Maharashtra Breaking News Live : वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई हायकोर्टात धाव, मुंबई हायकोर्टाचा बाजू ऐकून घेण्यास नकार

| Updated on: Mar 30, 2023 | 6:04 AM

Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live :  वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई हायकोर्टात धाव, मुंबई हायकोर्टाचा बाजू ऐकून घेण्यास नकार
Maharashtra Live NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई : सावरकरांवरील वादावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा काँग्रेस नेत्यांना सल्ला. सावरकर मुद्द्यावरून काँग्रेस बॅकफूटवर येण्याची शक्यता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर आता लोकसभा अध्यक्षांवरच अविश्वास प्रस्ताव आणण्याची काँग्रेसची तयारी. कोरोनाचा कहर सुरूच. आता दिल्लीसह महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. यासह देशविदेशातील बातम्या जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Mar 2023 09:15 PM (IST)

    भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ पुण्यात बॅनरबाजी

    पुणे : 

    – भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ पुण्यात बॅनरबाजी,

    – माजी सैनिक सूर्यकांत पवार यांच्या मुलाने केली पडळकरांच्या विरोधात बॅनरबाजी,

    – देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड?बॅनरच्या माध्यमातून संतप्त सवाल,

    – पवार महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, पडळकरांनी इंदापूरच्या सभेत केलं होतं वक्तव्य

  • 29 Mar 2023 08:57 PM (IST)

    कोरेगाव भीमा चौकशी आयोगास मुदतवाढ

    पुणे : 

    – कोरेगाव भीमा चौकशी आयोगास मुदतवाढ,

    – चौकशी आयोगास तीन महिन्यांची मुदतवाढ,

    – 30 जून 2023 पर्यंत कोरेगाव भीमा चौकशी आयोगास मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय,

    – 31 मार्चला आयोगाची मुदत संपत होती,

    – काही साक्षीदारांची चौकशी करायची असल्यामुळे आयोगास मुदतवाढ

  • 29 Mar 2023 06:22 PM (IST)

    वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई हायकोर्टात धाव, मुंबई हायकोर्टाचा बाजू ऐकून घेण्यास नकार

    लाईव्ह : 

    बार काऊंसिलनं वकिलीची सनद रद्द केल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई हायकोर्टात धाव

    सदावर्ते यांनी स्वत: बाजू मांडत हायकोर्टाला दिली माहिती

    मात्र त्यांची बाजू ऐकण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

    सदावर्ते यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी देत त्यांना त्यांच्या वकिलामार्फात कोर्टात बाजू मांडण्याचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाचे निर्देश

  • 29 Mar 2023 05:44 PM (IST)

    पीएफवरील व्याज दरवाढीचा किती झाला फायदा

    पीएफवरील व्याजात यंदा कोणतीही कपात नाही

    निवडणुकीपूर्वी खेळली मोठी खेळी

    पण सर्वसामान्य वेतनदाराला किती होणार फायदा

    या व्याजदर वाढीने वर्षाला किती मिळेल तुम्हाला व्याज

  • 29 Mar 2023 04:52 PM (IST)

    आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक न केल्यास मोठा दंड

    दोन्ही कार्डची मुदतीत जोडणी न केल्यास आर्थिक भुर्दंड

    या लोकांना या प्रक्रियेतून मिळाली सूट

    सध्या एक हजार रुपये दंड भरुन करता येईल जोडणी

    आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी दिली मुदतवाढ, वाचा बातमी 

  • 29 Mar 2023 03:56 PM (IST)

    आमदार सतेज पाटील गटाला धक्का

    कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैद्य ठरले आहेत. नियमानुसार ऊस न दिल्याचा ठपका ठेवत अर्ज अवैध ठरवले आहेत. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय सतेज पाटील यांनी जाहीर केला.

