माझ्यावर बायोपिक आला तर… देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बायोपिकचं नाव; गाण्याबद्दलही मोठा खुलासा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलमध्ये झालेल्या सभेत बायोपिकचे नाव देखील सांगितले आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, येत्या 15 तारखेला राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीला तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचारही अंतिम टप्प्यात पोहोचल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पनवेल येथे सभा झाली. या सभेत त्यांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक आणि गाण्यांच्या आवडीवर देखील भाष्य केले. ते काय म्हणाले जाणून घ्या…
काय असणार बायोपिकचे नाव?
देवेंद्र फडणवीस पनवेल येथे झालेल्या सभेत अनेक विषयांवर बोलले. दरम्यान, त्यांनी बायोपिकविषयी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले. बायोपिकविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भविष्यात माझा बियोपीक आला तर आपला देवा भाऊ हे नाव असावा. घरी संगीतावर चर्चा होते. मला हजारो गाणी पाठ आहेत. मी बेसुरा आहे अशी अमृता बोलते.
या सभेत ते म्हणाले की, जिजाऊ यांनी स्वराज्य तयार केलं. स्वामी विवेकानंद यांचा अमेरिका तसेच विविध देशांनी त्याचा बोध घेतलाय. स्वामी विवेकानंद यांनी तरुण पिढीला सांगितलं होत 21व शतक युवकांचं असेल ते आता झालाय. भविष्यातील तिसरी मुबंई आपण तयार करणार आहोत ती पनवेल असेल. एअरपोर्टला आपण भविष्यात दि बा पाटील हे नाव देणार आहोत. या ठिकाणी युनिवससिटी आपण तयार करणार आहोत. आपण लवकरच दि बा पाटील हे नाव विमानतलाला देणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले, पनवेलमध्ये वाहतूककोंडी होते. कळंबोली जनक्शन आपणं तयार करतोय वेगवेगळे पर्याय शोधतोय. तसेच मेट्रो नेटवर्क आपण हाती घेतलंय. मेट्रोने आपण अनेक शहर जोडणार आहोत. इन्फ्रास्तक्चरच काम आपण हाती घेतलं आहे. नवी मुबंई एअरपोर्ट ते छत्रपती महाराज एअरपोर्ट आपण मेट्रो सुरु करणार आहोत. सगळे विकास एअरपोर्टमुळे देखील होतात. वाढवणबंदरला आता तिसरं एअरपोर्ट आपण करणार आहोत. मोदीजी यांचं सरकार आलं आणि नवी मुबंई एअरपोर्ट ला काही परवानगी बाकी होत्या त्या झाल्या आणि आज विमानतळ सुरु झालं.
