Maharashtra News Live Update : केके यांचं पार्थिव कोलकात्यातून मुंबईत दाखल, उद्या अंत्यदर्शन घेता येणार

| Updated on: Jun 01, 2022 | 10:45 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : केके यांचं पार्थिव कोलकात्यातून मुंबईत दाखल, उद्या अंत्यदर्शन घेता येणार
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज बुधवार 1 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर लावलेल्या शिलालेखावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या गडावर तानाजी मालुसरे यांच्या घटनेआधी कोंढाण्याचे नाव सिंहगडच होते, असा शिलालेखात उल्लेख आहे. सिंहगडावरील शिलालेखावर संभाजी ब्रिगेडने घेतला आक्षेप घेतला आहे. हा शिलालेख खोटा असून खोट्या इतिहासाचे दाखले देऊन शिलालेख लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा शिलालेख काढून टाकण्याची संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे यांची मागणी आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jun 2022 10:40 PM (IST)

    सात वर्षांच्या मुलाला कुत्र्याने चावा घेतला, घटनाना सीसीटीव्हीत कैद

    मीरा रोडच्या पूनम सागर परिसरात सात वर्षांच्या मुलाला कुत्र्याने चावा घेतला

    कुत्र्याचा चावल्याची घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली

    मीरा रोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या संकल्प सोसायटी परिसरातील घटना

    सात वर्षीय अर्जुन गुप्ता नावाच्या  मुलाला कुत्र्याने चावा घेतला

    कुत्र्याने चावल्याची घटना सोसायटीचे सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे.

  • 01 Jun 2022 09:31 PM (IST)

    केके यांचं पार्थिव कोलकात्यातून मुंबईत दाखल

    केके यांचं पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आलं

    केके यांचं पार्थिव कोलकात्यातून मुंबईत दाखल

    पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल

    उद्या सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार

    मुंबईतील वर्सोवा येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार

  • 01 Jun 2022 07:43 PM (IST)

    जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल

    दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

    जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल तर शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार

    अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली

    यंदा कोरोनाच्या दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा पार पडल्या

    हा निकाल विद्यार्थ्यांसाठी विशेष असणार आहेत

    लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली

  • 01 Jun 2022 06:23 PM (IST)

    सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, जय शाह यांचा दावा

    सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही

    जय शाह यांच्या दाव्याने काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे

    जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव तसेच बीसीसीआयचे सचिव आहेत.

  • 01 Jun 2022 05:43 PM (IST)

    सौरव गांगुलींचा BCCIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

    सौरव गांगुलींचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

    नवीन इनिंग सुरू करत आहे- सौरव गांगुली

    सौरव गांगुली यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार कोट्यातून राज्यसभा खासदार पदी निवड होण्याची शक्यता

  • 01 Jun 2022 05:02 PM (IST)

    एकनाथ खडसेंना ईडीकडून मालमत्ता रिकामी करण्याची नोटीस

    मोठी बातमी!

    एकनाथ खडसेंना ईडीकडून मालमत्ता रिकामी करण्याची नोटीस

  • 01 Jun 2022 04:51 PM (IST)

    दोन महिन्यात मला तिसरी धमकी, रुपाली चाकणकर यांची 'tv9 मराठी'ला माहिती

    दोन महिन्यात मला तिसरी धमकी

    रुपाली चाकणकर यांची 'tv9 मराठी'ला माहिती

    धमकीनंतर चाकणकर नॉट रिचेबल होत्या

  • 01 Jun 2022 04:29 PM (IST)

    भाजपच्या प्रदेश सचिव विद्या ढोलेंची पत्रकार परिषद

    ओशिवारा पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दाखल केली

    दिपाली सय्यद यांच्यावर FRI दाखल करावी, ही आमची मागणी आहे.

