Maharashtra Marathi News LIVE | टीएमटी कंत्राटी कामगारांचा संप, प्रवाशांची गैरसोय

| Updated on: Sep 16, 2023 | 7:19 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करू शकता.

Maharashtra Marathi News LIVE | टीएमटी कंत्राटी कामगारांचा संप, प्रवाशांची गैरसोय

मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : लालबागच्या राजाचे आज होणार प्रथम दर्शन. संध्याकाळी 7 वाजता लालबागच्या राजाचे फोटो सेशन होणार. रत्नागिरीतील टेरव गावातील जलजीवन मिशन योजनेतील पाण्याची टाकी स्मशानात बांधल्याने ठाकरे गटाचं आमरण उपोषण. उपोषणकर्त्या दोघांची प्रकृती अस्वस्थ. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळाच्या बैठकीला हजर राहणार. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Sep 2023 08:57 PM (IST)

    Thane Tmc Strike | ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर टीमटी बससाठी प्रवाशांची गर्दी

    ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर टीमटी बससाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झालेली आहे. टीएटी कंत्राटी कर्मचारी हे आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम हा सार्वजनिक वाहतुकीवर झालेला दिसून येत आहे. टीएमटीची वाहतूक ही तब्बल 1 तास उशिराने आहे. परिणामी प्रवाशांना अपेक्षित स्थळी जाण्यासाठी बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झालीय.

  • 15 Sep 2023 08:17 PM (IST)

    Ravikant Tupkar-Uddhav Thackeray Meets | रवीकांत तुपकर-उद्धव ठाकरे भेट, दुष्काळ, शेतीच्या मुद्यावर चर्चा

    मुंबई | रवीकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. दुष्काळ आणि शेतीच्या मु्द्द्यावर ही भेट झाल्याची माहिती तुपकर यांनी दिली. या भेटी दरम्यान खासदार बंडु जाधव आणि आमदार कैलास पाटील उपस्थित होते.

  • 15 Sep 2023 08:11 PM (IST)

    Cm Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, जीआरही जारी

    मुंबई | गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्ल आहे. मुंबई, राज्यासह देशभरात लगबग सुरु आहे. गणेशोत्सवासाठी 16 ते 1 ऑक्टोबर दरम्यान टोलमाफीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा आज (15 सप्टेंबर) शासन निर्णय काढण्यात आला आहे. सार्वजनित बांधकाम विभागाने हा शासन निर्णय अर्थात जीआर जारी केला आहे.

    टोलमाफीचा शासन निर्णय

  • 15 Sep 2023 07:57 PM (IST)

    Nashik News : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे नाशिकमध्ये दाखल

    थोड्याच वेळात ठाकरे गटाचे नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे नाशिकच्या रेडिसन ब्लु हॉटेल येथे पोहोचणार आहे. आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्या संवाद साधताना दिसणार आहेत.

  • 15 Sep 2023 07:40 PM (IST)

    कॅबिनेट बैठकीबाबत मोठ्या घडामोडी सुरू

    उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीसाठी मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ थोड्याच वेळात संभाजीनगर विमानतळावर दाखल होणार आहेत.

  • 15 Sep 2023 07:25 PM (IST)

    Mumbai News : तांत्रिक समस्येमुळे अप आणि डाऊन हार्बर लोकल गाड्या उशिराने

    वाशी स्टेशनवर 06.30 वाजल्यापासून सिग्नलिंग तांत्रिक समस्येमुळे अप आणि डाऊन हार्बर लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. सिंग्नल तांत्रिक बिघाडात सुधारणा करण्यात आलीये. मात्र,  रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत.

