Maharashtra News LIVE: TCS प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर, पीडितेच्या घरी जाऊन…
TCS प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याची माहीती समोर आली आहे. तर दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकाची झालेली दुरवस्था, तुटफूट आणि परिसरातील अस्वच्छता यावरून मुंबई महापालिका सभागृहात जोरदार गदारोळ झाला. यासह राज्यातील, देश-विदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग..

LIVE NEWS & UPDATES
-
धाराशिव येथील दहा कोटीच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या
धाराशिव येथील दहा कोटींच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. ओडिशासाच्या नक्षलग्रस्त भागातून धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. नळदुर्ग येथील दहा कोटी 38 लाख किमतीच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणात प्रसेनजीत खिरमहन दास मुख्य आरोपी आहे. ओडिसाच्या जनतापाई नक्षलभागातून अटक, यापूर्वी नाशिक आणि मालेगावातून दोन आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस नाकेबंदी दरम्यान रस्त्यावरच हशीश ऑइलच्या बॅगा फेकून आरोपी पसार झाला होता.
-
TCS प्रकरणातील निदा खानचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत
निदाच्या मोबाईल मधून अनेक रहस्य बाहेर आल्यास तपासाला मदत होणार. तपास यंत्रणेंकडून निदा खानचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. डिलीट केलेले मेसेज व्हिडिओ, नंबर पुन्हा रिकव्हर झाल्यास अनेक बाबींचा उलगडा होणार. निदाची फरार काळातील लोकेशन हिस्ट्री, बँक व्यवहार ऑनलाइन पेमेंट , क्लाऊड बॅकअप ई-मेल आणि सोशल मीडिया लॉगिन्स सर्व बाबींची चौकशी होणार आहे. आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून देखील कुठून फंडिंग होत होतं का याचा देखील तपास होणार…
-
-
पेड दर्शन घोटाळा प्रकरण; संशयिताची जामिनासाठी धाव
याआधी विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्यासह इतर दोघांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात कमी कालावधीत दर्शन देण्याच्या नावाखाली भाविकांकडून तीन ते १२ हजार रुपये घेणाऱ्या टोळीतील पाच जणांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्यात मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलगसह त्यांचे पुतणे ओम कडलग व अभिषेक कडलग आणि एजंट गोटीराम पेहरे व मध्यस्थ वसंत मुर्तडक यांचा समावेश आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला होता मात्र , न्यायालयाने एकाच सशर्त तीन दिवसांचा जामीन मंजूर करीत इतरांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
-
गरोदरपणामुळे नियुक्ती रोखणे अयोग्य; केंद्र सरकारचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द
एखादी महिला गर्भवती असणे हा कोणताही आजार नसून, केवळ गर्भधारणेच्या कारणावरून तिची नियुक्ती रोखणे हे तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केंद्र सरकारचा आदेश रद्द केला आहे. याचिकाकर्त्या डॉ. रेणुका शिवाजी बुगणे यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात म्हणजे CRPF मध्ये “स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर” पदावर निवड झाली होती.
-
आई तुळजाभवानीच्या खजिन्यात दोन वर्षात 28 किलो 408 ग्रॅम सोने आणि 523 किलो चांदीची भर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तिजोरीत गेल्या दोन वर्षात तब्बल 28 किलो सोनं आणि 523 किलो चांदीची भर पडलीय.देशभरातून येणारे भाविक तुळजाभवानीला श्रद्धेने सोने चांदी आणि रोख रक्कम दान करतात.भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीतून तुळजाभवानीच्या तिजोरीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत श्री. तुळजाभवानीच्या तिजोरीमध्ये तब्बल 253 किलो सोनं आणि 4523 किलो चांदी असल्याची नोंद आहे.
-
-
सासरच्या व अमाणूष मारहणीत गर्भवती महिलेचा गर्भपात; निष्पाप जीवाचा जन्माआधीच मृत्यू…
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील धक्कादायक घटना पती, नणंद ,सासूविरुद्ध पथ्रोट स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी मारहाण आणि छड केल्याचा आरोप आहे. मारहाण झाल्यानंतर महिला दवाखान्यात नेण्यासाठी गयावया करत होती, मात्र पतीने तिला दवाखान्यात नेण्यासाठीही नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.
TCS प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याची माहीती समोर आली आहे. निदाने पीडितेच्या घरी जात धार्मिक शिक्षण देणं, निदाच्या धर्माची प्रार्थना करणं, तिच्या धर्माचा पोशाख पीडितेला परिधान करायला लावणं… धार्मिक विधी आणि शिक्षणातून पिढतेचं मत परिवर्तन केल्याचं देखील कळत आहे. याप्रकरणी आता पुढील तपास सुरु आहे. तर दुसरीकडे, आयटी कंपनी कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी निदा खानला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. निदाच्या पोलीस कोठडीत आज वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर कंपनीतील पीडितेवर बलात्कार आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यात निदा खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकाची झालेली दुरवस्था, तुटफूट आणि परिसरातील अस्वच्छता यावरून मुंबई महापालिका सभागृहात जोरदार गदारोळ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसने स्मारकाच्या तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरणाची मागणी करत प्रशासनावर टीका केली. भाजपनेही या मागणीला पाठिंबा दिला, मात्र स्मारकाची उपेक्षा काँग्रेसच्या काळातच झाल्याचा आरोप करत विरोधकांवर निशाणा साधला. यासह राज्यातील, देश-विदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग..
Published On - May 11,2026 7:49 AM
