Maharashtra News LIVE : ठाणे स्थानकाजवळ सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू…
Maharashtra News LIVE : नाशिकच्या सुरगाणा दिंडोरी तालुक्यातील घरांना भूकंपाच्या धक्क्यामुळे तडे गेले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरात असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं वाचता येईल.

नाशिकच्या सुरगाणा दिंडोरी तालुक्यातील घरांना भूकंपाच्या धक्क्यामुळे तडे आले आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या घरांना तडे गेल्याची माहिती देण्यात आली. 4.3 रिश्टर स्केल पाच किलोमीटर खोल भूकंपाची नोंद करण्यात आली. सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे नाशिकमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे केंद्रबिंदू गुजरातमध्ये असल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या प्रसिद्ध मनूदेवी मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि छत्री लंपास करण्यात आल्या. सुमारे १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना उघडकीस आली. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं वाचता येईल.
LIVE NEWS & UPDATES
-
खरे कुणबी आहेत अशांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले – परिणय फुके
खरे कुणबी आहेत अशांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र,ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत किंवा चुकीचे कागदपत्र असतील अशांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर जरांगे पाटील यांनाही वाटत असावं,त्यांनीही एखादे आंदोलन करावं म्हणून ते दौऱ्यावर निघाले आहेत अशी टीका परिणय फुके यांनी केली आहे.
-
शहरीकरणाच्या नावाखाली आदिवासींवर अन्याय – हर्षवर्धन सपकाळ
आदिवासी हा संपूर्ण जगाचा मूलनिवासी आहे. या आदिवासीला वनवासी ठरवण्याचे एक पाप आणि एक राजकीय षडयंत्र आपल्या देशात सुरू आहे. जल, जंगल, जमीन ही लढाई अधिक तीव्रतेने लढण्याची आवश्यकता आहे. जल, जंगल,जमिनीवर पुंजीपंथींना मोठा ताबा मिळत आहे. शहरीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या अधिकाराची फार मोठ्या प्रमाणावर अवहेलना होत आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
-
-
ठाणे स्थानकाजवळ सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू…
कोपरीतील सॅटीसच्या बेसमेंटमध्ये ६० वर्षीय सुरक्षा रक्षक अशोक साळुंखे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असून हाताचे एक बोट तुटले आहे. शनिवारी रात्री ड्युटीनंतर घरी न परतल्याने कुटुंबीयांकडून शोध सुरू होता. कोपरी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
-
भंडारा – गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले
मागील 24 तासांपासून गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि धापेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या आवक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. धरणातून सध्या 49 हजार 405 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. सतत वाढणाऱ्या पाणीपातळीमुळे प्रशासनाने वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
-
अहिल्यानगर : धीरज परदेशीच्या मृत्यू प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
अहिल्यानगर मनपाचे कर्मचारी धीरज परदेशीच्या मृत्यू प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ज्या रुग्णालयात धीरजवर उपचार सुरू होते त्या ठिकाणीच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत धीरज परदेशीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी केली.
-
-
ठाणे : ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, महिला गंभीर जखमी
ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्सकडून कळवा पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर, हेलिपॅड ग्राउंडसमोर आज सकाळी 11:14 वाजताच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार महिला पुष्पा सिंग (वय 48, रा. साकेत कॉम्प्लेक्स) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांकडून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
-
सांगोला : जरांगे पाटील यांचे मराठा बांधवांकडून स्वागत
सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला शहरात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाज बांधवांकडून स्वागत करण्यात आले. सांगोला शहरात येताच जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टि करण्यात आली. पंढरपूर तालुक्यातल्या सरकोली येथील सभा आटोपल्यानंतर पुढील सभेसाठी जात असताना समाज बांधवांकडून स्वागत करण्यात आले.
-
नालासोपाऱ्यात भरदिवसा पिता-पुत्रावर कोयत्याने हल्ला
नालासोपारा पूर्व श्रीरामनगर परिसरात दिवसा ढवळ्या भर रस्त्यात पिता पुत्रावर गुंडांनी धारदार कोयत्याने वार केले आहेत. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
-
मनसेचे मिरा-भाईंदरमध्ये ‘भीक मांगो आंदोलन’
मिरा-भाईंदरमधील जीवघेण्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी मनसेने शहर अध्यक्ष संदिप राणे यांच्या नेतृत्वात ‘भीक मांगो आंदोलन’ केले.पालिकेने निधी नसल्याचे कारण दिल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी नागरिकांकडून पैसे गोळा केले. जमा झालेली रक्कम पालिका आयुक्तांना सुपूर्द करण्याचा निर्धार यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.
-
बारामतीत पुन्हा कारवार एव्हीनेशन कंपनीच्या शिकाऊ विमानाचा अपघात
बारामतीत पुन्हा कारवार एव्हीनेशन कंपनीच्या शिकाऊ विमानाचा अपघात
शिकाऊ विमान लँडिंग करत असताना झाला अपघात
अपघात झालेले शिकाऊ विमान हे कारवर एव्हीनेशन या प्रशिक्षण संस्थेचे
सुदैवाने या शिकाऊ विमान अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी नाही
शिकाऊ विमानांचा सतत अपघात होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
सतत होत असलेल्या अपघातांमुळे शिकाऊ विमान कंपनीवर कारवाई करण्याची मागणी
-
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर राडा, मोठी वाहतूक कोंडी
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर राडा
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर ट्रकचालकाने रोडवर आडवा केला ट्रक
आरटीओने कारवाई केल्याने मोठा ट्रक रोडवर आडवा केला
अमरावतीजवळ समृद्धी महामार्ग जाम
शेकडो वाहनं जाममध्ये अडकले
-
लोणावळ्यात बिबट्याचा थरार; पर्यटकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्या कैद
लोणावळ्यातील INS शिवाजी परिसरात रस्ता ओलांडणारा बिबट्या पर्यटकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काही दिवसांपासून अंदर मावळ परिसरातही बिबट्या दिसल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे
-
पुणे विमानतळाच्या सुरक्षा हालचालींची राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल
पुणे विमानतळाच्या सुरक्षा हालचालींची राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल. मुरलीधर मोहोळांनी पुढील आठवड्यात तातडीची बैठक बोलावली. पुणे विमानतळावर पक्षी, कचरा आणि भटक्या श्वानांचा विमान उड्डाणांना धोका
-
वडिलांच्या डोळ्यासमोर दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
वडिलांच्या डोळ्यासमोर दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी गावातील धक्कादायक घटना. तर, एका चिमुकलीला वडिलांनी सुखरूप पाण्याबाहेर काढलं. हात पाय धुण्यासाठी पाणी असलेल्या खड्ड्याजवळ आलेल्या 2 चिमुकल्यांचा बुडून मृत्यू.
