Maharashtra News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू, इच्छुकांची नावं मागवली

| Updated on: Jan 10, 2022 | 12:05 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू, इच्छुकांची नावं मागवली
Breaking

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा या राज्यांतील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात जिल्हा बँकेच्या (District Bank Election) निवडणुका सुरु आहेत. यामुळे जिल्हा पातळीवरच्या राजकारणातही रंग चाढलाय. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Jan 2022 09:43 PM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू

    स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू,

    – महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची नावं प्रदेश कार्यालयाला देण्याच्या पक्षाकडून सूचना,

    – यासंदर्भात राज्यातील जिल्हा काँग्रेस कमिटीला काँग्रेस पक्षाकडून पत्र

    – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून स्वबळाची तयारी सुरू

  • 09 Jan 2022 09:39 PM (IST)

    चंद्रपुरात दोन मुलांसह महिलेने विहिरीत उडी मारली

    जिल्ह्यातील ब्रम्हपुरीच्या मालडोंगरी येथे खळबळजनक प्रकार घडला आहे. दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसर हादरून गेला आहे. पती-पत्नी दरम्यान सतत वाद होत असल्याने जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, परंतु खरे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

  • 09 Jan 2022 07:08 PM (IST)

    मला ठाण्याला दाखवायची गरज नाही पण महाजनांना बुधवार पेठेत दाखवा-एकनाथ खडसे

    मला ठाण्याला वेड्याच्या रुग्णालयात दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

  • 09 Jan 2022 05:58 PM (IST)

    मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही 500 चौरस फूटांपर्यंत करमाफी देण्याची मागणी

    मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही 500 चौरस फूटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना करमाफी देण्याची मागणी,

    - येत्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता,

    - मुंबई महापालिकेने नुकतेच महापालिकेच्या हद्दीतील 500 चौरस फूटा पर्यंतच्या घरांना करमाफ केला आहे,

    - पुण्यातही असा निर्णय झाल्यास या मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळ्णार.

  • 09 Jan 2022 05:20 PM (IST)

    पोलीस अधीक्षकांनी चालवली बैलगाडी

    सिंधुदुर्गात बैलागाडा शर्यतीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी चालवली बैलगाडी

  • 09 Jan 2022 04:13 PM (IST)

    ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता

    ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता, 50 टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्यास परनगी

  • 09 Jan 2022 04:12 PM (IST)

    ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नको-डॉ. भागवत कराड

    जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते भागवत कराड यांनी केली आहे.

  • 09 Jan 2022 01:43 PM (IST)

    चेंबूरमध्ये कांग्रेसचे नेते आमने सामने, कांग्रेस ऊपाध्यक्ष चंद्रकांत हांडोरेंचा पक्षातील नेत्यांवर मोठा आरोप

    औरंगाबाद : चेंबूरमध्ये कांग्रेसचे नेते आमने सामने

    कांग्रेस ऊपाध्यक्ष चंद्रकांत हांडोरेंचा पक्षातील नेत्यांवर मोठा आरोप

    कांग्रेस पक्षाने कारवाई करावी अशी मागणी

    - कांग्रेस पक्षातील एका दलीत मंत्र्याचा पोटात पोटशुळ ऊठल्याचा केला आरोप

    माझ्या हत्येच्या मास्टरमाईंडला पोलिसांनी शोधावं

    अन्यथा समाज रस्त्यावर ऊतरेल असा इशारा

    - कार्यकर्त्यांकरवी आखला होता हत्येचा कट

    डंपरने ऊडवण्याचा होता कट

    - टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

    पोलीस फरार आरोपी निलेश नानचेचा घेत आहेत शोध

    - पोलिसांकडून तपासाला सुरवात

  • 09 Jan 2022 11:25 AM (IST)

    औरंगाबादमधील प्रसिद्ध भोजनालय सील, हॉटेल भोज असं प्रसिद्ध हॉटेलचं नाव

    औरंगाबाद : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने औरंगाबादमधील प्रसिद्ध भोजनालय केले सील

    हॉटेल भोज असं या प्रसिद्ध हॉटेलचे नाव

    50 % क्षमतेपेक्षा जास्त नागरिक आढळले हॉटेलमध्ये भोजन करताना

    मास्क न लावता कर्मचारी बनवत होते खाद्यपदार्थ आणि स्वयंपाक

    कोरोनाचा प्रादुर्भाव असताना हॉटेल चालक करत होते नियमांची पायमल्ली

    कोरोनाचा संसर्ग पाहता रेस्टॉरंट आणि हॉटेल जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर

  • 09 Jan 2022 11:09 AM (IST)

    हडपसर पोलिसांची मोठी कारवाई, दीड कोटींचा गुटखा जप्त

    पुणे - हडपसर पोलिसांची मध्यरात्रीनंतर मोठी कारवाई

    - पुणे-सोलापूर रोडवर गुटखा वाहतूक करणाऱा आयसर, टेम्पोसह गुटखा जप्त

    - अंदाजे टेम्पोसह दिडकोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त

    - गुटख्याचा टेम्पो पुण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती

  • 09 Jan 2022 10:56 AM (IST)

    हवामान विभागाचा अंदाज ठऱला खरा, नागपूरसह परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात

    नागपूर : हवामान विभागाचा अंदाज ठऱला खरा

    नागपूरसह परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात

    - विदर्भाच्या काही भागात आज आणि उद्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

