Maharashtra News Live Update : काँग्रेसमुक्त भारतची सुरूवात गोव्यातून, मोदींची प्रचारतोफ कडाडली
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई : आज गुरुवार 10 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Elections) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील (West Uttar Pradesh) 9 जिल्ह्यातील 58 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
महाराष्ट्र राज्य सरकारने वाइन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा-नवनीत राणा
आमदार रवी राणा यांच्यावरील गुन्ह्याबाबत खासदार नवनीत राणा यांच्याकडून लोकसभेत प्रश्न उपस्थित
किरीट सोमय्या, नितेश राणे यांच्यासोबत जे झालं ते आमदार रवी राणा यांच्या सोबत महाराष्ट्रात होत आहे
खासदार नवनीत राणा यांचा लोकसभेत आरोप
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
गोव्यात जी कामं भाजपने केली ती कुणीही केली नाहीत
व्हिजा ऑन आरायव्हल आम्हीच केलं
गोव्याच्या पर्यटनात मोठा हातभार लागला
गोव्यासाठी इलेक्ट्रीक बसेसला मंजुरी
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
गोव्यतल्या विकासकामांचा मोदींनी पाढा वाचला
गोव्याला किती कोटी दिले याचे स्पष्टीकरण
गोव्यात पर्यटनाला चालना मिळेल
गोवा व्यापारातही प्रगती करेल
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
भाजपने गोव्यात समग्र विकासाचा मुद्दा मांडला. कारण विकासाला तुकड्यात जात, धर्म, भाषा, श्रेत्राच्या नावाने वाटलं जाऊ शकत नाही. साऊथ गोवा आणि नॉर्थ गोव्यात एकत्र काम झालं पाहिजे.
जेव्हा आम्ही गोव्याच्या पर्यटनाचा मुद्दा उपस्थित करतो. तेव्हा अन्य क्षेत्राचा मुद्दाही उपस्थित होते. त्यामुळे भाजपनं इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाचं नवं अभियान राबवलं आहे. गोव्या स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे अनेक कामं सुरु आहेत.
बस डेपो, आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम सुरु आहे. यामुळे गोव्यात दुसऱ्या उद्योगात, व्यापारात गुंतवणुकीचे मार्ग उघडतील. गोव्यात एक मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क बवण्याचं काम सुरु आहे. गोव्यात भाजप सरकार आज जे काम करत आहे. त्याची गरज गोव्याला दशकांपूर्वी होती.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
काँग्रेसमुक्त भारतची सुरूवात गोव्यातच झाली
गोवा सर्वांना बरोबर घेऊन चालतो
गोवा भ्रष्टाचाऱ्याचं एटीएम होतं
मोदींची पुन्हा काँग्रेसवर तोफ
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
जेव्हा कधी मी गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकर यांची कमतरता भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमतरता नेहमी भासत असेल. आज तुम्ही मला ज्या रुपात पाहत आहात त्याची सुरुवात गोव्यातून झाली होती. जून 2013 मध्ये इथं भाजपची कार्यसमिती पार पडली. तेव्हा मी गोव्याच्या याच धरतीवर होतो. तेव्हा भाजपनं मला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसमितीचा प्रमुख घोषित केलं होतं. नंतर मला पंतप्रधान पदाचा उमेदवारही घोषित करण्यात आलं. गोव्याच्या मातीतून निघालेली ती प्रेरणा होती. त्या दिवशी आमच्या पर्रिकरांनी एक सभा आयोजित केली होती. तेव्हा माझ्या तोंडून सहज एक शब्द आला होता काँग्रेसमुक्त भारत… आज हा शब्द देशाच्या कोट्यवधी नागरिकांचा संकल्प बनला आहे.
-
मोदींचं भाषण पाहा Live
-
किरीट सोमय्या यांच्या उद्याच्या सत्काराला आता काँग्रेस विरोध करणार
या कार्यक्रमास महापालिकेने परवानगी दिल्यास त्याठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा शहर काँग्रेसचा इशारा
शहराध्यक्ष रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
किरीट सोमय्या यांना पालिकेच्या ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली होती त्याठिकाणी भाजप त्यांचा सत्कार करणार आहे.