  • 29 Mar 2023 03:47 PM (IST)

    वैभव कदम यांच्या आत्महत्येनंतर मोहित कंबोज यांचे ट्विट

    या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी

    ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे मोहीत कंबोज यांचे म्हणणे

    तर हे प्रकरण मनसूख हिरेन 2.0 असल्याचा कंबोज यांचा दावा

    मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी

    हायप्रोफाइल व्यक्तिला वाचवण्यासाठीसाठी सामान्य व्यक्तीचा बळी गेल्याचा आरोप

  • 29 Mar 2023 03:34 PM (IST)

    संजय शिरसाट यांच्या समर्थनार्थ शेकडो महिला पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल

    सुषमा अंधारे प्रकरणानंतर संभाजी नगर जिल्ह्यात शेकडो महिला पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल

    संजय शिरसाट यांच्या समर्थनाचे बॅनर हातात घेऊन महिला दाखल

  • 29 Mar 2023 03:30 PM (IST)

    नाशिक | त्र्यंबक रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयात ठेकेदार आक्रमक

    500 कोटींची बिले थकीत असूनही शासनाने केवळ 45 कोटी रुपये पाठवल्याचा दावा

    गेल्या तीन वर्षांपासून रक्कम मिळत नसल्याने जवळपास 200 ठेकेदार झाले आक्रमक

    सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता औटी यांच्या कार्यालयात ठेकेदारांचा गदारोळ

    ठेकेदारांची बांधकाम विभागाच्या गेटवर घोषणाबाजी

  • 29 Mar 2023 03:29 PM (IST)

    कोल्हापूर | आमदार सतेज पाटील गटाला मोठा धक्का

    कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा धक्का

    आमदार पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज छाननीत ठरले अवैद्य

    नियमानुसार ऊस न घातल्याचा ठेवला आहे ठपका

    या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा सतेज पाटील यांचा निर्णय

  • 29 Mar 2023 03:27 PM (IST)

    वैभव कदम यांच्या आत्महत्येनंतर मोहित कंबोज यांचं ट्विट

    या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

    ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं मोहीत कंबोज यांचं म्हणणं

    हे प्रकरण मनसूख हिरेन 2.0 असल्याचं कंबोज म्हणाले

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी

  • 29 Mar 2023 12:37 PM (IST)

    भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं निधन

    वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    बापट यांची सकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

    लता मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर सुरू होते उपचार

  • 29 Mar 2023 12:27 PM (IST)

    अंबरनाथ शहरात कोरोना टेस्टिंगच बंदच

    शहरात अद्याप एकही कोरोना रुग्ण नाही

    अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची माहिती

    गरज पडल्यास टेस्टिंग आणि फिव्हर क्लिनिक सुरू करणार

  • 29 Mar 2023 12:27 PM (IST)

    भाव कमी झाल्याने पुण्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

    कांदा बाजार भाव कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पुणे - नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन

    खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उपकेंद्र चाकण येथे कांद्याला 600 रू भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त

    पुणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

  • 29 Mar 2023 12:11 PM (IST)

    अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच नाफेड मार्फत सुरू असलेली लाल कांदा खरेदी बंद

    नाशिक : लासलगाव येथील शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या केंद्रावर सुरु असलेली लाल कांद्याची खरेदी झाली बंद

    कांदा खरेदी बंदच्या परिणामामुळे कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याच्या शुक्रवारच्या तुलनेत आज तीनशे रुपयांची घसरण

    कांद्याचे बाजार भाव 851 रुपये पर्यंत आले खाली

    लाल कांद्याला जास्तीजास्त 851 रुपये, कमीतकमी 300 रुपये तर सरासरी 650 रुपये प्रतिक्विंटल ला दर मिळाला

  • 29 Mar 2023 11:57 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बापट यांच्या प्रकृतीची माहिती

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोनवरून घेतली माहिती

    गिरीश बापटांच्या तब्येतीची केली विचारपूस

    गिरीश बापटांची प्रकृती चिंताजनक

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून योग्य उपचार करण्याच्या हॉस्पिटल प्रशासनाला सूचना

  • 29 Mar 2023 11:32 AM (IST)

    गव्हाचे भाव राहणार आटोक्यात

    अवकाळी पावसाने नाही बिघडणार गणित!