    - काल दुपारपासून ढगाळ वातावरण

    - अवकाळी पावसाचा रब्बी पिकं आणि भाजीपाल्याला फटका

    - वेचणी न झालेला कापूस शेतात भिजला

  • 09 Jan 2022 10:46 AM (IST)

    नागपुरात एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, खासगी एजन्सीकडून ड्रायव्हर हायर करुन काढणार बसेस

    नागपूर : नागपूर विभागात एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

    - खासगी एजन्सीकडून ड्रायव्हर हायर करुन काढणार बसेस

    - नागपूर गणेशपेठ आगारात आजपासून 15 पेक्षा जास्त खासगी एजन्सीचे ड्रायव्हर रुजू होणार

    - नागपूर आगारातून थोड्याच वेळात एजन्सीचे ड्रायव्हर काढणार बसेस

    - नागपूर विभागात ड्रायरवरसाठी नेमली खासगी एजंसी

    - संपामुळे एसटी कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

  • 09 Jan 2022 09:51 AM (IST)

    कोकणातील पहिली बैलगाडा शर्यत आज वैभववाडीत, माजी खासदार निलेश राहणार उपस्थित

    सिंधुदुर्ग- कोकणातील पहिली बैलगाडी शर्यत आज वैभववाडीत

    माजी खासदार निलेश राहणार उपस्थित

    शासनाच्या 27 अटी व कोरोनाचे सर्व नियम पाळून ही स्पर्धा संपन्न होणार

    काल पासूनच अनेक स्पर्धक, बैलजोड्या उपस्थित

    कोल्हापूर, रत्नागिरी, कराड, डोंबिवली, बेळगाव व सिंधुदुर्गातील बैलजोड्या होणार सहभागी

    वैभववाडी-नाधवडे माळरानावर दुपारी रंगणार थरार

  • 09 Jan 2022 08:51 AM (IST)

    पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरात गोदामाला पहाटे भीषण आग

    पिंपरी चिंचवड-पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरात एका भंगारच्या गोदामाला आज पहाटे भीषण आग लागली

    -अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली

    -ही आग पावणेसहाच्या सुमाराला लागली ती 7 च्या सुमाराला आटोक्यात आलीय

    -सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र नुकसान झाले आहे

  • 09 Jan 2022 08:19 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा अखेर रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा अखेर रद्द

    देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला

    पंतप्रधान कार्यालयाकडून दौरा रद्द झाल्याचं पुणे प्रशासनाला कळवण्यात आले

    पुणे मेट्रो उद्घाटन, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या नावाचे कलादालन, पालिकेतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन तसेच विविध कार्यक्रमात मोदी उपस्थित राहणार होते

    मात्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता

    सूत्रांची माहिती

  • 09 Jan 2022 08:10 AM (IST)

    पुढील चार दिवस मराठवाडा, विदर्भात पाऊस, गारपीटीचा इशारा 

    मुंबई : पुढील चार दिवस मराठवाडा, विदर्भात पाऊस, गारपीटीचा इशारा

    अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येतायत आद्रतायुक्त वारे

    त्यामुळे भारतात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे

    मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात आज आणि उद्या पावसासह गारपिटीची शक्यता

    तर विदर्भात आज काही ठिकाणी पावसासह गारपिटीची शक्यता आहे

  • 09 Jan 2022 08:08 AM (IST)

    नाशिकमध्ये एसटीचे आणखी 10 कर्मचारी बडतर्फ

    नाशिक - एसटीचे आणखी 10 कर्मचारी बडतर्फ

    13 डेपोतून आतापर्यंत 95 कर्मचारी बडतर्फ

    वारंवार सूचना देऊन देखील कामावर हजर न झाल्याने कारवाई

    आतापर्यंत 110 बसेस धावल्याचा एसटी प्रशासनाचा दावा

    आतापर्यंत 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस

  • 09 Jan 2022 07:23 AM (IST)

    नायलॅान मांजा विकणाऱ्यांवर नागपूर पोलिसांची कारवाई, बारा जणांना अटक

    नागपूर - नायलॅान मांजा विकणाऱ्यांवर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची धडक कारवाई

    - पोलिसांनी पावणेतीन लाख रुपयांचा 400 बंडल नायलॅान मांजा केला जप्त

    - एकाच दिवशी बारा जणांना पोलिसांनी केली अटक

    - गुन्हे शाखेनं 12 ठिकानी धाडी टाकून केली कारवाई

    - नायलॅान मांजा विकणाऱ्या 12 जणांवर गुन्हे दाखल

    - गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 32 धाडी, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

    - नागपुरात नायलॅान मांजाचा भंडारा आणि नाशिकमधून होत होता पुरवठा

    - भंडारा आणि नाशिक येथील पुरवठादारालाही पोलिसांनी केली अटक

  • 09 Jan 2022 06:28 AM (IST)

    उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट, महाराष्ट्रातही पुढच्या 2 दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता

    नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र

    जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी

    श्रीनगरसह अनेक जिल्ह्यात जनजीवन ठप्प, अनेक मार्ग बंद

    आज सकाळपासून अनेक राज्यात पावसाची शक्यता

    पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये पावसाची शक्यता

    राजधानी नवी दिल्लीमध्येही पावसाची शक्यता

    महाराष्ट्रातही पुढच्या 2 दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता

    उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात थंडी वाढणार

Published On - Jan 09,2022 6:23 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.