-
उर्दू घराला मुस्कानचे नाव देणार
-मालेगावच्या महापौर मांडणार महासभेत ठराव…
कर्नाटकात झालेल्या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र तीव्र उमटतांना दिसत आहेत…
या प्रकरणात घोषणाबाजी देणारी तरुणी अचानक प्रकाशझोतात आली असून या तरुणीला मौलाना मदनी यांनी पाच लाखांचे पारितोषिक जाहिर केले असतांना मुस्कान खान या तरुणीचे नाव मालेगावातील उर्दू घराला देण्याचा प्रस्ताव दस्तुरखुद्द महापौर ताहेरा शेख यांनी मांडला आहे…. याबाबत माहिती देतांना त्या म्हणाल्या की, या जिगरबाज तरुणीचे नाव उर्दू घराला देवून आम्ही तीचा सन्मान करणार आहोत….
याबाबत आगामी महासभेत याबाबतचा प्रस्ताव सादर करुन त्याला एकमताने मंजुरी मिळवून देण्याचे आवाहन देखील महापौर शेख यांनी केले आहे…
-
हिजाबसाठी मालेगावात एकवटल्या हजारो मुस्लिम महिला…
-पोलिसांचा विरोध झुगारून मौलानांनी घेतला महिला मेळावा कल्लू स्टेडियम वर हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती..
-शहरभरातून महिला एकवटल्या
-पोलीस उरले केवळ बंदोबस्त पुरता -कर्नाटकातील त्या तरुणीचा विशेष उल्लेख
-उर्दू भाषेतील फलक झळकले -महिलांना संस्कृती जोपसनच्या जबाबदारी दिली.. – महिलेचा चरणी जन्नत दिली – पडदा सुरक्षित जीवनासाठी लाख मोलाचा – शरीर पूर्ण झाकणे हेच महत्वाचे
-
हिंगणघाट अॅसिड ह्ल्ला प्रकरण
आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा
– प्रा. अंकीता पिसूड्डे जळीतकांड प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
– हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
– जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर. बी. भागवत यांनी सुनावली शिक्षा
– अंकीता पिसूड्डे यांचे आई वडील न्यायालयात उपस्थित
– निकालाकडे लागलं होतं महाराष्ट्राचं लक्ष
– वकील उज्ज्वल निकम यांनी मांडली सरकारी पक्षाची बाजू
– ॲड, भुपेश सोने बचावपक्षाचे वकील
– हिंगणघाट येथील बहुचर्चित अंकिता जळीतकांड प्रकरणाला आज दोन वर्षे पूर्ण, आणि आरोपीला जन्मठेप
– या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे 29 साक्षीदार तपासण्यात आले
-
सरकार पडण्याची वेळ आली की मुख्यमंत्री आजारी का पडतात?-नितेश राणे
नेमकं अधिवेशनाच्या वेळी मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात?
यांना ईडीच्या कारवाई सुरू झाल्यावर कोरोना कसा होतो?
बाहेर आल्या आल्या नितेश राणेंकडून महाविकास आघाडीवर हल्लाबोल
मी बरा होईपर्यंत आराम करणार आहे-राणे
-
तपासात कुठलेही अडथळे आणले नाहीत-नितेश राणे
मला अटक करण्याची वेळ आली नाही, मी पळण्याचा प्रयत्न केला नाही-नितेश राणे
माझ्या सहकाऱ्यांना केससमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला
माझी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला-राणे
कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून मी हजर झालो
या सरकारने मला अटक केली नाही
मला पाठिचा, मणक्याचा त्रास आहे, ब्लड प्रेशरचा त्रास आहे,
मी त्यासाठी रुग्णालयात दाखल होणार आहे
लोकांना वाटतं मी खोटं बोलतो,
आजच माझं ब्लड प्रेशर चेक केलं
कोणाच्याही तब्येतीवर प्रश्न उपस्थित करणं किती नैतिकतेचं
हे महाराष्ट्राला शोभणारं आहे का?