    बेमौसमी पावसाने पिकांचे मोठे नुकसान

    गव्हाच्या उत्पादनावर पण होणार परिणाम

    भाव आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न

    केंद्र सरकारचा हा आहे खास प्लॅन, वाचा बातमी 

  • 29 Mar 2023 11:20 AM (IST)

    नवी दिल्ली | विरोधकांच्या बैठकीत पुन्हा मतांतर

    आजच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गट आणि तृणमूलचे खासदार अनुपस्थित

    मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावली होती बैठक

    राहुल गांधी आणि सावरकर यांच्या बाबतचा संभ्रम दूर झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितल्यानंतरही दोन्ही पक्षांचे खासदार बैठकीला अनुपस्थित

  • 29 Mar 2023 11:12 AM (IST)

    महाविकास आघाडीच्या सभेची 60 टक्के तयारी पूर्ण

    छत्रपती संभाजी नगर : मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 60 टक्के तयारी पूर्ण

    स्टेज बॅरिगेटिंग लायटिंग चे काम पूर्ण

    2 एप्रिल रोजी रविवारी होणार महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा

    सभेसाठी महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची असणार उपस्थिती

  • 29 Mar 2023 11:11 AM (IST)

    गिरीश बापटांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देण्यासाठी रुग्णालय प्रशासन मेडिकल बुलेटिन काढणार

    गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती

    दीनानाथ रुग्णालय प्रशासन थोड्याच वेळात मेडिकल बुलेटिन काढणार

  • 29 Mar 2023 11:10 AM (IST)

    राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना पुन्हा खासदारकी बहाल

    सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्वीच लोकसभा सचिवालयाचा निर्णय

    मोहम्मद फैजल यांना पुन्हा खासदारकी बहाल

    दहा वर्षांची शिक्षा झाल्यानंतर खासदारकी रद्द करण्यात आली होती

    आज सर्वोच्च न्यायालयात होणार होती सुनावणी

  • 29 Mar 2023 10:52 AM (IST)

    खासदार गिरीश बापट यांची तब्येत बिघडली

    पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

    खासदार गिरीश बापट यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती

  • 29 Mar 2023 10:46 AM (IST)

    एका अहवालानंतर पुन्हा जोरदार झटका

    एक रिपोर्ट आणि 50 हजार कोटी स्वाहा!

    अनेक शेअर्समध्ये झाली मोठी पडझड

    उद्योजक गौतम अदानी यांचे काय असेल पुढचे पाऊल

    गुंतवणूकदारांनी काय घ्यावी काळजी, वाचा बातमी 

  • 29 Mar 2023 10:37 AM (IST)

    संपूर्ण मुंबईत 31 मार्चपासून महिनाभर 15 टक्के पाणीकपात लागू

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला गळती होत असल्याने दुरुस्तीकामासाठी हा निर्णय

    ठाणे येथे कुपनलिकेच्या खोदकामामुळे जलबोगद्याला हानी

    मुंबई पालिकेच्या वतीने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात

    जलबोगदा पाणीगळती दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार

    मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे शहरास होणाऱ्या प्रक्रियायुक्त पाणीपुरवठ्यात 31 मार्चपासून अंदाजे 30 दिवस 15 टक्के कपात

  • 29 Mar 2023 10:31 AM (IST)

    जालनात ठाकरे गटाकडून भाजपला धक्का

    जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील कडेगाव विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक पार पडली. या सोसायटीमध्ये महाविकास आघाडीने 13 पैकी 13 जागा जिंकत भाजपचा सुफडा साफ केला. निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांच्या उपस्थितीत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती.

  • 29 Mar 2023 10:04 AM (IST)

    युपीआय पेमेंटसाठी मोजा पैसा

    केंद्र सरकारचा ग्राहकांना मोठा झटका

    दोन हजारांपेक्षा अधिक व्यवहारांवर द्यावे लागेल शुल्क

    सरकारची तिजोरी भरणार, तुमचा खिसा कापल्या जाणार

    युपीआय पेमेंट करताना आता बसले इतका फटका

  • 29 Mar 2023 10:04 AM (IST)

    गडचिरोली सिरोंचा तालुक्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी

    गडचिरोली सिरोंचा तालुक्यातील मोयबिनबेटा गावात ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्याने 40 महिला मजूर जखमी.

