AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्षणातच मृत्यू… कुणाचा जीमला जाताना तर कुणाची कार पलटी होऊन अपघात, राज्यासाठी शनिवार नव्हे घातवार…

महाराष्ट्रात आज अनेक भयानक रस्ते अपघात घडले. बदलापूरमध्ये एका आयशर ट्रकचा अपघात झाला ज्यात दोघांचा मृत्यू झाला. गोव्याहून येणाऱ्या कारने मोटरसायकलला धडक दिली. भिवंडी-मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीस्वार ठार झाला. नांदेडमध्ये दोन कारंचा अपघात झाला. अनेक अपघातांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे.

क्षणातच मृत्यू... कुणाचा जीमला जाताना तर कुणाची कार पलटी होऊन अपघात, राज्यासाठी शनिवार नव्हे घातवार...
| Updated on: Aug 02, 2025 | 11:49 AM
Share

शनिवार सकाळचा दिवस हा राज्यातील नागिरकांसाठी काही फराशी सपखद बातमी घेऊन आलेला नाही. राज्यातील विविध भागांत झालेल्या अपघातांमध्ये अनेक लोकांना जीव गमवावा लागला असून काहींची प्रकृती तर अतिशय गंभीर आहे. बदलापूर जवळ आयशर ट्रकने तीन-चार वाहनांना धडक दिली तर गोव्याहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मोटारसायकलला ठोकलं. एवढंच नव्हे तर भिवंडी – मुंबई नाशिक महामार्गावर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला असून भयानक असा हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. सर्व अपघातांत मिळून चौघे ठार तर 7 जण जखमी झाले आहेत.

कुठे काय घडलं ?

बदलापूरमध्ये भीषण अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू, भयानक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर

बदलापुरातल्या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. आज सकाळच्या सुमारास एका आयशर ट्रकने वाली नाक्यावर तीन ते चार वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय. त्यात एका महिलेसह रिक्षा चालकाचा समावेश आहे. तीन ते चार जण गंभीरित्या जखमी झाले आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमधील वाहनाचा वेग पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता लक्षात येते. सुदैवाची बाब म्हणजे कार मध्ये अडकलेल्या एका तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. हा तरुण जिमला जाण्यासाठी निघाला होता. त्याचवेळी वालीवली ऐरंझाडच्या भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने तीन ते चार वाहनांना धडक दिली. त्यानंतर हा ट्रक चार चाकीवर धडकला. अपघातानंतर ट्रक चालकांना घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

गोव्याहून भरधाव वेगात येणाऱ्या कारची सावंतवाडीत मोटरसायकलला जोरदार धडक, तरूणाच्या डोक्याला दुखापत

तर जून्या मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली येथे इरटीका कार व मोटरसायकलचा अपघात झाला. गोव्या वरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने इन्सुली येथे मोटरसायकल चालकाला जोरदार धडक दिली. या धडकेत सावंतवाडीतील युवकाच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलवण्यात आले आहे. अपघातानंतर कार मधील युवकांनी घटनास्थळावर न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरीकांनी त्या कारचा पाठलाग केला. त्यावेळी ही कार रस्त्यात सोडून यातील तीनही युवकांनी पळ काढला. सध्या सावंतवाडी पोलीस सीसीटीव्ही फूटेज पाहून या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

कचरा वेचून उपजीविका करणाऱ्या इसमाच्या काही क्षणातच ट्रक अपघातात मृत्यू

दरम्यान, काल देवरी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एक विचित्र अपघात घडला. कचरा वेचून आपली उपजीविका करणारा 60 वर्षीय सुखदास गावडकर रा. जरताळटोला देवरी या इसमाचा जागीच मृत्यू झाला. अचानक अनियंत्रित झालेला चेचेस ट्रक त्याच्या अंगावर आला आणि पूर्ण शरीराचा चेंदामेंदा काही क्षणातच होऊन गेला आणि ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतही भयानक अपघात

तर मुंबईतील अंधेरी वेस्टर्न हायवेवरती विलेपार्ले कडे जाणाऱ्या दिशेच्या फ्लायओव्हर ब्रीज येथे चारचाकी गाडीचा अपघात झाला. पहाटे 5.30 वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर आली असून गाडीचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी ही जागेवरच पलटी झाली. मात्र जवळच्या स्थानिक लोकांनी त्वरित गाडी मधून चालकाला सुखरूप बाहेर काढल्याने तो वाचला. मुंबई पोलीस अपघाताच्या कारणांचा तपास करत आहेत.

भिवंडी – मुंबई नाशिक महामार्गावर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार,

मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या वाहुली गावच्या हद्दीत भरधाव आयव्हा डंपर ने दिलेल्या धडकेत एका दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रस्त्य लगतच्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.ही धडक एवढी जोरदार होती की यामध्ये दुचाकी चालक जागेवरच गतप्राण झाला. या अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.फिरदौस अबिद तौफ फरोश रा. वाशिंद असे मयताचे नाव आहे. स्थानिक पडघा पोलिसांनी डंपर जप्त केला असून चालकाचा शोध घेत आहेत.

नांदेडमध्ये मध्यरात्री दोन कारचा अपघात, दोघे जखमी

अपघाताच्या सत्रात नांदेडच्या घटनेमुळेही भर पडली. नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात मध्यरात्री एक वाजता दोन कारची धडक झाल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात रस्त्यावर लावलेले लोखंडी डिव्हायडर तुटले. त्यातील एक कारचालक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली. दोन गंभीर जखमींवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.