-
गंगापूरमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंग
अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा प्रवेश
राष्ट्रवादीची बेरीज वाढली-अजित पवार
राज्यात मविआचं सरकार, पण अनेक भागात अजूनही काम करणं गरजेचं
सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबादमध्ये ताकद वाढवण्याची गरज
-
चंद्रकांत पाटील तुम्ही किती कामं केलं कागदावार सांगा-बाळासाहेब थोरात
चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावरती बोलण्याआधी मी कोरोना काळात किती काम केलं हे पेपरावर सांगावं
मी त्यांच्यापेक्षा निश्चितच जास्त काम केलेला असेल
करोना काळात मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो त्याचबरोबर महसूलमंत्री म्हणून जिल्हा यंत्रणा सांभाळत होतो
सर्व ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत होते
महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे
ते पडण्याची कुठलीही शक्यता नाही
भाजपचे नेते जरी बोलत असले तरी त्यांनी कार्यकर्ते आणि त्यांच्या आमदारांसाठी बोलावं लागतं त्याशिवाय कार्यकर्ते, आमदार राहणार नाहीत
तपास संस्था वापरल्या जात आहेत
एखाद्याच्या कुटुंबियांपर्यंत तपास करुन त्रास देणं हे निश्चित दुर्देवी आहे
लोकशाहीमध्ये मतमतांतरे असू शकतात
पण त्याचा असा गैरवापर करू नये अशी अपेक्षा असते
पण भाजप तेच काम आता करत आहे
गोव्यामध्ये भाजप सरकार ज्या पद्धतीने चालले आहे
त्याला लोक कंटाळली आहेत
इथं परिवर्तन निश्चित आहे
-
शिवसेना खासदार संजय राऊत गोवा विमानतळावर दाखल
गोवा- शिवसेना खासदार संजय राऊत गोवा विमानतळावर दाखल
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत घेणार आढावा
वास्को मधील आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या ती ठिकाणाची करणार पाहणी
गोवा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे उद्यापासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर
-
पुण्यातील आरटीओ कार्यालयावर हजारांच्या संख्येने एकत्र येत रिक्षाचालकांनी काढला मोर्चा
पुण्यातील आरटीओ कार्यालयावर हजारांच्या संख्येने एकत्र येत रिक्षाचालकांनी काढला मोर्चा,
बघतोय रिक्षावाला संघटनेचे रिक्षाचालक झाले होते सहभागी,
अवैध टँक्सीज बंद करा केली मागणी,
मागणी मान्य झाली नाहीतर करणार बेमुदत आंदोलन,
आज पुण्यात हजारो रिक्षाचालक उतरले होते रस्त्यावर,
आरटीओ कार्यालयाबाहेर केली घोषणाबाजी…
मध्यंतरी दादा मला वाचवा अशा आशयाचे लावले होते पोस्टर्स !
-
आम्ही किंगमेकर नाही किंग बनणार आहोत : बाळा नांदगावकर
आम्ही किंगमेकर नाही किंग बनणार आहोत
मनसे आणि राज ठाकरेंचा कार्यकर्ता असल्यानं वैयक्तिक मत राहत नाही
कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु आहेत
नाशिक पुण्याला बैठका सुरु आहेत
तयारीला लोक लागले आहेत
राज ठाकरेंचा दौरा ठरलेला नाही
नेत्यांच्या दौऱ्याचा आढावा आला की ते दौरा करतील
साहेब जातीनं लक्ष घालतील
-
संजय राऊत जे बोलतात त्याला गंभीरपणे घेत नाही : चंद्रकांत पाटील
संजय राऊत जे बोलतात त्याला गंभीरपणे घेत नाही
कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी बोललो
सुपातले जात्यात जात आहेत
सगळे जण जात्यात जातील
अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहेत
-
नगरमध्ये एकाच सरणारवर 24-24 प्रेतं जाळली गेली : चंद्रकांत पाटील
गंगेतल्या प्रेतांचं बोलता, नगरमध्ये एकाच सरणारवर 24-24 प्रेतं जाळली गेली, त्याची चौकशी होते की नाही, एका रुग्णवाहिकेत 20 डेडबॉडी नेल्या, त्याचं काय करायचं.