    भाजपच्या प्रदेश सचिव विद्या ढोलेंची पत्रकार परिषद

    अश्लिल फोटो मॉर्फ करुन व्हायरल करण्याची मला धमकी दिली-विद्या ढोले

  • 01 Jun 2022 03:46 PM (IST)

    भाजप नेते राजेश उर्फ बाळा काशिवार यांचा राजीनामा

    काशिवार भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आहेत

    प्राथमिक सदस्यत्वाचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदाचा त्यांनी राजीनामा दिला

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्राद्वारे राजीनामा सुपुर्द केला

    विशेष म्हणजे नुकतेच झालेल्या नितीन गडकरी यांच्या हस्ते साकोली येथील लोकार्पण सोहळ्यात राजेश (बाळा) काशिवार उपस्थित होते.

    राजीनामा दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलंय.

  • 01 Jun 2022 03:35 PM (IST)

    मोदींशिवाय कोणी पंतप्रधान होणार नाही-राज्यमंत्री बच्चू कडू

    आम्ही जाहीर करतो देशात भाजपाशिवाय दुसरी पार्टी राहणार नाही

    मोदींशिवाय कोणी पंतप्रधान होणार नाही-राज्यमंत्री बच्चू कडू

    ED हा विषय भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातून चालतो

    मला वाटलं दुसरा पक्ष या देशात बंद झाला पाहिजे.

    एकच पक्ष ठेवायचा भाजप, एकच पंतप्रधान राहील जाहीर करून टाकणार आहे.

    की मोदी यांच्याशिवाय पंतप्रधान होणार नाही. एवढी मरमर बीजेपी कशाले करते कळत नाही.

  • 01 Jun 2022 03:29 PM (IST)

    रिया चक्रवर्तीला परदेशात जाण्याची परवानगी

    सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर वादात अडकलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला न्यायालयाचा दिलासा

    - न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला परदेशात जाण्याची दिली परवानगी

    - पोलिसांना पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश

    - पण दररोज भारतीय दूतावासात रिपोर्ट लावण्याचेही दिले आदेश

  • 01 Jun 2022 03:22 PM (IST)

    जून महिन्यात पावसात पडणार खंड, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये!

    महाराष्ट्रातील काही भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार

    यंदा 101 टक्के पावसाचा अंदाज

    जून महिन्यात पावसात पडणार खंड, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

    मात्र जूलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पाऊस चांगला

    हवामानतज्ञ डॉ.रामचंद्र साबळेंनी व्यक्त केला अंदाज

    राज्यातील 11 स्थानकांचा केला अभ्यास यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर, अकोला या ठिकाणी तिथल्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार

    यंदा पाऊसकाळ चांगला आहे दिली माहिती

  • 01 Jun 2022 03:17 PM (IST)

    पुरंदरमधील घटनेच्या चौकशीची मागणी, विजय शिवतारे मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र

    शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लिहिणार पत्र

    पुरंदरमध्ये मृत्यू झालेल्या घटनेची चौकशी करण्याची मागणी

    सासवडमध्ये रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मृतकाला मारहाण झाल्याचा दावा

    सासवड नगरपरिषदेच्या बाजूला अंडाभूर्जी चालवणाऱ्या व्यावसायिकांन मारहाण केल्याचा आरोप

    गरम पाणी अंगावर टाकून केली मारहाण ,

    माजी मंत्री वियज शिवतारे यांचा आरोप

    नगरपालिका विशिष्ट पक्षाच्या ताब्यात आहे म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावली

    खोटा पोस्टमार्टेम रिपोर्ट तयार केला

    शिवतारेंचा आरोप आय व्हीटनेस असतानाही खोटा रिपोर्ट कसा ?

    एसपींना मी यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे

    काँग्रेसचे आमदार पोलीस स्टेशन चालवतात

    काही घटना झाली की ते हजर असतातात

    अंगावर मारहाण झाली असताना रिपोर्ट बदलला केला आरोप

  • 01 Jun 2022 01:16 PM (IST)

    आमचा जीएसटी वेळेत घ्या

    आमचा जीएसटी वेळेत घ्या

    महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे

    केंद्राने राज्याचे पुर्ण पैसै द्यावे

    थोडाफार जीएसटी दिला आहे

    आमच्याकडे हनुमंता वगैरे सुरू आहे

    नाशिकला जन्म झाला

    देवाचा जन्म इथं झाला काय तिथं झाला...

