AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

29 तारखेला आरक्षणाचा तुकडाच पाडणार, मनोज जरांगे कडाडले, सरकार काय भूमिका घेणार?

येत्या 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील आपल्या लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या आझाद मैदानात येणार आहेत. दरम्यान, जरांगे यांच्या या आंदोलनाची पुन्हा एकदा महाराष्ट्रभर चर्चा चालू झाली आहे. एकीकडे गणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईत येणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्या व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जरांगे हे मुंबईत येण्यावर ठाम असून त्यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी आरक्षणाचा तुकडा पाडणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे.

29 तारखेला आरक्षणाचा तुकडाच पाडणार, मनोज जरांगे कडाडले, सरकार काय भूमिका घेणार?
manoj jarange
| Updated on: Aug 24, 2025 | 3:05 PM
Share

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी मुंबईत धडकणार आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील आपल्या लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या आझाद मैदानात येणार आहेत. दरम्यान, जरांगे यांच्या या आंदोलनाची पुन्हा एकदा महाराष्ट्रभर चर्चा चालू झाली आहे. एकीकडे गणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईत येणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्या व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जरांगे हे मुंबईत येण्यावर ठाम असून त्यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी आरक्षणाचा तुकडा पाडणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे.

सर्वांनी मुंबईत यावे, माझे आवाहन

मनोज जरांगे हे जालन्यात बोलत होते. यावेळी त्यांनी 29 ऑगस्टच्या मोर्चाबाबत भाष्य केलं. या मोर्चासाठी मराठा बांधवांनी मोठ्या ताकदीने आले पाहिजे. 29 ऑगस्टला सर्वांनी मुंबईला या असे माझे आवाहन आहे. समाजाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

फडणवीस यांचं मराठ्यांना बरबाद करण्याचं स्वप्न

तसेच, राजकारण्यांच्या दबावात कोणीही राहू नये. मुंबईत कोणताही राजकारणी येणार नाही. सरकारमधून आम्हाला प्रतिसाद दिला जात नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचं मराठ्यांना बरबाद करण्याचं स्वप्न आहे. मराठ्यांची पोरं आत्महत्या करून मेली पाहिजेत, हे त्यांचं काम आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

29 ऑगस्टला आरक्षणाचा तुकडा पाडणार

तसेच आम्ही तुम्हाला गुडघ्यावर बसवणार आहोत. येत्या 29 ऑगस्ट रोजी आम्ही आरक्षणाचा तुकडा पाडणार आहोत. मी चार महिन्यांपूर्वीच या आंदोलनाची तारीख जाहीर केली होती. दोन दिवसांपूर्वी आम्ही फोन कॉल केला होता. 20 ऑगस्टच्या आत आमच्या मागण्या पूर्ण करा, असे आम्ही सांगितले होते, असेही यावेळी जरांगे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांविषयी…

आम्ही तुमचीच लेकरं आहोत. आम्ही काय चूक केलेली आहे. एखादा माणूस खुनशी असतो. देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांविषयी खुन्नस आहे, अशी घणाघाती टीकाही यावेळी जरांगे यांनी केली.

भुजबळ हे भुंगारा आहेत

मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला. फडणवीस यांनी सांगितलं की भुजबळ भुंकतात. त्यांना काहीही कळत नाही. भुजबळ हे भुंगारा आहेत, अशा शब्दांत जरांगे यांनी भुजबळांना डिवलचलं.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था