AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर थेट या मैत्रिणीचा फोन राज्यातील मोठ्या नेत्याला, प्रकरणाला गंभीर वळण, त्या मुलीच्या…

फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या निधनानंतर दररोज खुलासे होताना दिसत आहेत. दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. पोलिस या प्रकरणात तपास करत असून एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी केली जातंय.

डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर थेट या मैत्रिणीचा फोन राज्यातील मोठ्या नेत्याला, प्रकरणाला गंभीर वळण, त्या मुलीच्या...
Phaltan Medical Officer case
| Updated on: Oct 31, 2025 | 2:03 PM
Share

वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणात सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी तळाहातावर नोट लिहित पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप केली. या प्रकरणावर बोलताना मेहबूब शेख यांनी म्हटले की, आज मला एक माहिती मिळाली की, बदने यांची चाैकशी करण्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलीये. बदनेच्या चौकशीसाठी चांगला अधिकारी मिळाला नाही का? सुरेश कुटे यांची दूध डेरी 65 एकरमध्ये असून 4 हजार 200 कोटी त्याची किंमत आहे. ती पॉपर्टी फलटण निंबोरीमधील आहे 40 हजार कोटीची. अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. ननावरे यांनी आत्महत्या केली.

ज्यावेळेस माझ्यावर गुन्हा दाखल झाला, त्यावेळी तिकडेचे पोलीस येतात आणि मग मला अटक करतात. 420 कोण्याच्या दबावखाली दाखल केला? फलटणला गुंडा राज सुरू आहे. दोन माणसाचा जीव गेला तरी तुम्हाला जाग नाही येत. संपदा यांनी हातावर सुसाईड नोट लिहिलेला पेन कुठे गेला? पोलिसांनी फक्त संपदा यांचे चरित्रहान करण्याचा प्रयत्न केला, असे मेहबूब शेख यांनी म्हटले. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, मी अश्या गोष्टींना भीक घालत नाही. देवा भाऊ फलटणमध्ये जंगल राज सुरू आहे. या प्रकरणात तुम्ही SIT चौकशी का लावत नाही बाकी ठिकाणी लावतात.

तो पेन सापडला का तो ताब्यात घेतला का की तो घेऊन गेली संपदा? संदीप निंबाळकर यांचा खून झाला ज्याने मारला तो भाजपचा आहे. 12 मार्चला गुन्हा दाखल होऊन अटक का झाली नाही? आरोपीचे फोटो तुमच्यासोबत आहे, असेही त्यांनी म्हटले. नातेवाईकांना न सांगता डॉक्टर महिलेचा मृतदेह खाली का घेतला असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोण माजी खासदार आहे? देवा भाऊ क्लिन चीट देत आहेत. मला डॉक्टर महिलेच्या काकाने फोन केला. या प्रकरणात राजकारण दूर ठेवणे आवश्यक आहे.

मेहबूब शेख पुढे म्हणाले की, संपदा यांचा फोन 11.37 ला सीन कसा झाला. राजश्री रायगुडे नावाची ह्या महिलेने मला फोन केला आणि मला धमकावले आहे. तुम्ही फलटनला या मग मी दाखवते. या बाईंच्या नवऱ्याने खून केला होता. या ताई शिंदेवाडीत नोकरी करत होत्या. फलटन हा काय केंद्रशासित प्रदेश आहे का? संपदाने काय केले असेल देव जाणे. भाजपचा सरचिटणीसाने खून केलाय. त्यांच्या हाताची बोटं तोडली डोक्यात्या चिंध्या चिंध्या केल्या आहे. तो का सापडत नाही.

तुम्ही संवेदनशील असाल तर एसआयटी चौकशी करा. त्या हॅाटेलचे मालक हे निंबाळकर यांचेही कार्यकर्ते आहेत. महिला डॉक्टरचा मृतदेह कुंटुबातील कोणी असताना का खाली आणला. दोन लोकांनी आत्महत्या केली. उगाच कोणी आत्महत्या करत नाही. संपदाच्या मैत्रिणीने मला फोन केला आणि बरंच काही सांगितले आहे पण मी त्या मुलीची माहिती देणार नाही कारण तिच्या जीवाला धोका आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.