  • 15 Sep 2023 07:14 PM (IST)

    डोंबिवलीत इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकले दोन जण

    डोंबिवलीत धोकादायक इमारत कोसळल्याची घटना घटलीये. ढिगाऱ्यात अडकलेल्या 4 ते 5 जणांना रेस्क्यू करत अग्निशामक दल व पालिका कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले आहे. मात्र इमारतीत 54 वर्षीय दीप्ती लोढाया व 70 वर्षीय अरविंद भाटकर वयोवृद्ध अडकल्याची माहिती मिळत आहे. दोघांना बाहेर काढण्यासाठी आता TDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

  • 15 Sep 2023 07:06 PM (IST)

    Mumbai News : आज होणार लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन

    आज लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन होणार आहे. 350 वा राज्यअभिषेक सोहळा आणि लाल बागच्या राजाचे 90 वर्षे हा योगायोग पाहता या वर्षी लालबागच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा देखावा साकरण्यात आला आहे. मोठ्या संख्येने आज देखील भाविक लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन घेण्यासाठी उपस्थित होताना दिसत आहेत.

  • 15 Sep 2023 06:55 PM (IST)

    आयुष्मान भव मोहिमेला दोन दिवसात मिळालं इतकं यश

    आयुष्मान भव मोहिमेच्या शुभारंभाच्या वेळी दोन दिवसांत आयुष्मान अॅपद्वारे 1,00,000 हून अधिक आयुष्मान कार्ड बनवले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

  • 15 Sep 2023 06:45 PM (IST)

    जयंत पाटील यांनी केलं प्रशांत जगताप पाटलांचं कौतुक

    जयंत पाटील यांनी पुणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं कौतुक केलं आहे. "मी जितका पवारांच्या पाठिशी ठाम नव्हतो, तेवढे जगताप होते. जगतापांच्या सोबतचे सहकारी निघून गेले तरी ते ठाम होते."

  • 15 Sep 2023 06:35 PM (IST)

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांची पंतप्रधानाकडे मागणी

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची विनंती केली आहे.

  • 15 Sep 2023 06:25 PM (IST)

    किम जोंग उन युक्रेनमध्ये वॉन्टेड

    युक्रेनने उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला काळ्या यादीत टाकले आहे. किम जोंग उन युक्रेनसाठी वॉन्टेड असणार आहे. या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासह रशियातील सर्व लोकांचा समावेश आहे.

  • 15 Sep 2023 06:11 PM (IST)

    खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी घालण्याची मागणी

    खासदार आणि आमदार दोषी ठरल्यास त्यांना निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी घालण्याच्या मागणीवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

  • 15 Sep 2023 05:48 PM (IST)

    Dombivli News | डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली

    डोंबिवली | डोंबिवली पूर्व येथील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आलीय. या घटनेनंतर ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. पोलीस, अग्रिशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्याला सुरुवात झालीय.

  • 15 Sep 2023 05:19 PM (IST)

    Mumbai News | मंत्रालयात कार्यरत असलेले दोन पोलीस निलंबित

    मुंबई | मंत्रालयात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. काही शेतकऱ्यांनी मंत्रालयात पहिल्या मजल्यावर लावण्यात आलेल्या जाळीवर जावून आंदोलन केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी सांगितलेली माहिती गांभीर्याने न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

  • 15 Sep 2023 05:17 PM (IST)

    OBC Reservation | धनगर आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक, सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

    अहमदनगर :  धनगर आरक्षणावरून धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  चौंडी येथील उपोषणकर्त्याकडे शासनाचे कोणी फिरकले नाही याच्या निषेधार्थ आंदोलकांकडून सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आलाय. अहमदनगर- सोलापूर महामार्गावर चापडगाव येथे आंदोलकांनी पुतळ्याचे दहन केलं. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला

  • 15 Sep 2023 05:02 PM (IST)

    Cabinet Meeting : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या अख्खं मंत्रिमंडळ

    उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेट दाखल होत आहे. मध्यंतरी ही परंपरा अनेक वर्ष खंडीत झाली होती. आता उद्या मराठवाड्यातील अनेक प्रश्नांना आणि समस्या सोडविण्यासाठी ही बैठक उपयोगी ठरेल. या बैठकीसाठीचे नियोजन युद्धपातळीवर करण्यात आले आहे. अनेक संघटना निवेदन देणार आहेत.