-
पुणे विमानतळ परिसरातील एका पबवर कारवाई
पुणे विमानतळ परिसरातील एका पबवर कारवाई. पुण्यातील ऐरॉमॉलमधील द हौज कम्युन पबवर कारवाई. पहाटे 3 वाजेपर्यंत पब सुरु असल्याने पोलिसांची कारवाई. पबमध्ये पार्टी करणाऱ्या 62 जणांची चौकशी सुरु
-
गोरगरिबांच्या मुलांचं नुकसान करण्याचा सरकारने विडा उचलला – जरांगे पाटील
मराठा समाजासाठी माझा संघर्ष सुरुच आहे. संघर्ष केल्याशिवाय मुलांना सुख मिळणार नाही. मराठा समाजामध्ये आतापर्यंत एकजूट नव्हती… गोरगरिबांच्या मुलांचं नुकसान करण्याचा सरकारने विडा उचलला आहे.. असं वक्तव्य जगांगे पाटील यांनी केलं आहे.
-
नांदेडमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चाला सुरुवात,
महाराष्ट्र सरकारद्वारा प्रस्तावित अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज नांदेडात जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला शहरातील आयटीआय चौकातून सुरुवात झाली आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने अनुसूचित जातीतील विविध समाजघटक सहभागी झाले आहेत.
-
जरांगेंवरुन सदावर्तेंचा एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांवर निशाणा
जरांगेंवरुन सदावर्तेंनी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगेंच्या टीकेला शिंदे, सामंतांची मुकसंमती आहे? असा प्रश्न सदावर्ते यांनी उपस्थित केला.
-
नांदेडमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चाला सुरुवात
महाराष्ट्र सरकारद्वारा प्रस्तावित अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज नांदेडात जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला शहरातील आयटीआय चौकातून सुरुवात झाली आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने अनुसूचित जातीतील विविध समाजघटक सहभागी झाले आहेत.
-
जळगावच्या ममुराबाद येथे महावितरणच्या खांबावरील विजेची तार तुटून शेतात विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू
जळगावच्या ममुराबाद येथे महावितरणच्या खांबावरील विजेची तार तुटून शेतात विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू झाला आहे. शेतात काम करताना विजेची तार तुटून पडल्याने वीजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू झाला असून घटनेत शेतकरी कुटुंब सुदैवाने बचावले आहेत. बैलाच्या मृत्यूनंतर शेतकरी कुटुंबातील महिलाना अश्रू अनावर झाले. मृत पावलेल्या बैलाजवळ बसून शेतकरी महिलांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल शेतकऱ्याची संता व्यक्त करत बैलाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.
-
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कारभारावर अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीच नाराजी व्यक्त
धाराशिवमध्ये मराठा बांधवांची बैठक घेत नरेंद्र पाटील यांनी तरुणांच्या अडचणी जाणून घेतल्या. CIBIL खराब असणे, कर्ज थकीत असणे आणि महामंडळाच्या जाचक अटींमुळे अनेक तरुणांना कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याचे यावेळी समोर आले.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाबाबत सकारात्मक असताना महामंडळाच्या एमडीच्या कार्यपद्धतीमुळे समाजात नकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचा दावा नरेंद्र पाटील यांनी केला आहे. याबाबत आता मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटील यांची भेट घेऊन महामंडळाच्या सर्व अडचणी मांडणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
-
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामती विमान अपघात प्रकरणावर प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामती विमान अपघात प्रकरणावर प्रतिक्रिया “या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा असं कळलं की, कारवार एव्हिशनचं विमान खालीच होते ते काही वरती उडत नव्हते, पण ते वळण घेताना चाक बाजूच्या एका साईडला अडकले एवढेच झाले आहे बाकी नाही.
-
फडणवीसांकडून पाटील कुंटुबियांची सांत्वनपर भेट
फडणवीसांकडून पाटील कुंटुबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. फडणवीसांकडून डी.वाय.पाटील यांना श्रद्धांजली देण्यात आली.
-
डी. वाय पाटील हे जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील एक अतिशय अग्रगण्य नाव होतं- देवेंद्र फडणवीस
डी. वाय पाटील हे जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील एक अतिशय अग्रगण्य नाव होतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की जीवनामध्ये संघर्षातून त्यांनी एक अतिशय मोठे कार्य उभे केले. शिक्षणाचा क्षेत्र असेल, सहकाराचा क्षेत्र असेल, उद्योगाचे क्षेत्र असेल. या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य उभे केले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा विमानातून एकत्र प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी विमानातून एकत्र प्रवास केला. फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यासोबत राहुल नार्वेकरही सोबत होते. मुंबई ते कोल्हापूर दरम्याप एकत्र प्रवास केला आहे.
-
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबवणार- मंत्री प्रताप सरनाईक
महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मुंबई मराठी साहित्य संघ व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या सहकार्याने राज्यात अमराठी रिक्षा-टॅक्सी चालक-वाहकांकरिता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानास राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यशस्वीपणे संपन्न होत असलेल्या या अभियानाची सांगता ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये 17 ऑगस्ट रोजी आयोजित भव्य सोहळ्याद्वारे होणार आहे.
