Maharashtra Mumbai Marathi News Live | सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा

| Updated on: Nov 11, 2023 | 7:29 AM

Maharashtra Mumbai Marathi News Live : आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra Mumbai Marathi News Live | सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा

मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : राज्यात अनेक भागांत गुरुवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या. कल्याण कोळसेवाडी परिसरात झाड पडल्याने आठ ते 10 घरांचे नुकसान तर तीन जण जखमी झाले आहेत. बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस झाला. सांगलीच्या ऐतवडे खुर्द परीसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. वर्षाभरापासून कंत्राटदारांचे अडकलेले १२० कोटी रुपये मिळाले नाही तर अधिवेशन तयारीवर बहिष्कार टाकणार आहे. यामुळे नागपुरातील मंत्र्यांचे बंगले, विधानभवन, आमदार निवासातील कामे ठप्प होणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान संघाचे आव्हान जवळपास संपले आहे. राज्य, देश, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Nov 2023 06:35 PM (IST)

    Maharashtra Kesari Sikandr Shaikh | सिकंदर शेख ठरला 66 वा महाराष्ट्र केसरी

    मुंबई | सिंकदर शेख हा 66 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. सिकंदरने मानाची चांदीची गदा पटकावली आहे.

  • 10 Nov 2023 06:18 PM (IST)

    Ajit Pawar Amit Shah | अमित शाह यांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत

    नवी दिल्ली | राजधानी नवी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी दाखल झाले आहेत. अमित शाह यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार गटाचे हे नेते दिल्लीत गेले आहेत.

  • 10 Nov 2023 06:08 PM (IST)

    Mumbai | मुंबईत 6 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, काँग्रेसची मागणी

    मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राज्यासह देशातून 6 डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमीवर अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी मागणी केली आहे. या दिवशी सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करणं शक्य व्हावं, यासाठी मुंबईतील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करा, अशी मागणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी केली आहे. याबाबत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

  • 10 Nov 2023 05:52 PM (IST)

    राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात विवेक कोल्हे निवडणूक लढवणार

    मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात विवेक कोल्हे निवडणूक लढवणार आहेत. विवेक कोल्हे हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत.

  • 10 Nov 2023 05:50 PM (IST)

    संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत 24 नोव्हेंबरपर्यंत वाढ

    दिल्लीच्या अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केलेले संजय सिंग आज राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर झाले. राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने संजय सिंगच्या न्यायालयीन कोठडीत 24 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.

  • 10 Nov 2023 05:43 PM (IST)

    कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचं अनोखं आंदोलन

    कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी कंत्राटी कामगारांनी अनोखं आंदोलनं केलं. कर्मचाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन सुरु केल आहे. उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं.

  • 10 Nov 2023 05:35 PM (IST)

    तामिळनाडूच्या वैगई धरणाचे दरवाजे उघडले

    तामिळनाडू : धरणाच्या पाण्याची पातळी 69 फुटांवर गेल्याने वैगई धरणाचे शटर उघडण्यात आले. तामिळनाडू जलसंपदा विभागाने मदुराई, दिंडीगुल, थेनी, शिवगंगई आणि रामनाथपुरम जिल्ह्यातील वैगई नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांसाठी तिसरी चेतावणी जारी केली आहे.

  • 10 Nov 2023 05:27 PM (IST)

    तानाजी सावंत आणि पोलीस अधीक्षक यांचा व्हिडीओ व्हायरल

    मंत्री तानाजी सावंत आणि पोलीस अधीक्षक यांच्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओनंतर वासुदेव मोरेंच्या बढतीसाठी तानाजी सावंत यांचा दबाव होता का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मी मुख्यमंत्र्यांचं देखील ऐकत नाही असं तानाजी सावंत यांनी म्हंटलं आहे. मी सांगतो तेच करा आणि ऑर्डर काढा, असं तानाजी सावंत म्हणताना दिसत आहेत.

