AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय शिरसाट यांना खाण्याचं नाही, पिण्याचं… कोणते ब्रँड… इम्तियाज यांचा खोचक हल्ला

१५ ऑगस्टच्या मांसबंदी निर्णयावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद तीव्र झाला आहे. शिरसाट यांनी जलील यांना टीआरपीसाठी नाटक करण्याचा आरोप केल्यानंतर जलील यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

संजय शिरसाट यांना खाण्याचं नाही, पिण्याचं... कोणते ब्रँड... इम्तियाज यांचा खोचक हल्ला
| Updated on: Aug 15, 2025 | 2:52 PM
Share

आज १५ ऑगस्टनिमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त मांसविक्रीवर बंदी घालण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध करताना स्वातंत्र्यदिनी बिर्याणी खाण्यासाठी अनेकांना आमंत्रण दिले होते. यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली होती. इम्तियाज जलील हे टीआरपीसाठी नाटक करत असल्याचे विधान संजय शिरसाट यांनी केले होते. आता या टीकेला प्रत्युत्तर देताना इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

त्यांना पिण्याबद्दल विचारा

इम्तियाज जलील यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केली आहे. “संजय शिरसाट काय खातात हे महाराष्ट्राला माहिती आहे. मी मार्केटमध्ये गेलो तर मटण आणू शकतो, कधी चिकन असू शकतो. त्यांच्या बॅगेत काय असते हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि ते काय खातात हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना पिण्याबद्दल विचारा कोणते कोणते ब्रँड आहेत, हे विचारा ते त्यांना माहिती असते. यावर त्यांचे लक्ष जास्त असते. एकदा प्यायल्यानंतर त्यांच्यापुढे जर तुम्ही त्यांच्यासमोर शाकाहारी जेवण ठेवलात आणि ते चिकन आहे असं जर सांगितलं तर ते देखील खाऊ शकतात”, असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.

माझ्याबद्दल तुम्ही बोलणं शोभत नाही

“तुमच्या बॅगेत काय काय सापडलेले आहे. त्याबद्दल तुम्ही विचार करा. माझी चिंता करु नका. मी विरोधी पक्षातील एक लहान माणूस आहे. माझ्याबद्दल तुम्ही बोलणं हे शोभत नाही. तुम्ही मोठे नेते आहात. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहात, तुम्ही जिल्ह्याचा विकास कसा करणार, काय काय नवीन उद्योग आणणार आहात, हे सांगा. समाजकल्याण विभागात तुम्ही आता काय करणार आहेत याबद्दल आपण बोललो तर बरं होईल”, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

१५ ऑगस्ट रोजी काही महानगरपालिकांनी मांस, मासे आणि अंडी यांच्या विक्री आणि कत्तलीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. १९८८ च्या एका कायद्याचा आधार घेत कल्याण-डोंबिवली, नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये ही बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयाला विरोध दर्शवत खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यदिनी बिर्याणी खाणार असल्याचे जाहीर करत मुख्यमंत्री आणि मनपा आयुक्तांना पार्टीचे आमंत्रण दिले होते. यावर संजय शिरसाट यांनी जलील यांच्यावर टीआरपीसाठी नाटक करत असल्याचा आरोप केला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकारण चांगलेच तापले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.