  • 01 Jun 2022 01:07 PM (IST)

    दफ्तरी बियाणे कंपनीने केली शेतकऱ्यांची फसवणूक

    - दफ्तरी बियाणे कंपनीने केली शेतकऱ्यांची फसवणूक .

    - 1008 धानाचे वाणाचा बियाणे 145 दिवसात निघणारा धानाचा पिक निघाला 90 दिवसात.

    - एका वर्षा अगोदरच केली होती कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रार.

    - दफ्तारी कंपनी विरोधात कारवाहीचे आश्वसन दिले।मात्र आता या प्रकरणाला एक वर्ष लोटत असून सुद्धा कारवाई करण्यात आली नाही.

    - कृषी अधिकारी म्हणतात आम्ही तसा अहवाल पाठवीला आहे,वरिष्ठ स्तरावरून अहवाल येताच कारवाई करणार.

    - वर्ष लोटूनही दफ्तारी कंपनीवर कारवाई नाही.

  • 01 Jun 2022 12:38 PM (IST)

    आपलं भविष्य घडविण्यात एसटीचा हक्क आहे

    आपलं भविष्य घडविण्यात एसटीचा हक्क आहे

    एसटीच्या काळात त्यांनी पराक्रम केले आहेत

    गाव तिथं एसटी...

    शहरात सुद्धा एसटी आहे

    आता आयपीएल संपली, तिथं अनेकांनी कशी मदत केली हे आपण पाहिलं...

    आज मी एसटीमुळे आहे, असं सांगणारी अनेकजण आहेत

    एसटी चालू कशाला करायची

    कोरोना काळात एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बहादूरीचं काम केलं

    सर्व काही करता येतं, पण पैशाचं काय करता येत नाही

    जे सगळं शक्य आहे, ते आम्ही केलं आहे

    आपण या राज्याचं वैभव आहात

    पु.ल. देशपांडेची कथा वाचायला हवी

    एसटी ही आपली सगळ्यांची आहे. आपलं हे महाराष्ट्राचं कुटुंब आहे.

  • 01 Jun 2022 12:20 PM (IST)

    भगवा आणि निळा एकत्र आल्याने महाराष्ट्राची ताकद वाढेल - संजय राऊत

    भगवा आणि निळा एकत्र आल्याने महाराष्ट्राची ताकद वाढेल

    पुणे महापालिकेवर भगवा फडकावणार

    नगरसेवक काय करू शकतो शिवसेनेचा

    प्रत्येकाचा आदर्श काम आहे

    चुकीचं काही दाखवू नका

    पवार साहेबांचा पुर्ण मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे

    महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे

    हनुमान चाळीसा आम्हाला सुध्दा येत

    फक्त राजकारण आम्ही करत नाही

    आम्ही केलेली काम भोंग्यावरून सांगू

    कोविडच्या काळात शिवसेनेने उत्तम काम केलं

    लोकांना आमचा आधार राहावा म्हणून आम्ही काम करतो

    रयतेचं राज्य उभं केलं

    या राज्याचं नेतृत्व शिवसेना करते

    तिकीट नको पण जबाबदारी द्या

    हनुमान चालीसा आम्हालाही येते

    आम्ही भोंगे लावून सांगत नाही

    मात्र देशासमोर अनेक प्रश्न आहेत

    आम्ही रस्ते , बेरोजगारी यावर काम करतोय हे शिवसैनिक करतो

    आम्ही भोंगे लावू आणि महापालिकेत काय काम केलन ते सांगू

    तुम्ही काय केलं

    पाच वर्षे लोकांसाठी काय केलं ते सांगू

    कोरोना काळात चांगल काम केलं

    बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आमचे दोनच दैवत आहेत

    शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर

    एकानं रयरतेच राज्य निर्माण केलं दूसऱ्यानं कायद्याचं राज्य निर्माण केलं

  • 01 Jun 2022 11:39 AM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर

    शिवसेना खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर

    महमंदवाडीतील बाबासाहेब आंबेडकर भवनाचं उद्घाटन

    थोड्या वेळात संजय राऊत येणार..

  • 01 Jun 2022 11:39 AM (IST)

    महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा फोडल्याप्रकरणी औरंगाबादेत गुन्हा दाखल..

    महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा फोडल्याप्रकरणी औरंगाबादेत गुन्हा दाखल..

