AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : अजितदादांचा घातपात असेल तर कोणालाही सोडणार नाही- देवेंद्र फडणवीस

| Edited By: | Updated on: Mar 29, 2026 | 3:33 PM
Share

Maharashtra News LIVE : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड होत आहेत. सातवा गुन्हा अशोक खरातवर दाखल झाला. राज्यात एलपीजी गॅसचे संकट अजूनही कायम आहे.

Maharashtra News LIVE : अजितदादांचा घातपात असेल तर कोणालाही सोडणार नाही- देवेंद्र फडणवीस
maharashtra news

भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अनेक महिला पुढे येऊन तक्रार देत आहेत. राज्यातील बडे नेते आणि बड्या अधिकाऱ्यांसोबत भोंदू अशोक खरात याचे फोटो व्हायरल होत आहेत. अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत आला. मंत्री शंभुराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर अनेकांनी टीका केली. आजही अधिवेशनात तो मुद्दा गाजताना दिसेल. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने कहर केला असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल युद्धात अनेक घडामोडी घडत आहेत. युद्ध थांबवण्याकरिता इजिप्तसारखे काही देश पुढे आली आहेत. राज्यातील काही भागात एलपीजी गॅसचा तुटवडा बघायला मिळत आहे. सरकारकडून एलपीजी गॅसची समस्या दूर करण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. होर्मुज खाडी इराणकडून खुली करण्यात आली. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेशातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Mar 2026 07:30 PM (IST)

    सांगलीचा, मिरज परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी

    सांगली शहरासह मिरज परिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. सायंकाळच्या सुमारास अचानकपणे आलेल्या या पावसामुळे सांगलीकरांची चांगली तारांबळ उडाली आहे. मात्र दुसरीकडे हवेत गारवा निर्माण झाल्यानं उष्णतेपासून दिलासा देखील मिळाला आहे.

  • 25 Mar 2026 07:15 PM (IST)

     भोंदू अशोक खरातची आजची SIT चौकशी संपली

    भोंदू अशोक खरातची आजची SIT चौकशी संपली

    दिवसभर सखोल चौकशीनंतर तपास पथकाकडून विचारपूस पूर्ण

    विविध मुद्द्यांवर खरातची चौकशी

    SIT तपासातून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

    खरातची आजची SIT चौकशी पूर्ण, उद्या पुन्हा चौकशी होणार

  • 25 Mar 2026 06:18 PM (IST)

    अजितदादांचा घातपात असेल तर कोणालाही सोडणार नाही- देवेंद्र फडणवीस

    अजितदादांचा अपघात हा घातपात असेल तर मी कुणालाही सोडणार नाही. कोणाच्याही बापाला आम्ही सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच कर्नाटक पोलिसांनी अजितदादांच्या अपघात प्रकरणात दाखल केलेला झिरो एफआयआर हा बेकायदेशीर आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • 25 Mar 2026 06:04 PM (IST)

    संभाजीनगरात पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा, वाहनांच्या रांगा

    छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरली आहे. पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी झाली. पेट्रोल पंपांवर दुचाकी, चारचाकी वाहनांची लांब रांग लागल्याचे दिसत आहे.

  • 25 Mar 2026 05:54 PM (IST)

    सातारा : पेट्रोल संपेल या भीतीने पंपावर वाहनचालकांच्या रांगा

    सातारा जिल्ह्यात हिंदुस्तान पेट्रोलियमचे पेट्रोल पंप काही ठिकाणी बंद असल्यामुळे सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या पेट्रोल भरण्यासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. याबाबत प्रशासनाने आवाहन करून देखील वाहन चालक आपल्या गाड्यांमधील टाक्या फुल करताना पाहायला मिळत आहेत.