-
अण्णासाहेब डांगे यांचा आणि आमचा संबंध जुना- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अण्णासाहेब डांगे यांचा आणि आमचा संबंध जुना आहे. मी राजकारणा आम्ही ज्यांच्याकडे बघून काम केले,त्यापैकी एक अण्णासाहेब डांगे आहेत. महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पक्षात अण्णासाहेब डांगे यांच्याकडे सन्मानाने पाहिले जायचे,त्यांचा मान मोठा होता. युतीच्या काळात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अण्णासाहेब डांगे यांच्याकडे बैठक व्हायची आणि मग ठरायचे.ग्रामविकास मंत्री आसताना महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याचं काम अण्णासाहेब डांगे यांनी सुरू केलं, टँकर मुक्त करण्याचा शिवधनुष्य अण्णासाहेब डांगे यांनी पेललं. प्रशासनावर अण्णासाहेब डांगे यांची प्रचंड पकड होते. शौचालय बांधण्यासाठी किती निधी लागतो,हे ऐकून सचिव देखील आश्चर्य करायचे. प्रदीर्घ स्वरूपाचा अण्णासाहेब डांगे यांचा प्रवास राहिला आहे,त्यांचा संघर्ष हा सुरुवातीपासूनच राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची जुडलेली नाळ आज देखील कायम आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या वक्त्यांमध्ये अण्णासाहेब डांगे यांचं नाव वरती आहे.
-
जळगाव येथे महावितरणच्या खांबावरील विजेची तार तुटून शेतात विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू
जळगावच्या ममुराबाद येथे महावितरणच्या खांबावरील विजेची तार तुटून शेतात विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू. शेतात काम करताना विजेची तार तुटून पडल्याने वीजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू , घटनेत शेतकरी कुटुंब सुदैवाने बचावले. बैलाच्या मृत्यूनंतर शेतकरी कुटुंबातील महिलाना अश्रू अनावर : मृत पावलेल्या बैलाजवळ बसून शेतकरी महिलांचा मोठा आक्रोश. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल शेतकऱ्याची संता व्यक्त करत बैलाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे
-
निलम गोऱ्हे सोशल मीडिया बंदी कायदावर दिली प्रतिक्रिया
सोशल मीडिया बंदी कायदा आणण्याची मागणी ही प्रसिद्ध होते.. काही देशात बंदी आणली असेल तरीही ती मुलं खोटी माहिती देऊन काही प्रमाणात वापर सुरूच आहे.. त्यापेक्षा मुलांशी संवाद साधून सुरक्षित मैत्री व्हायला हवी.. विकृत माणसं मैत्रीच्या नावावर फायदा घेत असतील तर त्यांच्यापासून सावध कसं राहायचं हे शिक्षण आणि प्रशिक्षण पोलिसांच्या सोबत शिक्षण विभाग आसपासच्या लोकांमध्ये येणे आवश्यक आहे.. मीडिया यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री सह पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील आहेत तोपर्यंत कोणीही दबाव आणू शकणार नाही. न्यायालयात संवेदनाहीन एखाद्या वकिलांनी वक्तव्य केली असतील तर त्याची माहिती वरिष्ठ स्तरावर विधी आणि न्याय विभागात देईन. कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचा भाचा हे आपण जाहीरपणे सांगावे..
-
नागपूर अल्पवयीन तरुणी अपहरण आणि अत्याचार प्रकरणावर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
नागपूर अल्पवयीन तरुणी अपहरण आणि अत्याचार प्रकरणावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या,” अत्यंत गंभीर आणि आरोपीबद्दल मनात चीड आणणारी घटना.. माझं पीडितेच्या कुटुंबीयांशी बोलणं झालं.. त्या मुलीवर प्रचंड दहशत आणि मानसिक दबाव आणून शारीरिक अत्याचार केलेत.. केवळ शारीरिक अत्याचार करून न थांबता तो व्हिडिओ कुठेतरी पाठवत असावा अस वाटत. त्याच्याकडे शस्त्र मिळाल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.. त्यामुळे न्यायालयांच मला आश्चर्य वाटतं.. सायबर क्राईम मध्ये वेगवेगळे धागेदोरे जोडण्यासाठी किमान आठ ते दहा दिवस लागतो.. अश्यावेळी पोलिसांना अधिक कस्टडी मिळायला हवी होती. पीडित मुलगी मरता मरता वाचली आहे.. त्याच्यावर ,साक्षीदरवर आणि कुटुंबावर दबाव आणणारे जे लोक आहेत.. त्यांना पाठबळ मिळेल असे वर्तन कोणी करू नये. आरोपीला वकील मिळणे हा कायद्याने अधिकार असला तरी एक नंबरच्या वकिलांनी कायदे पत्रक घेणे.. महाराष्ट्रातील वकील वर्गाला शोभा देणार नाही. कसाबला सुद्धा वकील द्यावा लागतं मात्र या प्रकरणात सरकारी वकीला सोबत सर्व वकिलांनी सहकार्य करावे. आरोपींनी ठाण्यावरून येऊन इथे भाड्याने घर घेऊन पिडीतेला सापळ्यात फसवल आहे.. त्यामुळे भारताच्या इतर भागात देखील त्यांनी असे प्रकार केलेत का..? आरोपीचा हेतू मुलीचा खून करून हे व्हिडिओ विकणे आणि लैंगिक व्यापार करणे असावा.. त्याचा अवयव काय करणार होता हा देखील प्रश्न. त्याच्या कुटुंबियांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठल्याने ती मुलगी आपल्यात आज जिवंत दिसत आहे.. त्यामुळे पोलीस विभागाच्या तत्परतेचा कौतुक करायला पाहिजे. नंदुरबार आणि नरसापुर येथील प्रकरण आणि या प्रकरणातील कार्यप्रणाली सारखी दिसत आहे. यामध्ये एकच आरोपी असेल असे नाही याचे काही लांगी-बांध जर असतील तर त्याचाही शोध व्हायला हवा. मुलगी आणि कुटुंबीयांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत. मुलीच्या वडिलांना भेटल्यावर त्यांनी मला मोठी बहीण आल्यासारखं म्हटलं या प्रकरणात त्यांना न्याय मिळेल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील या प्रकरणात सक्रिय आहेत. नरसापुर येथील दीड महिन्यात निकाल लागला.. या प्रकरणाचा ह लवकरात लवकर निकाल लावून या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी. आरोपी अद्याप बोलला नसला तरी तांत्रिक सबळ पुरावे उपलब्ध आहेत.. फिजिकल टेस्ट पूर्ण झालेले आहेत या सगळ्यातून त्याला शिक्षा होणार यामध्ये माझ्या मनात शंका नाही.
-
नांदेडमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चाला सुरुवात
महाराष्ट्र सरकारद्वारा प्रस्तावित अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज नांदेडात जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला शहरातील आयटीआय चौकातून सुरुवात झाली आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने अनुसूचित जातीतील विविध समाजघटक सहभागी झाले आहेत.