    मनपा कंत्राटी संगणक चालक सोहेल काझी विरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

    महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची लोकप्रतिनिधींनी केली होती मागणी..

    409 भा द वि सह शासकीय गुपिते अधिनियम सन 1923 चे कलम 5 प्रमाणे गुन्हा दाखल..

    औरंगाबाद महानगरपालिका निवडणूकीच्या प्रारुप आराखड्याची माहिती झाली होती

  • 01 Jun 2022 11:37 AM (IST)

    चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात कोल्हापूरात टाहो मोर्चा

    चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात कोल्हापूरात टाहो मोर्चा

    ज्यांना मदत मिळाली नाही त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा

    पूराच्या पाण्याचं नियोजन नाही

    पूरस्थिती निर्माण झाली तर काय कराचं

    त्यामुळे आम्ही आज मोर्चा काढणार आहोत

    काय झाल्यास आम्ही काय करणार आहोत...

    चौदा हजार कोटीचा परतावा मिळाला आहे

  • 01 Jun 2022 11:09 AM (IST)

    बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचीही सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

    बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचीही सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

    लॉरेन्स बिश्नोईचं मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आल्यानंतर सलमान खानची वैयक्तिक सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

    २०१८ मध्ये लॉरेन्स बिश्नोईने तुरूंगातूनच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचं कारण होतं सलमान खानचं काळविट शिकार प्रकरण. सलमान खानला काळविट शिकार प्रकरणावरुन थेट जीवे मारण्याची धमकी त्यानं दिली होती. सलमान खानला जीवे मारण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीने प्लानिंग केलं होतं.

  • 01 Jun 2022 11:05 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये बाहुलीला फाशी दिल्यानंतर आठ वर्षीय मुलाने स्वतः ही आत्महत्या केलीये

    -पिंपरी चिंचवडमध्ये बाहुलीला फाशी दिल्यानंतर आठ वर्षीय मुलाने स्वतः ही आत्महत्या केलीये

    -मुलाने स्वतःही तोंडावर तसाच कापड टाकलं अन मग गळफास घेतला

    -दोन दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना थेरगावमध्ये घडली

    -ज्या सोसायटीच्या पायऱ्यांखाली ते राहतात त्याच सोसायटीच्या गेटवर वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहेत होते.आई तिथंच बाहेर होती. त्यावेळी घरात ही घटना घडली

  • 01 Jun 2022 11:05 AM (IST)

    संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं नियोजन सुरू

    संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं नियोजन सुरू

    यंदा पाच लाख वारकरी देहूत पालखी सोहळ्याला येण्याची शक्यता

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 तारखेला देहूत

    कार्यक्रमाची तयारी करण्याचे देहू संस्थानला सूचना

    पीएम ओ ऑफिसचे अधिकारी उद्या किंवा परवा देहूत पाहणी करण्यासाठी येण्याची शक्यता

    संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं होणार लोकार्पण

    20 तारखेपासून सुरू होतोय पालखी सोहळा

    देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांची माहिती

  • 01 Jun 2022 10:16 AM (IST)

    जीएसटीचे अजून 15 हजार कोटी रुपये येणं बाकी आहे

    जीएसटीचे अजून 15 हजार कोटी रुपये येणं बाकी आहे

    हे जुने कबूल केलेले पैसे आहेत, ते टप्प्याने येत आहे, राहिले लवकर द्यावेत एवढी माफक अपेक्षा आहे

    29 हजार कोटी रुपये येणं बाकी होत,

    जीएसटीचे पैसे काय पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठी नाही आलेले

    पेट्रोल डिझेलचे भाव आम्ही पण कमी केलेत

    मागच्या काळात येणारे पैसे आत्ता मिळालेत त्याचा आणि याचा काही संबंध नाही

  • 01 Jun 2022 10:14 AM (IST)

    राम मंदीराच्या गाभाऱ्याची पायाभरणी

    राम मंदीराच्या गाभाऱ्याची पायाभरणी,

    युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती

  • 01 Jun 2022 09:23 AM (IST)

