Maharashtra News Live Update : उत्तर प्रदेशमध्ये एक विकासाची नवी दिशा – देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jan 06, 2022 | 7:27 AM

Maharashtra News And Omicron Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : उत्तर प्रदेशमध्ये एक विकासाची नवी दिशा - देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांन तात्पूरता दिलासा मिळाला असून पुढील सुनावणीपर्यंत त्यांन अटक करता येणार आहे. ज्येष्ट समाजसेविका सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे निधन झाल्याने पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या तसेच इतर घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही9 मराठीवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Jan 2022 06:59 PM (IST)

    नाशिक

    मुंबई आग्रा महामार्गावर मुंढेगाव जवळ भीषण अपघात

    ट्रक आणि जिप मध्ये समोरासमोर धडक

    अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू

    तर 3 जण गंभीर जखमी

    मृत झालेले तीन जण शिक्षक असल्याची माहिती

  • 05 Jan 2022 05:41 PM (IST)

    मनिषा कायंदे बाईट

    ऑन देवेंद्र फडणवीस

    मोदी सरकारने नोट बंदी रात्री जाहीर केली, टाळेबंदी देखील रात्री जाहीर केली, त्यामुळे रात्रीच्या अंधारात काळे कायदे करण्याची प्रथा ही केंद्र सरकारची आहे अस प्रत्युत्तर शिवसेनेच्या आमदार तथा प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी दिली

    ऑन आशिष शेलार

    मेघालय चे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी देशाच्या पंतप्रधानांना अहंकारी असे म्हटले आहे त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीने आत्मचिंतन करावे इतरांवर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललय त्या कडे लक्ष द्या व भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या एक प्रतियोगिता सुरू आहे शिवसेनेवर जास्तीत जास्त जहरी टीका कोण करेल त्याला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष करणार आहे

  • 05 Jan 2022 05:41 PM (IST)

    पुणे

    2021 युपीएससी मुख्य परीक्षा नियोजित वेळेवर होणार

    युपीएससीची 7 जानेवारी , 8,9 आणि 16 तारखेला होतीये परीक्षा,

    विद्यार्थ्यांना निर्बधांमधून शिथीलता द्या युपीएससी आयोगाची राज्य सरकारकडे मागणी,

    मायक्रो कंन्टेन्मेंट झोनमधून विद्यार्थ्यांना शिथीलता द्यावी

    सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद झाल्यास एक दिवस आधीच वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्या,

    राज्यात आज कडक निर्बंध लागणार का ?

    युपीएससीची मुख्य परीक्षा मात्र वेळेत होणार

  • 05 Jan 2022 05:14 PM (IST)

    कोल्हापूर

    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीच मतदान संपलं

    दिवसभरात 7 हजार 400 मतदारांनी बजावला मतदानाचा

    बँकेसाठी चुरशीन 97 टक्के मतदान

    पंधरा जागांसाठी 33 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

    आता शुक्रवार च्या निकालाची प्रतीक्षा

  • 05 Jan 2022 04:41 PM (IST)

    डॉक्टर अविनाश दहिफले, मार्ड संघटना

    मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतला.

    करोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणत वाढत आहे त्या मध्ये मार्ड चे डॉक्टर ही बाधित झाले आहेत

    कंत्राटी पद्धतीच्या डॉक्टरांच्या नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा वर अधिक ताण पडणार आहे हे आम्ही आरोग्य विभाग आणि मंत्री महोदयांना सांगितलं आहे.आमच्या मागण्याचा पूर्तता करण्याचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आला आहे

  • 05 Jan 2022 03:20 PM (IST)

    हिंगोली

    वन विभागाच्या पथकावर दगडफेक

    वन जमीनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर अतिक्रमणधारकांची दगडफेक

    दोन अधिकाऱ्यांसह 11 जण जखमी तालुक्यातील पातोंडा शिवारातील घटना

    घटनास्थळी पोलीस दाखल

  • 05 Jan 2022 03:19 PM (IST)

    पुणे

    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबदल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजला पुणे पोलीस थोड्याच वेळात शिवाजीनगर न्यायालयात करणार हजर

    कालीचरण विरोधात खडक पोलीस ठाण्यात आहे गुन्हा दाखल

    पुणे पोलिसांनी रायपूर मधून कालीचरणला घेतलं ताब्यात

  • 05 Jan 2022 02:33 PM (IST)