जगात 60 देशांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात
रुपालीताई चाकणकर यांनी महिलांचा वाईनला विरोध नाही, असं म्हणतात
5 हजार वर्षात कोणत्या दारु पिणाऱ्याला मुलांनं दारु प्यावं असं वाटलं नाही
वेश्येला मुलीनं वेश्या व्यवसाय करु वाटतं
-
मॉब लिंचिंग करुन सोमय्यांची हत्या करण्याचा कट : चंद्रकांत पाटील
केंद्राची झेड सिक्युरिटी असताना हल्ला झाला
एका माणसावरआरोप झाले ते त्याला सहन होत नाही
मुंबई आमची, असे तसे आरोप आहेत
बाकीच्यांनी आरोपांवर कोर्टात जाण्याची भूमिका घेतली
मॉब लिंचिंग करुन सोमय्यांची हत्या करण्याचा कट
केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या ईडीचा वापर करतात असं वाटत असेल तर कोर्टात जा
महाराष्ट्रात टोळीचं सरकार चाललंय का?
सिताराम कुंठे यांनी आरोप केला, अनिल देशमुख चिठ्ठी पाठवायचे
अनिल देशमुख म्हणतात अनिल परब यादी पाठवायचे
-
मुख्यमंत्र्यांनी विदर्भात दोन वर्षे पाय ठेवलेला नाही: रवी राणा
मुख्यमंत्र्यांनी विदर्भात पाय ठेवलेला नाही
नवनीत राणा यांनादेखील या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न
न्यायालयावर आमचा विश्वास
कायद्याचा दुरुपयोग करायचा आणि राणा दाम्पत्याला अटक करण्याचे प्रयत्न
-
अमरावती शाईफेक प्रकरणात मला अडकवण्याचा कट : रवी राणा
अमरावती शाईफेक प्रकरणात मला अडकवण्याचा कट
राज्य सरकारचा मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय, त्याचा मी निषेध करतो
नितेश राणेंना ज्या प्रमाणं फसवलं
किरीट सोमय्यांना ज्या प्रकारे अडवलं
ठाकरे परिवाराविरोधात बोलतात त्यांना जेलमध्ये टाकायचा एककलमी कार्यक्रम
ज्या पद्धतीनं नितेश राणेंवर कारवाई झाली तिचं कलमं माझ्यावर झाली
शाईफेकच्या घटनेत 307 कलम लावण्यात आलं आहे
रवी राणाला अट करण्याचे आदेश देण्यात आले
जनतेचा सेवक आहे, मला फसवण्याचं काम, चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल
माझ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संजय राऊत, अनिल परब, दिलीप वळसे पाटील यांचे फोन
उद्धव ठाकरेंची परदेशातील संपत्ती, अनिल परब यांची संपत्ती याविषयीची माहिती ईडीला देणार
-
कोणतीही करवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर
कोणतीही करवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला..
निवडणुकीचे वर्ष असल्याने ठाणेकरांवर कोणतीही करवाढ नाही..
ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी स्थायी समितीला सादर केला अर्थसंकल्प ..
आरोग्य आणि पाणीपुरवठा सक्षम करण्यावर भर..
गेल्या वर्षी 2 हजार 755 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता..
यंदाचा अर्थसंकल्प हा 3 हजार 299 कोटींचा अर्थसंकल्प सादर….