    गोविंदानंद स्वामी आज घेणार पत्रकार परिषद

    गोविंदानंद स्वामी आज घेणार पत्रकार परिषद

    काल शास्त्रार्थ सभेत झालेल्या गोंधळानंतर आज मांडणार आपली भूमिका

    महर्षी सिद्धपीठ आश्रम परिसरात मोठा बंदीबस्त

    पत्रकार परिषदेत गोविंदानंद काय भूमिका मांडतात याकडे लक्ष

  • 01 Jun 2022 09:22 AM (IST)

    नागपूर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत चढताना पडत असलेल्या महिलेचे प्राण वाचविण्यात आरपीएफ जवणाला आले यश

    नागपूर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत चढताना पडत असलेल्या महिलेचे प्राण वाचविण्यात आरपीएफ जवणाला आले यश

    तामिळनाडू एक्स्प्रेस ही गाडी नागपूर स्थानकावरून सुटली आणि स्पीड पकडली

    एक महिला धावत्या गाडीत चढत होती मात्र तिचा हात घसरला

    ड्युटीवर तैनात असलेला जवान जवाहर सिंग जवळच असल्याने त्यांनी महिलेला फलाटावर ओढले

    केरळची आहे ही महिला

    आरपीएफ जवानांच्या तत्परतेने वाचले महिलेचे प्राण

  • 01 Jun 2022 09:22 AM (IST)

    नागपूरातील अनेक पेट्रोलपंप आजंही बंद

    पेट्रोल आणि डिझेल नसल्याने आज तिसऱ्या दिवशीही नागपूरातील ५० पेक्षा जास्त पेट्रोलपंप बंद आहेत. तेल कंपण्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत नसल्याने, सोमवारपासून नागपूरातील ५० पेक्षा जास्त पेट्रोलपंप बंद आहेत.  पेट्रोलपंपवर पेट्रोल मिळत नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होतेय. ॲडव्हान्स पैसे देऊनंही तेल कंपन्यांनी पेट्रोल न दिल्याने शहरातील ५० पेक्षा जास्त पेट्रोलपंप बंद आहेत. याचा सर्वसामान्यांना फटका बसतोय. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी.

  • 01 Jun 2022 09:20 AM (IST)

    खासदार नवनीत राणांविरोधात कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह

    खासदार नवनीत राणांविरोधात कॉग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी अमरावती लोकसभा निवडणुक लढवण्याचा आग्रह....

    काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी 2024 ची लोकसभा निवडणुक अमरावती मधून लढवावी......

    प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांचे आमदार प्रणिती शिंदे यांना पत्र....

    आतापासून तयारी केल्यास 2024 मध्ये अमरावतीत काँग्रेसचा खासदार निवडणूक येऊ शकतो-नंदकिशोर कुयटे यांचा दावा..

  • 01 Jun 2022 08:40 AM (IST)

    धक्कादायक...नागपूरात नवजात बालकाची तीन लाखात विक्री

    - धक्कादायक...नागपूरात नवजात बालकाची तीन लाखात विक्री

    - पाच दिवसांच्या बाळाची विक्री करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने केली अटक

    - विशेष म्हणजे बाळाच्या खरेदी विक्रीत बाळाचे आई वडील आणि डॉक्टरांचा समावेश

    - मुकुल आणि सिंड्रेला वासनिक या दाम्पत्याला बाळ नको होतं

    - मात्र नकळत गर्भवती राहिल्यावर बाळाची विक्री करण्याची योजना आखली

    - त्यामुळं बाळ झाल्यावर डॉ. कल्याणी थॉमस यांच्या मदतीने बाळाचा केला तीन लाखात सौदा

    - मानव तस्करी विरोधी पथकाला सुगावा लागताच सापळा रचून केली अटक

    - नवजात बाळांची विक्री करणाऱ्या टोळीची शक्यता

    - आरोपींची सात दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी

  • 01 Jun 2022 08:39 AM (IST)

    दुग्ध दिनाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना फटका

    - दुग्ध दिनाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना फटका

    - खाजगी डेअऱ्या कडून दुध खरेदीदरात पुन्हा एक रुपयाने कपात

    - 1 जून पासून अंमलबजावणी करीत शेतकऱ्यानं पुन्हा एकदा आर्थिक फटका

    - गायीचा दूध खरेदी दर ३३ वरून ३२ रुपयांवर करण्यात आला

  • 01 Jun 2022 08:39 AM (IST)