    मिरची तोडणीचे काम करून परत येत असताना काल रात्रीच्या सुमारास घडली घटना.

    38 महिला मंजूर किरकोळ जखमी तर बारा महिला मजुरांना गंभीर दुखापत झालेली आहे.

    गंभीर झालेल्या महिला मजुरांना तेलंगणा राज्यातील मंचरीयाल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

    रेगुंटा पिरमिळा गावातून मोबिनपेटा गावाला मिरची तोडणीच्या कामासाठी गेले होतेय

    दुर्गम भागातील अनेक छोट्या गावातील मंजूर मिरची तोडणीच्या कामासाठी मोठ्या गावात जात असतात.

    चालकाचं दुर्लक्ष झाल्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • 29 Mar 2023 10:00 AM (IST)

    महिला खेळाडूंकडे सेक्सची मागणी, कोचची क्लिप व्हायरल, टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूला दिलय ट्रेनिंग

    जबानी अजून नोंदवण्यात आलेली नाही. कारण डॉक्टरांनुसार ते अजून बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. वाचा सविस्तर....

  • 29 Mar 2023 09:57 AM (IST)

    नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात बॅनरबाजी

    युवासेनेकडून संजय राऊत यांचे बॅनर लावून निषेध

    बॅनरवर एका बाजुने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो तर दुसरीकडे संजय राऊत आणि राहूल गांधी यांचा फोटो

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने अपमान होत असल्याचा आरोप

    हेच खरे गद्दार म्हणत काढला चिमटा

  • 29 Mar 2023 09:26 AM (IST)

    MS Dhoni संदर्भात CSK च्या चाहत्यांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी

    IPL 2023 CSK News : मैदानात जे दृश्य दिसलं, त्यामुळे CSK च्या टीम मॅनेजमेंटला नक्कीच घाम फुटू शकतो. वाचा सविस्तर.....

  • 29 Mar 2023 09:23 AM (IST)

    मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कुपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याने दुरुस्तीकामासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई पालिकेच्या वतीने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ातही कपात करण्यात आली आहे. जलबोगदा पाणीगळती दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे शहरास होणाऱ्या प्रक्रियायुक्त पाणीपुरवठय़ात ३१ मार्चपासून अंदाजे ३० दिवस १५ टक्के कपात करण्यात येणार आहे.

  • 29 Mar 2023 09:18 AM (IST)

    सोने-चांदीचा सूर बदलला

    आज चला सोने-चांदी खरेदीला

    सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात घसरण

    गेल्या काही दिवसांपासून सोन्यानं घेतली होती उसळी

    चांदीने मागील रेकॉर्ड केले होते इतिहासजमा

    आज, बुधवारी चांदीच्या किंमतीत झाली पुन्हा घसरण

    मिस्ड कॉलवर जाणून घ्या भाव

  • 29 Mar 2023 09:14 AM (IST)

    कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचा आज दिक्षांत समारंभ 

    कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचा आज 59 वा दिक्षांत समारंभ

    राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असणार

    66457 स्नातकांना पदवीप्रदान केली जाणार

    यंदाही पदवीधर होण्यात मुलींची आघाडी

    यंदा 33785 विद्यार्थीनी पदवी स्वीकारणार

    राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात पार पडणार दिक्षांत समारंभ

  • 29 Mar 2023 09:12 AM (IST)

    शिल्पा शेट्टी काही वेळात छत्रपती संभाजी नगर विमानतळावर येणार

    शहरातील खाजगी कार्यक्रमासाठी येणार विमानतळावर

    विमानतळावर होणार शिल्पा शेट्टीचं स्वागत

    जवळपास चार तास शिल्पा शेट्टी थांबणार छत्रपती संभाजी नगर शहरात

    खाजगी विमानाने शिल्पा शेट्टी विमानतळावर होणार दाखल

  • 29 Mar 2023 09:04 AM (IST)

    पुण्यात आज भारतीय सैन्य दलाचा युद्ध सराव

    पुणे : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडणार सराव

    पुण्यातील औंध मिलट्री स्टेशन येथे पार पडणार दोन्हीं देशाच्या सैन्य दलात संयुक्तिक युद्ध सराव