  • 10 Nov 2023 05:20 PM (IST)

    दिवाळीत फटाके फोडण्यावरील निर्बंध आणखी कडक होणार

    दिवाळीत मुंबई फटाके फोडवण्यावर आणखी निर्बंध लागणार आहेत. मुंबईकरांना आता फक्त 8 ते 10 या कालावधीतच फटाके फोडता येणार आहेत, असं हायकोर्टाने सांगितलं आहे.

  • 10 Nov 2023 05:07 PM (IST)

    राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार दिल्लीत पोहोचले

    राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार आज दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अजित पवार दुपारी 2.10 वाजता विमान पकडून दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांच्या गटाची आज दिल्लीत बैठकही होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

  • 10 Nov 2023 04:56 PM (IST)

    राज्यात काही भागात पाऊस

    कल्याण – डोंबिवलीत सगल दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला. ऐन दिवाळीत पाऊस पडल्याने नागरिक आणि विक्रेत्यांची तारांबळ उडाली. तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची धांदल उडाली. पावसाने अर्धातास जोरदार हजेरी लावली. कालपासून ढगाळ वातावरण होते. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागली.

  • 10 Nov 2023 04:34 PM (IST)

    आनंदाचा शिधामध्ये कमी वस्तू

    शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते विलेपार्ले पूर्वेतील रेशन दुकानांची रिॲलिटी चेकिंग करत आहेत. आनंदाचा शिधा मिळत नसल्याची तक्रार आल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विलेपार्ले पूर्व येथील रेशन दुकानात जाऊन रिॲलिटी चेकिंग केली. सरकारने एकूण 6 वस्तू देण्याची घोषणा केली असली तरी आतापर्यंत केवळ दोनच वस्तू दुकानदारांपर्यंत पोहोचल्या आहेत. उर्वरित चार वस्तू अद्याप आलेल्या नाहीत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

  • 10 Nov 2023 04:23 PM (IST)

    संजय राऊत यांना ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराला बोलवत नाही-प्रवीण दरेकर

    संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. ते बाहेरील राज्यात प्रचार करत असल्याविषयी राऊत यांनी टीका केली होती. त्यावर प्रवीण दरेकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांना ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराला पण बोलविण्यात येत नसल्याची जहरी टीका त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

  • 10 Nov 2023 04:18 PM (IST)

    धान खरेदीला दिवाळीतच खोडा

    गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीच्या तिढा अजूनही कायम आहे. दिवाळी तोंडावर असूनही अजून शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कवडीमोल भावाने खासगी व्यापाऱ्यांना धान विक्रीची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. याप्रकरणी सरकारने वेळीच लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 10 Nov 2023 04:12 PM (IST)

    आता वडेट्टीवार-जरांगे सामना

    मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आखाड्यात आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणातील अनेकांशी पंगा घेतला आहे. आता या आखाड्यात विजय वडेट्टीवार आणि मनोज जरांगे यांच्यात आज शाब्दिक चकमक उडाली. यापूर्वी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज वडेट्टीवार आणि त्यांच्यात टोलेबाजी रंगली. गोळीबाळानंतर जरांगे हे हिरो ठरले, आता त्यांना सरकारला झुकवू शकतो, हे कळल्याचा टोला त्यांनी हाणला. तर जरांगे पाटील यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.

  • 10 Nov 2023 03:58 PM (IST)

    अजित पवार आणि अमित शहा यांची आज भटे

    अजित पवार हे पाचनंतर अमित शहा यांना भेटणार आहेत. दिवाळीचा शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याची माहिती मिळतंय. अजित पवार हे पुण्यावरून थेट दिल्लीला रवाना झाले आहेत.

  • 10 Nov 2023 03:45 PM (IST)

    आमदार आमदार गुट्टे यांनी घेतला अत्यंत मोठा निर्णय

    मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागेपर्यंत यापुढे आमदार गुट्टे एकही कार्यक्रम घेणार नसल्याचे नुकताच जाहिर करण्यात आले आहे. आमदार गुट्टे यांच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर मराठा युवकांनी आंदोलन स्थगित केले असल्याचे कळते आहे.

