AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत सुमारे अडीच कोटींची रक्कम सापडली, भरारी पथकाची मोठी कारवाई, थेट व्हॅनमधूनच…

Mumbai : मुंबईच्या देवनार परिसरातून निवडणूक भरारी पथकाने 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. आता ही रक्कम नेमकी कुठून आली याचा तपास केला जात आहे.

मुंबईत सुमारे अडीच कोटींची रक्कम सापडली, भरारी पथकाची मोठी कारवाई, थेट व्हॅनमधूनच…
Cash MumbaiImage Credit source: Google
| Updated on: Jan 05, 2026 | 9:11 PM
Share

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. अशाच एका भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. त्यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. ही रक्कम कशासाठी आणि कुठून आली याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

निवडणूक भरारी पथकाची कारवाई

निवडणूक भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. ही रोकड ATM मध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या रकमेबाबत संशय असल्यामुळे या पैशांची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील तपास आयकर विभागाकजे सोपवण्यात आला आहे. सध्या ही रोकड देवनार पोलिसांकडे कस्टडी म्हणून ठेवण्यात आली असून ही रोकड कुठून कुठे नेली जात होती याची माहिती घेतली जात आहे.

आयकर विभाग चौकशी करणार

समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना या रकमेबाबत संशय आहे. सध्या निवडणूक असल्यामुळे पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. यावर बारीक नजर ठेवली जात आहे. संशयित वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. अशाच एका कारवाईत ही रक्कम आढळली आहे. या पैशांची पुढील चौकशी आयकर विभाग करत आहे. देवनार पोलिसांनी या घटनेची नोंद स्टेशन डायरीत केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

राज्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी

मुंबईसह राज्याच्या विविध भागात सध्या भरारी पथके तैनात करण्यात आलेली आहे. तसेच प्रमुख शहरांच्या प्रवेशद्वारावर नाकाबंदी करण्यात आली असून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. याचे कारण म्हणजे मतदानाच्या आणि प्रचाराच्या काळात राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होण्याची शक्यता आहे. मतदारांना पैशांचे आमिष दाखवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून अशा गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक.
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्...
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्....
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग.
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा.
भाजपचे 2 बडे नेते भडकले अन् दादांना इशारा, प्रचारादरम्यान युतीत जुंपली
भाजपचे 2 बडे नेते भडकले अन् दादांना इशारा, प्रचारादरम्यान युतीत जुंपली.
दादांच्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार अन निवडणुकीत पाणी पाजण्याचा इशारा
दादांच्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार अन निवडणुकीत पाणी पाजण्याचा इशारा.
वयोवृद्ध इंदुबाई नागरे निवडणुकीच्या मैदानात... शेती करून नाशकात प्रचार
वयोवृद्ध इंदुबाई नागरे निवडणुकीच्या मैदानात... शेती करून नाशकात प्रचार.
ठाकरेंची सेना आणि भाजप आमने-सामने, पनवेलमध्ये प्रचार तापला
ठाकरेंची सेना आणि भाजप आमने-सामने, पनवेलमध्ये प्रचार तापला.
मनसे सोडून धुरी भाजपात का? ठाकरे बंधूंवर निशाणा;'त्या' आरोपामुळे खळबळ!
मनसे सोडून धुरी भाजपात का? ठाकरे बंधूंवर निशाणा;'त्या' आरोपामुळे खळबळ!.
भाजपवासी झालेल्या संतोष धुरी यांच्या 'त्या' दाव्यानं खळबळ
भाजपवासी झालेल्या संतोष धुरी यांच्या 'त्या' दाव्यानं खळबळ.