Maratha Reservation : समाज म्हणून आमचा एकनाथ शिंदे यांना विरोध संपला – मनोज जरांगे पाटील

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि हजारो-लाखो आंदोलकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे.

Maratha Reservation : समाज म्हणून आमचा एकनाथ शिंदे यांना विरोध संपला - मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 11:53 AM

नवी मुंबई | 27 जानेवारी 2024 : गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि हजारो-लाखो आंदोलकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून आज पहाटेच त्याचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. यामुळे मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचं , उत्साहाचं वातावरण आहे.

मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेत सर्वांना संबोधित केलं.  सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे त्यांनू नमूद केले.  ‘ एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणाचे काम केले आहे. समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे’ असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने ज्या मागण्या मान्य केल्या, त्याबद्दलही ते बोलले. ज्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र द्यावं तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही द्यावं ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

सरकारने सगासोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढला असून तो मला देण्यात आला आहे. राज्यातील मराठा बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मराठवाड्यामध्ये कमी प्रमाणपत्र सापडली आहेत, त्याबाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करेल, असे जरांगे पाटील यांनी नमूद केले. एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षण चे काम केले आहे. समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्य पिंजून काढले. राज्यातील विविध भागात, गावा-खेड्यात सभा घेत त्यांनी आंदोलन तीव्र केले होते. अखेर त्यांच्या या लढ्याला यश मिळालं असून त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने मराठा बांधवांमध्ये आनंदाचा वातावरण आहे. आज सकाळी वाशी येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार असून त्यानंतर विराट सभा घेण्यात येणार आहे. त्याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Non Stop LIVE Update
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.