टँकर उलटून भीषण अपघात

    ऑईल टँकरच्या खाली एक फोर व्हिलर चिरडली आहे, आतमध्ये फॅमिली होती

    जीवितहानी झाली की नाही या बाबत अद्यापी स्पष्ट नाही

    ठाणे महानगरपालिका अग्निशमन वैद्यकीय पथक पोलीस पथक घटना स्थळी दाखल

    तसेच मिरा भाईंदर महानगरपालिका अग्निशमन दल देखील घटना स्थळी दाखल

    क्रेनच्या सहाय्याने अडकलेल्या कार ला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता

    गेल्या तीन तासापासून दोन्ही मार्गाची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे

Published On - Sep 27,2021 6:35 AM

Follow us
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.