-
महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने, तसेच राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या सहकार्याने राज्यात अमराठी रिक्षा-टॅक्सी चालक-वाहकांकरिता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात येत आहे.
-
बारामती विमान दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
विमान लँड होत असताना रन-वेववरुन घसरल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
-
बारामतीतील विमान अपघात प्रकरणावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
“संबंधित यंत्रणांनी याची दखल घ्यावी. कारण वारंवार अशा घटना होत आहे. मला वाटतं नक्कीच सरकार संबंधित कंपन्या किंवा ज्या काही एजन्सी असतील त्यांना कठोर सूचना द्यावा” अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
-
बारामतीमध्ये प्रशिक्षण विमानाला दुर्घटना
बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान अपघात झाल्याची आता बातमी समोर येत आहे. बारामतीमध्ये प्रशिक्षण विमानाला दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
बारामतीत पुन्हा विमान अपघात
बारामतीत पुन्हा विमान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
-
विमानतळावरील ग्राउंड स्टाफ परीक्षा भरतीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ
विमानतळावरील ग्राउंड स्टाफ परीक्षा भरतीपूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये गोंधळ निर्माण झाला. NIA संस्थेकडून परीक्षा आयोजित करण्यात आली होती. एनआयईए एविएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फ्रॉड असल्याचा आरोप विद्यार्थ्यांने केला आहे. भरती करण्यापूर्वी कंपनीकडे DGCA चे पूर्व परवानगी पत्र नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरच्या विकास मंदिरासमोर विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ सुरू आहे.
-
महाराष्ट्रातले प्रखर वक्ते म्हणून डांगेंकडे आपण पाहतो – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातले प्रखर वक्ते म्हणून डांगेंकडे आपण पाहतो. राज्याला टँकरमुक्त करण्याचा संकल्प डांगेंनी घेतला होता. गावागावात पाणी पोहोचवण्याचं शिवधनुष्य डांगेंनी घेतलं होतं… असं वक्तव्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
-
टँकरच्या जाळ्यात महाराष्ट्राला मुक्त करण्याच श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जातं – देवेंद्र फडणवीस
टँकरच्या जाळ्यात महाराष्ट्राला मुक्त करण्याच श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जातं… त्यांच्या जीवनाची सुरुवात संघर्षात झाली आणि तो संघर्ष जीवनभर त्यांना पुरला. या संघर्षातून सामान्य माणसाच्या जावनीत परिवर्तन घडवण्यात येतं… हे अण्णासाहेब माहिती होतं. त्यांनी आपल्यासाठी जे कार्य केलं, ते असामान्य असं कार्य आहे.. – असं देवेंद्र फडणवीस म्हणाले
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णासाहेब डांगेंच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन
अण्णासाहेब डांगेंच्या जीवनावर आधारित पुस्कराचं प्रकाशन आज करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.. सांगलीच्या आष्टामध्ये शैक्षणिक संकुलाचं उद्धाटक करण्यात आलं.
-
पुणे-नाशिक रेल्वेच्या जुन्या मार्गासाठी आंबेगाव तालुक्यात तीव्र आंदोलन; विविध पक्षांचे नेते व शेतकरी आक्रमक
चाकण, राजगुरुनगर, मंचर आणि नारायणगाव फाटा परिसरासह अनेक ठिकाणी नागरिकांनी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन आणि जोरदार निदर्शने केली. विमानतळ न झाल्यामुळे शेतमाल, फळबागा आणि व्यापारी वाहतुकीसाठी हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, केंद्र व राज्य सरकारने जुन्या मार्गामध्ये बदल न करता हा प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान, प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता टप्प्याटप्प्याने तीव्र लढा उभारण्याचा इशारा माजी मंत्री दिलीप वळसेपाटील यांनी आंदोलनातुन दिलाय
-
राज ठाकरे यांच्याकडून मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी सुरु
स्वतः कार चालवत राज ठाकरे मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई – गोवा मार्गाचं काम रखडलं आहे… नितिन गडकरी म्हणतात, कंत्राटदार कंटाळले, पण ते कंटाळले कशामुळे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
-
जन्मादात्या आईचा खूण करून मुलाने संपविले स्वतःचे जीवन,कारण अस्पष्ट
जन्मदात्या आईचा खूण करून मुलाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना काल रात्री नांदेडमध्ये घडली. तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनीमध्ये चौथरे कुटुंब राहते. रात्री अकराच्या सुमारास 26 वर्षीय मुलगा प्रतीक चौथरे याने 50 वर्षीय आपल्या आईला मारहाण केली. बॅट आणि लोखंडी रॉडने त्याने डोक्यावर आणि इतर ठिकाणी गंभीर मारहाण केली. आईच्या मृत्युंनंतर मुलाने दुसऱ्या खोलीत जाऊन स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली. आवाज एकूण शेजा-र्यांना शंका आल्याने खिडकीची काच फोडून पहिल्यानंतर घटना उघडकीस आली. मयत प्रतीकचे वडील नोकरी निमित्त बाहेरगावी असतात. ते नसताना ही घटना घडली. नेमक्या कोणत्या कारणाने ही घटना घडली याचा कुठलाही सुगावा अद्याप पोलीसांना लागला नसून अधिक तपास सूरु आहे.