  • 25 Mar 2026 05:40 PM (IST)

    नांदेड : वाढीव दराने गॅस सिलिंडरची विक्री

    नांदेडच्या अर्धापूर शहरात ही गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून याचा फटका हॉटेल व्यवसायाला बसताना पहायला मिळतोय. अर्धापूर येथील ताज आणि गरम जेवण देणाऱ्या एका हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय निम्म्यावर आलाय. चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याने मनुष्यबळ असतानाही ते वेळेत सर्व्हिस देऊ शकत नसल्याने हॉटेल व्यावसायिकाच्या नफ्यात तूट झालीये. गॅसधारक मात्र ब्लॅकमध्ये तीन ते चार हजार रुपयांना व्यावसायिक गँस विकत असल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिकाने केला आहे.

  • 25 Mar 2026 05:27 PM (IST)

    ठाणे जिल्हा परिषदेचा 116.99 कोटींचा अर्थसंकल्प सादर

    ठाणे जिल्हा परिषदेचा 2026-27 चा 116.99 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. ठाण्यातील बी.जे. हायस्कुल येथे बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रणजित यादव यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. यंदा जिल्हा परिषदेसमोर आर्थिक नियोजनाचे मोठे आव्हान उभे ठाकले असल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थावर मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा संकल्प केल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले.

  • 25 Mar 2026 05:17 PM (IST)

    सांगली : प्रलंबित मागण्यासाठी आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचे आंदोलन

    आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यासाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले. लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये अशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला सहभागी झाल्या होत्या.

  • 25 Mar 2026 04:54 PM (IST)

    ..तर भोंदू खरातला ट्रम्पचा एडव्हायझर नेमला असता- फडणवीस

    ‘जादूटोणा करून समस्या संपल्या असत्या तर भोंदू खरातला ट्रम्पचा एडव्हायझर नेमला असता. सुरक्षा सल्लागार म्हणून. लगेच विषय संपले असते. युद्ध ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो. दहशतवाद्यांना इथे बसूनच टाचण्यांनी संपवून टाकलं असतं. सीमेवर सैनिक पाठवण्याची गरज पडली नसती. पाच दहा भोंदू बाबा पाठवले असते आपली सीमा सुरक्षित झाली असती. आपल्याला प्रचार सभा घ्यायला लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसू सर्व निवडणुका जिंकता आल्या असत्या.’,  असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 25 Mar 2026 04:49 PM (IST)

    खरात प्रकरणी कोणाकडे माहिती असल्यास शासनाला द्या- फडणवीस

    खरात प्रकरणातील माहिती कोणाकडे असल्यात त्यांनी शासनाकडे द्यावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहिरपणे सांगितलं. श्रद्धा आणि अंधश्रद्धेत खूप छोटी रेष आहे. अंधश्रद्धेत विवेक कशा पद्धतीने हरवतो हे खरात प्रकरणात दिसलं असं त्यांनी सांगितलं.

  • 25 Mar 2026 04:32 PM (IST)

    यूसीसीबाबत मुख्यमंत्री भूपेंद्र आणि आमदारांचे अभिनंदनः अमित शहा

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “मला आनंद आहे की उत्तराखंडनंतर, गुजरातने आता समान नागरी संहिता (यूसीसी) विधेयक मंजूर करून आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे. यासाठी मी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांचे अभिनंदन करतो.”

  • 25 Mar 2026 04:19 PM (IST)

    पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ नाही – सरकार

    पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, कच्च्या तेलाचा पुरेसा साठा आहे. रिफायनरी 100% क्षमतेने कार्यरत आहेत. घाबरून खरेदी करणे टाळा. पेट्रोल आणि डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका. रेग्युलर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती पीएनजी आणि वाहतूक सीएनजीचा पुरवठा देखील 100% क्षमतेने केला जात आहे.