    संजय राऊत

    पाच वर्षे उद्धव ठाकरेच मविआचे नेतृत्व करतील

    रश्मी ठाकरेंविषयी कोणाला चर्चा करायची असेल तर करु दे

    लकवा मारल्याचं पहायचं असेल तर केंद्राकडे पहावं

    भाजपने कितीही बार फोडले तरी सरकारचा बालही बाका होणार नाही

    सत्तारांना अजून शिवसेनेची हळद चढायचीय

    राज्य चालवणं, केबिनेट चालवणं हे टीम वर्क आहे

    अजित पवार पुढाकार घेताहेत, आक्रमक होताहेत हे राज्याच्या हिताचं आहे

    विरोधकांच्या हाती कोलित मिळेल असं करु नये

    मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक आहे

    मुख्यमंत्री प्रशासनाला योग्य सूचना देताहेत

    विरोधी पक्षातले पाद्रे पावटे फुसफुसले तरी सरकारला आग लागणार नाही

    केंद्रीय गृहमत्र्यांनी एसआयटी नेमावी

    राणेंनी गृहमंत्र्यांकडे तशी मागणी करावी

    कुठेही राजकीय दहशत असू नये

    राणेंकडे केंद्राचं एक महत्वाचं खातं आहे

  • 05 Jan 2022 02:21 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस

    उत्तर प्रदेशमध्ये एक विकासाची नवी दिशा आहे

    या निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळतील

    जेव्हा कुठल्याही राज्याच्या निवडणुका होता तेव्हा आमचे इतर कार्यकर्ते जातात

    भाजप उत्तर भारतीय मोर्चा कार्यकर्ते जात आहेत

    आमचे 125 कार्यकर्ते उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यात जातील

    उत्तरप्रदेशात भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील,

    राज्यातून उत्तरप्रदेशात भाजपचे कार्यकर्ते प्रचारासाठी जाणार,

    तेथिल भाजप विजय मिळविण्यसाठी सक्षम

    मोदी व योगींच्या सहयोगाने मोठा विजय मिळेल

    मोदी यांनी विकासाची गंगा सुरू केल्यामुळे उत्तरप्रदेशात विजय निश्चित,

    उत्तर प्रदेशचे बरेच लोकं मुंबाईत राहतात,

    त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते उत्तरप्रदशात

    ऑन सत्तार

    मला अतिशय आनंद आहे,

    अब्दुल सत्तार नया है वह,

    पाच ते सात महिन्यात सत्तार उद्धवजींना भेटले का ते

    राज्यात काळे कायदे मध्यरात्री पास करतात,

    राज्यातील जनतेने असा असे कधी पाहीलेले नाही

    हा त्यांचा पळपुटे पणा यावर त्यांनी लक्ष द्यावे

  • 05 Jan 2022 01:21 PM (IST)

    आतापर्यंत तिघांना ताब्यात गेतलंय, 31 तारखेला अॅप लोड करण्यात आले- हेमंत नगराळे

    सोशल मीडियावरच्या काही विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो साईटवर लोड करण्यात आले होते. त्यांच्या भावना दुखावतील असे मेसेज साईटवरुन प्रसारीत करण्यात आले. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला. 31 तारखेला ऍप लोड करण्यात आला होता. या ऍप आणि ट्विटर हॅन्डलची चौकशी केली. बुल्ली बाई नावाचं ट्विटर हॅन्डलही तयार करण्यात आलं होतं. ही वेबसाईट जी होती, ती जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, असा उद्देश ठेवून हे सगळं ककरण्यात आलं. याचे फॉलोअर्स कोण आहे, त्याची माहिती काढून त्यांच्या मागावर लागलो.

    दुसऱ्या वर्षाला शिकणारा इंजिनिअरींगचा तरुण विशाल कुमार, चा तपास केला. एकूण पाच फॉलोअर्स होते. त्यांचा शोध घेतला गेला. ज्यांच्या नावानं ट्वीटर सुरु करण्यात आलं होतं, त्यांना एक एक ताब्यात घेतलं गेलं. आतापर्यंत तिघांना ताब्यात गेतलंय. विशाल झा याला ताब्यात घेतलंय. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तरा सिंहला उत्तराखंडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर तिसऱ्या आरोपीलाही उत्तराखंडमधूून ताब्यात गेण्यात आलं आहे

  • 05 Jan 2022 01:20 PM (IST)

    या प्रकरणात नागरिकांना काही माहिती असेल तर त्यांनी द्यावी- हेमंत नगराळे

    या प्रकरणात ज्या नागरिकांना माहिती द्यायची आहे, त्यांनी आमच्या वेबसाईटवर माहिती द्यावी. या माहितीच्या मदतीने आम्हाला या प्रकरणाच्या तळाशी जाता येईल, असे हेमंत नगराळे म्हणाले.