  • 15 Sep 2023 04:43 PM (IST)

    आदित्य ठाकरेंचा दौरा, शेतकऱ्यांना आश्रू अनावर

    Aditya Thakare News : आदित्य ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळी दौऱ्यासाठी आले आहेत. त्यावेळी ठाकरे यांच्यासमोर, तुम्हीच मुख्यमंत्री होणार अशी घोषणा बाजी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना आश्रू अनावर झाले. गंगापूर तालुक्यातील गुरुधानोरा गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी विचारपूस केली.

  • 15 Sep 2023 04:12 PM (IST)

    Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी मतदानावर बहिष्काराचे अस्त्र

    मराठा आरक्षणासाठी 42 गावांनी मतदानावर बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. मतदानावर बहिष्काराचा ठराव या गावांनी केला आहे. 25 गावातील समाज बांधवांनी तहसीलवर मोर्चा काढला आहे. हदगांव तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलन आता पेटले आहे.

  • 15 Sep 2023 04:01 PM (IST)

    Shivsena News :  सोमवारी फैसल्याचा दिवस 

    शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होआर आहे. 18 सप्टेंबर रोजी ही सुनावणी होईल. यामध्ये सुनील प्रभु यांनी 16 आमदारांना अपात्र करावे यासाठी दाखल याचिकेवर सुद्धा सुनावणी होईल.

  • 15 Sep 2023 03:15 PM (IST)

    बॉलिवूडमधील अनेक कलाकार ईडीच्या रडारवर

    मुंबई | ईडीकडून मुंबईसह विविध राज्यांमध्ये 39 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. यात गायिका नेहा कक्कर, अभिनेत्री सनी लिओनी, अभिनेता टायगर श्रॉफ यांसह इतरही काही कलाकारांचा समावेश आहे. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित ही छापेमारी करण्यात आली आहे.

  • 15 Sep 2023 03:00 PM (IST)

    मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरण | सर्व आरोपींना 25 सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

    मालेगाव 2008 बॉम्बस्फोटप्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना जबाब नोंदवण्यासाठी 25 सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. भाजप खासदार आणि या प्रकरणातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वकिलाने न्यायालयात अर्ज करत विनंती केली होती. संसदेचं विशेष सत्र 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान सुरू असल्याने त्यानंतरची तारीख ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने अर्ज स्वीकारत सर्व आरोपींना हजर राहून जबाब नोंदवण्यासाठी 25 सप्टेंबर ही तारीख ठरवली.

  • 15 Sep 2023 02:42 PM (IST)

    गडचिरोली-छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर दोन तासांपासून वाहतूक ठप्प

    गडचिरोली-छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर रस्त्यावर आडवं झाल्यामुळे वाहतूक ठप्प झालं आहे. कोरची तालुक्यापासून सहा किलोमीटर अंतरावर ही वाहतूक ठप्प झालेली आहे. अनेक वाहनं राष्ट्रीय महामार्गावर थांबले असून प्रवाशांना दोन तासांपासून अडचणीचा सामना करावा लागतोय.

  • 15 Sep 2023 01:43 PM (IST)

    शिस्तभंगाचा ठपका, तीन तहसीलदार निलंबित

    शिस्तभंगाचा ठपका! गडचिरोलीत रुजू होण्यास टाळाटाळ करणारे तीन तहसीलदार निलंबित झालेत. महसूल आणि वनविभागाचे अवर सचिव संजीव राणे यांनी काढले निलंबनाचे आदेश दिले. राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागास आणि दुर्गम गडचिरोलीत झालेली पदस्थापना शिक्षा समजून अनेक अधिकारी रुजू होत नाहीत किंवा पदस्थापना बदलून घेतात.मात्र टाळाटाळ करण महागात पडलं आहे.