  • 25 Mar 2026 04:06 PM (IST)

    रवींद्र धंगेकर यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी

    भोंदू बाबा अशोक खरातच्या ईशान्यश्वर देवस्थानाला मंञी चंद्रकांत पाटील यांच्याकडून दीड कोटींच्या विकास कामांची मंजुरी देण्यात आली होती, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पुण्यातील खासदाराची अशोक खरात सोबत उठबस असल्याचा आरोपही रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.  रवींद्र धंगेकर यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

  • 25 Mar 2026 04:01 PM (IST)

    नागपूर जिल्हा परिषदेतील आर्थिक व्यवहारासंदर्भातील व्हीडिओ व्हायरल

    नागपूर जिल्हा परिषदेतील आर्थिक व्यवहारासंदर्भातील व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आर्थिक व्यवहारासंदर्भातील तक्रार प्राप्त होताच जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकारी आण कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. व्हायरल व्हीडिओत पैसे घेताना दिसणारे परिचर (शिपाई)गौरव कंगाली आणि लेखा अधिकारी जितेंद्र राऊत यांच्यावर पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत जिल्हापरिषेदचे सीईओ विनायक महामुनी यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यावर दख घेण्यात आली.

  • 25 Mar 2026 03:45 PM (IST)

    अमरावतीच्या पंचवटी चौकातील आणि आयटीआय समोरील पेट्रोल पंपवरील इंधन संपले

    अमरावतीच्या पंचवटी चौकातील आणि आयटीआय समोरील पेट्रोल पंपवरील पेट्रोल संपलं आहे. त्यामुळे बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर नागरिकांची भर उन्हात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंपवर आता ऑनलाइन पेमेंट ऐवजी कॅश पेमेंट घेण्यावर भर असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 25 Mar 2026 03:18 PM (IST)

    शिर्डीत भोंदू अशोक खरातच्या आणखी एका मालमत्तेचा खुलासा

    शिर्डीत भोंदू अशोक खरातच्या आणखी एका मालमत्तेचा खुलासा झाला आहे. काकडी शिवारात विमानतळाजवळ 5 एकर प्लॉट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. विमानतळावर जाताना प्लॉट आवडला आणि खरातने ऑफर दिली, असं जमिन विक्रेते विजय कोते यांनी सांगितलं. जमीन खरेदीची प्रक्रिया दोन वर्षांपूर्वी झालीय. 64 लाखांत साठेखत तर NA झाल्यानंतर भुखंड नावांवर होणार होता.

  • 25 Mar 2026 03:03 PM (IST)

    हिंगोलीतील पोस्ट ऑफीसला धमकीचा मेल, नक्की काय?

    हिंगोलीतील पोस्ट ऑफीसला धमकीचा मेल आला आहे. सायनॉइड विषारी वायू मिश्रित 16RdX बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा मेल पोस्ट ऑफीसला आला आहे. त्यामुळे घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झालं आहे. या पथकाकडून संपूर्ण पोस्ट ऑफीस रिकामी करण्यात आलं असून तपास केला जात आहे.

  • 25 Mar 2026 02:55 PM (IST)

    पोस्ट ऑफिस उडवून देण्याची धमकी, सर्वत्र खळबळ

    बीड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर येथील पोस्ट ऑफिसला उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. सध्या या पोस्टऑफिस मध्ये पोलीस पोहचले असून या बॉम्ब शोध पथक या ठिकाणी बॉम्ब आहे का याचा शोध घेत आहे

  • 25 Mar 2026 02:45 PM (IST)

    SIT-क्राइम ब्रँचेच पथक सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल

    भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील SIT आणि क्राइम ब्रँचेच पथक सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणातील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. दाखल गुन्ह्यांच्या संदर्भात माहितीसाठी एसआयटी पथक आणि क्राइम ब्रांच चे पथक आल्याची माहिती.

  • 25 Mar 2026 02:30 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील तापमानचा पारा वाढला

    गडचिरोली जिल्ह्यातील तापमान 35 ते 38 डिग्री झाल्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तापमानामुळे नागरिक बाहेर पडण्यास भीती व्यक्त करीत आहेत. चार दिवसा अगोदर गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे थंडगार वातावरण झाले होते परंतु चार दिवसात उन्हाळ्याच्या तडाका सुरू झालेला आहे

  • 25 Mar 2026 02:15 PM (IST)

    Lpg गॅस भरण्यासाठी रिक्षाचालकांच्या रांगाच रांगा

    Lpg गॅस भरण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात रिक्षाचालकांच्या रांगा लागल्या आहेत, तसेच lpg गॅस महाग झाला असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे गॅस मिळत नाही आणि मिळाला तर महाग मिळत असल्याने रिक्षा भाड्यात मात्र वाढ झाली नसल्याचे lpg रिक्षा चालकांचे म्हणणे आहे

  • 25 Mar 2026 01:55 PM (IST)

    भटक्या कुत्र्यांची दहशत, विद्यार्थिनीवर हल्ला

    अंबरनाथ शहरातील वांद्रापाडा परिसरात विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्याचा अचानक हल्ला…. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद… पालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी…

  • 25 Mar 2026 01:45 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याला वेग

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याला वेग…पाईपलाईनद्वारे गॅस वितरणासाठी सुमारे 100 कंपन्यांशी करार केल्याची माहिती….गेल्या काही काळापासून गॅस टंचाईमुळे अनेक उद्योग अडचणीत आले होते. काही उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर होते.

  • 25 Mar 2026 01:40 PM (IST)

    बीड शहरातील पोस्ट ऑफिस उडवून देण्याची धमकी

    बीड शहरातील पोस्ट ऑफिस उडवून देण्याची धमकी. पोस्ट ऑफिसमधील पासपोर्ट कार्यालयाला मेलवरुन धमकी. धमकी आल्याने बीडमध्ये खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल. धमकीचा इ-मेल कुणी केला याची पोलिसांकडून चौकशी सुरू

  • 25 Mar 2026 01:35 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या महिला संघटेनत रुपाली चाकणकरांविषयी तीव्र नाराजी

    राष्ट्रवादीच्या महिला संघटेनत रुपाली चाकणकरांविषयी तीव्र नाराजी. चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्याची मागणी. नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची सुनेत्रा पवारांकडे पत्राद्वारे मागणी. रुपाली चाकणकर यांच्या मुळे पक्षाच्या पुरोगामित्व चेहऱ्याला डाग लागली जात आहे असा पत्रात उल्लेख

  • 25 Mar 2026 01:25 PM (IST)

    पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काऊंटर होईल असं वाटतं- वडेट्टीवार

    पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काऊंटर होईल असं वाटतं… विजय वडेट्टीवारांकडून संशय व्यक्त तर पेनड्राईव्ह समोर आला तर दोघातिघांची विकेट जाईल… मात्र सरकार केवळ सोयीच्या गोष्टी समोर आणतंय… वडेट्टीवारांची टीका

  • 25 Mar 2026 01:15 PM (IST)

    गेल्या तासाभरापासून भोंदू खरातची SIT कडून चौकशी सुरु

    गेल्या तासाभरापासून भोंदू खरातची SIT कडून चौकशी सुरु. सलग सातव्या दिवशी भोंदू खरातची SIT कडून चौकशी. SIT प्रमुख तेजस्वी सातपुतेंच्या उपस्थितीत चौकशी सुरु. गोपनीय ठिकाणी भोंदू खरातची SITची चौकशी

  • 25 Mar 2026 12:58 PM (IST)

    ठाण्यात वर्गणीवरून वाद, चॉपरने डोक्यात वार

    ठाणे शहरातील गावदेवी परिसरात वर्गणी मागण्याच्या कारणावरून एक धक्कादायक हल्ल्याची घटना समोर आली आहे. साई मंदिरात आयोजित भजन-कीर्तन सोहळ्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवर धारदार शस्त्राने डोक्यात हल्ला करण्यात आला.

  • 25 Mar 2026 12:42 PM (IST)

    सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची वाढ

    सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 20 हजार रूपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 49 हजार 865 रुपये तर चांदीचे दर 2 लाख 47 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याचे संकेत असल्याने त्याचा परिणाम झाल्याने सोने चांदी दरात वाढ झाल्याचं सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे.

  • 25 Mar 2026 12:30 PM (IST)

    धुळ्यातील पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

    धुळ्यातील पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी. शहरात उडाली एकच खळबळ. धुळे पोलीस सायबर यंत्रणेसह मुख्य पोस्ट कार्यालयात दाखल. मात्र गंभीर बाब म्हणजे पोस्ट कार्यालयातील मुख्य ईमेलवर हा संदेश प्राप्त झाल्याची माहिती. सुरक्षेच्या कारणावरून कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले. पोलीस प्रशासन संपूर्ण पोस्ट कार्यालयाची करत आहेत तपासणी.

  • 25 Mar 2026 12:17 PM (IST)

    भोंदू अशोक खरातच्या बेकायदा ईशान्येश्वर मंदिरासाठी थेट शासनाचीच मदत का?

    धक्कादायक भोंदू अशोक खरातच्या बेकायदा ईशान्येश्वर मंदिरासाठी थेट शासनाचीच मदत का? उपलब्ध सरकारी शासन निर्णयनुसार ,नाशिक जिल्ह्यातील श्री ईशान्येश्वर देवस्थान (मिरगाव, सिन्नर) येथे विकास कामांसाठी तब्बल 1 कोटी 5 लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यातील ₹25 लाखांचा निधी 2018 सालासाठी मंजूर करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली माहिती.

  • 25 Mar 2026 12:08 PM (IST)

    राजकारण वंगाळ, सुनेत्राकाकींनी काळजी घ्यावी – रोहित पवार

    राजकारण वंगाळ, सुनेत्राकाकींनी काळजी घ्यावी. दादांच्या अपघाताबद्दल तटकरे, पटेलांनी कोणाला बोलू दिलं नाही. तटकरे, पटेलांनी एनसीपी पक्षासंदर्भात नियम बदलले. आमदारांमुळे सुनेत्रा काकी पक्षाच्या अध्यक्ष बनल्या असा दावा रोहित पवार यांनी केला.

  • 25 Mar 2026 11:57 AM (IST)

    सोलापुरात मनसेच्या वतीने भोंदू बाबा खरात विरोधात निदर्शने

    सोलापुरात मनसेच्या वतीने भोंदू बाबा खरात विरोधात निदर्शनं करण्यात आली. भोंदू बाबा खरातच्या प्रतिमेला शेण खाऊ घालत निषेध नोंदवण्यात आला.

  • 25 Mar 2026 11:52 AM (IST)

    भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वराच्या मंदिराच्या उजव्या बाजूला तीन अग्निकुंड सापडली

    मिरगाव, सिन्नर  – भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वराच्या मंदिराच्या उजव्या बाजूला तीन अग्निकुंड सापडली. होम आणि विविध धार्मिक विधीसाठी अग्निकुंड वापरण्यात आली.  अर्धवट जळलेले नारळ, होम-हवन साठी लागणार साहित्य जळालेल्या अवस्थेत होतं. याच अग्निकुंडामध्ये विविध धार्मिक आणि आघोरीक पूजा करत असल्याची शक्यता आहे.

    खरातच्या फार्महाऊस वर जिवंत काडतूसं आणि पाच फायर केलेल्या पुंगळ्या आढळल्या होत्या , त्यामुळे नरबळी आणि हरणाच्या कस्तुरीसाठी बाबाने प्रयत्न केले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • 25 Mar 2026 11:32 AM (IST)

    अक्कलकोटमध्ये प्रत्येक गुरुवारी मांस विक्री राहणार बंद, नगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

    -लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अक्कलकोटनगरीमध्ये प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद राहणार – नगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय.  प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद ठेवण्याचा नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी निर्णय घेतला.  – स्वामीभक्त आणि अक्कलकोट वासियांकडून नगरपरिषदेच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करण्यात आलं.  गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी भक्तांकडून होत असलेली मागणी अखेर पूर्ण.

  • 25 Mar 2026 11:15 AM (IST)

    सुनिल तटकरेंनी ठरवलं तरच चाकणकरांवर कारवाई होईल – वडेट्टीवार

    सुनिल तटकरे सांगत नाहीत तोपर्यंत चाकणकरांचा राजीनामा होणारप नाही, सुनेत्रा पवार नव्हे तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रवादीवर ताबा. ते दोनच बॉस आहेत.  तटकरेंच्या मनात येईल तेव्हाच चाकणकरांवर कारवाई होईल – विजय वडेट्टीवार यांनी साधला निशाणा.