-
बावनकुळेंच्या एका चुकीमुळे मराठा समाज चिडला – जरांगे पाटील
कुणबी प्रमाणपत्रांना बोगस म्हणणारे मंत्रीच बोगस… बावनकुळेंच्या एका चुकीमुळे मराठा समाज चिडला… असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
जे लहान मुलांना कळतं ते सरकारला कळत नाही याचं आश्चर्य- बाळासाहेब थोरात
“सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाई झाली आहे. आमचा वारसा स्वातंत्र्य सैनिकांचा आहे. लहान मुलाला विचारलं तरी तो सांगेल की ही रेल्वे विकासासाठी महत्त्वाची आहे. जे मुलांना कळतं ते सरकारला कळत नाही याचं आश्चर्य वाटतं. 2019 मध्ये या मार्गासाठी आम्ही गती दिली होती. संगमनेर, नारायणगाव मार्गे रेल्वेसाठी आम्ही प्रयत्न केले. त्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने सगळ्या मान्यता घेतल्या त्यात केंद्राची देखील परवानगी होती. 2027 ला रेल्वे धावेल हे आमचं स्वप्न होतं, भूसंपादन देखील केलं. मग त्यावेळी आजच्या अडचणी दिसल्या नाही का, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
-
महाराष्ट्रातील मुलांनाच माहिती नाही पुढे काय वाढून ठेवलंय – राज ठाकरे
महाराष्ट्रातील मुलांनाच माहिती नाही पुढे काय वाढून ठेवलंय… आमच्या जमिनीवर बाहेरचे लोक पोसणार… जमीन हेच तुमचं अस्तित्व आहे… कोकणात येणाऱ्या उद्योगांमध्ये भागीदार व्हा… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
-
तिसऱ्या मुंबईत कोणत्या गोष्टी येतली? यावर राज ठाकरे म्हणाले…
एज्युकेशनल सीटी, मेडीकल सीटी, स्पोर्ट सीटी, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपेबलीटी सेंटर, बीकेसी पेक्षा देखील मोठ व्यवसायिक केंद्र उभारलं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि उच्च मुल्य सेवा कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु आहे… हे राज्याला माहिती आहे का? असं देखील राज ठाकरे म्हणाले.
-
राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई – गोवा मार्गाचं काम रखडलं – राज ठाकरे
राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई – गोवा मार्गाचं काम रखडलं आहे… नितिन गडकरी म्हणतात, कंत्राटदार कंटाळले, पण ते कंटाळले कशामुळे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला…
-
दिग्दर्शक आणि निर्माते शकील नूरानी यांना अटक
‘बडे दिलवाला’ आणि ‘जोरू का गुलाम’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्माते 73 वर्षीय शकील नूरानी यांना मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. 33 वर्षीय एका अभिनेत्रीने नूरानी विरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, नूरानीने नवीन चित्रपटावर चर्चा करण्याच्या बहाण्याने अभिनेत्रीला मालवणी येथील आपल्या घरी बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला बेशुद्धीचे औषध दिले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही आहे. तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी नूरानीचा सातारा जिल्ह्यातील मेढा येथील एका फार्महाऊसमध्ये शोध घेतला आणि 8 ऑगस्टच्या पहाटे त्याला अटक केली. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. न्यायालयाने शकील नूरानीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
-
17 तारखेपर्यंत बघा, रोहित पवारांचं सूचक विधान
मतदान ज्या दिवशी तेव्हा कोण – कोणाच्या बाजूने ते कळेल… आमचे सर्व 8 आमदार डिलीमीटेशनच्या विरोधात मतदान करतील.. डिलीमीटेशन करु नका, हेच सांगण्याची उद्याची भेट असले.. असं वक्तव्य देखील रोहित पवार यांनी केलं आहे.
-
विरोधक टीका करतात तुम्ही धाडसी निर्णय घेऊन स्वतःला सिद्ध करा – रोहित पवार…
तुमच्याकडे पद आहे, त्यामुळे तुमच्याकडे अधिकार आहेत, विरोधक टीका करतात तुम्ही धाडसी निर्णय घेऊन स्वतःला सिद्ध करा… गुंगी गुडियाच्या टीकेनंतर रोहित पवार याचं विधान…
-
वाघुर धरणावरून जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्वला मोठ्या प्रमाणावर गळती
वाघुर धरणावरून जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्वला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. मुख्य जलवाहिनीवरील जवळपास सात ते आठ व्हाल्वमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असून दररोज हजार लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. कारंजांप्रमाणे व्हॉल्वमधून पाण्याचे फवारे उडत असून दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याची शोकांतिका व्यक्त केली जात आहे, वाघूर धरणापासून 3 किलोमीटरच्या अंतरात मुख्य जलवाहिनीवर रस्त्यालगत 10 पैकी सात हॉल मधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. पाण्याचा जपून वापर करा असे सांगणाऱ्या महापालिकेचा दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण, असा कारभार उघड झाला आहे.
-
भाजपचे स्थानिक पदाधिकारी अनिल सोनवणेंची शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेवर टीका
नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गाने करावी, या मागणीसाठी सुरु असलेल्या चक्काजाम आंदोलनात काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. भाजपचे स्थानिक पदाधिकारी अनिल सोनवणेंनी शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेवर टीका केली. यावरून सर्व पक्षीयांनी सोनवणेंना वैयक्तिक टीका करण्यापासून रोखले. पुणे-नाशिक रेल्वे अहिल्यानगर मार्गे होत आहे, केंद्रात कोल्हेचा पाठपुरावा करण्यात कमी पडले. असा आरोप सोनवणे करु लागले, त्यामुळं हा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र अशा वैयक्तिक टिकेपासून त्यांना रोखण्यात आलं आणि आंदोलन पुढं सुरु झालं.
-
सत्यजित तांबे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पोलिसांच्या गाडीवर चढत गाडी रोखण्याचा प्रयत्न केला… आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावं… असं आवाहान सत्यजित तांबे यांनी आंदोलकांना केलं आहे..
-
कोणत्याही परिस्थितीमध्ये कमिटीचा निकाल साठ दिवसांत लागला पाहिजे – सत्यजीत तांबे
कोणत्याही परिस्थितीमध्ये कमिटीचा निकाल साठ दिवसांत लागला पाहिजे… आणि दुसरी गोष्ट कमिटीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता जनभावनेनेचा देखील विचार केला पाहिजे, या दोन मागण्या आहेत… जनसुनवाई झाली पाहिजे.. याबाबद लेखी द्या अशी मागणी देखील सत्यजित तांबे यांच्याकडून करण्यात आली आहे… गिरीश महाजन यांचा सत्यजित तांबेंना आश्वासन…
-
सिन्नरमध्ये समृद्धीकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखल
नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्कादाम आंदोलन… सिन्नरमध्ये समृद्धीकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखल आहे. अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सत्यजीत तांबे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
-
आंदोलनांदरम्यान आमदार सत्यजित तांबे यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन
नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्कादाम आंदोलन… आंदोलनांदरम्यान आमदार सत्यजित तांबे यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला आहे. फोन वरून आमदार सत्यजित तांबे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात संभाषण सुरू आहे. जन सुनावाई घेण्याची सत्यजित तांबे यांनी मागणी केली.
-
मोदींच्या भेटीवरुन राजकीय अँगल लावणं योग्य नाही – शशिकांत शिंदे
मोदी, शाह विरोधी पक्षाच्या खासदारांना भेट नाही… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. यावर शशिकांत शिंदे म्हणाले, मोदींच्या भेटीवरुन राजकीय अँगल लावणं योग्य नाही. राजकीय मुद्द न केल्यास डिलिमीटेशनवर चर्चा करु… असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलं आहे.
-
गांजा, मोबाईल आणि बेकायदेशीर वस्तु रोखण्यासाठी हायटेक मशिनरी दाखल
सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपी असलेल्या बीड जिल्हा कारागृहात यापूर्वी गांजासह इतर वस्तू आढळल्या होत्या तसेच काही आरोपींना बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा अनेकांकडून आरोप होत होते. तर धनंजय देशमुख यांच्या तक्रारीनंतर दोन पथकांकडून तपासणी करण्यात आली. यानंतर गांजा, मोबाईल आणि इतर बेकायदेशीर वस्तूंचा प्रवेश रोखण्यासाठी प्रशासनाने ‘हायटेक’ प्रणाली सुरू केली आहे. पुणे कारागृह मुख्यालयाकडून बीड कारागृहासाठी बॅगेज स्कॅनर, डोअर फ्रेम आणि हँडहेल्ड मेटल डिटेक्टर्ससह अत्याधुनिक उपकरणे पुरवण्यात आली आहेत. या नवीन तंत्रज्ञानामुळे कारागृहात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि वस्तूंची आता अतिशय बारकाईने डिजिटल तपासणी केली जाईल. मानवी त्रुटी संपवून कारागृहाची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
-
पंतप्रधानांनी निवसस्थानी केटरिंग सर्व्हिस उघडलीये, गद्दारांनी यावं आणि खाऊन जावं – संजय राऊत
बाळासाहेबांनी पक्ष उद्धव ठाकरेंकडे सोपावला आहे. विधीमंडळातील 2 – 5 आमदार फुटले म्हणजे पक्षाची जबाबदारी दुसऱ्याकडे कशी जाऊ शकते, आमदार फोडले, खासदार फोडल… देशाच्या पंतप्रधानांनी निवसस्थानी केटरिंग सर्व्हिस उघडली आहे. गद्दारांनी यावं आणि खाऊन जावं… तुम्हाला गद्दारांना जेवणावळी घालायला वेळ आहे. पण संसदेत 16 दिवस झाले विरोधीपक्ष तुमची वाट बघत आहे. तेथे येण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
पवाराचे खासदार मोदींची भेट घेण्याआधी सचिन सावंतांची पोस्ट
पवाराचे खासदार मोदींची भेट घेण्याआधी सचिन सावंतांची पोस्ट व्हायरल होत आहे. ‘महिला आरक्षण लागू करा, डिलिमिटेशनचा त्याच्याशी संबंध जोडू नये…’ इंडिया आघाडीची एकता आणि विरोध मोदींना समजलाच पाहिजे… असं वक्तव्य सावंत यांनी केलं आहे.
-
नांदेड -चार-पाच जणांच्या टोळक्याचा हल्ला; इंदरसिंग बावरीचा निर्घृण खून,नांदेडमध्ये पेट्रोलपंपावर रक्तरंजित थरार; खुनाचा व्हिडिओ व्हायरल
काल नांदेड शहरातील धनेगाव परिसरातील पेट्रोल पंपावर झालेल्या खुनाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने इंदरसिंग बावरी याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
-
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या जीवन प्रवासातील 91 वर्षाचा मंगलमय प्रारंभ व त्यांचा प्रेरणादायी जीवन कार्याचा सोहळा
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या जीवन प्रवासातील 91 वर्षाचा मंगलमय प्रारंभ व त्यांचा प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचे प्रकाशन आणि आष्टा शैक्षणिक संकुलातील विविध इमारतीचा उद्घाटन सोहळा आज सांगलीच्या आष्टामध्ये पार पडत आहे. या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जयकुमार गोरे, सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जंगी तयारी करण्यात आली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अण्णासाहेब डांगे यांना मानणाऱ्या अनेक मान्यवर देखील उपस्थित राहत आहेत.
-
मुलांना वाचवताना वडिलांचा तलावात बुडून मृत्य
बीड येथे धक्कादायक घटना घडली आहे. मुलांना वाचवताना वडिलांचा तलावात बुडून मृत्य झाला आहे. तिन्ही मुलांना बाहेर काढल्यानंतर वडिलांना पाण्याचा अंदाज आला नाही, ज्यामुळे वडिलांचा मृत्यू झाला… पोलीस आणि अग्निशमन दलाने मृतदेह पाण्यातून काढला आहे.
-
पुस्तकाचं ज्ञान असतं तर कायद्याच्या चौकटीत जरांगे बोलले असते – विजय वडेट्टीवर
धमक्या देणं चुकीचं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काय ते मिळवा… पुस्तकाचं ज्ञान असतं तर कायद्याच्या चौकटीत जरांगे बोलले असते… जरांगेंनी पुस्तकातून नाही तर, आभाळातून ज्ञान आलं आहे.. असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
-
नाशिक-पुणे रेल्वेसाठी आज समृद्धी महामार्गावर रास्तारोको आंदोलन
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आरेखनानुसार करण्याची मागणी करण्यात आली. सिन्नर, संगमनेर, अकोले, नाशिक येथील नागरिक रस्त्यावर उतरून चक्कजाम आंदोलन करणार आहेत. आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे व आमदार सत्यजित तांबे सहभागी होणार आहेत. नाशिक पुणे मार्गावर आज आंदोलनामुळे वाहतूक कोंडीचे मोठे परिणाम दिसून येण्याची शक्यता… नाशिक- पुणे रेल्वे साठी सिन्नर संगमनेर चाकण येथे एकाच वेळी आंदोलन करणार आहेत.