  • 15 Sep 2023 12:39 PM (IST)

    गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत महाडीक गट आक्रमक

    गोकुळ दूध संघाची 61 वी सर्वसाधारण सभेत सतेज पाटील - महाडीक गटात संघर्ष सुरु झाला आहे. खरे ठरावधारक दूध उत्पादक बाहेर ठेवले असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. विरोधकांनी पोलिसांची तटबंदी भेदून आत प्रवेश केला आहे.

  • 15 Sep 2023 12:17 PM (IST)

    मुंबई - गोवा महामार्गावरुन मनसेचे सायन, षण्मुखानंद हॉल येथे आंदोलन

    मुंबई - गोवा महामार्गाची एक मार्गिका गणपतीआधी सुरु करण्याचे आश्वासन सरकारने न पाळल्याने मनसेचे संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

  • 15 Sep 2023 12:01 PM (IST)

    LIVE UPDATE | अमित शाहांचा संभाजीनगर दौरा रद्द

    अमित शाह यांचा संभाजीनगर दौरा रद्द झाला आहे. ज्यामुळे ठाकरे गटाने निशाणा साधला आहे. 'अमित शाह आम्हाला खूप घाबरतात, त्यामुळे दौरा रद्द केला...' असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

  • 15 Sep 2023 11:27 AM (IST)

    LIVE UPDATE | कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण महिला आघाडी यांच्या वतीने श्रावण सरी या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. कार्यक्रमासाठी रश्मी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून त्यांच्या आगमना आधी शहरात ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे. थोड्याच वेळात कल्याणच्या अत्रे नाट्यगृहात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मतदार संघात कार्यक्रम सुरु होणार आहे.

  • 15 Sep 2023 11:16 AM (IST)

    LIVE UPDATE | पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा ठिय्या

    पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा ठिय्या आंदोलन. सरकारी नोकरीत कंत्राटीकरण नको अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. कंत्राटी नोकरभरती रद्द करा अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. यासाठी विद्यार्थ्यी आंदोलनाला बसले आहेत.

  • 15 Sep 2023 11:02 AM (IST)

    संभाजीनगरच्या बैठकीत चुकीचा खर्च केल्यास जाब विचारणार

    संभाजीनगरच्या बैठकीत चुकीचा खर्च केल्यास जाब विचारणार, असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.

    प्रशासनाने सरकारची चाकरी करू नये असेही ते म्हणाले.

  • 15 Sep 2023 10:46 AM (IST)

    अजित पवारांचं मन त्यांना खातंय - संजय राऊत

    अजित पवारांना त्यांचं मन खातंय, पाप केलंय असं त्यांना वाटतंय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला अजित पवार गैरहजर राहिल्याच्या मुद्यावरून संजय राऊतांनी केली टीका.

  • 15 Sep 2023 10:41 AM (IST)

    शिंदे सरकारचे अंत्यसंस्कार थाटामाटातच करणार - संजय राऊत

    या सरकारला थाटामाटात रहायची खूप आवड आहे. आम्ही या सरकारचे अंत्यसंस्कार थाटामाटातच करणार, असं संजय राऊत म्हणाले.

  • 15 Sep 2023 10:37 AM (IST)

    सरकारमधील मंत्री औटघटकेचे सुभेदार - संजय राऊत

    सरकारमधील मंत्री औटघटकेचे सुभेदार आहेत. उद्याच्या बैठकीवर आमचं लक्ष आहेच. पण बैठकीनंतरच्या पोपटपंचीवर जास्त लक्ष आहे, असं संजय राऊत म्हणाले.

  • 15 Sep 2023 10:33 AM (IST)

    पंतप्रधानांना हृदय नावाची गोष्ट आहे का ?

    पंतप्रधानांना हृदय नावाची गोष्ट आहे की नाही ? संजय राऊत यांनी खडा सवाल विचारला आहे.