  • 10 Nov 2023 03:33 PM (IST)

    आमदार रत्नाकर गुट्टे यांना बसला मराठा आंदोलनाचा फटका

    मराठा आंदोलनाचा धग कायम असून मराठा तरुणांच्या रोषाचा फटका गंगाखेडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना बसला आहे. आमदार गुट्टे यांच्याकडून आयोजित रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मराठा युवकांनी उधळून लावला आहे.

  • 10 Nov 2023 03:17 PM (IST)

    केंद्रीय निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीचा आढावा अजित पवार घेणार

    काल केंद्रीय निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीचा आढावा आज अजित पवार घेणार असल्याचे सांगितले जातंय. नुकताच अजित पवार हे पुण्यातून थेट दिल्लीला रवाना झाले आहेत.

  • 10 Nov 2023 03:03 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीचा तिढा कायमच…

    गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीचा तिढा अजूनही कायम असल्याचे बघायला मिळत आहे. दिवाळी तोंडावर असूनही अजुनी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

  • 10 Nov 2023 02:58 PM (IST)

    शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस गाडीतून धूर

    शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस गाडीतून धूर निघाला. बॅटरी शॉर्ट झाल्याने जाळ झाला. धुर निघतोय लक्षात येताच पोलिसांनी दुरुस्त केली.

  • 10 Nov 2023 02:49 PM (IST)

    देशातील दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांमध्ये प्रदूषणात वाढ

    देशातील दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांमध्ये प्रदूषणात वाढ झाली आहे. नाशिक शहरात प्रदूषण होऊ नये यासाठी जनजागृती करण्यात आली. यंदाची दीपावली प्रदूषण मुक्त साजरी करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत.

  • 10 Nov 2023 02:32 PM (IST)

    पुण्याहून अजित पवार थेट दिल्लीला रवाना

    पुण्यात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे प्रतापराव पवार यांच्या घरी आले होते. प्रतापराव पवारांच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी सर्वजण एकत्र आले होते. प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी तिघांची एकत्र भेट झाली. पुण्याहून अजित पवार थेट दिल्लीला जाणार असल्याची माहिती समजत आहे. अजित पवार दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर बैठका घेणार असल्याची चर्चा

  • 10 Nov 2023 02:22 PM (IST)

    शिंदे मुख्यमंत्री नसतील तर आम्ही नाही आहे हे स्पष्ट- बच्चू कडू

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे म्हणूनच मी त्यांच्या सोबत गेलो. ते मुख्यमंत्री नसेल तर आम्ही नाही आहे हे स्पष्ट आहे.त्यात काय लपवायच नाही. मुख्यमंत्री बदलणार नाही आणि बदलण्याचा काही कारणही नाही. 24 तारखेपर्यत शिंदे समितीने अहवाल द्यायचा आहे..पुण्यात 75 टक्के नोंदी सापडल्या आहे, मराठा म्हणून वेगळं आरक्षण मिळणार नाही ते ओबीसीच असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

  • 10 Nov 2023 01:54 PM (IST)

    केंद्राकडून गहू, तांदूळ खासगी बाजारात आणण्याचा निर्णय

    केंद्र सरकारकडून गहू, तांदूळ खासगी बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे महत्वाचं पाऊल उचललं आहे.

    व्यापाऱ्यांनी सरकारी गहू खरेदी करून साठेबाजी करू नये यासाठी सरकारकडू साठेबाजी करणाऱ्यांवर कडक नियंत्रण देखील ठेवलं जात आहे.

  • 10 Nov 2023 01:44 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतले तिरुपतीचे दर्शन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर काल सहकुटुंब तिरुपतीला जाऊन तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासह त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पत्नी , सून, नातू आणि इतर सहकारी उपस्थित होते.