    गेल्या ८ दिवसांपासून सुरू होता युद्ध सराव

    याच युद्ध सरावाची सांगता आज राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होत आहे

  • 29 Mar 2023 08:49 AM (IST)

    सांगलीत चंकी पांडेचा जलवा

    "ओ लाल दुपटे वाली तेरा नाम तो बता,,, या गाण्यावर ठेका धरत प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे यांनी सांगलीकरांना दाखवला आपला जलवा,,, चंकी पांडे हे नाव कसे पडले याचा किस्सा सांगत सांगली करासाठी ""गणपती बाप्पा मोरया"" म्हणत सांगलीकराना शुभेच्छा दिल्या

  • 29 Mar 2023 08:42 AM (IST)

    कच्चा तेलाच्या किंमती भडकल्या

    बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा मोठा परिणाम

    कच्चा तेलाने महागाईच्या आगीत ओतले तेल

    पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय झाला परिणाम

    आज कोणत्या शहरात भाव काय, जाणून घ्या

  • 29 Mar 2023 08:31 AM (IST)

    नाशिक | सावरकर वादाचे पडसाद नाशिकमध्ये

    शिंदे गटाकडून नाशिकमध्ये बॅनरबाजी

    'आम्ही सारे सावरकर'चे लागले बॅनर

    सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत जाणारे खरे गद्दार असा उल्लेख

    नाशिकमध्ये सावरकरांवरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमने सामने

  • 29 Mar 2023 08:14 AM (IST)

    पुण्यात आज भारतीय सैन्य दलाचा युद्ध सराव

    भारत आणि आफ्रिकेतील २३ देशांमध्ये पुण्यात पार पडत आहे युद्ध सराव

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडणार सराव

    पुण्यातील औंध मिलट्री स्टेशन येथे पार पडणार दोन्हीं देशाच्या सैन्य दलात संयुक्तिक युद्ध सराव

    गेल्या ८ दिवसांपासून सुरू होता युद्ध सराव

  • 29 Mar 2023 08:10 AM (IST)

    सप्तशृंगी गडावर आढावा बैठक

    देवीच्या स्वयंभू पीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर 30 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान होत असलेल्या चैत्रोत्सवयाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडावर सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थित आढावा बैठक पार पडली. चैत्रोत्सव काळात खान्देशातून लाखो भाविक दर्शनासाठी पायी गडावर पायी येतात. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच कायदा सुव्यवसेसह भाविकांना मूलभूत सुविधा देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

  • 29 Mar 2023 08:08 AM (IST)

    निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

    निवडणूक आयोगाची आज सकाळी साडेअकरा वाजता पत्रकार परिषद

    कर्नाटक विधानसभा निवडणुकांची आज होणार घोषणा

  • 29 Mar 2023 08:05 AM (IST)

    शिष्यवृत्ती योजनेचं 100 टक्के वाटप

    पुणे महापालिकेनं गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचं केलं 100 टक्के वाटप.

    दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा.

    जवळपास 15 कोटी 8 हजार 669 विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा.

    दहावीसाठी मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावी साठी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

  • 29 Mar 2023 08:03 AM (IST)

    Mumbai Indians : Rohit sharma ला मिळणार आराम, 'हा' खेळाडू करणार मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप

    Mumbai Indians च्या फॅन्सना निराश करणारी मोठी बातमी. वाचा सविस्तर....

  • 29 Mar 2023 07:54 AM (IST)

    शिर्डीत रामनवमी उत्सवाला भक्तीमय‌ वातावरणात सुरूवात

    शिर्डी : तिन दिवस साजरा होतो रामनवमी उत्सव

    उत्सवाच्या पार्श्वभुमीवर साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई

    साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल

    रामनवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

  • 29 Mar 2023 07:29 AM (IST)

    पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरच्या टोलमध्ये आता वाढ होणार

    पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर टोलमध्ये आता 18 टक्क्यांनी होणार वाढ