ऑनलाइन अर्थ संकल्प घेतल्याने स्थायी समिती मधील काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि भाजप ने केला सभात्याग केला…
-
नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले
नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले
भाजपकडून नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी
काँग्रेसकडून नितीन गडकरी यांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा
भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले
-
गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस घराणेशाहीचे प्रतीक नाहीत का? : नवाब मलिक
गोवा- गोव्यातल्या प्रचार अंतिम टप्प्यात
उद्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध होईल
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हा प्रसिद्ध करतील
दिगंबर कामत आणि विजय सरदेसाई यांची सध्या राजकारणात जोडी आहे
आम्ही काँग्रेससोबत आघाडी इच्छितो होतो
काँग्रेसने योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे 10 वर्ष भाजपचे सरकार
बाबुश तुमच्याकडे आल्यावर पवित्र कसा झाला
घराणेशाहीच्या नावाखाली भाजपला स्वत: ची घराणेशाही लपवायचीय
गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस घराणेशाहीचे प्रतीक नाहीत का? : नवाब मलिक
-
हिजाब वापरण्यास बंदी विरोधात गंज पेठेतील फुले वाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
कर्नाटकमध्ये मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास बंदी घालनाऱ्या कर्नाटक भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन
गंज पेठेतील फुले वाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
मुस्लिम महिलांसह इतरही महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी
-
लता मंगेशकर यांच्या अस्थींचं नाशिकमधील रामकुंडे येथे विसर्जन
लता मंगेशकर यांच्या अस्थींचं नाशिकमधील रामकुंडे येथे विसर्जन
मंगेशकर कुटुंबीय उपस्थित
नाशिकमधील प्रमुख पुजारी उपस्थित
-
उद्धव ठाकरे सरकारनं संजय राऊत यांच्या बेनामी कंपन्यांना कंत्राट दिलं : किरीट सोमय्या
पुणे महापालिका कार्यालयात किरीट सोमय्यांवर हल्ला
पुणे पोलिसांकडून त्यावेळी त्रुटी राहिल्या
किरीट सोमय्यां सुरक्षेतील चुकांची दुरुस्ती करावी
कोविड घोटाळे पीएमआरडीएनं पुणे महापालिकेनं नाकरलेल्या लोकांना कंत्राट दिली गेली : मनोज कोटक
उद्धव ठाकरे सरकारनं संजय राऊत यांच्या बेनामी कंपन्यांना कंत्राट दिलं
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संगनमत करुन जीव घेण्याचा कट रचला
-
एखाद्याला गाणं तयार केलं म्हणून काढलं गेलं तर आकाशवाणीवर गाणं अजून कसं वाजतं : संजय राऊत
मी न्यायालयात बोलणार आहे
मी काल मुद्दाम संसदेत बोललो नाही
ह्रदयनाथ मंगेशकर यांच्याबद्दल बोललं गेलं
मला जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून मी ने मजशी ने मातृभूमीला हे गाणं आकाशवाणीवर ऐकलं
घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीनं इतकं खोटं बोलू नये
एखाद्याला गाणं तयार केलं म्हणून काढलं गेलं तर आकाशवाणीवर गाणं अजून कसं वाजतं
मी नरेंद्र मोदींना शुभेच्छा देतो
महाराष्ट्रात 10 मार्चनंतर सरकार पडेल सांगितलं गेलं त्यांना शुभेच्छा देतो
ते लोक न्यायालयात बेलिफ असतील
लोकशाही मार्गानं ते होणार असेल तर शुभेच्छा आहेत
किरीट सोमय्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावं
गंगेत जी प्रेत फेकून दिली होते त्याबद्दल कोणत्या न्यायालयात जाणार
मी महाराष्ट्राच्या राजधानीत जाऊन बोलणार
प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं, कमी करण्याचं , कमी लेखण्याचं, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत
त्यावर प्रत्येक मराठी माणसानं बोलायला हवं, बाणेदार पणानं आम्ही ते लोकांंपर्यंत जाऊ
आम्ही उत्तर प्रदेशमध्ये 15 जागा लढणार आहोत. गुजरातमध्ये लढणार आहोत
आम्हाला चिंता नाही, आम्हाला परवा नाही, तुम्ही अजून दमनचक्र राबवा म्हणजे महाराष्ट्र तुमच्या विरोधात एकवटेल
-
राज्यातील नद्यांमध्ये प्रेत बेवारस पडली नव्हती, महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर म्हणणाऱ्यांना संजय राऊत यांनी फटकारलं
बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून बाजू मांडली
मला जे काय बोलायचं ते बोललो
आता महाराष्ट्राच्या राजधानीत जाऊन बोलणार