  • 10 Nov 2023 01:28 PM (IST)

    आनंदाचा शिधा न मिळाल्याने आमदार प्रकाश सुर्वे संतापले

    आनंदाचा शिधा न मिळाल्याने आमदार प्रकाश सुर्वे हे रेशन दुकानदार आणि शिधावाटप अधिकाऱ्यांवर संतापले. दहिसर पूर्व येथील रेशन दुकानाची तपासणी करण्यासाठी प्रकाश सुर्वे आले होते. आनंदाचा शिधा वेळेवर न देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी सुर्वे यांनी दिले.

  • 10 Nov 2023 01:19 PM (IST)

    उल्हासनगरमध्ये घरावर विजेचा खांब कोसळून 1 जण जखमी

    उल्हासनगरमध्ये अवकाळी पावसामुळे एका घरावर विजेचा खांब कोसळून एक महिला जखमी झाली. सिंधवाडी परिसरात ही दुर्घटना घडली असून घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

  • 10 Nov 2023 01:06 PM (IST)

    तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी शिझान खानला दिलासा नाहीच

    टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी आरोपी प्रियकर शिझान खानला मुंबई हायकोर्टाचा दिलासा नाहीच. तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा रद्द करण्यास हायकोर्टाकडून नकार.

  • 10 Nov 2023 12:45 PM (IST)

    जायकवाडी धरणात फक्त 44 टक्के पाणीसाठा शिल्लक

    नाशिक :  जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत कमालीची घट झालीये. जायकवाडी धरणात फक्त 44 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नगर नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध होतोय. जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू असून उजव्या कालव्यातून 900 क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी घासरल्यामुळे मराठवाड्यात चिंता निर्माण झालीये.

  • 10 Nov 2023 12:40 PM (IST)

    दिवाळीनिमित्त शरद पवारांना कार्यकर्त्यांकडून ड्रायफ्रूट्सचा हार

    पुणे :  दिवाळीनिमित्त शरद पवारांना कार्यकर्त्यांकडून ड्रायफ्रूट्सचा हार घालण्यात आलाय. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या शरद पवार यांच्या समर्थकांनी शरद पवार यांना ड्रायफ्रूटचा हार घातलाय.  दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी शरद पवार यांच्यासाठी कार्यकर्त्यांकडून हा अनोखा हार तयार करण्यात आला आहे.

  • 10 Nov 2023 12:35 PM (IST)

    टाईम बाँडबद्दल बोललो तर मी धमक्या देतोय असं बोलतात – जरांगे पाटील

    टाईम बाँडबद्दल बोललो तर मी धमक्या देतोय असं बोलतात मनोज जरांगे पाटील यांचा जोरदार निशाणा

  • 10 Nov 2023 12:30 PM (IST)

    नागरी समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी पदयात्रा काढत मनपा आयुक्तांना दिले निवेदन

    नवी मुंबईतील नेरुळ विभागातील विविध नागरी समस्यांकडे नवी मुंबई मनपाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे नेरुळ ते बेलापूर मनपा मुख्यालय लक्षवेधी पदयात्रा काढण्यात आली. नेरुळ सेक्टर 4 विभागात पदपथाची दुरुस्थी, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र बांधावे, तसेच सिसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अश्या विविध मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे.

  • 10 Nov 2023 12:20 PM (IST)

    २० नोव्हेंबरला पुण्यात मनोज जरांगे पाटील यांची पहिली सभा

    मनोज जरांगे यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. २० नोव्हेंबरला खराडीत ही जाहीर सभा होणार असून पुण्यात मनोज जरंगे यांची पहिलीच सभा आहे. यासाठी मराठा समाजाकडून सभेचं नियोजन सुरु आहे.