    बेगडी सनातनवाल्यांनी शहीदांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं का ? असेही ते म्हणाले.

  • 15 Sep 2023 10:30 AM (IST)

    शिंदे, गोगावलेंची निवड बेकायदेशीर - संजय राऊत

    शिंदे, गोगावले यांची निवड बेकायदेशीर असल्याने सरकारही बेकायदेशीर आहे. सरकारने घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरणारे, असं संजय राऊत म्हणाले.

  • 15 Sep 2023 10:28 AM (IST)

    संजय राऊत यांचे सरकारवर टीकास्त्र

    एकीकडे सीमेवर आपले जवान शहीद होत आहेत आणि दुसरीकडे भाजप कार्यालयात फुलं उधळली जात आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

  • 15 Sep 2023 10:25 AM (IST)

    देशाचा आणि मराठवाड्याचा अमृत महोत्सव फक्त कागदावरच - संजय राऊत

    शहांच्या दौऱ्यांसाठी जरांगे पाटील यांचं उपोषण संपवलं, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

  • 15 Sep 2023 10:22 AM (IST)

    मुंबईकरांच्या लाडक्या डबलडेकर बेस्ट बसचा आजचा शेवटचा दिवस

    मुंबईकरांची लाडकी असलेली डबलडेकर बेस्ट बस आज मुंबईकरांचा निरोप घेणार असून उद्यापासून जुनी डबल डेकर रस्त्यावर दिसणार नाही. या पार्श्वभूमीवर मरोळ आगारात असलेल्या शेवटच्या बसला आज सजवण्यात आलं असून शेवटच्या दिवशी गाडीचं औक्षणही करण्यात आलं.

    आता अत्याधुनिक असलेली इलेक्ट्रिक बस मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहे.

  • 15 Sep 2023 10:12 AM (IST)

    उपोषण मागे घेतलं तरी मनोज जरांगेंच आंदोलन सुरूच

    मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं असलं तरी त्यांचं आंदोलन सुरूच आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे.

  • 15 Sep 2023 10:06 AM (IST)

    वाशिममध्ये नीलगाईंचा हैदोस, शेतकरी झाले त्रस्त

    वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन पीक आता शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे मात्र नीलगाईंमुळं शेतकरी त्रस्त झाले आहेत. नील गाईंचे कळप येऊन तयार झालेले पीक फस्त करत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. वन विभागाने नीलगाईंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

  • 15 Sep 2023 09:58 AM (IST)

    Maharashtra News | भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय

    पंढरपूरमधील सांगोला शहरासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान पाणी सोडण्यात येणार आहे. उजनीतून भीमा नदीत दीड टीएमसी पाणी सोडले जाणार असल्याचे माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.

  • 15 Sep 2023 09:46 AM (IST)

    Maharashtra News | राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्हाबाबत ६ ऑक्टोंबरला सुनावणी

    राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्हाबाबत ६ ऑक्टोंबरला निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे. यावेळी दोन्ही गटाकडून आपली बाजू मांडण्यात येणार आहे.

  • 15 Sep 2023 09:33 AM (IST)

    Maharashtra News | शरद पवार यांच्या सभेला दिलीप वळसे जाणार

    आंबेगावमध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेला मी आणि माझे कार्यकर्ते जाणार आहे. तसेच आपण शरद पवार यांचे स्वागतही करणार असे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

  • 15 Sep 2023 09:20 AM (IST)

    Maharashtra News | गोकुळ सभेच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त

    कोल्हापुरात गोकुळ सभेच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीतील पशुखाद्य कारखान्याच्या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बैठकीला सभासदांची तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे. सभेसाठी पाण्याची बाटली, नेत्यांचे फलक असे साहित्य नेण्यास बंदी असणार आहे.