    मृत्यच्या जबड्यात जाणाऱ्या महिलेला आरपीएफ जवानाने वाजवलं

    - मृत्यच्या जबड्यात जाणाऱ्या महिलेला आरपीएफ जवानाने वाजवलं

    - तामीलनाडू एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारी महिला येत होती ट्रेन खाली

    - ट्रेनच्या हॅंडलचा हात सुटतात आरपीएफ जवानाने त्या महिलेला फलाटावर ओढलं

    - केरळमधील सी पी सेरेना या महिलेचा वाचला जीव

    - जवाहर सिंह या आरपीएफ जवानाने तत्परता दाखवत वाचवला महिलेचा जीव

  • 01 Jun 2022 08:38 AM (IST)

    पुणे आरटीओच्या नव्या 250 मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

    पुणे आरटीओच्या नव्या 250 मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

    परिवहन मंत्री अनिल परब यांच्यां अध्यक्षतेखाली होणार कार्यक्रम

    आळंदी रोड वरील फुलेनगर येथील आरटीओ कार्यालयाच्या मैदानावर तयार करण्यात आला नवीन ट्रॅक

  • 01 Jun 2022 08:38 AM (IST)

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा करोनाची लागण झाली

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा करोनाची लागण झाली आहे… ते सध्या घरी असून घराबाहेर शांतता आहे… या बातमीने मनसे कार्यकर्त्यांना धक्का बसलाय…

    - ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात राहतील असं सांगण्यात आलंय…

    - मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त असणारे राज शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते.

    - याचदरम्यान ते पुन्हा एकदा करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आलीय.

    - आधी कोविड डेड सेलमुळे राज ठाकरेंना वैद्यकीय अ‍ॅनेस्थेशिया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरेंची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलंय,

    - मात्र नंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे…

  • 01 Jun 2022 07:45 AM (IST)

    नागपूरात विकृत तरुणाकडून तब्बल सात अल्पवयीन मुलांवर अत्याचार

    - नागपूरात विकृत तरुणाकडून तब्बल सात अल्पवयीन मुलांवर अत्याचार

    - आंबा, चिंच तोडण्याच्या बहाण्याने न्यायचा महाराजबाग परिसरात

    - निर्जनस्थळी नेऊन करायचा अनैसर्गिक अत्याचार

    - कुठेही वाच्यता केल्यास द्यायचा जीवे मारण्याची धमकी

    - 9 वर्षाच्या मुलाने आईवडिलांना हकीकत सांगितल्यावर पोलिसांत केला गुन्हा दाखल

    - वसंतराव नाईक झोपडपट्टी भागात आली घटना उघसकीस

    - 28 वर्षीय मयूर मोडक असं या विकृत आरोपीचं नाव

    - आरोपी फरार, पोलीस घेताहेत आरोपीचा शोध

    - बर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

  • 01 Jun 2022 07:26 AM (IST)

    3 जूनला कौंडण्यपूरातील माता रुक्मिणीची पालखी पंढरपूर साठी ठेवणार प्रस्थान.

    3 जूनला कौंडण्यपूरातील माता रुक्मिणीची पालखी पंढरपूर साठी ठेवणार प्रस्थान.

    यंदा माता रुक्मिणीच्या पालखीचे 428 वे वर्ष..

    कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच आषाढीला पायी दिंडी पंढरपूरला जाणार.

    विदर्भाची पंढरी कौंडण्यपुर हे आहे रुक्मिणीचे माहेर घर...४० दिवस पालखीचा प्रवास ८०० किलोमीटर पायी जाणार दिंडी.

    कोरोना काळात मानाच्या दहा पालख्यांमध्ये मिळाला होता रुक्मिणीच्या पालखीला मान.....

    तीन तारखेला दुपारी चार वाजता होणार पालखी पंढरपूर कडे रवाना.....