खोट करा, दबावतंत्र करा, खोटे पुरावे तयार केले
हा महाराष्ट्र येऱ्या गबाळ्यांसमोर झुकणारा नाही
छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यापुढं झुकणार नाही
महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर म्हटलं गेलं
जागतिक पातळीवर महाराष्ट्रानं चांगलं काम केलं
राज्यातील नद्यांमध्ये प्रेत बेवारस पडली नव्हती
मुंबईचा दावा शिवसेना आहे
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात
गोवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात
गोवा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर घेणार जाहीर सभा
म्हापसा इथंल्या बाडगेश्वर मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणार जाहीर सभा
भव्य सभामंडप आणि आकर्षक मंच आणि रोषणाई
मोदी काय बोणार याची गोमंतकीयांचे लक्ष्य
-
पुण्यात पीएमपीएलएम बसखाली येऊन 75 वर्षीय महिलेचा मृत्यू
पीएमपीएलएम बसखाली येऊन 75 वर्षीय महिलेचा मृत्यू
विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात झाला अपघात
पीएमपीएल बसच्या मागील चाकाखाली आल्याने पदमा पंढरीनाथ गायकवाड या 75 वर्षीय जेष्ठ महिलेचा जागीच मृत्यू
-
नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता
नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता
महापालिकेत 67 लाखाचा स्टेशनरी घोटाळा पुढे आला होता
या प्रकरणाचा तपास पोलीस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखे मार्फत सुरू आहे
तर दुसरी कडे महापालिकेच्या चौकशी समिती मार्फत सुद्धा
समिती समोर रोज सुनावणी सुरू आहे
यात अनेक बाबी पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
-
गोसीखुर्द धरणाचे 15 यांत्रिकी कर्मचारी आमरण उपोषणावर.
भंडारा
– गोसीखुर्द धरणाचे 15 यांत्रिकी ( कंत्राटी ) कर्मचारी आमरण उपोषणावर.
– धरणावर जोखमीचे काम असतांना देखील अपघात विमा तसेच भविष्य निधी न काढल्यामुळे आमरण उपोषणावर
– यांत्रिकी कर्मचारी उपोषणावर बसल्यामुळे धरणाचे ३३ दरवाजे पूर्णपणे बंद असून पाण्याचा विसर्ग बंद
-
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक,58 जागांसाठी मतदान सुरु
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक
पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
11 जिल्ह्यातील 58 मतदारसंघात मतदानाला सुरुवात
सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात
623 उमेदवार पहिल्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात
विद्यमान सहा मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
-
डी.एस. कुलकर्णी ठेवीदार फसवणूक प्रकरणाची मुंबईत सुनावणी
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी खटल्याची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात वर्ग करण्यात येणार
विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी याबाबतचे आदेश दिले
गुंतवणुकीच्या आमिषाने 35 हजार ठेवीदारांची 1100कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात एमपीआयडी अन्वये गुन्हा दाखल आहे
इडीकडून याबाबत कारवाई करण्यात आली आहे
-
भाजप नेते किरिट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण, सुरक्षा विभागाचे उपायुक्तांना खुलासा करण्याचे आदेश
भाजप नेते किरिट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण
अतिरिक्त आयुक्तांनी दिले पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांना खुलासा करण्याचे आदेश
दरम्यान, सोमय्या यांचे प्रकरण झाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची व महापालिकेतील अधिकाऱ्यांची झाली
महापालिकेत पुढील काही दिवस बंदोबस्त ठेवला जाणार
तसेच महापालिकेने सीसीटीव्हीचे फुटेज प्रमाणित करून पोलिसांना देण्यात आलं
-
ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली
ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली
उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल
अनोल पालेकर यांना दीर्घ आजारावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल
10 वर्षांपूर्वीही त्यांना याच आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली
त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्यासारखे काही कारण नसल्याची पत्नी संध्या गोखले यांची माहिती
Published On - Feb 10,2022 6:19 AM