  • 15 Sep 2023 09:08 AM (IST)

    Maharashtra News | संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक

    तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजी नगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा 75 वा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे 16 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या प्रश्नांसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात.

  • 15 Sep 2023 08:54 AM (IST)

    Nipah virus | केरळमध्ये निपाह व्हायरसचा धुमाकूळ

    केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोझीकोडेमध्ये एका 39 वर्षीय व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली आहे.

  • 15 Sep 2023 08:42 AM (IST)

    Asia cup 2023 | श्रीलंका आशिया कपच्या फायनलमध्ये

    श्रीलंकेने आशिया कप 2023 स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता 17 सप्टेंबरला टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात फायनल होणार आहे. श्रीलंकेने थरारक सामन्यात पाकिस्तानवर कसा विजय मिळवला ते वाचा सविस्तर

  • 15 Sep 2023 08:22 AM (IST)

    Ajit pawar | 'दीड लाख जागांसाठी भरती प्रक्रिया राबवतोय'

    "शासकीय रुग्णालयात स्टाफ कमी आहे हे खरं आहे. आपण दीड लाख जागांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहोत. कारण नसताना गैरसमज करु नका. काहीही करुन आमच्यावर बिल फाडण्याचा प्रयत्न आहे" असं अजित पवार म्हणाले.

  • 15 Sep 2023 08:19 AM (IST)

    Ajit pawar | कंत्राटी भरतीच्या मुद्यावर अजित पवार काय म्हणाले?

    "विरोधकांना उकाळ्या फुटतात, काहीही व्हॉट्सअपवर शेअर करतात. कंत्राटी भरतीच्या मुद्यावर मला विनाकारण ट्रोल केलं जातय. नवीन भरती होईपर्यंत कंत्राटी भरती असा मागच्या काळातला निर्णय आहे" असं अजित पवार म्हणाले.

  • 15 Sep 2023 08:15 AM (IST)

    Ajit pawar | अमित शाह यांचा संभाजी नगर दौरा रद्द

    "कामाच्या व्यापामुळे अमित शाह यांचा संभाजी नगरचा दौरा रद्द झाला आहे. कॅबिनेट बैठकीसाठी आज मी संभाजी नगरला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्या संभाजीनगरला येतील" असं अजित पवार म्हणाले.

  • 15 Sep 2023 08:00 AM (IST)

    Nashik : नाशिककरांसाठी खूश खबर, पालिकेतील 671 पदे भरली जाणार

    राज्य शासनाने मान्यता दिलेल्या महापालिकेतील 671 पदांच्या भरती प्रक्रियेला वेग आला आहे. दिवाळीपूर्वीच महापालिकेतील नोकरभरती होण्याची शक्यता आहे. परीक्षेचे स्वरूप तयार करणअयात आले असून मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात पद भरतीची जाहिरात निघणार आहे.

  • 15 Sep 2023 07:47 AM (IST)

    sharad pawar : शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर; कारण काय?

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज एकाच मंचावर येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळाच्या बैठकीनिमित्त शरद पवार आणि अजितदादा एकत्रयेणार आहेत. यापूर्वी व्हिएसआयच्या बैठकीकडे अजित पवारांनी पाठ फिरवली होती. आज होणाऱ्या या बैठकीला जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, रोहित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.

  • 15 Sep 2023 07:30 AM (IST)

    rain in pune : पुण्यासह राज्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा अंदाज काय?

    पुण्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. त्यातच मान्सून दक्षिणेकडे सरकलेल्याने राज्यातच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

    पूर्व विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

  • 15 Sep 2023 07:23 AM (IST)

    Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाची आज पहिली झलक; भाविक दर्शनासाठी आतूर

    लालबागच्या राजाची आज पहिली झलक पाहायला मिळणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता लालबागच्या राजाचं फोटोसेशन पार पडणार आहे. यावेळी भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकही उत्सुक झाले आहेत.

Published On - Sep 15,2023 7:11 AM

Follow us
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.