-
UPI वापरासाठी कोणतेही शुल्क नसणार, वित्त मंत्रालयाचे स्पष्टीकरण
UPI वापरासाठी कोणतेही शुल्क नसणार आहे असं स्पष्टीकरण वित्त मंत्रालयाने दिलं आहे. सर्व व्यवहार पुर्णपणे मोफत असणार आहे… नागरिकांमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाल्यानंतर मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे…
-
प्रसाद लाड यांनी वातावरण केलंय, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे प्रसाद लाडच – लक्ष्मण हाके
मध्ये मध्ये जे लुडबूड करतात, उदय सामंत यांच्यापासून प्रसाद लाड यांच्यापर्यंत… यांना आम्ही प्रश्न विचारतो, आम्ही टीका केली तर, मारहाण केली जाते… जरांगेंनी आई – बहिणीवरून शिव्या दिल्या त्यांना काहीच करणार नाही, हा कसला दुजाभाव.. हे वातावरण प्रसाद लाड यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे प्रसाद लाडच आहे…. असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं…
-
राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 526 शाळा अनधिकृत असल्याचे उघडकीस
राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 526 शाळा अनधिकृत असल्याचे उघडकीस आले आहे. माहितीच्या अधिकारात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांनी ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिली आहे. या अनधिकृत शाळांपैकी 43 शाळा बंद करण्यात आले असून 155 शाळाविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आले आहे तसेच 422 शाळांना दंड किंवा नोटीस बजावण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यासाठी मान्यता आणि ‘यू डायस’ क्रमांक घेणे बंधनकारक असतानाही नियमांचे उल्लंघन करून या शाळा चालवल्या जात असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधीक 452 शाळा मुंबई विभागातील आहेत
-
नवी मुबंईतील कोपरखैरणे रेल्वे स्थानकात महिलेची छेड
नवी मुबंईतील कोपरखैरणे रेल्वे स्थानकात महिलेची छेड एक हात नसलेला व्यक्ती काढत होता, हा व्हिडिओ सोशल मीडियावर viral झाला होता. वाशी लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या सहा तासात सदर इसमाला अटक केलीय. सदर व्यक्ती मनोरुग्ण आहें, अधिक तपास वाशी लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
-
परभणीत ॲम्बुलन्स न मिळाल्याने प्रसुती दरम्यान आईसह बाळाचा दुर्दैवी मृत्यू
परभणीत ॲम्बुलन्स न मिळाल्याने प्रसुती दरम्यान आईसह बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परभणीच्या शासकीय रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूती दरम्यान गरोदर मातेची तब्येत खालावल्याने डॉक्टरांनी नांदेड येथे हलवण्याचा नातेवाईकांना सल्ला दिला होता. मात्र तीन तास ॲम्बुलन्स लेट झाल्याने आईसह बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. डॉक्टरसह रुग्णवाहिकेत चार ड्रायव्हर वर कारवाई करण्याची मयत महिलेच्या पतीने मागणी केली आहे.
-
नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आज चक्काजाम आंदोलन
नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आज चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आला आहे. चाकण पासून सिन्नर पर्यंत चक्काजाम केला जाणार आहे. नारायणगाव मधील GMRT चे कारण देत रद्द केलेला मार्ग पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे, संगमनेर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर बाळासाहेब थोरात तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील समृद्धी महामार्गावर सत्यजीत तांबे करणार आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. यामुळे नाशिक पुणे महामार्ग वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
पुणे शहरामध्ये स्वच्छताग्रहांची अवस्था दयनीय
पुणे शहरामध्ये स्वच्छताग्रहांची अवस्था दयनीय झाली आहे. महिलांच्या स्वच्छतेचा प्रश्न आणखीच गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरात स्वच्छतागृह शोधण्याची नागरिकांवर वेळ आली आहे. अनेक स्वच्छतागृहामध्ये दिवे नसल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. पाणी वीज आणि स्वच्छतेचा प्रचंड अभाव जाणवत आहे.
-
जळगावातील आकाशवाणीतील चौकातील खड्ड्यांच्या दुरुस्तीची भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांच्याकडून पोलखोल
जळगावातील आकाशवाणीतील चौकातील खड्ड्यांच्या दुरुस्तीची पोलखोल भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांनी केली आहे. महापालिकेकडून खड्ड्यांमध्ये डांबराऐवजी माती आणि मुरूम टाकून मलमपट्टी केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. नगरसेविका वैशाली पाटील यांनी स्वतः खड्ड्यांमधली माती उकरून दाखवत दुरुस्ती बद्दल अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत जाब विचारला. महापालिकेने 24 तासात शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे बुजवले नाही तर स्वखर्चाने काँक्रिटीकरण करून हे खड्डे बुजवू असा इशारा नगरसेविका वैशाली पाटील यांनी दिला आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात होणार चार जाहीर सभा
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला रविवारपासून सुरुवात होत आहे. सांगली जिल्ह्यात त्यांच्या चार ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. सांगलीच्या आटपाडी कवठेमंकाळ, बोरगाव आणि कडेगाव येथे सभा होणार आहेत. जरांगे पाटील आज आटपाडी येथे त्यांचे आगमन होणार आहे. सायंकाळी त्यांची जाहीर सभा आटपाडी मध्ये पार पडणार आहे. तर उद्या सकाळी कवठेमंकाळ तालुक्यात दौरा करून त्यांची सकाळी दहा वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे येथे मराठा समाजाच्या वतीने दुपारी तीन वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आणि कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे जरांगे पाटील यांचे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे.
-
मनसेतून भाजपात गेलेल्या वैभव खेडेकरांची राज ठाकरेंवर टीका
मुंबई – गोवा महामार्गाचं काम 97 टक्के पूर्ण, मग राज ठाकरे कशाची पाहणी करण्यासाठी येत आहेत? असा प्रश्न वैभव खेडेकर यांनी उपस्थित केला आहे. मनसेतून भाजपात गेलेल्या वैभव खेडेकरांची राज ठाकरे यांच्यावर टीका..
-
त्र्यंबकेश्वर खरोली रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या सलून व्यावसायिकाला मारहाण
मोटारसायकल बंद पडल्याने खरोली येथे रस्त्याच्या बाजूला व्यावसायिक उभा होता. स्कॉर्पिओ चालकाने रस्त्याच्या मध्ये का उभा राहतोस? म्हणत वाद घातल्याचा आरोप होत आहे. वादातून शिवीगाळ व दमदाटी करत कारमधून धारदार वस्तू काढून मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीत सलून व्यावसायिकाच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले, मध्यस्थी करणाऱ्यांनाही शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहेत. दमदाटीनंतर गाडीचालक नाशिकच्या दिशेने गेला निघून, याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावर; माणगाव बायपासची पाहणी करणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावर येत आहेत. माणगाव बायपास आणि मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी राज ठाकरे करणार आहेत. महामार्गाच्या रखडलेल्या कामासह रस्त्याच्या सद्यस्थितीचा ते आढावा घेणार असून, यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि महामार्ग अधिकाऱ्यांशीही चर्चा होणार आहे. राज ठाकरे ज्या ठिकाणी पाहणी करणार आहेत, या मुंबई-गोवा महामार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे.