    कंत्राटदारचा खर्च निघून गेल्या सव्वातीन वर्षात 70 कोटी रुपये जमा झाले आहेत

    या संदर्भात जनहित याचिका हायकोर्टात प्रलंबित आहेत

    यावर 5 एप्रिलला सुनावणी होणार. आहे

    मात्र 18 टक्क्यांची वाढ होणार असल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे

  • 29 Mar 2023 07:07 AM (IST)

    महाविकास आघाडीच्या सभेसाठी ठाकरे गटाचा मॉर्निंग वॉक सुरू

    संभाजी नगर जिल्ह्यातील गारखेडा परिसरातील विभागीय स्टेडियमवर ठाकरे गटाचा मॉर्निंग वॉक

    सभेला लाखोंची गर्दी जमवण्यासाठी मॉर्निंग वॉकमधून शिवसेनेचे आवाहन

    स्टेडियमवर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांमध्ये शिवसेनेचा प्रचार सुरू

    मॉर्निंग वॉक करत ठाकरे गटाचा सभेसाठी प्रचार सुरू

  • 29 Mar 2023 06:26 AM (IST)

    अंध दाम्पत्याला रेल्वेच्या हमालांनी लुटलं

    अंबरनाथ रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार

    पोलिसांचाही हमालांच्या लुटीत वाटा असल्याचा आरोप

    आधी काठी चोरली, मग अंध पती रेल्वे रुळात पडला

  • 29 Mar 2023 06:23 AM (IST)

    शिंदे गटाला सोबत घेतल्यामुळे भाजपचं रेटिंग घसरलंय

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भाजप आणि शिंदे गटावर टीका

    जयंत पाटील यांनी जळगावात भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केलंय

    भाजपला राज्यातली जनताच त्यांची जागा दाखवेल

    शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरेंना जनतेचा किती पाठिंबा आहे हे मालेगावच्या सभेत दिसून आलंय

    शिंदे गट भाजपसोबत गेल्यामुळे शिंदे गटाचं तर रेटिंग कमीच आहे पण असंगाशी सांग केल्यामुळे भाजपचं पण रेटिंग लोकप्रियता घसरली आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केलीय

  • 29 Mar 2023 06:21 AM (IST)

    आई एकविरा देवीच्या माहेरघरात रंगला भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा

    महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला कार्ल्यात सुरुवात झाली आहे

    षष्टीच्या दिवशी आई एकविरा देवीचे माहेरघर असलेल्या देवघरात देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात

    मुंबई, रायगड, कोकण, तळकोकण भागातून आलेल्या आई एकविरा देवीच्या पालख्या याठिकाणी भाऊ काळभैरवनाथाची भेट घेण्यासाठी आल्या होत्या

    रात्री पावणे आठ वाजता भैरवनाथ महाराजांची आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली

    कोळी, आग्री समाजातील अनेक भाविक आणि पालख्या देवघरात दाखल झाल्याने देवघरचा परिसर गजबजला होता

    पालखी सोहळ्यानंतर भाविकांनी एकविरा देवी मंदिराकडे कूच केली

  • 29 Mar 2023 06:18 AM (IST)

    अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी अनिक्षा जयसिंघानी अज्ञातस्थळी रवाना?

    अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीची आज कारागृहातून सुटका झाली

    अनिक्षा डीबी मार्ग पोलीस ठाण्यातून बाहेर पडली

    मात्र तिला ज्या घरातून अटक करण्यात आली होती, त्या उल्हासनगरच्या घरी ती आलेलीच नाही

    या घराला कुलूप लागलेलं असून दारावर अनिल जयसिंघानीच्या नावाने पोलिसांची नोटीस लावलेली आहे

    त्यामुळे अनिक्षा माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता आहे

  • 29 Mar 2023 06:16 AM (IST)

    पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटात तुफान दगडफेक

    दोन गटात तुफान दगडफेक झाल्याने जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात तणावाचे वातावरण

    अज्ञात जमावाकडून पाळधी पोलीस स्टेशनवरही दगडफेक

    पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने टळला अनर्थ, पाळधी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात....

    गावात तणावाचे वातावरण, पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

    एका पोलिसासह तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे

Published On - Mar 29,2023 6:13 AM

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.