  • 25 Mar 2026 11:07 AM (IST)

    सोलापुर – यापुढे गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर न मिळता केवळ घरपोच मिळणार

    यापुढे गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर न मिळता केवळ घरपोच मिळणार अशी माहिती सोलापुरातील गॅस एजन्सी चालकांनी दिली आहे.

    यापुढे एजन्सीतून गॅस न देता तो घरपोच करायचा आहे अशा सूचना आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.   आम्हाला गॅस साठा कमी येत आहे त्यामुळे आमच्याकडे जेवढा गॅस आहे तेवढाच पुरवठा करतोय.  रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत गॅस वितरित केला आहे त्यामुळे आमच्याकडे साठा आला की आम्ही देतोय, असं त्यांनी नमूद केलं.

  • 25 Mar 2026 10:55 AM (IST)

    सोलापुरात गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा

    सोलापुरात गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडर मिळावा यासाठी नागरिकांची गॅस एजन्सीबाहेर भलीमोठी रांग पहायला मिळतेय. सोलापुरात गॅस तुटवड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. “सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही रांगेत थांबलोय, मात्र गॅस एजन्सी बंदच आहे. आम्हाला नंबर लावून आठ दिवस झाले तरीही सिलिंडर मिळत नाही. आम्ही कामं सोडून इथेच थांबायचं का, आमच्याकडे एकच टाकी आहे मग आम्ही काय उपाशी राहायचं का,” असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

  • 25 Mar 2026 10:45 AM (IST)

    गॅस सिलेंडरनंतर पेट्रोल-डिझेलासाठी नागरिकांच्या रांगा

    गॅस सिलेंडरनंतर पेट्रोल-डिझेलासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. कोल्हापुरात पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी सलग दुसऱ्या दिवशी गर्दी केली आहे. तर नागपुरातदेखील पेट्रोलसाठी दुसऱ्या दिवशीही रांगा लागल्या आहेत. रत्नागिरीतही हीच परिस्थिती पहायला मिळतेय. पेट्रोल संपणार, अशी अफवा पसरली आणि त्यानंतर वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करण्यास सुरुवात केली.

  • 25 Mar 2026 10:30 AM (IST)

    भोंदूबाब अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी मंजूर करण्यात आला होता दीड कोटीचा निधी

    भोंदूबाब अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. युती सरकारच्या काळातील 2018 सालचा जीआर समोर आला आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने मंदिराचं काम पूर्ण केलं होतं. 31 मार्च 2018 रोजी मंदिराच्या निधीसाठी जीआर काढण्यात आला होता.

  • 25 Mar 2026 10:15 AM (IST)

    खरात प्रकरणातील महिलांचे फोटो समोर कसे येतात, सरकारला लाज वाटली पाहिजे- राऊत

    “अशोक खरात प्रकरणी जप्त केलेले मोबाइल पोलिसांकडे आहेत. पोलीस गृह खात्याच्या नियंत्रणाखाली आहे आणि गृह खातं भाजपकडे आहे. देशभरात बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत, पण कोणत्या पीडितांचे फोटो, व्हिडीओ समोर आले नव्हते. परंतु कायद्याच्या बालेकिल्ल्यात नाशिकमध्ये त्या महिलांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सरकारला, मंत्र्यांना याची लाज वाटली पाहिजे. महिलांचे फोटो बाहेर कसे येतात, यामागे कोणाचं षडयंत्र आहे, याची चौकशी केली पाहिजे,” अशा शब्दांत संजय राऊतांनी फटकारले.