  • 01 Jun 2022 07:26 AM (IST)

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेचे आज होणार ध्वजपूजन

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेचे आज होणार ध्वजपूजन

    सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनेकडून केले जाणार ध्वजपूजन

    ध्वजपूजन करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेची करणार जय्यत तयारी

    आमदार अंबादास दानवे आणि शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत केले जाणार ध्वजपूजन

  • 01 Jun 2022 07:26 AM (IST)

    राज्यभरातील शेतकऱ्यांना आजपासून कपाशीचे बियाणे खरेदी करता येणार

    राज्यभरातील शेतकऱ्यांना आजपासून कपाशीचे बियाणे खरेदी करता येणार.....

    आज पासून कृषी केंद्र संचालकांना कपाशी बियाणे विकता येणार....

    बोंडअळीला रोखण्यासाठी वेळेआधी कपाशीची लागवड होऊ नये यासाठी ३१ मे पर्यत कपाशी बियाणे विकण्यावर होती कृषी विभागाची बंदी....

  • 01 Jun 2022 07:25 AM (IST)

    काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा काँग्रेसवर पुन्हा हल्लाबोल

    - काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा काँग्रेसवर पुन्हा हल्लाबोल

    - ‘इमरान प्रतापगडी यांना अनुमोदक- सूचक असलेल्या १० आमदारांच्या सह्या प्रदेश काँग्रेसने आधीच घेतल्या होत्या’

    - ‘कोऱ्या फार्मवर १० काँग्रेस आमदारांच्या सऱ्हा घेतल्या’

    - ‘अनुमोदक म्हणून सऱ्ह्या केलेल्या आमदारांना कुठलीही माहिती न देता घेतल्या कोऱ्या कागदावर सऱ्ह्या’

    - ‘बाहेरचा उमेदवार लादणार हे माहित असतं तर आमदारांनी अनुमोदक म्हणुन सही केली नसती’

    - आमदारांना अंधारात ठेऊन राज्यसभा निवडणुकीत लादला बाहेरचा उमेदवार

    - काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा गौप्यस्फोट

  • 01 Jun 2022 07:25 AM (IST)

    नागपूरातील नदी- नाले स्वच्छता मोहीम केवळ देखावा का?

    - नागपूरातील नदी- नाले स्वच्छता मोहीम केवळ देखावा का?

    - स्वच्छता मोहिमेत काढलेला कचरा नदी आणि नाल्याच्या काठावरंच

    - काठावर ठेवलेला कचरा पहिल्याच पावसात पुन्हा नदीत जाणार

    - नदीतील कचरा काठावर ठेवल्याने स्वच्छता मोहिमेचा खर्च वाया जाण्याची शक्यता

    - गाळ काढल्याबाबत नागपूर महापालिकेकडून दावेही केलेले दावे फोल!

    - दरवर्षी नदी-नाले स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च केले जातात, पण त्यातील त्रुटींमुळे हा पैसा पाण्यात जातोय

  • 01 Jun 2022 07:24 AM (IST)

    विधान परिषद सदस्य आमदार परीणय फुके यांचा चेस खेळणाचा व्हिडीओ वायरल

    विधान परिषद सदस्य आमदार परीणय फुके यांचा चेस खेळणाचा व्हिडीओ वायरल..

    फुके जिल्ह्यात राजकारणात शह मात देत आपल्या प्रतिस्पर्धीला नेहमी चकीत करीत असतात.त्याच प्रमाणे या चेस खेळात एका कुशल खेळाडू प्रमाणे आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडू ला त्यांनी चकीत केल्याचे वीडियोत दिसत आहे.

    परीणय फुके यांचा चेस खेळतांना चा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

  • 01 Jun 2022 07:24 AM (IST)

    पूर्व नागपुरातील वस्त्यांमध्ये आज पाणी बंद

    - पूर्व नागपुरातील वस्त्यांमध्ये आज पाणी बंद

    - पारडी, भांडेवाडी, सुभाननगर जलकुंभांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी प्रजापती नगर येथे फुटली

    - जलवाहिणीच्या दुरुस्ती चे काम चालणार असल्याने आज दिवसभर पाणी पाणीपुरवठा बंद

    - पूर्व नागपुरातील अनेक वस्त्यांना आज पाणीपुरवठा होणार नाही

Published On - Jun 01,2022 6:40 AM

Follow us
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.