  • 05 Jan 2022 01:19 PM (IST)

    बुल्लीबाई अॅप प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक केल- हेमंत नगराळे

    मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त माध्यमांशी बोलत आहेत. बुल्लीबाई अॅप संदर्भात आतापर्यंत काय तपास केलाय याची ते माहिती देत आहेत. या प्रकरणाचा खोलपर्यंत जाऊन तपास केला जाणार आहे. आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलं आहे. या वेबसाईटला पाच जणांना फॉलो करत होतो.

  • 05 Jan 2022 12:43 PM (IST)

    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक अपडेट, आतापर्यंत 53. 31 टक्के मतदान

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक अपडेट

    कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान

    दुपारी 12 वाजेपर्यंत 4079 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

    आत्तापर्यंत 53. 31 टक्के मतदान

    गगनबावडा मतदान केंद्रावरील मतदान जवळपास पूर्ण

    शिरूर तालुक्यात देखील 80 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान पूर्ण

  • 05 Jan 2022 12:27 PM (IST)

    प्रवाशांवर रिक्षा चालकांची गुंडगिरी, 4 ते 5 रिक्षा चालकांकडून प्रवाशाला बेदम मारहाण 

    औरंगाबाद : प्रवाशांवर रिक्षा चालकांची गुंडगिरी

    रिक्षा चालकांची प्रवाशाला बेदम मारहाण

    4 ते 5 रिक्षा चालकांकडून प्रवाशाला बेदम मारहाण

    प्रवाशी शुल्कावरून झाला वाद

    मध्यवर्ती बसस्थानकाजवळील प्रकार

    बस बंद असल्याने प्रवाशांची वाढली संख्या, तर वाढली काही रिक्षा चालकांची दादागिरी

  • 05 Jan 2022 12:25 PM (IST)

    महाविकास आघाडीच सरकार म्हणजे तीन माकडांचं सरकार, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांचं विधान

    महाविकास आघाडीच सरकार म्हणजे तीन माकडांचं सरकार

    तोंड, नाक आणि कानावर हात ठेवून सरकार चालवलं जातंय

    जिथे जिथे सरकार विद्यार्थ्यांचं नुकसान करेल तिथे तिथे ह्या सरकारला लाथ मारून जागं केल्याशिवाय राहणार नाही

    भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांचं विधान

  • 05 Jan 2022 11:45 AM (IST)

    सिंधूताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात केलं जाणारं अंत्यसंस्कार  

    पुणे : पुण्यातील नवी पेठेमधील ठोसरपागेत सिंधूताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार

    शासकीय इतमामात केलं जाणारं अंत्यसंस्कार

    महानुभाव पंथाप्रमाणे केलं जाणार दफन

    ठोसरपागेतील सगळी तयारी पूर्ण

  • 05 Jan 2022 11:03 AM (IST)

    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक अपडेट, 1347 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक अपडेट

    कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान

    दहा वाजेपर्यंत 1347 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

    पहिल्या दोन तासांत 17.61 टक्के झाले मतदान

    दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढणार

    आजरा केंद्रावरील मतदान झाले पूर्ण

  • 05 Jan 2022 10:41 AM (IST)

    कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात, दुपारी पुण्यात आणलं जाणार

    पुणे : कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात

    पुण्यात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    महात्मा गांधीविषयी वापरली होती अर्वाच्य भाषा

    पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची टीव्ही 9 ला माहिती

    रायपूरमधून घेतलं ताब्यात, दुपारी पुण्यात आणलं जाणार

  • 05 Jan 2022 10:19 AM (IST)

    एसटीच्या 55 हजार कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस 

    मुंबई - एसटीच्या 55 हजार कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस

    - वेळेत हजर न झाल्यास बडतर्फीच्या कारवाईचा इशारा

    -  कर्मचाऱ्यांना 70  दिवस गैरहजर राहण्यामागचं कारण विचारण्यात आलं

    एसटीचं शेकडो कोटिंचं नुकसान होत असल्याचीही करून दिली आठवण

    - एसटी महामंडळाने सर्क्युलर जारी करून विचारला जाब

  • 05 Jan 2022 09:48 AM (IST)

    थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे मंत्री, आमदारांची बैठक सुरू होणार

    राष्ट्रवादीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरला उपस्थित

    थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची, आमदारांची बैठक सुरू होणार

  • 05 Jan 2022 08:32 AM (IST)

    सिंधुताई सपकाळ यांच्यावर महानुभाव पंथाप्रमाणे अंत्यसंस्कार, ठोसरपागेत होणार अंत्यसंस्कार