  • 25 Mar 2026 10:00 AM (IST)

    भोंदूबाबा अशोक खरात हा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत प्रचारक होता- राऊत

    भोंदूबाबा अशोक खरात हा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत प्रचारक होता. भाजप किंवा संघाची निती ही अशाप्रकारच्या बाबा, बुवा, महाराज यांची संघटना बांधायची आहे. त्यांनी वारकरी संप्रदायालासुद्धा राजकारणात ओढलेलं आहे. त्यामुळे भाजपचा या पापाचा मोठा भागीदार आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

  • 25 Mar 2026 09:53 AM (IST)

    वाळूज एमआयडीसीला मोठा दिलासा, पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याला वेग

    छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योगांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून गॅस टंचाईमुळे संकटात सापडलेल्या उद्योगांना आता पाईपलाईनद्वारे थेट गॅस पुरवठा केला जात आहे. यासाठी सुमारे १०० कंपन्यांसोबत करार करण्यात आले असून, त्यापैकी १३ कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष पुरवठा सुरू झाल्याने ठप्प झालेले उत्पादन पुन्हा सुरू झाले आहे. गॅस टंचाईमुळे अनेक छोटे-मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर होते, मात्र आता २०० ते ३ हजार किलो गॅसची गरज असलेल्या कंपन्यांना पाईप गॅस मिळाल्याने मोठी उभारी मिळाली आहे. आगामी काळात १८ हजार किलोपर्यंत गॅसची गरज असलेल्या मोठ्या कंपन्यांनाही ही सुविधा देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

  • 25 Mar 2026 09:43 AM (IST)

    जालन्यात भररस्त्यात थरार, कौटुंबिक वादातून तुंबळ हाणामारी, 3 जण जखमी

    जालना शहरातील दुखी नगर भागात मंगळवारी दुपारी कौटुंबिक वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. दोन गटांमध्ये झालेल्या या वादात लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला. ज्यामध्ये तीन तरुण गंभीर जखमी झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणावर अचानक तिघांनी हल्ला चढवला, त्यानंतर दोन्ही बाजूने समर्थक भिडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे, या घटनेला बराच वेळ उलटूनही रात्री उशिरापर्यंत पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

  • 25 Mar 2026 09:33 AM (IST)

    नाशिक रोड कारागृहात खळबळ, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

    नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात एका ३२ वर्षीय कैद्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शंकर काशिनाथ भोगाडे असे या कैद्याचे नाव असून, तो खून आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. विशेष म्हणजे, २८ दिवसांची रजा मंजूर झाल्यानंतर भोगाडे कारागृहातून बाहेर पडला होता. मात्र रजा संपल्यानंतर तो ४१५ दिवस फरार होता. पोलिसांनी त्याला नुकतेच अटक करून कल्याण कारागृहातून पुन्हा नाशिक रोड कारागृहात आणले होते. जिथे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

  • 25 Mar 2026 09:23 AM (IST)

    अशोक खरातचा बुरखा फाटला, स्वतःला अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा निघाला दहावी फेल

    नाशिकमधील अशोक खरातचा एक धक्कादायक शैक्षणिक खुलासा समोर आला आहे. भविष्य आणि अंकांच्या खेळात लोकांना अडकवणारा खरात प्रत्यक्षात १९८३ च्या दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत नापास झाला होता, विशेष म्हणजे ज्या गणिताच्या आधारे तो अंकशास्त्राचा दावा करतो, त्यातच त्याला अपयश आले होते. शाळेच्या नोंदीनुसार त्याचे मूळ नाव ‘लक्ष्मण एकनाथ खरात’ असून त्याने नंतर नाव बदलून ‘अशोककुमार’ केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ ३५.८६ टक्के गुण असतानाही स्वतःला कॅप्टन म्हणवून घेत त्याने हजारो लोकांची फसवणूक केल्याचे आता उघड झाले आहे.

