Raj Thackrey : काय चुकलं?… निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय? काय केलं आवाहन?
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले, ज्यात भाजप आणि शिंदे गट आघाडीवर राहिले. मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी निकालानंतर एक पोस्ट लिहीली आहे. काय चुकले, याची समीक्षा करून पक्ष पुन्हा उभारण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या मतदानानंतर काल निकाल लागला असून बहुतांश ठिकाणी भाजपचीच सरशी झाली आहे. अतिशय श्रीमंत अशा , प्रतिष्ठेची लढाई ठकरलेल्या मुंबई महालिके.्या निवडणुकीतही भाजपाने विजयी गुलाल उधळला असूव भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. तर तब्बल 20 वर्षांनी एकत्र आलेल्या राज व उद्धव ठाकरे या बंधूंनी एकत्र येऊन बीएमसी निवडणुकीत युती करत एकत्र लडत दिली. मात्र त्यांच्या पदरी पराभवच आला. भाजपला 89 तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या असून त्यांचा महापौर होणार हे चित्र स्पष्ट आहे. तर शिवेसना ठाकरे गटाला 65 आणि राज ठाकरेंच्या मनसेला बीएमसी निवडणुकीत अवघ्या 6 जागा मिळाल्या असून मनसेला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. इतर महापालिकांमध्येही मनसेची कामगिरी खास झालेली नाही.
याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच असं त्यांनी पोस्टमध्ये नमूदल केलं आहे.
Municipal Election 2026
आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत- संजय राऊत...
Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बैठक...
BMC Election Result 2026 : एकनाथ शिंदे जयचंद झाला - संजय राऊत
BMC Election Result 2026 : ठाकरेंना मुंबई महापालिका टिकवता आली नाही, यावर संजय राऊत यांचं उत्तर काय?
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.
आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.
बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.
लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !
आपला नम्र
राज ठाकरे