  • 10 Nov 2023 12:16 PM (IST)

    वडेट्टीवार विरोधीपक्ष नेते असूनही एकाच जातीसाठी बोलतायत – जरांगे पाटील

    वडेट्टीवार विरोधीपक्ष नेते असूनही एकाच जातीसाठी बोलत आहेत, मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी त्यांना घटनात्मक पद दिले आहे का? मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला सवाल

  • 10 Nov 2023 12:01 PM (IST)

    जळगावात महिलांची दिवाळीचे फराळ बनविण्याची लगबग सुरू

    जळगावात महिलांची दिवाळीचे फराळ बनविण्याची लगबग सुरू. जळगावात ठिकठिकाणी लागले फराळ बनविणारे राजस्थानी कारागिरांचे स्टॉल. स्टॉलवर फराळ बनवून घेण्यासाठी महिलांची होतेय सकाळपासून गर्दी..

  • 10 Nov 2023 11:48 AM (IST)

    वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यास वाहनचालक- मालकाला दंड होणार

    अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाड्यांना ‘रिफ्लेक्टर बोर्ड’ व टेप लावण्याच्या सूचना. साखर आयुक्तालयाचे सहकारी व खासगी साखर कारखान्यांना आदेश. मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियम पालनाचे आदेश. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यास वाहनचालक- मालकाला दंड होणार

  • 10 Nov 2023 10:10 AM (IST)

    Maratha Reservation | ‘आम्हाला गाजर दाखवू नका’

    “आम्हाला गाजर दाखवू नका. मुख्यमंत्र्यांनी टाईमबाँड लवकर द्यावा. आम्हाला 24 डिसेंबरच्या आत आरक्षण हवं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 10 Nov 2023 10:07 AM (IST)

    Maratha Reservation | ‘सरसकट मराठा आरक्षण द्याव यावर ठाम’

    “मुख्यमंत्र्यांनी कुणबी नोंदी तपासण्याच्या कामात लक्ष द्यावं. हे काम वेगात व्हावं. सरसकट मराठा आरक्षण द्याव यावर ठाम. आम्हाला ओबीसीत घ्या आणि कितीही टक्के वाढवा” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 10 Nov 2023 09:43 AM (IST)

    Maharashtra News : सामाजीक सलोखा राखण्याची जबाबदारी नेत्यांसह जनतेचीही- फडणवीस

    सामाजीक सलोखा बिघडवू नये ही आमची आणि सर्वांचीच जबाबदारी आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सामाजीक सलोखा राखण्यासाठी आपले वक्तव्य आणि वागणूक याचे भान ठेवावे असंही ते म्हणाले.

  • 10 Nov 2023 09:36 AM (IST)

    Maharashtra News : उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमान याचीका दाखल करण्याची मागणी

    उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमान याचीका दाखल करण्याची मागणी एका पत्रकाराने केली आहे. अॅटर्नी जनरल यांच्याकडे ही परवाणगी मागितली आहे. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यामधील भाषणावर उपाध्याय यांनी आक्षेप घेतला आहे. ठाकरेंनी सरन्यायाधीशांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं असं उपाध्याय यांचं म्हणणं आहे.

  • 10 Nov 2023 09:21 AM (IST)

    Akola Fire News : अकोल्यातल्या शास्त्री स्टेडियमजवळील भंगार बाजाराला आग

    अकोल्यातल्या शास्त्री स्टेडियमजवळील भंगार बाजाराला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

  • 10 Nov 2023 09:13 AM (IST)

    Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण

    धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या भावात पून्हा घसरण झाली आहे. सोन्यासोबतच चांदीच्याही भावात घसरण झाली आहे.

  • 10 Nov 2023 09:08 AM (IST)

    Mumbai News : एसी लोकलवर दगडफेक करणारा तरूण पोलिसांच्या ताब्यात

    एसी लोकलवर दगडफेक करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. टिटवाळा- सीएसएमटी एसी लोकलवर काल दगडफेक झाली होती. ठाकुर्ली डोेंबीवली दरम्यान दगडफेकीची घटना घडली होती. शरद गांगुर्डे असं दगडफेक करणाऱ्या तरूणाचं नाव आहे.