  • 25 Mar 2026 09:13 AM (IST)

    अमरावतीत स्टोन क्रशरमुळे ग्रामस्थ आक्रमक; वडगाव माहोरे येथे चक्काजाम आंदोलन

    अमरावती शहराजवळील वडगाव माहोरे येथील नागरिकांनी आज रस्ता रोखून धरत जोरदार चक्काजाम आंदोलन केले. परिसरातील स्टोन क्रशरमधून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या त्रासाला कंटाळून ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. या क्रशरमुळे होणाऱ्या जड वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. जोपर्यंत हे स्टोन क्रशर बंद केले जात नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 25 Mar 2026 09:03 AM (IST)

    संतापलेल्या पत्नीने पतीच्या डोळ्यात फेकली मिरची पूड, प्लॉटच्या वादातून खळबळ

    सिल्लोड तालुक्यातील घटनांद्रा येथे कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या पतीची हत्या केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. घराचा प्लॉट विकण्याच्या कारणावरून जेबास तालीब पठाण आणि त्यांची पत्नी रशिदाबी यांच्यात तीव्र वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्याने रशिदाबीने रागाच्या भरात पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मृताच्या पुतण्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे.

  • 25 Mar 2026 08:50 AM (IST)

    शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला उत्साहात सुरुवात..

    साईनामाच्या जयघोषाने दुमदूमली साईनगरी. काकड आरतीनंतर पोथी मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात. शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल. उद्या मुख्य रामनवमी दिवशी साई मंदिर रात्रभर खुले. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जाणारा हा उत्सव. धर्मध्वज (निशाण) मिरवणूक ठरणार मुख्य आकर्षण…

  • 25 Mar 2026 08:40 AM (IST)

    राज्यात खरात प्रकरण गाजत असतानाच डोंबिवलीत ‘भोंदू बाबा’ जेरबंद

    लग्नातील ‘दोष’ काढण्याच्या बहाण्याने बापाला लुटले, डोंबिवलीत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणारा दीपक सावंत पोलिसांच्या जाळ्यात. मुलीच्या लग्नातील ‘दोष’ काढण्याच्या बहाण्याने वयोवृद्ध पित्याला जाळ्यात ओढलं. विधीच्या नावाखाली सोन्याचे ब्रेसलेट व चांदीची नाणी एका लाल रुमाला ठेवून त्या रुमालाची अदलाबदल करत “6 महिन्यांनी उघडा” सांगून हातचलाखीने केले होते दागिने लंपास

  • 25 Mar 2026 08:30 AM (IST)

    अजय बागुल मामा राजवाडे यांच्यासह पाच जणांना हायकोर्टातून जामीन मंजूर…

    बाबासाहेब उर्फ मामा राजवाडे हे ठाकरे सेनेच्या महानगरप्रमुख पदावर असताना त्यांनी भाजपमध्ये केला होता पक्ष प्रवेश. नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मोहीम राबवत केली होती राजकीय हितसंबंध असलेल्यांवर कारवाई. अजय बागुल आणि मामा राजवाडे यांच्यासह पाच जणांना हायकोर्टातून जामीन मंजूर झाल्याने त्यांची होणार तब्बल सहा महिन्यानंतर न्यायालयीन कोठडीत सुटका

  • 25 Mar 2026 08:20 AM (IST)

    पुणे भूमिगत मेट्रोची सुरक्षा धोक्यात…

    घरा खालून भूमिगत मेट्रोमार्गीका गेली असल्याची माहिती असताना शुक्रवार पेठेतील धनंजय मोटे नामक घरमालकाने बोरवेल घेतल्याने स्वारगेट पिंपरी भूमिगत मेट्रो मार्गीकेत पाणी गळती झाल्याचा प्रकार उघडीस आला झाला छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरात ही घटना नुकतीच घडली त्यानंतर मेट्रोतील अधिकाऱ्यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर एका घरमालकासह ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 25 Mar 2026 08:18 AM (IST)

    कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार! आजारी महिला घरात असतानाच KDMC ने लावलं सील

    घरात आजारी महिला झोपलेली असतानाच KDMC कडून घर सील, संतापजनक प्रकार उघड. तब्बल 4–6 तास महिला घरातच कोंडली, आरडाओरडीनंतर अधिकाऱ्यांनी सील काढलं. शेजाऱ्यांनी महिला आत असल्याचं सांगूनही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप

Published On - Mar 25,2026 8:16 AM

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.