    पुणे : सिंधुताई सपकाळ यांच्यावर महानुभाव पंथाप्रमाणे अंत्यसंस्कार

    आता पार्थिव मांजरीत नेलं जाणार

    कौटुंबिक सदस्य सुरेश वैराळकर यांची माहिती

    ठोसरपागेत होणार अंत्यसंस्कार

  • 05 Jan 2022 08:05 AM (IST)

    नागपूर महिला काँग्रेसमध्ये खदखद, नागपूर अध्यक्षपदी नॅश अली यांची नियुक्ती होताच असंतोष वाढला

    नागपूर - नागपूर महिला काँग्रेसमध्ये खदखद आणि राजीनामासत्र

    - 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने पक्षासमोर आव्हान

    - नागपूर अध्यक्षपदी नॅश अली यांची नियुक्ती होताच असंतोष वाढला

    - महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रज्ञा बळवाईक यांच्यासह 180 जणांचे राजीनामे

    - नॅश अली यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचीही केली मागणी

  • 05 Jan 2022 08:02 AM (IST)

    नागपुरात प्रतिबंधित नायलॅान मांजाची ॲानलाईन विक्री, गुन्हा दाखल

    नागपूर : प्रतिबंधित नायलॅान मांजाची ॲानलाईन विक्री

    - प्रतिबंधित मांजाची ॲानलाईन विक्री करणाऱ्या शॅाप क्लूजच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

    - ॲानलाईन मांजा विक्री प्रकरणात नागपुरात पहिलाच गुन्हा दाखल

    - सायबर पोलिसांनी सापळा रचून 514 रुपयांचा नायलॅान मांजा मागवला

    - ॲानलाईन मांजाची डिलिव्हरी करताना डिलिव्हरी बॅायलाही अटक

    - सदर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

  • 05 Jan 2022 07:34 AM (IST)

    औरंगाबादच्या विकासासाठी 500 कोटी रुपये निधीची गरज, पालकमंत्री सुभाष देसाई करणार प्रयत्न 

    औरंगाबाद : मराठवाड्याच्या राजधानीच्या विकासासाठी 500 कोटी रुपये निधीची गरज

    वित्त आणि नियोजन विभागाकडे मागणी करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई करणार प्रयत्न

    शहरातील विकास कामांसाठी आणि योजनांसाठी 500 कोटी रुपये आणण्यासाठी पालकमंत्री करणार प्रयत्न

    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समोर आली निधीची गरज आल्याची माहिती

    पालकमंत्री सुभाष देसाई, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री रावसाहेब दानवे यांची होती उपस्थिती

  • 05 Jan 2022 07:17 AM (IST)

    नरखेड तालुक्यात आरोग्य निरीक्षकाला मारहाण, गुन्हा दाखल

    नागपूर - नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुपेश मुंदाफळे यांची आरोग्य निरीक्षकाला मारहाण

    - रुपेश मुंदाफले शिवसेनेचे पदाधिकारी

    - ग्रामपंचायतला सूचना न देता कोविड लसीकरण शाळेत घेतल्याचा राग

    - आरोग्य सेविकाला शिवीगाळ

    - आरोग्य निरीक्षण प्रवीण धोटे आणि आरोग्य विभागाचा वाहन चालक नितेश रेवातकर यांना मारहाण

    - नरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, सरपंच रुपेश मुंदाफले याला अटक

  • 05 Jan 2022 06:58 AM (IST)

    पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज 12 वाजून 10 मिनीटांनी अंत्यसंस्कार

    पुणे : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज अंत्यसंस्कार

    सिंधुताई सपकाळ यांच पार्थिव सकाळी 9 वाजता नोबल हॉस्पिटलमधून मांजरीला नेलं जाणार

    सकाळी 9 ते 11 पर्यंत मांजरीच्या बाल सदन संस्थेत अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाणार

    12 वाजून 10 मिनीटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार केलं जाणार दफन

    सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त

  • 05 Jan 2022 06:38 AM (IST)

    शिवसेना पक्षप्रमुख यांची मुंबईतील शिवसेनेच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक

    मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील 227 शाखाप्रमुख, विभागप्रमुख ,नगरसेवक आमदार, खासदार यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागातील झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा असा आदेश दिला. नुकताच मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता कराचा निर्णय आपण घेतला तो जनतेपर्यंत पोहोचवा, विकास कामाची पोचपावती जनतेला मिळायला हवी असे ठाकरे म्हणाले.

Published On - Jan 05,2022 6:35 AM

Follow us
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.