  • 10 Nov 2023 08:57 AM (IST)

    Live update : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

    ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. ललित ससूनमध्ये राहण्यासाठी महिन्याला १७ लाख रुपये द्यायचा.. पोलीस तपासात ललित पाटील याने कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 10 Nov 2023 08:43 AM (IST)

    Live update : पुण्यात एकाच दिवशी 1251 ठिकाणी अनधिकृत विजेचा वापर

    पुण्यात एकाच दिवशी 1251 ठिकाणी अनधिकृत विजेचा वापर झाल्याची माहिती समोर येत आहे. एकाच दिवशी 83 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघड झालं आहे. वीज तारेच्या हुक मध्ये किंवा मिटर मध्ये फेरफार करून विज चोरी केल्यची घटना पुण्यातून समोर येत आहे. दंड न भरणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.

  • 10 Nov 2023 08:31 AM (IST)

    Live update : कैद्यांना खरेदीसाठी मिळणार दहा हजार रुपये

    कारागृहातील कैद्यांना दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी अगोदर काटकसर करावी लागायची. मात्र शासनाने दिवाळीच्या तोंडावर खर्चाच्या मर्यादेत वाढ केली आली आहे. कैद्यांना आता कारागृह उपहारगृहातून खरेदीसाठी सहा हजारावरून दरमहा दहा हजार रुपये इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

  • 10 Nov 2023 08:18 AM (IST)

    Live update : एसी ट्रेन वर दगडफेक; माथेफिरूला आरपीएफ पोलिसांनी घेतलं ताब्यात

    एसी ट्रेन वर दगडफेक करणाऱ्या माथेफिरूला आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. शरद गांगुर्डे असं या माथेफिरू तरुणाचे नाव आहे.. याप्रकरणी पुढील चौकशी सुरु…

  • 10 Nov 2023 08:00 AM (IST)

    Maharashtra News | गर्दी नियंत्रणासाठी पुणे रेल्वे स्थानकात विशेष पथक

    गर्दी नियंत्रणासाठी पुणे रेल्वे स्थानकात विशेष पथक तयार करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून विशेष पथके नेमण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकात आजपासून आरपीएफ जवानांच्या गस्त वाढवण्यात येणार आहे.

  • 10 Nov 2023 07:54 AM (IST)

    Maharashtra News | फटाके विक्रेत्यांवर कारवाई

    विनापरवाना फटाका विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या उपनगर पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली. शहरी वस्तीमध्ये विनापरवाना फटाक्यांची विक्री सुरु होती.

  • 10 Nov 2023 07:43 AM (IST)

    Maharashtra News | गिरणा धरणातून विसर्ग

    मालेगावच्या गिरणा धरणाचा एक दरवाजा आज उघडण्यात आला आहे. त्यातून गिरणा नदीत दीड हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. हे पाणी धुळे औद्योगिक वसाहतीसाठी सोडण्यात आले आहरे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • 10 Nov 2023 07:33 AM (IST)

    Maharashtra News | ऊस गाळप हंगामाची तयारी

    नाशिक, अहमदनगर नगर जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात होणार असल्यामुळे मालेगाव, नांदगाव, मनमाड भागातून शेकडो ऊसतोड मजूर बैलगाड्यातून सहकुटुंब साखर कारखान्याकडे निघाले आहे. नांदगाव, मनमाड भागात ऊसतोड मजुरांचे अनेक तांडे असून दरवर्षी हे मजूर चार महिन्यांसाठी वेगवेगळ्या साखर कारखान्यावर जातात.

  • 10 Nov 2023 07:17 AM (IST)

    Maharashtra News | कल्याणमध्ये तीन जण जखमी

    कल्याणमधील कोळसेवाडी परिसरात झाड पडल्याने आठ ते 10 घरांचे नुकसान झाले. या घटनेत तीन जण जखमी झाले आहे. हे झाड पडणार असल्याच्या वारंवार तक्रार देऊन पालिका प्रशासन लक्ष दिले नाही. यामुळे स्थानिक रहिवाशी संतप्त झाले आहे.

Published On - Nov 10,2023 7:14 AM

Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.