AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सून योजना, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, काय आहे खास?

या योजनेचा उद्देश सुना आणि सासू यांच्यातील सकारात्मक संबंध निर्माण करणे हा आहे. या योजनेत समुपदेशन आणि गरजेनुसार इतर मदत समाविष्ट आहे. राज्यभरातील शिवसेना शाखाद्वारे ही मदत उपलब्ध करून दिली जाईल.

लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सून योजना, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, काय आहे खास?
eknath shinde
| Updated on: Aug 18, 2025 | 8:52 AM
Share

गेल्या काही महिन्यांपासून घरगुती हिंसाचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यात ‘लाडकी बहीण योजने’च्या यशानंतर आता ‘लाडकी सून योजना’ सुरू करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच ठाण्यात या योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. ज्या सुनांचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक किंवा मानसिक अत्याचार होतात, त्यांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एक हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ठाण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदेंनी लाडकी सून योजना सुरु करत असल्याचे जाहीर केले. ज्याप्रकारे घरांमध्ये लाडकी मुलगी असते पण लाडकी सून मात्र नसते, अशा विचारधारेला छेद देऊन प्रत्येक सून ही लाडकीच असली पाहिजे, या उद्देशाने शिवसेनेकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये केवळ पीडित सुनांनाच नाही, तर चांगल्या सासूंचाही सन्मान केला जाणार आहे, जेणेकरून समाजात एक सकारात्मक संदेश जाईल.

हेल्पलाइन नंबर जारी

या मोहिमेअंतर्गत, घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी एक विशेष हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे. 8828862288 असा हा हेल्पलाईन नंबर असणार आहे. या मोहिमेत शिवसेना शाखा आणि कार्यालयेही सहभागी होणार आहे. तसेच पीडित महिलांना तातडीने मदत पुरवली जाईल. यावेळी एकनाथ शिंदेंनी या योजनेबद्दल आपले मत व्यक्त केले. “जशी आपली मुलगी असते, तशीच सूनही असते. तिलाही सन्मानाने वागवले पाहिजे. अनेक घरांमध्ये सुनांवर अत्याचार होतात, त्यांना त्रास दिला जातो. याला आळा घालण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे. ज्या सुनांना मदत हवी असेल, त्यांनी न घाबरता या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.” असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.

राज्यभर मोहीम राबवली जाणार

सुरुवातीला समुपदेशनाद्वारे कुटुंबामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर ही पद्धत अयशस्वी ठरली, तर मग आपली शिवसेना स्टाईल आहेच. या योजनेत केवळ अन्याय झालेल्या सुनांनाच नाही, तर चांगल्या सासूंचाही सन्मान केला जाणार आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे या योजनेची राज्यस्तरावरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही मोहीम राज्यभर राबवली जाणार असून, प्रत्येक शिवसेना शाखेतून पीडित महिलांना मदत केली जाईल.

मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.