-
युरोपमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून नागपूरच्या एका महिलेला पोर्तुगालमध्ये विकले
युरोपमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून नागपूरच्या एका महिलेला पुण्यातील कथित कंपनी संचालकांनी चक्क पोर्तुगालमध्ये विकले. तब्बल महिनाभर छळ सहन केल्यानंतर या महिलेने स्वतःची सुटका करून घेत पुन्हा पुणे गाठले आणि नंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पीडित महिला २८ वर्षांची आहे. ती जॉब सर्चिग करीत असताना डिसेंबर २०२५ मध्ये इंस्टाग्रामवर पुण्यातील विमान नगर परिसरातील ‘वी मायग्रेट’ नावाच्या कन्सल्टन्सीची तिला माहिती मिळाली. संपर्क केल्यावर एजन्सीने तिला पोर्तुगालमध्ये कॅशिअरच्या नोकरीचे आमिष दाखवले. दरमहा १.५ लाख रुपये पगार आणि दररोज फक्त ८ तासांचे काम, असे सांगण्यात आले. नोकरीसाठी विविध प्रक्रियेकरिता तिच्याकडून टप्प्याटप्प्याने ११ लाख रुपये उकळण्यात आले. धक्कादायक म्हणजे, नंतर आरोपींनी तिची पोर्तुगालमधील एका बिअर शॉपच्या मालकाला विक्री केली. तिथे तिच्याकडून जबरदस्तीने नको ते काम करून घेण्यात आले. जेव्हा महिलेने याचा विरोध केला, तेव्हा मालकाने तिला ‘तुला खरेदी करण्यासाठी मी भारतातील एजंट्सना पैसे दिले आहेत’ असे सांगितले.. सध्या पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
-
मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक
मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक असणार आहे. माटुंगा-मुलुंडसह सीएसएमटी-चुनाभट्टी, गोरेगाव-वांद्रे मार्गावर आज मेगाब्लॉक असणार आहे. धीम्या लोकल जलद मार्गावर वळवणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.. रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
-
नागपुरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण मात्र पावसाचा जोर नाही
नागपुरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण मात्र पावसाचा जोर नाही. आज सकाळ पासून सुद्धा ढगाळ आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले असून काही भागात रिमझिम पाऊस सुरु आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचं वातावरण बनल असलं तरी पावसाने उसंत घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला मात्र पावसाची प्रतीक्षा नागपूरकर करत आहे.
-
पुण्यातील गुन्हे शाखेची पब वर कारवाई, पहाटेपर्यंत 3 पर्यंत सुरु होता पब
पुण्यातील गुन्हे शाखेची पबवर कारवाई करण्यात आली. पहाटे 3 पर्यंत पब सुरू होता. पुण्यातील विमानतळ जवळ असलेल्या हौज कम्युन नावाच्या पबवर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. पबमध्ये पार्टी करणाऱ्या ६२ जणांची चौकशी सुरू आहे.
-
नाशिकच्या सुरगाणा दिंडोरी तालुक्यातील घरांना भूकंपाच्या धक्क्यामुळे तडे
नाशिकच्या सुरगाणा दिंडोरी तालुक्यातील घरांना भूकंपाच्या धक्क्यामुळे तडे आले आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या घरांना तडे गेल्याची माहिती देण्यात आली. 4.3 रिश्टर स्केल पाच किलोमीटर खोल भूकंपाची नोंद करण्यात आली. रात्री दहा वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी सुरगाणा तालुक्यात सह निफाड पेठ सुरगाणा देवळा त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरात भूकंपाचे धक्के जाणवले.
-
गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये मोठी वाढ
गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस येत असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरण साठ्यामध्ये मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणापैकी पुजारीटोला धरणाचे 6 गेट हे दीड फूट उंचीने सुरू करण्यात आले असून 2 गेट एक फूट उंचीने सुरू करण्यात आले आहेत. पाणीसाठ्यात वाढ झाल्यास पुन्हा धरणाचे गेट उघडण्यात येतील असे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले. तर कालीसरार धरणाची 4 गेट एक फूट उंचीने सुरू करण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला…. त्याचबरोबर इतर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत असल्याचे दिसून येते आहे….
-
पुणे विमानतळाच्या सुरक्षा हालचालींची दखल राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली
पुणे विमानतळाच्या सुरक्षा हालचालींची दखल राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. विमानतळ लगतच्या परिसरात असणाऱ्या कचऱ्यामुळे हवाई सुरक्षेला निर्माण झालेला धोका आणि वाढता पक्षी व प्राण्यांचा वावर यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुढील आठवड्यात तातडीची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या गंभीर समस्येवर चर्चा करण्यासाठी मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीला हवाई दल भारतीय विमान प्राधिकरण आणि पुणे महापालिकेच्या येथे नवल किशोर उपस्थित राहणार आहेत. विमानतळ परिसरातील कचरा व्यवस्थापन आणि त्यामुळे होणारा हवाई सुरक्षेचा धोका कायमस्वरूपी कसा दूर करता येईल यावर बैठकीत ठोस निर्णय होण्याची शक्यता.
-
नाशिकमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे केंद्रबिंदू गुजरातमध्ये ,नाशिक जिल्हा प्रशासनाची माहिती
गुजरात राज्यातील हतगडच्या डोंगरा रंगातील भणवड या ठिकाणी भूनकंपाचे केंद्रबिंदू ठरले आहे. काल रात्री नाशिकमध्ये दहा वाजेच्या सुमारास जाणवलेल्या भूकंपाचे धक्क्यांची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल तर खोली पाच किलोमीटरची नोंद करण्यात आली आहे. नाशिकला लागूनच गुजरात राज्य असून गुजरात मधील काही भागासह नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्याची शक्यता वर्तवली असून जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
Published On - Aug 09,2026 8:03 AM
