धनंजय मुंडेंना मंत्रिपद?… मनोज जरांगे यांनी बाह्या सरसावल्या, म्हणाले, स्वप्नातही…
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मोठ विधान केले. आमचे नशीब इतके वाईट आहे. ज्यांना आम्ही मोठा करतो तेच आमच्या लेकरा बाळांकडे बघत नाहीत. मराठा समाजातील नेते जागृत करण्यासाठी या सांगलीच्या क्रांतिकारक भूमीतून मी आव्हान करतो की, मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र यावे, विनंती आहे.

नुकताच सांगलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. परत एकदा जरांगे पाटील हे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना दिसले. मागील काही दिवसांपासून परत एकदा राज्याची मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांचा समावेश होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यावर बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटले की, धनंजय मुंडेला पुन्हा मंत्रिपद हे स्वप्नात पण आणू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
जरांगे पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र एक नाही असे म्हटले जायचे पण आतापर्यंत तीन बैठक झाल्या. ही चपराक आहे सर्व मराठा एक आहे. त्यामुळे मुंबईला पाच पट लोक येणार. सांगली ही भूमी क्रांतिकारक भूमी आहे आणि क्रांतीमध्ये माघे राहिल शक्य नाही. एक घर एक गाडी मोहीम सुरू होईल. 100 टक्के मराठा मुंबईला दिसणार. सरकार मान्य नाही करणार असे होणार नाही. कायदा मोडू शकत नाही. ही लढाई शेवटची आहे. मी थकलो आहे. मी समाजाचा थोड्या दिवसाचा पाहुणा राहिलो आहे. माझे शरीर साथ देत नाही.
पुढे जरांगे म्हणाले, हे रेकॉर्ड ब्रेक लढाई होणार आहे. शांततेत मुंबईत जाणार. जाळपोळ करायची नाही. सरकारने तसा डाव टाकला तर बघू. ओबीसी आरक्षण आणि सख्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून घेणार. काही गोष्टी जबाबदारी पणाने कराव्या लागतात. लोकशाहीच्या आधारावर आणि कायद्याच्या आधारावर आम्हाला मराठा आरक्षण मिळेल. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, अशी भूमिका देखील जरांगे यांनी घेतलीये.
आमचे नशीब इतके वाईट आहे. ज्यांना आम्ही मोठा करतो तेच आमच्या लेकरा बाळांकडे बघत नाहीत. मराठा समाजातील नेते जागृत करण्यासाठी या सांगलीच्या क्रांतिकारक भूमीतून मी आव्हान करतो की, मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र यावे, विनंती आहे. अंतिम लढ्यात साथ द्या. माधवी ( हत्ती ) माघे येणार ती लोकांच्या भावनेशी जोडलेली आहे. आम्ही सर्व मराठा समाज त्यांच्या मागे उभा राहणार.
बीडबद्दल बोलताना जरांगे म्हणाले, बीडमधील क्राईम थांबणे सध्या अवघड आहे. गुंडगिरी संपायला 20 वर्ष लागतील. महादेव मुंडे याच्या प्रकरणात खरे नावे द्या. खरा तपास लागणार नाही. संतोष देशमुख कुटुंबाला रस्त्यावर आणले. अजित पवार पालकमंत्री आणि बीडमध्ये येऊन नाही चालणार. प्रशासन निर्वाचक ठेवणे गरजेचे आहे. बीडमधील प्रशासन वेगळे आहे. परळी तालुक्यातील स्टाफ वगळावे. दुसऱ्या जिल्ह्यातील स्टाफ भरती करावे. नुसतं पालकमंत्री होऊन उपयोग नाही, असेही त्यांनी म्हटले.
