AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra CM Swearing : महायुतीचा ग्रॅंड शपथविधी सोहळा, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांची उपस्थिती, फडणवीस- अजितदादांच्या नावावर नवा रेकॉर्ड

Maharashtra New CM Devendra Fadnavis Swearing : महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत. त्याचसोबत अनेक दिग्गजांना सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या डिटेल्ससाठी वाचा सविस्तर बातमी....

Maharashtra CM Swearing : महायुतीचा ग्रॅंड शपथविधी सोहळा, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांची उपस्थिती, फडणवीस- अजितदादांच्या नावावर नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीस, एनाथ शिंदे, अजित पवार Image Credit source: ANI
| Updated on: Dec 05, 2024 | 8:26 AM
Share

महाराष्ट्रात आजपासून ‘देवेंद्र पर्वा’ला सुरुवात होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असणार आहेत. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

महायुतीकडून राज्यपालांना पत्र देत सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, हे एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलं नाही. संध्याकाळपर्यंत कळेल असं म्हटलं. रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात ‘वर्षा’ बंगल्या पाऊण तास चर्चा झाली. यावेळी गृहमंत्रिपदाबाबतही चर्चा झाली असल्याची माहिती आहे. मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? हे अद्याप समोर आलेलं नाही.

फडणवीस- अजितदादांच्या नावावर रेकॉर्ड

देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. शरद पवारांनंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस त्यांना गृहखात्यासोबतच इतर खाती सांभाळण्याचा अनुभव आहे. तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सहावेळा राज्याचे उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार हे पहिले नेते आहेत. या आधी त्यांनी अर्थ खातं आणि जलसंपदा खात्याचा कारभार सांभाळलेला आहे. या शपथविधी सोहळ्याआधी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

फडणवीसांच्या शपथविधीसाठी आझाद मैदान सज्ज

शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर तीन व्यासपीठं उरण्यात आली आहेत. मुख्य व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची आसनव्यवस्था असणार आहे. आझाद मैदानात पालिका प्रशासनाकडून सेवा- सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत, मैदानाच्या आजूबाजूच्या रस्त्यांची डागडुजी, वाहतूक चिन्हे आणि रेषांची रंगरंगोटी मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.