AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा तगडा डाव, अंतरवाली सराटीतून मुंबई निशाण्यावर? उपोषणाचा प्लॅन काय?

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण अंतरवाली सराटीतच होणार आहे. जरांगे यांनी ही माहिती दिली. प्रसंगी प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबई गाठण्याचा थेट इशारा त्यांनी दिला.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा तगडा डाव, अंतरवाली सराटीतून मुंबई निशाण्यावर? उपोषणाचा प्लॅन काय?
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 19, 2026 | 9:48 PM
Share

Manoj Jarange on Eknath Shinde -Devendra Fadnavis: येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्धार व्यक्त केला आहे. अंतरवाली सराटीतून मुंबई टप्प्यात आली आहे. त्यांनी मोठा डाव टाकला आहे. तब्येत साथ देत नसली तरी त्यांचा निश्चिय पक्का आहे. यामुळे कार्यकर्ते आणि आंदोलकांसोबत सरकारचीही चिंता वाढली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण अंतरवाली सराटीतच होणार आहे. जरांगे यांनी ही माहिती दिली. प्रसंगी प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबई गाठण्याचा थेट इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळं उपोषणाची वेळ आल्याचा गंभीर आरोप केला. मंत्री संजय सिरसाट यांच्या आडमुठेपणा शिंदेंना नडणार असून दोघांची मिली भगत असणार अशी शंकाही जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. यामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. तिकडे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सुद्धा मुंबईत उपोषणाचा इशारा दिला आहे. यामुळे दोन्ही समाजातील कार्यकर्ते मुंबईत दाखल झाल्यास मोठा पेचप्रसंग निर्माण होण्याची भीती आहे. राज्य सरकारसह पोलीस प्रशासन या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

शिंदे यांच्या सांगण्यावरूनच बैठकांचं सत्र

मनोज जरांगे यांचं उपोषण अंतरवाली सराटीतच होणार असल्याची माहिती खुद्द त्यांनी दिली आहे. येत्या 29 ऑगस्टला जरांगे पुन्हा आमरण उपोषणला बसणार आहेत.मात्र हे आंदोलन मुंबई होणार की अंतरवाली सराटी याबाबत संभ्रम होता. मात्र आता मराठा समाजाचं आंदोलन अंतरवाली सराटीतच होणार असून प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरु असतानाच मुंबईला जाणार आणि त्यासाठी परवानगी अर्ज केला असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळेच उपोषणाची वेळ आली आहे. शिंदे यांच्या सांगण्यावरूनच बैठका घेण्यात आल्या. एकनाथ शिंदे आणि संजय सिरसाट यांची मिलीभगत असून सिरसाट यांनी प्रमाणपत्र रद्द केले असा आरोपही जरांगे यांनी केला आहे.

तब्येतीमुळे मराठवाडा दौरा रद्द

मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर त्यांना ताप, सर्दी आणि इतर आजारांनी घेरलं. त्यांना अशक्तपणा आला. त्याही स्थितीत त्यांनी तीन दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीत मराठा अभ्यासकांची बैठक बोलावली. ती बैठक पार पडताच ते तातडीने रुग्णालयात दाखल झाले होते.

Follow Us
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात